क्रिकेट - ४

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33

क्रिकेटवरील पहिले तीन धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्‍याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्‍याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आपल्यापेक्षा सरस पेस बॉलर्सबरोबर मॅच ठेवणे हे एकतर अति धाडसाचे किंवा अति आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणायचे का ?" - लॉर्ड्स, पर्थ चं उदाहरण समोर असेल. किंवा ह्या मॅच पर्यंत सिरीज चा निकाल लागला असेल अशी अपेक्षा असेल.

कोहली आणी विजय, दोघंही नसतील, तर खूप अवघड जाणार आहे. अभिनव मुकुंद ने मिळालेल्या लिमिटेड संधींमधे फारसं प्रॉमिस दाखवलेलं नाहीये. नायर, अय्यर नवखेच आहेत. रहाणे चा फॉर्म तळ्यात-मळ्यात आहे.

स्विंग मिळण्याची शक्यता असेल तर भुवनेश खेळेल का? का ईतके बदल एकदम नाही केले जाणार?

"ही एक भन्नाट क्लिप सापडली काल. १९९३ च्या इग्लंड वि. च्या होम सिरीज मधली मुंबई कसोटी." - फा, अशा हटके क्लिप्स योग्य वेळी शोधण्याचं तुझं टॅलेंट अफलातून आहे.

असामी , फारेंड - खेळाडूंना किती से असतो हे ग्राऊंड्स वगैरेची निवड होतांना माहित नाही पण कदाचित अश्यावेळी धोनी आणि कोहली थॉट प्रोसेस मधला फरक अधोरेखीत होतो असे दिसते. धोनीने कदाचित ईंटर्फियर केले असते अश्या अपवर्ड ट्रेंडिंग टीम परफॉर्मन्स ला अ‍ॅफेक्ट करणार्‍या ( खीळ घालणार्‍या ) अनसर्टेन पीचेस ची निवड करतांना.

कदाचित अश्यावेळी धोनी आणि कोहली थॉट प्रोसेस मधला फरक अधोरेखीत होतो असे दिसते. >> मान्य आहे. धोनी अशा स्टेटला पोहोचला होता कि अशा निर्णयांवर तो टीका करू शकत असे. कोहलीचा approach थोडा वेगळा वाटतोय. 'गरज पडली तर आम्ही कुठेही खेळू शकतो नि जिंकूही शकतो' अशा थाटात तो असतो.

फे फे. स्स्विंग होईल असे वाटत असेल तर भुवी नक्की खेळेल. बाकीचे चेंजेस हे forced आहेत तेंव्हा Happy

सिरिज संपल्यावर कोहली/ कुंबळे कडून पीचेस वर आणि ग्राऊंड सिलेक्शन कमिटीवर कॉमेंट यायला हवी . कोहली ने कॅप्टन झालल्यापासून स्वतःला अंतर्गत वादापासून दूर ठेवले आहे. पण धोनी सारखा, सिलेक्शन कमिटी, सिनियर प्लेयर गंभीर्/युवराज ह्यांच्या बरोबर वादातही सॉलिड स्टंड घेण्याचे कसब कोहलीला अजून शिकायचे आहेत. वाद होत नाही म्हणजे मतभेद नाहीत असे कॉजल रिलेशन नसावे अशी अपेक्षा.

फा, जबरी क्लिप आहेत त्या सर्व ! एकदम नॉस्टॅल्जिक झाले. ऑस्सम.

कपिलने व्हिव रिचर्डस सारखाच कॅच पकडला. Happy
सचिन आल्यावर त्याच्या स्केअर कटला असणार र्‍हिदम मॅच फास्ट होत चालली आहे दर्शविणारा. जबरदस्त .

कोहली बाहेर. कुलदीप यादव चा डेब्यू. जुगार की मास्टर स्ट्रोक?

ह्या मॅच च्या कॅप्टन चं नाव टीम चं ध्येय बनो हीच सदिच्छा!

