तर मंडळी, नोटा बदलाचा निर्णय येऊन 3 दिवस होत आलेत,
लोकांनी याचे स्वागत केले, काहींनी विरोध केला हे यथासांग चाललेच आहे,
सरकारचे अभिनंदन करणारे मेसेज धूम धडाक्यात फिरले,
त्यात एक वाक्य पुनः पुनः येत होते,
"देशासाठी थोडी गैरसोय सोसण्याची आमची तयारी आहे"
" थोडा त्रास सहन करा, हे आपल्याच चांगल्या साठी आहे"
हे वाचून मनात प्रश्न आला,
या नोटा बदलल्याने नेमकी कोणाला गैरसोय होणार आहे? आपण मध्यम/उच्च मध्यम वर्गीय लोक जे सहन करतो आहोत त्याला गैरसोय म्हणायचे का?
आणि जी काही सो कोल्ड गैरसोय आपण सहन करतोय, त्या साठी थेट देशभक्ती ला मध्ये आणायचे का?
जे आपण फेस करतोय त्याला गैरसोय म्हणणार असू तर, निम्न मध्यमवर्गीय, आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले लोक जे फेस करत आहेत त्याला अस्मानी/सुलतानी संकट म्हणायचे का?
आपल्या पैकी किती जणांनी लाईन मध्ये उभे राहून, आपले पैसे बदलून घेतले आहेत? होम मेकर असाल तर घराचे आवरून , लहान मुले असतील तर शेजारी/घरी सोय करून ,किंवा त्यांना कडेवर घेऊन,
Working असाल तर कामावरून रजा घेऊन,
- किंवा खिशात 500 च्या जुन्या नोटा घेऊन, क्रेडिट डेबिट कार्ड न वापरता , paytm न वापरता शहरात फिरायचा प्रयत्न केला आहे? लोकल/बस अशा पब्लिक कॉन्व्हेयन्स नि, खाजगी गाडी दुचाकी न वापरता,
- घरातील वर्षाचा/महिन्याचा/आठवड्याचा किराणा न वापरता, घरात जे काही पैसे उरले असतील त्याने किराणा,दूध, क्वचित औषधे असे मॅनेज केले आहे?
- आपल्या कामवाली ला बाईला/ऑफिस स्टाफ ला तू 1-2 पूर्ण दिवस सुट्टी घे, तुझ्या पैशाचे मार्गी लाव मग ये, तो पर्यंत घरचे मिळून कामे करतो, थोडा त्रास आम्ही सहन करतो असे म्हटले आहे?
हि यादी इकडेच थांबवतो
मध्यम/उच्च मध्यम वर्गात लोकांना, ज्यांच्या कडे कमीतकमी 7-15 दिवसाचा किराणा भरलेला असतो, दूध/क्वचित वाणी सुद्धा उधार देतो
क्रेडिट /डेबिट /paytm /ओला मनी सगळे असते,
वापरायला खाजगी गाडी असते, त्यात 500 च्या पटीत पेट्रोल भरून घ्यायला पुरेश्या संख्येने जुन्या नोटा असतात,
कदाचित ऑफिस मध्ये असणाऱ्या बँक काउंटर वरून नोटा बदलून देण्याची व्यवस्था HR करणार असते.
मुख्य म्हणजे परिस्थितीची माहिती असल्याने आपले पैसे सुरक्षित आहेत, आणि आज नाही तर 15 दिवसांनी बदलून मिळतील या बद्दल खात्री असते. आणि 15 दिवसात पैसे नाही मिळाले तर हमखास पैसे उधार मिळतील ईतकी शेजारी पाजारी किंवा नातेवाईकात पत असते.
अशा वर्गाला देशभक्ती पोटी नेमकी कोणती " थोडीशी गैरसोय" सहन करायला लागते ते ऐकायला आवडेल एकदा.
गैरव्यवहार प्रकाशात यायला
गैरव्यवहार प्रकाशात यायला लागले. अच्छे दिन आ गये!
