आजपासून ५०० आणि १००० रुपयेच्या नोटा चलनातून बाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 8 November, 2016 - 10:36

आज मध्यरात्रीपासूनच!

लागला घोडा काळ्या पैश्याला Happy

- श्री नरेंद्र मोदी !!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरं,

सुनिधीतैंसाठी खास आजच्या सायंकाळच्या सभेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

कार्यक्रमाचं नाव आहे, कॉपीपेस्ट.

***

झाडू | 14 November, 2016 - 22:06

तरीही आजच्या ठळक बातम्यांत,

महाराष्ट्र सरकारने २४ ता. पर्यंत नोटा घेणे बंधनकारक असे डिक्लेअर केलेय. या बंधनाच्या बदल्यात मला/इतर खासगी रुग्णालयांना टॅक्स असेसमेंटमधून सूट वगैरे काहीही डिक्लेअर केलेले नाही. फक्त "कडक कारवाई करू" असा हाग्या दम. (सग्गळेच डॉक्टर्स पास होण्यासाठीदेखिल लाच देऊन अन नंतर निरंतर ब्लॅक मनी कमवणारे व्हिलन्स अस्तात नै?)

आमच्या लॅबमधे रँडम बीएसएल ३० रुपयांत चेक होते. ते करून १००० ची नोट पुढे करणारे व नाही घेतली तर भांडण करणारे नमुने वाढायला लागलेत.

मला एक समजत नाही.

जर भारताचे केंद्रसरकार या नोटांना "रंगीत कागद" इतकीच व्हॅल्यू आहे, इट्स नॉट लीगल टेंडर, असे डीक्लेअर करून चुकले आहे, तर, राज्य सरकारे कोणत्या मायपॉवरमधे, वा कोणत्या कायद्यानुसार या कागदांना करन्सी म्हणा व त्यात व्यवहार करा, अशी जबरदस्ती कुणाही नागरिकावर करू शकते?

यार, मला जेन्युइन गरजू दिसतोय तर मी या भुक्कड सरकारच्या नाकावर टिच्चून स्वतःहून फुकट वा वाट्टेल ती रिस्क घेऊन ट्रीटमेंट करतोच आहे.

पण उगंच कानाखाली बुळ्बुळ होतंय. पोटात मुरडा मारल्या"सारखं" वाटतंय वगैरे तक्रारींसाठी १००० च्या नोटा नाचवत भांडणारे कामचुक्कार माझ्या बोकांडी का??

साती | 14 November, 2016 - 22:11

आमचे सिद्रामप्पा बरे म!
*
झाडू | 14 November, 2016 - 22:31

ते काँग्रेजी आहेत ना? गद्दार देशद्रोही वगैरे?
*
भरत. | 14 November, 2016 - 22:34

चिडू नका. उरलेले परत करायला सुट्टे नाहीत म्हणून सांंगा.
*
झाडू | 14 November, 2016 - 22:37 नवीन

चिडू नका. उरलेले परत करायला सुट्टे नाहीत म्हणून सांंगा.
<<
एका नमुन्याने तिथे ९७० रुपयांचा चेक मागितला हसून हसून गडबडा लोळण
अरे भाऊ, तुझ्या अकाउंटात भरता येतात, तर तूच ३० रुपयांचा चेक दे म्हटल्यावर कटला.

*

सोऽहं!

anilchembur | 14 November, 2016 - 22:39

Is it really written ?

<<

चाणक्य व नॉस्ट्रॅडेमसच्या नावाने काय वाट्टेल त्या पुड्या खपवणार्या आधुनिक पुराणिकबोवांबद्दल मला नितांत आदर आहे. :हात जोडणारी व्हॉअ‍ॅ स्मायली:
(भगवा) :झेंडा: :झेंडा: :झेंडा: :झेंडा:

हसू नका.

चाणक्य व नॉस्ट्रॅडॅमसचं नांव काढलं, की ते झेंडे अन हात जोडणे मस्ट असते.