वॉर्नर सकाळपासून लवकरच जाईल असे वाटतेय पण जात नाहीये.. कुलदीप यादवला खेळायला थांबला आहे का? स्मिथ पुन्हा डोक्याला त्रास देण्याच्या मूडमध्ये आहे. सकाळची भुवीची पहिली ओवर पाहिल्यावर ईथे स्टार्क नाहीये याचा आनंद झाला. थोडाफार स्विंग रोज सकाळी मिळेल इथे असे वाटतेय. आणि तो स्टार्कच्या पेसला नको. आधीच आपण एक फलंदाज कमी केलाय, त्यात रहाणे आश्विनचा फलंदाजीतील फॉर्म गंडलाय. राहुल भरवश्याचा वाटत नाही. नायरनेही काही विशेष कमाल केलेली नाहीये. तरी हा पिच दोघांना सूट होईल असे वाटते.

धर्मशाळेत 'यादव' राज !
पहिल्या सेशन मधे ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व होतं, दुसर्‍यात आपलं. धमाल चालू आहे ...

गेला स्मिथ फायनली. व्हॉट अ सेंच्युरी. तो कोहलीपेक्षा सध्यातरी चांगला आहे, हे ह्या सिरीजमधून अधोरेखित झालेलं आहे. आता कोहलीने परदेशामध्ये चांगला खेळ करून ग्रेटेस्ट बनण्यासाठी प्रयत्न करावा.

व्हॉट अ सेंच्युरी. तो कोहलीपेक्षा सध्यातरी चांगला आहे, >>>>
अगदी माझ्या मनातले वाक्य !

जास्त नाही बरोबर आहे. पहिल्या दिवशी फलंदाजांना उपयुक्त होती खेळपट्टी पहिल्यासत्रात ४ च्या सरासरीने धावा काढल्या आहे ते ही अवघा एक विकेटवर. यावरुन खेळपट्टी ठणठणीत वाटते. कुलदीप आल्यानंतर खेळपट्टी भारतीय गोलंदाजांचे ऐकू लागली. त्याआधी "तु कोण मै खांमखा" टाईप खेळपट्टी बोलत होती. कुलदीपने चांगली बॉलिंग टाकली. त्याला ५ विकेट मिळायला हवे होते. जाडेजा पहिल्या आणि दुसर्‍या सत्रात काहीच कमाल दाखवू शकला नाही. अश्वीनला देखील स्मिथ कंटाळल्यामुळे विकेट मिळाली. मेहनत फक्त उमेश, भुवी आणि कुलदीप यांनी घेतली.
पहिल्याच बॉल वर नायर ने वॉर्नरला जीवदान दिले नसते तर कदाचित इतका स्कोर झाला नसता. पण तो कॅच अवघड होता.
तब्बल ४ दिवस बाकी आहे आणि किमान ३ इनिंग्स खेळायच्या बाकी आहे. भारताने दोन दिवस खेळून ४००-५०० जरी काढून २००ची लिड जरी घेतली तर उर्वरीत २ दिवसात ऑसीला ती लिड पार करुन पुन्हा २००-२५० ची लीड देऊन आपले १० विकेट्स काढायच्या आहे.
सध्यातरी भारताचा वरचष्मा आहे.

मस्त कमबॅक केला ईंडिया ने. स्मिथ अपेक्षेप्रमाणेच अवघड पेपर आहे. पण कुलदीप यादव सरप्राईझ पॅकेज होता. नायर आणी राहूल ह्या कानडी जोडीला फिल्डींग वर बरच काम करायची गरज आहे. बॉलिंग ओव्हरऑल च छान झाली. रहाणे ने चांगला लीड केला पहिला दिवस. दोन कॅचेस पण मस्त घेतले. ईंडियाने (खरं तर) १.५+ दिवस बॅटींग करून ५५०+ स्कोअर केला तर मजा येईल. एकदाच बॅटींग करायला लागली तर फारच छान.