जनतेने स्वयंप्रेरणेने
जनतेने स्वयंप्रेरणेने सरकारविरुद्ध रस्त्यात उतरून बंड केले नाही असे म्हणायचे आहे. >>>
अजूनही लोक रस्त्यावर उतरून नासधूस करताना दिसत नाही आहेत.>>>>
नागरिकांनी पेटून उठून केलेल्या जाळपोळी किंवा तत्सम कृत्ये' असे म्हणायचे आहे>>>
बेफिकीर आपली मानसिकता निव्वळ जाळपोळ केली तर ते बंड, सरकार विरोधी आवाज आहे असे समजण्याची आहे. सामान्य जनता कधीही रस्त्यावर उतरून जाळपोळ दगडफेक करत नाही ती कामे कार्यकर्त्यांची आहे ज्यांना पैसे देऊन अथवा ज्वलंत भाषणे देऊन माथी भडकावून असे करून घेतात.
मागील कित्येक बंद मधे जे रस्त्यावर उतरलेले होते ते काय सामान्य लोक होती? बस पेटवणे, दगडफेक जी आधीच्या भारतबंद मधे झाली ती "सामान्य जनतेने स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरून केली होती?" आपल्याला असे म्हणायचे आहे का? नागरीक पेट्रोल भाववाढी विरुध्द पेटून उठलेले आणि तत्सम कृत्ये केली होती ? असे म्हणायचे आहे का?
तसे असल्यास त्यावेळेचा भाव आणि आत्ताचा भाव यांमधे प्रचंड तफावत आहे. मग आता पेटून का उठली नाही ?
याचा अर्थ काय होतो की त्यावेळेस सुध्दा सामान्य जनता रस्त्यावर कधी उतरत नाही ते दैनिक कामकाजात व्यस्त असतात. त्यांना जो त्रास होतो त्याचे उत्तर ते निवडणूकित देतात.
सामान्य जनता रस्त्यावर उतरत नाही तर राजकारण्यांना निवडणूकितून उत्तर देते.
जाळपोळ निव्वळ पैसे देऊन आंणलेले कार्यकर्ते करतात. मागील कित्येक वर्षात विविध पक्षांनी आयोजित केलेल्या बंद मधून ते दिसून आले आहे.
नोटा रद्द केल्याच्या
नोटा रद्द केल्याच्या निमित्ताने मोदींच्या नावाने शिमगा करण्याबद्दलचा "सध्याचा रेट" काय आहे बरे?
मात्र एक आहे, वयपरत्वे, आताशा मला त्या ममतादिदींनी केला तसा थयथयाट नाही करता येणार....
बाकी माझी फारच गैरसोय झालिये....... गेल्या नोव्हे. ८ तारखेनंतर मी एटीएम मधुन पैसे काढू शकलेलो नाही.
तेव्हडाच इन्कम होईल... नै का? 
नोकरीमुळे ब्यान्केत जाऊन पैसे काढू शकलेलो नाही. रजा टाकुन जाणे परवडणार नाही.
आता महिना होऊन गेला, खिशात फुटकी कवडी नाही.... म्हणून तर वरचा रेटचा प्रश्न विचारला आहे......
आता मी काय करु? कोतबो मधे टाकू का प्रश्न?
संघाच्या एका गोशाळेत जा....
संघाच्या एका गोशाळेत जा.... तिथे बैल आलेला चालत असेल तर ते तुला अन्नपाणी देतील
प्रसादक, धाग्याचा विषय पक्षीय
प्रसादक,
धाग्याचा विषय पक्षीय राजकारण नाही. नोटाबंदीमुळे झालेली गैरसोय असा आहे. (कोणाची व किती, असा). शिवाय, नोटाबंदीचा निर्णय योग्य होता परंतु अंमलबजावणी व्यवस्थित नाही हे विषय त्यात आपोआप येणारच असा माझा समज आहे. कोणत्या पक्षामुळे दंगेधोपे व्हायचे हे इथे कशाला? सामान्य नागरीक सरकारवर भडकलेले नाहीत हे आजूबाजूला सहज दिसत आहे. शोधून शोधून दुर्दैवी बातम्याच पोस्ट करायच्या म्हंटल्या तर ते अशक्य नाहीच. पण उपासमार वगैरे झाल्यानंतर सामान्य नागरीकच रस्त्यावर येतात. अश्या वेळी नेत्यांनी त्यांना पेटवावे लागत नाही. परंतु तसे होताना दिसत नाही. (बहुधा सपना हरिनामेंचेही हेच म्हणणे असावे).