तसेच मिल्ट्रीचं नांव काढून तिरंगे.

(रच्याकने: भारताची अख्खी मिल्ट्री तिथे मिल्ट्रीत भरती व्हायच्या आधी विजयादशमी संचलनात सहभागी होत असे, व ते सैनिक जी काही राश्ट्रभक्ती करतात, ते त्या संचलनांच्या संचालकांमुळेच, अशी माझी पक्की खात्री पटायला लागली आहे.)

एक इरसाल नमुना भेटला मुंबई व्हीटी स्टेशन वरचा हमाल. माझ्या अवतारावरून अलिबाग ( अमेरिका) से आयेला है वाटले असावे. माझ्याकडची दोन हजाराची नोट पाहून साहेब, सुट्टे करून देतो प्रवासात बरे पडेल असे म्हणून पाचशेच्या चार नोटा देउ केल्या !

Is it really written ?
>>>>
खाली लिहिलेय न फ्रॉम व्हॉटसपे. मग खरं खोटं करायची माझी जबाबदारी संपली.

मला तर नॉस्त्रादेमस नावाचा कोणी होऊन गेलाय का खरंच हे देखील माहीत नाही. मी कधी आशिया खंडाच्या बाहेर गेलो नाही आणि तो तिकडे प्यारीसला. पण वाचायला मजा येते. जसे महाभारत बघायला मजा येते. खरेच घडलेय का असे नि याव नि त्यांव कोणी सांगितलेय

बरोबर आहे ऋन्मेष,
तिकडे त्या ऑरेंज मॅनच्या हातात न्यूक कोड जातील, इथे व्हाय वी शुड नॉट यूज इट फर्स्ट असे 'व्यक्तिगत' मत असणार्‍यांच्या हातात.
चार दोन धमाके आणि मग हजार वर्षांची ग्यारंटीड शांतता!

नमो ट्रम्पाय!

मी कधी आशिया खंडाच्या बाहेर गेलो नाही आणि तो तिकडे प्यारीसला.

च्या गावात, तरी त्याने तुझ्याबद्दल लिहून ठेवले आहे. माहीती तरी आहे का?

“Kings steal forests, the sky will open, the fields will be burned by heat,” the seer writes.

म्हणजे २० व्या शतकात मायबोलीवर एक आयडी येईल ऋन्मेष नावाचा, तो मायबोलीरुपी जंगल ताब्यात घेईल, त्याच्या विषयांना आणि धाग्यांना आकाशही दाहीदिशा मोकळे असेल, आणि या धगीत बाकी आमच्यासारखी रोपटी जळून खाक होतील.

झाडू, ऐकू आलं. Happy
आमच्या लॅबमधे रँडम बीएसएल ३० रुपयांत चेक होते. ते करून १००० ची नोट पुढे करणारे व नाही घेतली तर भांडण करणारे नमुने वाढायला लागलेत. >> हे खरंच अवघड आहे. आणि ९७० चा चेक द्या म्हणणरे भेटतील असे वाटलेच नव्हते कधी. संकटात असतानाच डोके जास्त चालते ते म्हणणे खोटे नाही. पण 'इतके बील झाले तरच ५००/१००० घेऊ अशी पाटी' लावली तर ? विचार करतीये ३० रु. कसे घ्यावेत त्यांच्याकडुन. चेक खोटे असु शकतात.
मग काय केलेत? नाहीतर दवाखान्याच्या सहीचा लीगल कागद द्या. 'भविष्यात ९७० चा इलाज फुकट केला जाईल व उरलेले पैसे घेतले जातील' अथवा 'चलन उपलब्ध झाल्यावर ९७० घ्यायला या'. हे असंच आपलं सुचले ते लिहिले बरं का. चुकीचा पण विचार असु शकेल हा.

कोणीतरे दागिनेव्यापार्‍याने आज ६००० कोटीची कॅश भरली व शिक्षाटॅक्स भरून ६०० कोटी की काय इतकेच घेऊन गेला म्हणे.