अरे अरे थांबा जरा!
आधी उद्या सकाळचा सेशन आपले गडी कसा खेळून काढतायत ते बघू!

स्मिथ पुर्ण भरात असणे आणि कोहली गेले दोन वर्षांत नेमके याच मालिकेत गंडलेला असताना तुलना करणे चुकीचे.
जेव्हा या दोन खेळाडूंची करीअर संपेल तेव्हा स्मिथपेक्षा कोहली पुढे असेल असा अंदाज मी मागेही बहुधा कोहली फ्यान क्लब वर लिहिलेला.
जरी कसोटी हा क्रिकेटचा क्लासिकल प्रकार मानला तरी कोहली क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये सरस आहे हे नाकारता येत नाही. अर्थात स्मिथही तिथे काही वाईट नाही पण कोहलीचे पारडे लिमिटेडमध्ये वाईच जड आहे.
अर्थात, स्मिथ या मालिकेत जे करतोय ते खरेच _/\_
तो नसता तर आपण ऑस्ट्रेलियाचेही अगदी सहजपणे ईंग्लंड न्यूझीलंड केले असते. स्वतःही खेळतोय आणि त्यामुळे ओवरऑल टीमचेही धैर्य वाढवतोय. वॅल्यु ऑफ रन्स आकड्यांच्या पलीकडे आहे.

सामना बाकी आजचा मस्त झाला. टिपिकल भारतीय उपखंड स्कोअरकार्ड. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात दमदार सुरुवात, त्यानंतर स्पिनर्सनी विकेट काढत पाहुणे दिवसाखेरीस गुंडाळले जाणे.
फक्त हेच पुढे बॅटसमननी नेणे गरजेचे. म्हणजेच किमान ४५० धावा टाकत १५० चा लीड, आणि दुसर्‍या धावात त्यांना दोनशेला गुंडाळत टारगेटच्या शेपन्नास धावा कुठल्याही ट्विस्ट एन टर्नशिवाय मारणे.
त्यातही ५००+ झालेच तर डावानेच हाणने. हे झाले तर आत्मा सुखावेल, पण आपल्याला चौथ्या इनिंगला थोडेफार चेस करावे लागले तर बघायला मजा येईल.
आपण तीनशेच्या आत गुंडाळले जाने आणि सामना पहिल्याच इनिंगला गमावणे हे सध्या तरी मी विचार करू शकत नाही. उद्याचा तासभर नवीन बॉल काढला तर दिवसाखेरीस चांगल्या स्थितीत असायला हरकत नाही.

टॉम लेथम रॉक्स!

फॉरवर्ड शॉर्टलेगला इतका अफलातून कॅच कितीतरॉ दिवसांनी पाहीला... टेरीफीक अँटीसिपेशन.. हॅट्स ऑफ!

पहिला अर्धा तास टफ टेस्ट क्रिकेट! दोन्ही टीम्स ठरलेल्या प्लॅन प्रमाणे खेळत होते. ऑसीज ची बोलिंग एकदम शिस्तबद्ध. ऑफ ची लाइन दोन्ही बोलर्स सोडत नव्हते. एका बाजूने लाय्न आणल्यावर मला वाटले होते आता सेटल झाले लोक. पण दुसर्‍या बाजूने हेझलवूड च्या "जस्ट ऑफ च्या बाहेर" असलेल्या बॉल ला इतका वेळ अत्यंत पेशण्टली खेळणार्‍या विजय ने शेवटी बॅट लावली. विजय अजून थोडा टिकला असता तर भरपूर रन्स केले असते.

विजयने आधीच्या ओव्हरमध्येही बॅट लावलीच होती. फक्त तेव्हा तो वन-टप गेला. त्याआधीची त्याची बाऊंडरीदेखील अवे फ्रॉम बॉडी मारली होती. त्याची एकाग्रता ढळून आता बॅड पॅच येणार अशी शंका वाटते.

