Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी इण्टरेस्टिंग गेम!
जबरी इण्टरेस्टिंग गेम!
आजचा दिवस पुजारा आणि साहाचाच.
आजचा दिवस पुजारा आणि साहाचाच. स्मिथ एवढा विवश प्रथमच दिसला ह्या दौऱ्यात चुकीचे रीव्हयु मिस फिल्डिंग २ झेल सुटले आणि २ वेळा पायाचित निर्णय चक्क फिरविला गेला रिव्ह्यू मध्ये..
सहा विषयी थोडे.http://www
सहा विषयी थोडे.
http://www.espncricinfo.com/ci/content/video_audio/1087682.html
अजुन ५० रन हव्या होत्या व
अजुन ५० रन हव्या होत्या व त्यांना अजुन १० ओव्हर कालच मिळाल्या असत्या तर लैच धमाल आली असती. तरी जडेजा मस्त खेळला व २ विकेटही काढल्या. भारी चालु आहे मॅच. आता स्मिथ व रेन्शॉ लवकर गेले की मज्जा. देखते हे आगे क्या होता है.
स्मिथ - रेन्शॉ तंबुत! ४/६३
स्मिथ - रेन्शॉ तंबुत!
४/६३
बर्याच वर्षांनी इशांत
बर्याच वर्षांनी इशांत शर्माने डोके लावून जाळे फेकून कुठली विकेट घेतल्याचे बघितले.
रेन्सॉला सुरुवातीचे ३ बॉल बाउंस वर टाकले चौथा बॉल सुध्दा बाउंसरच येईल या भ्रमात रेन्सॉ राहिला पण अगदी त्याच वेळेस लेन्थ बॉल टाकल्याने तो गोंधळला.
इशांतचे डोके चालायला लागले
बर्याच वर्षांनी इशांत
बर्याच वर्षांनी इशांत शर्माने डोके लावून जाळे फेकून कुठली विकेट घेतल्याचे बघितले.>>+१०१ त्यातही गुडलेंथ बॉल इशांत टाकुच शकत नाही या गोंधळात असेल रेन्शॉ.
(अरे किती शॉर्ट पिच व आपटाआपटी असते इशांतची)
आपटाआपटी असते इशांतची) >>>
आपटाआपटी असते इशांतची) >>> मुद्दामुन असेल . लव्कर बॉल जुना होउन अश्विन आणि जाडेजाला मदत मिळेल.

असे ही तो कुठे विकेट काढतो म्हणा. उंची जास्त आहे त्यामुळे बॉल आपटायलाच त्याला संघात घेतले असेल.
लहानपणी नाही का टेनिसचा बॉल पाण्यात गेला की त्याला जोर जोरात आपटून त्यातले पाणी काढायचो. तसला प्रकार असेल
चला आता मार्श व हातकंगवा घ्या
चला आता मार्श व हातकंगवा घ्या.
मग त्रास देणारा फक्त मॅक्स्वेल उरला.. 
दुपारी १ वाजल्यापासुन
दुपारी १ वाजल्यापासुन अश्विनचा चमत्कार सुरु होईल.
-- माझी भविष्यवाणी
अश्विन जसा इंग्रज आणि
अश्विन जसा इंग्रज आणि न्युझिलंड बरोबर चालला तेवढा त्रास कांगारुना नाही दिला अजुन!
मॅच ड्रॉ होण्याच्या दिशेने
मॅच ड्रॉ होण्याच्या दिशेने चालली आहे.. असं झालं तर ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने मोठं यशंच म्हणावं लागेल.
काही तरी चमत्कार व्हावा अशी अजूनही अपेक्षा !
मार्श / कंगव्याने तारले बहुदा
मार्श / कंगव्याने तारले बहुदा ऑसीज ना!
खरच मित
खरच मित
ड्रॉ होईल.
ड्रॉ होईल.
किमान ४५० करुन हारलो नाही यावर ऑसी समाधान मानतील
हातकंगवा आणि मार्श यांनी
हातकंगवा आणि मार्श यांनी मिळून तब्बल ४०० चेंडू खेळले
चांगली झाली मॅच शेवटच्या दिवशी सुध्दा दोन्ही बाजूंना योग्य खेळयला मिळाले.
