क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा नसेल झाला तोच स्कोअर, तरी दुसर्‍या दिवशी पेपर आल्याखेरीज कळणार कसे?
नि त्याच्या बाबतीत तो कुठल्या दिवशीचा स्कोअर सांगतोय ते काय माहित? पण तो इंग्लंडला जाऊन आला होता, नि इंग्रजीत सांगायचा म्हणजे खरा असेल.

समजा नसेल झाला तोच स्कोअर, तरी दुसर्‍या दिवशी पेपर आल्याखेरीज कळणार कसे?
नि त्याच्या बाबतीत तो कुठल्या दिवशीचा स्कोअर सांगतोय ते काय माहित? पण तो इंग्लंडला जाऊन आला होता, नि इंग्रजीत सांगायचा म्हणजे खरा असेल. आपण साधारण १९५५ सालच्या गोष्टी करतो आहोत - तेंव्हा तसेच असायचे.

आपण साधारण १९५५ सालच्या गोष्टी करतो आहोत - तेंव्हा तसेच असायचे. >> असेल बुवा, तेंव्हा क्रिकेट फारच स्लो होते असे ऐकलाय Lol

गावस्कर, अमरनाथ, गांगुली, लक्ष्मण इत्यांदीचे म्हणणे मनावर घेऊन पुजाराला खेळवतील का ? तुम्हाला काय वाटते ? पांड्याऐवजी पुजारा नि शमी/यादव च्या जागी कुलदीप (ड्राय पिच साठी) ? शमी किंवा उमेश मधे एकच निवडायचा असेल मधे कोणाला खेळवाल ? शमीला खेळ्वले तर तो पुढचे सामने खेळू शकेल कि नाही ह्याबद्दल काय वाटते ?

भाऊ, कृष्णा सोलकरच्या all round abilities बद्दल वाचलेले आठवत नाही. फक्त तो brilliant fielder होता हे आठवते.

सोलकर हा भलताच gutsy, versatile खेळाडू होता व त्याचे reflexes sharp होते. कर्णधारासाठी असा खेळाडू संघात असणं किती तरी आश्वासक असावं. तो कोणत्याही क्रमांकावर परिस्थितीनुसार फलंदाजी करायचा, मध्यमगती गोलंदाजी करायचा ( बायकाॅटसारखया चिवट फलंदाजाला तो हैराण करायचा ), व क्षेत्ररक्षणात तर त्याने नवीन मापदंडच निर्माण केला ! मैदानावरील त्याच्या रांगडया विनोदबुद्धीचे अनेक किस्से सांगितले जात असत , त्याच्या नांवाभोवती आंकडेवारीचं वलयं नसलं तरीही he was a darling of his teammates & genuine cricket lovers of his times !

"भाऊ, कृष्णा सोलकरच्या all round abilities बद्दल वाचलेले आठवत नाही." - क्या ब्बात कर रैले यार! एका इंग्लंड दौर्यात जेफ्री बॉयकॉट ला सातत्यानं आऊटस्विंगर वर सतावून त्याची विकेट काढून बॉयकॉट ला त्यानं स्लेज केल्याचा किस्सा फेमस आहे.

पण हे सगळे जरी असले, तरी मंकड (वाचीव) आणी कपिलदेव हे खरे भारताचे ऑलराऊंडर्स हे मान्य. ऑलराऊंडर म्हणजे जो बॉलिंग आणी बॅटींग समर्थपणे करू शकतो आणी त्यापैकी एका स्किल च्या जीवावर मॅच जिंकून देऊ शकतो तो. उदा. जॅक कॅलिस, ख्रिस केर्न्स, इयान बॉथम, इम्रान खान, कपिल देव, गॅरी सोबर्स, अँड्र्यू फ्लिंटॉफ. असो.

उद्या पुजारा खेळेल का हा कळीचा मुद्दा आहे. तसच रहाणे 'खेळेल' का? उमेश यादव च्या जागी कुलदीप येऊ शकतो.

कृष्णा सोलकर नाही एकनाथ सोलकर. गरिबीतून आलेला . गाउंड्स्मनचा मुलगा. पैसे नाही मिळाले. टीव्ही नसल्याने जाहीरातीचा प्रश्नच नव्हता. शेवटची टेस्ट खेळला तेव्हा कसोटीचे दर दिवसाला ७५० रुपये मिळायचे. कॅच नसलेले बॉल्स तो कॅचमध्ये कन्व्हर्ट करायचा.
सोलकरच्या उत्तम कॅचेस पैकी एक तू नळीवर आहे.
https://www.youtube.com/watch?v=XZo9Mit3akY