री कोहली-स्मिथ - पुण्यात थर्ड इनिंगमध्ये कठीण पिचवर स्मिथने जी सेंच्युरी मारली, ती इनिंग त्याच्यात आणि बाकीच्यांमध्ये किती डिफरन्स आहे, त्याची साक्ष देणारी होती. एनीवे स्मिथ कॅरीज अ‍ॅन अ‍ॅव्हरेज ऑफ ६०.९८. जी सिरीज ते ०-४ हरायला हवे होते, ती सिरीज आपल्या हातातून निसटते आहे की काय, हे वाटायला लावण्यात स्मिथच्या बॅटींगचा मोठा वाटा आहे. कोहली स्टिल हॅज सम वे टू गो, इन पर्टिक्युलर इन इंग्लंड अगेन्स्ट ब्रॉड. श्रीलंकेविरुद्ध ऑस्ट्रेलियन डीबॅकलमध्येही स्मिथचे अ‍ॅव्हरेज वाईट नव्हते. त्याने भारतात जडेजा इ.विरुद्ध अप्रतिम खेळ करून स्वतःला सिद्ध केलेले आहे. शेवटच्या दोन वर्षांचे म्हणाल, तर कोहली अ‍ॅव्हरेज ५४.१६ (इन्क्ल्युडींग धिस होम सीझन, २४ मॅचेसमध्ये) आणि स्मिथ अ‍ॅव्हरेज ७१.४६ (२८ मॅचेस). त्यामुळे पर्सेप्शन अ‍ॅज अ‍ॅन इंडियन फॅन काहीही असले, तरी प्रत्येक बाबतीत स्मिथ सरस ठरला आहे.

भा- स्मिथ सध्या सरस आहे यात वाद नाही. पण कोहली परदेशातही चांगला खेळलेला आहे इतकेच. म्हणजे भारतीय फलंदाजांची एक कॅटेगरी असते - देशात भरपूर यश्स्वी पण परदेशात फेल. कोहली त्यातला नाही. इग्लंड वगैरे मधला वीकनेस असू शकतो. द्रविडचा ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध होता २००१ च्या सिरीज पर्यंत. त्यावर मात करता येउ शकते.

(दुसरे म्हणजे ही तुलना टेस्ट पुरतीच आहे, कारण या सिरीज च्या संदर्भात आहे)

फा, तू सध्या सरस असण्याबद्दल वाद घालत नसलास, तरी बाकी प्रतिसाददाते आहेत. Happy तसेच कोहली परदेशात 'तितका' चांगला खेळलेला नाही इतकेच. ऑफ कोर्स ही हॅज बीन बेटर दॅन मोस्ट.

कोहली त्यातला नाही. इग्लंड वगैरे मधला वीकनेस असू शकतो. >> हो, जसा पाँटिंगला भारतात होता. द्रविडला आय थिंक द. आफ्रिकेत होता. तेंडुलकरला कुठेच नव्हता. म्हणून पाँटिंग/द्रविड तेंडुलकर लेव्हल नाहीयेत, इतकेच मी म्हणतोय. सध्या स्मिथ हॅज अ ग्रेटर चान्स ऑफ बीईंग देअर. मात करता येऊन कोहली त्या लेव्हलला पोचला, तर चांगलेच आहे. बट यंग ग्रेट बॅट्समेनचा पर्पल पॅच युज्वली वयाच्या २७-२८ वर्षांपर्यंत असतो, हे निरीक्षण आहे. त्यापुढे कसे करायचे व काय करायचे, हे कोहलीपुढे जास्त आव्हानात्मक आहे.

आय थिंक २०१५ वर्ल्डकपमध्ये स्मिथ बॅटेड अस आउट ऑफ द सेमी. तो काही कच्चाबच्चा नाही. वन-डेमध्ये त्यांच्याकडे वॉर्नर-मॅक्सवेल टाईप एक्स्प्लोसिव्ह लोक आहेत, त्यापुढे त्याचा इम्पॅक्ट कमी वाटतो, असे असेल.