इतके रुपये झाले तरच पाचशे /हजार घेऊ असा बोर्ड लावण्याचे स्वातंत्र्य 'महाराष्ट्रात' सरकारने डॉक्टरांना दिलेले नाही.

कर्नाट्कात आहे आणि मी ते वापरत नाहीये , ते सोडा!

समजा काका ३०रू त टेस्ट करून उरलेले ९७० रु देतायत परत हे कळले तर दोन सुया टोचून ३० रू च्या बदल्यात काकांकडे नोटा खपवायला रांगा लागतील.
समजा असे ५० पेशंट आले तर ५०००० रू होतील.
जेव्हा काकांना खरेतर १५०० मिळालेले असतील.
आता काका दररोज ते ५०००० बँकेत भरणार ओवर अँड अबोव्ह त्यांचा नेहमीचा टर्नओवर कारण या नोटा साठवल्यातर आपल्याला नंतर त्रास!
मग खात्यात नऊ तारिख ते ३० तारिख दररोज ५०००० + ट्रान्सेक्शन दिसणार.
म आयकर विभाग त्यांच्याकडे डोळे मोठे करून बघणार.

(आणि यांच्याकडेच बघणार कारण बाकी ९०टक्के डॉक्टर्स सरळ धंदापाणी बंद करून बसलेत किंवा जुन्या नोटा घेत नाहीयेत.)
मग इथले कुपन प्रेमी देशभक्त काकांना होणारा मनस्ताप दूर करायला मदत करणार नै!

लोकांना रिऍलिटी शो च्या रांगेत उभे राहायला आवडते ज्यात यश कमी अपयश जास्त पदरात पडते, डिपार्टमेंट स्टोर मध्ये लागलेल्या सेल साठी रांगा लावतील त्यात ओरिजिनल कमी नकली जास्त मिळते, जिओ च्या सिम साठी लाईन लावतील त्यात डेटा जास्त मिळतो पण अनिश्चितताची टांगती तलवार आहे. आणि इथे ATM / बँकेत स्वतःचे पैसे डिपॉजिट / काढण्यासाठी लोकांना लाईन लावायला कंटाळा येतोय किंवा त्याचा त्रास होतोय...कमाल आहे.

आणि इथे ATM / बँकेत स्वतःचे पैसे डिपॉजिट / काढण्यासाठी लोकांना लाईन लावायला कंटाळा येतोय किंवा त्याचा त्रास होतोय..
>>>>
अपर्णाजी फरक आहे आपण दिलेल्या उदाहरणात आणि यात. किंबहुना अशी उदाहरणे व्हॉटसपवर चिक्कार फिरत आहेत म्हणून सांगतो, त्या उदाहरणातील लाईन त्या लावणार्‍या लोकांनी स्वत: निवडली असते. लावायची की नाही किंवा लावलीच तर कधी लावायची हे निवडण्याचा पर्याय त्यांच्याकडे असतो. ईथे ईच्छा असो वा नसो सरसकट लावावीच लागत आहे.

उदाहरणार्थ मी जिओ साठी कधी लाईन लावली नाही. मी कधी साड्यांच्या सेलला कधी लाईना लावली नाही. ईथे मात्र लावावी लागणारच. तर मग मला त्रागा करायचा पुर्ण हक्क आहे.