>>>> anilchembur | 7
>>>> anilchembur | 7 December, 2016 - 10:52
संघाच्या एका गोशाळेत जा.... तिथे बैल आलेला चालत असेल तर ते तुला अन्नपाणी देतील
<<<<
लिंबूटिंबू ह्या सदस्याचा कितीही व कसाही अपमान केला तरी चालते असे आजकाल वारंवार दिसत आहे.
सामान्य नागरीक सरकारवर
सामान्य नागरीक सरकारवर भडकलेले नाहीत हे आजूबाजूला सहज दिसत आहे. >> सध्याचा सामान्य नागरिक सोशल मिडियावरून सरकारवर टीका करत आहे. हे आजुबाजूला सहज दिसत आहे. अर्थात काहींना हे दिसणार नाही हे सहाजिक आहे म्हणा. सरकार वर भडकले नाही हे कशावरून बोलत आहात?
सोशल मिडीयावर ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्या सर्व विरोधी पक्षांनी मॅनेज केलेल्या आहे का? असे असेल तर सरकार च्या समर्थनात बोलणार्यांना सत्ताधार्यांनी मॅनेज केले आहे असे म्हणायला वाव आहे.
वर लिंबुटिंबु महाशय मोदी विरोधात बोलणार्यांचा रेट विचारत आहे. त्यांना सत्तेच्या समर्थनात बोलायचा किती रेट मिळतोय बीजेपी आयटी सेल किती देत आहे हे विचारून घ्यावे.
मी इथे प्रतिसाद देईन, मग हा
मी इथे प्रतिसाद देईन, मग हा विषय संपवून टाका.
प्रसादक, सुदैवाने मी
प्रसादक,
सुदैवाने मी आयुष्यातला अधिक काळ इन्टरनेटवर घालवत नाही. प्रत्यक्ष जगात घालवतो. त्यामुळे मला जे दिसतं ते जालावर जे दिसत असेल त्यापेक्षा खूप वेगळे असू शकेल ह्याची जाणीव आहे. पण काहीजण ह्या प्रत्यक्ष जगाला अजूनही खरे जग समजतात आणि ते मला पटते.
विनयच लाजून लपून बसला असेल!
विनयच लाजून लपून बसला असेल!
प्रत्यक्ष जगात घालवतो>> मग
प्रत्यक्ष जगात घालवतो>>
मग सोशल मिडीयातून ९०% पाठिंबा नोटबंदीला मिळाला आहे म्हणजे जनता खुश आहे या अर्थाचे वाक्य आपण या धाग्यावर आधी लिहिले होते. हा विरोधाभास का?
प्रत्यक्ष जगात तर समोरासमोर सरकारला शिव्याशाप देत आहे. हवे तर ज्याचा पैसा बँकेत अडकला आहे. एटीएम मधून पैसे मिळत नाही, २४ हजाराची लिमिट असुन ही ५ हजारपेक्षा जास्त पैसे बँकेतून देत नाही अशा लोकांना विचारून बघा. तुम्हाला "प्रत्यक्ष जगाचे उत्तर" आपसूक मिळेल.
>>>> लिंबूटिंबू ह्या सदस्याचा
>>>> लिंबूटिंबू ह्या सदस्याचा कितीही व कसाही अपमान केला तरी चालते असे आजकाल वारंवार दिसत आहे. <<<< हे बर्याच प्रमाणात खरे आहे, व त्या त्यावेळेस तसल्या कोणत्याही डाव्या/लाल्या आयडींवर कसलीही कारवाई होत नाही हे देखिल तितकेच खरे आहे. मात्र.......