स्मिथ आधीच एका पोजिशनला येतो आणि त्यानंतर त्याची स्ट्रेंथ हॅण्ड आय कॉर्डीनेशन आहे. त्यामुळे त्यावर उपाय मिळने सहज नाही. तोच चुकी करायची वाट बघावी लागते. पण पुढेमागे वयोमानानुसार रिफ्लेक्सेस मंदावत त्यावर मर्यादा येऊ शकते. सेहवागही निवृत्तीची वेळ यायच्या आधीच संपला होता. स्मिथबाबतही तसेच होईल असे खात्रीने सांगता येत नसले तरी नक्कीच ईफेक्टीव्हनेस कमी होईल. आणि तेव्हा त्याची अ‍ॅडजस्टमेंट कशी असेल हे तेव्हाच समजेल.
सहजच सेहवागची न्यूझीलंडमधील दोन शतके आठवली जेव्हा ईतर सारे त्या कंडीशनमध्ये गळपटत होते. कारण सेहवागची स्ट्रेंथच वेगळी होती, ज्याला ती कंडीशन फारसा धक्का देऊ शकली नाही.

कोहली ही मालिका फेल गेला तरी गेल्या वर्षभरात त्याने मारलेले चार द्विशतक हा रेकॉर्ड नजरेआड करू शकत नाही.
फॉरेन सॉईल म्हणाल तर ऑस्ट्रेलियामधील त्याची चार शतके आपण विसरू शकत नाही.
त्याने एकदिवसीयमध्ये चेस करताना जिंकवून दिलेले सामने आता ईतके झाले आहेत की आपल्याला एखादा असा आठवत नाही ईतकेच.
सध्याची लेटेस्ट आयसीसी क्रमवारी ठाऊक नाही, पण मध्यंतरी तो कसोटीत दुसरा तर वनडे आणि २०-२० मध्ये पहिल्या क्रमांकावर होता.
ईंग्लंडमध्ये फेल गेला तो भूतकाळ झाला, त्याचा खेळ त्यानंतर उंचावलाय. मध्यंतरी २०-२० मध्ये जेव्हा ८०-८५ चे टारगेट डिफेण्ड करताना तो पाकिस्तानचा आमीर आपल्या स्विंगवर ईतरांना नाचवत होता तेव्हा कोहलीने सहजपणे काही क्लासिकल ड्राईव्ह मारत बॉल टू रन पन्नास धावा काढत सामना जिंकवून दिलेला. बाकी पुढचे ईंग्लंड दौर्‍यातच समजेल.
सध्या, म्हणजे नुसते या मालिकेत असे नाही तर या काळात, निव्वळ कसोटीचा विचार करता स्मिथ जगात सरस आहे यात वाद नाही. पण कारकिर्दीची केवळ उमेदीची सहाआठ वर्षे घेत तुलना करायची झाल्यास कदाचित स्मिथला सचिनपेक्षाही सरस ठरवले जाईल, ते मला पटत नाही.

सामना दुसर्‍या दिवसाखेर रंगतदार पण आपल्यासाठी टेंशनवाला झालाय. तरी उद्या जिगर दाखवून ३५० पर्यंत न्यावे. अर्थात ते कठीण आहे. पण हेच रन्स चौथ्या डावात आणखी कठीण होनार ..

दोन्ही संघाचा स्कोअरबोर्ड पाहिला स्पेशली फॉल ऑफ विकेट तर दिडशे नंतर ठराविक अंतराने लागलेली लाईन असा सिमिलर पॅटर्न दिसतो.
पण यात खेळपट्टीचा वा नव्या जुन्या बॉलचा फारसा संबंध वाटत नाही. जेव्हा त्यांचा फॉर्मचा प्लेअर स्मिथ खेळत होता तेव्हा ते फॉर्मला होते जेव्हा आपले दोन फॉर्मचे राहुल आणि पुजारा खेळत होते तेव्हा आपण फॉर्मला होतो ईतकेच.

Pages