अर्थात, ही भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई आहे, यातून आपल्याच देशाचे भविष्य सुधारणार आहे पर्यायाने आपल्याचा अच्छे दिन बघायला मिळणार आहे हे खरे मानले तरी ती नंतरची गोष्ट आहे. तसे होईलच की नाही याची शाश्वती नाही, किंबहुना ज्यांनी ही नोटाबंदी लादली आहे त्यांचा तसा खरेच हेतू आहे की नाही याबाबत बहुतांश लोक संभ्रमातच आहेत, किंवा राजकारण्यांवर या देशात कोणीच विश्वास ठेवत नाही असे म्हटले तरी चालेन. त्यामुळे लोकांच्या चीडचिडीचे मला तरी नवल वाटत नाहीये. यात सरकारचे विरोधक याचाच फायदा घेऊन लोकांना भडकावणार. समर्थक देशभक्तीचे मेसेज फॉर्वर्ड करतात खरे पण ते एक प्रकारची इरीटेटींग भावनाच वाढवते. अश्यात माझ्यामते खरे खोटे काहीही असो, मात्र ज्याला त्रास होत आहे त्याला उपदेश करायचे टाळून त्याची चीडचीड न वाढवणेच या स्थितीत उत्तम.

मी ना मोदी समर्थक, मी ना मोदी विरोधक, माझी निष्ठा देशाशी, माझे धोरण - वेट अ‍ॅण्ड वॉच !

नोटबंदी मध्ये जनार्दन रेड्डी च्या मुलीचे 500 करोड चे लग्न. ...जाऊ द्या हो आपण आपले लाइन मध्ये उभे राहूत काळा पैसा घेऊन

http://m.indiatoday.in/story/janardhan-reddy-daughter-wedding-fancy-arra...

आज कुठेतरी संतप्त लोकांनी बॅक कर्मचार्‍यांनाच बँकेत डांबून ठेवले. पोलिसांने येऊन सुटका केली.
तसेच दिल्लीला एका युवतीने एटीएम रांगेत चिडून(?) आपले कपडे काढले.
दोन्ही बातम्या पेपरात सापडतील, आता लिंक नाही शोधत बसत.

कुठे कोणाची परिस्थिती चांगली आहे तर कुठे कोणाची वाईट
मोदी समर्थक आणि विरोधक दोघे मात्र आपापल्या सोयीची उदाहरणे फिरवत आहेत.

काही समर्थकांकडून आपण कसे दहापंधरा मिनिटांतच पैसे काढून आलो याचे फेसबूक स्टेटस टाकण्याचे फॅड आले आहे.

याउलट काही विरोधक अफवा फिरवत आहेत जसे की विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले ही लेटेस्ट अफवा. आता यांना कोण सांगणार, की कर्जे अशी माफ केली जात नाहीत. ते आपल्या डोक्यावर घेऊनच मल्या वर जाणार.

पण एकंदरीत लोकं चिडण्याच्या ज्या घटना देशभरात घडत आहेत ते पाहता आपल्या विविधतेने नटलेल्या देशात सगळीकडे परिस्थिती एकसारखी नसणार हेच खरे.

दोन हजार रुपयांची नोट हे एक गंडलेले डिसीजन आहे.

आज ऑफिसहून निघताना एक तुलनेत कमी लाईनचे एटीएम दिसले. सगळे धावत पळत सुटले. पण तिथे पोहोचता समजले की तिथे फक्त २००० च्या नोटा मिळणार आहेत. सारे परत फिरले. ती नोट चालवायची कुठे आणि आता तिचे सुट्टे कोन देणार हा प्रश्नच आहे. जिथे खरेच मोठा खर्च असतो तिथे तर असेही कार्डच वापरले जाते. आणि जो खर्च छोटा असतो जसे दूध अंडी भाज्या रिक्षा वगैरी तिथे कोणी २००० ची नोट काढली तर मारतीलच त्याला..

याउलट काही विरोधक अफवा फिरवत आहेत जसे की विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले ही लेटेस्ट अफवा. >> रिझर्व्ह बँकेनेच पसरवली का ही अफवा ? आणि इंडीयन एक्स्प्रेस सहीत बड्या वर्तमानपत्रांनी शेअर केली का ?