माझ्यापुरते विचाराल, तर मी म्हणेन की कस्ला हो अपमानफिपमान? कावळ्यांकडुन कोकिळेसारखे गाणे / तान / लकेर अपेक्षिणे हीच आपली चूक ठरत असेल, तरी कावळ्यांच्या कर्कश्श्य कावकावेने आपला अपमान झालाय असे समजुन का घ्यावे?
>>>>तुम्हाला "प्रत्यक्ष जगाचे
>>>>तुम्हाला "प्रत्यक्ष जगाचे उत्तर" आपसूक मिळेल.<<<<
मला उत्तर केव्हाच मिळालेले आहे. ते तुम्हाला सहन आणि मान्य होणार नाही. तुमचा त्रास मला समजतो, पण जनतेचा सध्या फूस लावून घेण्याचा मूड दिसत नाही.
(अवांतर - खूप गैरसोय असलेले लोक आंतरजालावर का संताप व्यक्त करत बसतात? निदर्शने करायला हवीत खरे तर)
तुमचा त्रास मला सुध्दा समजत
तुमचा त्रास मला सुध्दा समजत आहे. समोर लोक सरकारला कितीही शिव्याशाप देत आहे ते तुम्हाला सहन होत नाही. कारण आपण सरकारच्या या तुघलकगिरीचे आंधळे समर्थन करत आहात. असो
जनता यास चोख उत्तर देईल.
>>> त्यांना सत्तेच्या
>>> त्यांना सत्तेच्या समर्थनात बोलायचा किती रेट मिळतोय बीजेपी आयटी सेल किती देत आहे हे विचारून घ्यावे. <<<<
आम्ही "मोदी/बीजेपी समर्थनार्थ" "बिनामोबदल्याचे" एकदाच २०१४ मध्ये बोल्लो...... कित्येकांनी तर तेव्हा घड्याळातुन वेळ दाखवित पंजातुन मोबदला घेतला, बोल्ले मात्र कमळाकरता...
आता आम्ही बिनामोबदल्याचे एकदम २०१९ मध्ये बोलू...... २०१४ पेक्षा मोठ्या आवाजात बोलू..... एकमुखाने एकदिलाने बोलू....!
त्यातुन हजारपाचशे नोटा रद्द झाल्याने घड्याळाची वेळ दाखवित पंजामधुन लाल कापडाखालुन मोबदला दिला जाणे अशक्यप्रायच आहे...
प्रसादक तुमचा मुद्दा
प्रसादक तुमचा मुद्दा कळाला
आणि हा मुद्दा अंत हीन आहे (निदान 2019पर्यंत तरी)
सो आपण परत आपल्या गैरसोयीकडे लक्ष देऊ या,
माझ्याशी भांडून काय उपयोग आहे
माझ्याशी भांडून काय उपयोग आहे प्रसादक? मी येऊनजाऊन एक बेकार भटक्या (भटक्या म्हणजे भटकणारा).
खरा त्रास ज्यांना होत आहे त्यांचे प्रश्न का नाही सोडवत तुम्ही?
असो! आपली भेट आता रात्री किंवा उद्या!
९ लाखाचा कोट घालणारा ,
९ लाखाचा कोट घालणारा , दिवसाला ५ वेळा कपडेपट बदलणारा सुध्दा स्वत:ला फकिर संबोधत आहे.
कमाल आहे आजकाल सत्तेचे समर्थक स्वतला भिकारी म्हणून घेत आहे. नविन ट्रेंड आला आहे.
वाट लावायला सुरुवात झाली का
वाट लावायला सुरुवात झाली का या पण धाग्याची?
कोणत्या पक्षामुळे दंगेधोपे
कोणत्या पक्षामुळे दंगेधोपे व्हायचे हे इथे कशाला?
<<
कस्ला मस्त मानभावीपणा आहे हा!