फे फे अरे सोलकर all rounder होता हे माहित नव्हते रे. गावसकरच्या पुस्तकांमधे त्याच्या फिल्डींगचा वारंवार उल्लेख येतो एव्हढेच आठवते. अर्थात बॅटींग बद्दल वाचल्याचे थोडेफार आठवते पण असे एकदम मोठे काहि केले बॅटींग करताना असे पटकन आठवले नाही ( ह्याचा अर्थ केले नसेल असेल नाही हे स्पष्ट करू इच्छितो) . रेग्युलर बॉलिंग करयाचा हे माहित नव्हते. सचिन सारखा मधे मधे करत असेल असे वाटले होते. बॉयकॉट्ला सतावले म्हणजे allrounder धरू का ? Happy

कृष्णा सोलकर नाही एकनाथ सोलकर. >> भाऊ, कृष्ना ह्यातले क्रूश्णा सोलकर साठी नसून कृष्णा ह्या आयडीला केले संबोधन होते.

बॉयकॉट्ला सतावले म्हणजे allrounder धरू का ?>>

डाव्या हाताने फलंदाजी पण बर्‍यापैकी करत एकनाथ सोलकर. एक शतक सुद्धा नावावर आहे त्यांच्या. ६ अर्धशतके केलीत!
एकनाथ सोलकर ह्यांना समक्ष भेटायला मिळालेले! Happy

कृष्णा सोलकर नाही एकनाथ सोलकर.>>> हो हो एकनाथ सोलकरच ते कृष्णा माझ्या साठी असावे त्यातला स्वल्पविराम राहिला! Happy

आज मला वाटते पुजाराला संधी देईल रवि गँग दुसरा बदल झाला तर कुलदीप येईल पण कुणाच्या जागी कारण सध्या हार्दिक हृदयाजवळ आहे गँगच्या आणि अष्टपैलू खेळाडू त्यातुन!

जिंकून मिरवणं अधिक हृदयाजवळचं असावं, असं वाटतं; त्यामुळे, मनापासून नसले तरी कांहीं चांगले बदल होतीलच अशी आशा करूंया. पण फलंदाजांच्या कामगिरीत चांगला बदल होणं सर्वाधिक महत्वाचं!

मागे कुणितरी मायबोलीवर क्रिकेट खेळाडूंची तुलना सैन्यातल्या सीमेवरच्या नौजवानांशी केली होती.
माझ्या माहितीत अनेक सैन्यातील लोक आहेत. त्यांच्यापैकी सगळे म्हणाले, पाऊस, थंडी, कमी प्रकाश, जखमा काहीहि असले तरी युद्ध थांबत नाही!
मग क्रिकेट खेळाडूच का रिमझिम पावसामुळे खेळ थांबवतात?

हे वाचल्यावर पुजारा खेळला नाही ह्याचे खरच आश्चर्य वाटते.
Kohli, however, admitted that the Indian batsmen ought to be mentally stronger, especially facing the first 30-odd deliveries. That, he said, would be key to starting and building an innings.

"It is not so much about the technical, but more about the mental aspect," he explained. "How you think about the situations, about the first 20, 25, 30 balls, after the fall of a wicket, matters a lot. You must have a clear plan about what to do in those 30 balls, and, more often than not, that plan should not involve aggression. We need to focus on composure, which as a batting unit we have discussed."

पाऊस पडल्यामूळे पहिला दिवस तरी स्विंङ नि सीम धुमाकूळ घालणार. आता दोन स्पिनर कि तीन फास्ट बॉलर हा निर्णय अतिशय अवघड होणार.

पहिली प्रार्थना - देवा, कोहली टाॅस जिंकूदे !
दुसरी प्रार्थना - कोहलीला फलंदाजीसाठी ्या्यला खूप वाट पहायला लागूं दे !
तिसरी प्रार्थना - चेंडू पीच व हवेमुळे फार स्विंग होत असेल, तर त्यावर नियंत्रण ठेवायला आमच्या गोलंदाजांना मदत कर !

चौथी प्रार्थना - आणि शास्त्रीबुवांच्या पापकर्मांमुळे वरच्या तिन्ही प्रार्थना नामंजूर असतील तर अजून पाऊस पाड Lol

"शास्त्रीबुवांच्या पापकर्मांमुळे" - शास्त्रीबुवा नेहमीच 'निष्काम कर्मयोग' फॉलो करत आले आहेत. निदान त्यातला पहिला 'निष्काम' भाग तरी. आणी केलच काही, तर ते 'मला अर्पण कर' ह्या भगवान-आज्ञेप्रमाणे कॅप्टन (गावसकर असो की कोहली) ला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कर्मफल लागू होत नाही. Happy

पहिला दिवस वॉश-आऊट होऊनही इंग्लंड मधे टेस्ट चा निकाल लागू शकतो. पुढचे तीन दिवस फोरकास्ट चांगलं आहे. त्यामुळे हवामानाचा वगैरे फार विचार न करता, भारताने त्यांचे सर्वोत्तम ११ खेळवावेत. horses for courses वगैरे करण्याइतपत बेंच स्ट्राँग नाहीये.