दोन हजार रुपयांची नोट हे एक गंडलेले डिसीजन आहे.>>> मला वाटते दोन हजाराची नोट हे काळा पैसा बाहेर काढण्याकरीता टाकलेले एक आमिष आहे. काळा पैसा जमा करणारे कमी जागेत जास्त काळा पैसा साठवण्याकरीता दोन हजारांच्या नोटांचा वापर करतील. आणि काही वर्षातच सरकार दोन हजाराची नोट रद्द करून त्यांना पुन्हा तोंडघशी पाडेल.

अजून मुंबईमध्ये ५०० च्या नोटा आल्या नाहीत का एटीएममध्ये? इथे कालपासून्न काही एटीएम मध्ये थोड्या ५०० च्या नोटा यायला लागल्यात.

>>>>>>एक इरसाल नमुना भेटला मुंबई व्हीटी स्टेशन वरचा हमाल. माझ्या अवतारावरून अलिबाग ( अमेरिका) से आयेला है वाटले असावे. माझ्याकडची दोन हजाराची नोट पाहून साहेब, सुट्टे करून देतो प्रवासात बरे पडेल असे म्हणून पाचशेच्या चार नोटा देउ केल्या !-

मग घ्यायच्या ना, आणी बँकेतुन बदलुन घ्यायच्या. हमालाला तेवढिच मदत झाली असती.

आज नेहमीसारखे ऑफिसला जायला रिक्षा न पकडता चाली चाली करत गेलो. 25 मिनिटे. रिक्षाचे सुट्टे पैसेही वाचले आणि तब्येतीला फायदाही झाला.
रत्याने जाताना एक चांगल्या घरातील पस्तीशीची बाई दिसली. बरयापैकी जीन्स टॉप घातलेली. समोरून मला क्रॉस करून गेली आणि अचानक मला मागून आवाज देत थांबवले. माझ्याकडे दहावीस रुपयांची मदत मागितली. ईतरवेळी मी मनावर दगड ठेवत अश्यावेळी सरळ निघून जातो कारण ही फार कॉमन ट्रिक झालीय आजकाल. पण सध्याची स्थिती अशी झालीय की कोणावर हात पसरायची वेळ येईल सांगता येत नाही. त्यामुळे डोक्यात तेच चालू असल्याने मी सहज तिला वीस रुपये काढून दिले. तिने अजून दहा मिळतील का विचारले. मी पाहिले तर दहाची शेवटची नोट शिल्लक होती. नाही म्हणालो. तसे तिने पाचेक रुपयांची चिल्लर मागितली. ती मी दिली. तिच्या हातात एक पिशवी होती ज्यात चपातीभाजी वगैरे दिसत होते. जनरली रस्त्याक्डेच्या भिकारयांकडे अशी असते. पण तिच्या पेहरावाला आणि एकूणच व्यक्तीमत्वाला ते शोभत नव्हते. तिचे बोलणेही जेन्युअन वाटत होते. जर तिने मला फसवले असेल तर एकाअर्थी ते बरेच असे म्हणावे लागेल. जर तसे नसेल तर अशी वेळ येणे वाईट..

@ अल्पना >>>> आम्हाला १७ तारखेलाच मिळाल्या ५०० च्या नोटा ईकडे अंधेरीत.

अगदी खेळण्यातल्या वाटतात

*'On the day money turns into worthless pieces of paper; New threads upon threads will be woven on the tongue of mother on web'*

_Nostradambis_

पहा त्या काळात नाश्त्रोडांबिसकाका काय म्हणून गेले? त्याकाळी लोकांना काही कळले नाही. पण आता त्याचा अर्थ लागत आहे. कि पाचशे हजार च्या नोटा रद्द झाल्यावर मायबोली वर अनेक धागे निघतील Lol Lol

हॅपी demon डे मित्रो .

लोकांच्या पुनरावलोकना साठी,
2 वर्षांपूर्वी" नोटबंदी ने काय साध्य होईल" या बद्दल स्वतः:ची काय मते होती, ती आजच्या रिऍलिटी बरोबर ताडून पाहण्यासाठी धागा वर काढत आहे.

Pages