अवतरण चिह्नातले "उत्स्फूर्त" दंगे या धाग्यावर प्रथम कुणी आणलेत ते इतर कुणाला समजले नाही तरी मा. अॅडमिन यांच्या लक्षात असेलच.
मुद्दाम उचकवणारे प्रतिसाद देण्याबद्दलच्या त्यांच्या सूचना निरुपयोगीच, हे सिद्ध केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.
आणि हा मुद्दा अंत हीन आहे
आणि हा मुद्दा अंत हीन आहे (निदान 2019पर्यंत तरी)>> 2024 (२०१९ ला मोदींना हरवेल असा एकही विरोधी पक्ष सध्यातरी दिसत नाही आहे. तेव्हा आवडो न आवडो मोदींना पर्याय नाही.)
हा मुद्दा कधीपर्यंत अंतहीन
हा मुद्दा कधीपर्यंत अंतहीन आहे ,आता यावर वाद नकोत
सोनू, या धाग्यावर हा धरून
सोनू, या धाग्यावर हा धरून माझे किती प्रतिसाद आहेत हे मोजून सांगा. अड्डय़ावर माझे नाव घेऊन बदवामी करताय. कामं नाहीत का दुसरी?
बाकी माझी फारच गैरसोय
बाकी माझी फारच गैरसोय झालिये....... गेल्या नोव्हे. ८ तारखेनंतर मी एटीएम मधुन पैसे काढू शकलेलो नाही.
नोकरीमुळे ब्यान्केत जाऊन पैसे काढू शकलेलो नाही. रजा टाकुन जाणे परवडणार नाही.
आता महिना होऊन गेला, खिशात फुटकी कवडी नाही...
गैरसोय वाल्यांच्या यादीत आल्याबद्दल अभिनंदन
खरा त्रास ज्यांना होत आहे
खरा त्रास ज्यांना होत आहे त्यांचे प्रश्न का नाही सोडवत तुम्ही
प्रश्न सोडवायलाच नव णेत्रूत्व आणलय ना ?
खरा त्रास ज्यांना होत आहे
खरा त्रास ज्यांना होत आहे त्यांचे प्रश्न का नाही सोडवत तुम्ही
>>> सरकार कशाला निवडून ठेवले आहे?. शोपीस साठी की सतत रडण्यासाठी?
PM Modi accepts
PM Modi accepts demonetisation is a blunder
http://naradanews.com/2016/12/pm-modi-accepts-demonetisation-is-a-blunde...
खूप गैरसोय असलेले लोक
खूप गैरसोय असलेले लोक आंतरजालावर का संताप व्यक्त करत बसतात? निदर्शने करायला हवीत खरे तर >> तर्कशुद्ध !!
@सपना हरिनामे आपण
@सपना हरिनामे
आपण संतुलितपणाचा अभिनय किती दिवस टिकवू शकाल याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तुमच्या प्रतिसादांचं वैशिष्ट्य म्हणजे इकडची किंवा मोदीविरोधातील एक कमी महत्वाची बाब मान्य करायची आणि त्याबदल्यात मोठ्या चुकांवर पांघरूण घालायचे. निर्णय चांगला होता पण... हे म्हणजे क्रेडीट घ्यायचं पण अंगाशी आलं की रिझर्व्ह बँकेकडे बोट दाखवायचं. तुम्ही एकट्याच हुषार नाहीत. आंजावर असे लाखो लोक आहेत. त्यामुळे ही ट्रीक जुनी झाली. तशीही फारशी ब्रिलियंट वगैरे नाहीच.
काही जण लोकांनी आपल्याला
काही जण लोकांनी आपल्याला नावे ठेवू नयेत म्हणून ब्रिलीयंट ट्रिक्स करतात. लोक आपल्याला काय किंमत देतात याचा अचूक अंदाज असणे ही साधी गोष्ट नाही.
अशांशी मी बोलत नाही हे अशाच एकाला पूर्वी कळवलेले होते.
Pages