"शास्त्रीबुवांच्या पापकर्मांमुळे" - शास्त्रीबुवा नेहमीच 'निष्काम कर्मयोग' फॉलो करत आले आहेत. निदान त्यातला पहिला 'निष्काम' भाग तरी. आणी केलच काही, तर ते 'मला अर्पण कर' ह्या भगवान-आज्ञेप्रमाणे कॅप्टन (गावसकर असो की कोहली) ला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे त्यांना कर्मफल लागू होत नाही. Happy >> Biggrin कुंबळेच्या पोटावर पाय दिल्याचं पाप आहेच ना पण त्याच्या माथी.

वॉ.अ‍ॅप फॉर्वर्डवर कोणीतरी शास्त्रीच्या सुटलेल्या पोटाचा फोटो टाकून 'If Kohli does not deliver Shastri will' अशी एक फालतू कमेंटही टाकली आहे

चौथी प्रार्थना - >> Lol

शास्त्रीबुवा नेहमीच 'निष्काम कर्मयोग' फॉलो करत आले आहेत. निदान त्यातला पहिला 'निष्काम' भाग तरी. >> निष्काम नि शास्त्रीबोवा एकत्र बसत नाही. बर्‍यापैकी डेबोनेर होता शास्त्री. कर्मयोगी पेक्षा कामयोगी जास्त अचूक ठरेल आता ते काम निष्काम भावनेने करत असेल तर कल्पना नाही.

तिसरी प्रार्थना - >> तिसर्‍या प्रार्थनेवरून आठवले कि स्विंग बॉलर आहे कोण आपल्याकडे जो अचूक असेल ? इशांत, पांड्या ची length short असते. उमेश होतात तेंव्हाही असे भन्नाट स्विंग होतात कि अशा वेदरमधे त्याला कंट्रोल ठेवता येणे कठीण वाटते. शमी जुना बॉल अधिक चांगला वापरतो. भुवी, बुमर बाहेर. ठाकूर स्विंग करतो का ते माहित नाही. अश्विन ला नवा बॉल द्यावा लागेल Wink

असामी फेफच्या निष्कामचा अर्थ खेळाच्या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये पाट्या टाकणे असा होता रे ....म्हणजे तुला कळलाच असेल म्हणा तो आणि तू मुद्दाम वेगळा अर्थ घेऊन कामयोगी वगैरे लिहिले असे गृहीत धरतो. slack vs shag चा गोंधळ झाला की घातला Lol

हाब Happy

असाम्याने, एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं शास्त्री ला Happy

,,,,, आणि, courses for horses बनवायला आपण घरच्या मालिकेचे यजमान पण नाही आहोत ! Wink

आज काय परिस्थिती लंडनला?
हवामानाचा अंदाज तर आता ३ दिवस पाऊस नाही असा आहे.

बघुया नाणेफेक जिंकली तरी प्रोब्लेम आम्हाला आधी काय करावे!

इंग्रजांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले!

धवन आणि उमेश च्या ऐवजी पुजारा आणि कुलदीप

'र'वि' चा लाडका पंड्या बघु काय करतो ते ह्या सामन्यात!

विजय पहिल्याच षटकात शुन्यावर बाद होऊन परत! १ बाद पुज्य भारत!

राहुल विश्रांती गृहात २ बाद १०
अँडरसन ला दुसरा बळी!

कोहली ने क्रिकेट च्या मैदानात सगळं स्वतः करायचा चंग बांधलाय. इंडियासाठी बॅटींग करताना, इंग्लंड ला पुजाराची विकेट सुद्धा मिळवून दिली त्यानं Wink

१५/३ म्हणजे अवस्था बिकट (बोली भाषेत, हालत ब्येक्कार) आहे. एक तर 'ये रे ये रे पावसा' तरी किंवा एकदम 'ओ पालनहारे'.

टाॅस निर्णायक ठरणार ? पण क्रिकेटमधे भाकीतं करताना घाई करूं नये असं म्हटलं जातं . बघूं, खेळपट्टी काय काय नखरे करते तें आणि शेवटीं कोणावर फिदा होते तें !

इथं आतां काय पचकायचं ? लाॅर्डसवर गरमागरम, कुरकुरीत कांद्याची भजीं मिळत असतील ?

Pages