पुजारा खेळायला जेव्हा मैदानात
पुजारा खेळायला जेव्हा मैदानात आलेला तेव्हा आदित्यनाथ फक्त खासदार होते
जेव्हा पुजारा आउट होऊन मैदानाबाहेर गेला तो पर्यंत आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले होते.
हातकंगवा आणि मार्श यांनी
हातकंगवा आणि मार्श यांनी मिळून तब्बल ४०० चेंडू खेळले >>> हेच लिहायला आलो होतो
तब्बल ६० ओव्हर्स!
आपला पुजारा एकटा ५००+ चेंडु
आपला पुजारा एकटा ५००+ चेंडु खेळला होता. बहुतेक म्हणून त्या दोघांनी खुन्नस काढली
पुजारा आणि साहा यांनी मिळून ७६० चेंडू खेळले . म्हणजे जवळपास १२६ षटके. मॅक्सवेल ने कोहलीचा खांदा दुखवलेल्याचे चिडवले होते. ते या दोघांनी मनावर घेतलेले. सगळ्या ऑसी गोलंदाजांचे खांदे दुखावले.
:). ज्या स्टाइलने बाकी लोक
:). ज्या स्टाइलने बाकी लोक स्पिन खेळताना चाचपडत होते त्या तुलनेत पाचव्या दिवशी आश्विन्-जडेजा पुढे इतका काळ उभे राहणे हे क्रेडिटेबल आहे.
बाकी मी स्मिथ-उमेश यादव हे कॉम्बो जितक्या वेळा पाहिले तितक्या वेळा मला हा प्रश्न पडतो - त्याला खेळताना स्मिथ नेहमी चौथ्या पाचव्या स्टम्प इतका ऑफ साइडला सरकतो, लेग स्ट्म्पच काय, कधीकधी मिडल स्टम्प सुद्धा उघडा टाकून. यादव ने कधी तरी सरप्राइज फास्ट यॉर्कर टाकायचा प्रयत्न केला आहे का स्मिथ ला? मला तरी दिसला नाही.
बहुदा असा सरप्राईज यॉकर
बहुदा असा सरप्राईज यॉकर यादवला टाकता येत नाही हे रेकॉर्डींग वरुन ऑसी टीम मॅनेजमेंटने ताडले असेल. याजागी बुमराह असता तर स्मिथ कधीच सरकला नसता.
त्या तुलनेत पाचव्या दिवशी आश्विन्-जडेजा पुढे इतका काळ उभे राहणे हे क्रेडिटेबल आहे.<<< हो पण ऑसी मधे फक्त हे दोघेच उभे राहिले. बाकी सगळे स्वस्तात आउट झाले. बहुदा ४ विकेट गेल्यानंतर थोडे ढीले झाले असतील. त्याचा फायदा देखील त्यादोघांना मिळाला असेल. तरी ५व्या दिवशी ४०० चेंडू खेळणे अविश्वसनिय आहे. खरी कसोटी त्यांनी आणि पुजारा-साहा यांनी खेळली.
खरे आहे.
खरे आहे.
ती मधली बॅटिंग मी पाहिली नाही. अशा वेळी स्पिनर्स ना सुद्धा मधे ब्रेक लागतो. पूर्वी सचिन, सेहवाग वगैरे "तिसरा स्पिनर" म्हणून अधून्मधून एका बाजूने अशा वेळी थोडीफार बोलिंग करत (व कधी कधी मोक्याच्या वेळी विकेट्स ही काढत) तसा तिसरा कोणी सध्या आपल्याकडे दिसत नाही. स्कोअरकार्डवर चारच बोलर दिसत आहेत.
आणि अशा विकेट्स वर चारच रेग्युलर बोलर्स घेउन खेळणे हे आपले जुनेच दुखणे आहे. "साहा" असताना सहा बॅट्समन ची गरज नसायला हवी. हा डिफेन्सिव्ह माइण्डसेट आहे. मॅच जिंकण्याकरता टीम निवडण्यापेक्षा ती हरू नये म्हणून निवडलेली - ती ही सिरीज बॅलन्स मधे असताना. तिसरा स्पिनर अशा वेळेस हवाच. अझर च्या काळात बॅटिंग मधे कपिल सुद्धा असल्याने तो रिस्क घेता येत असे. कुंबळे, राजू, चौहान असत. नंतर गांगुली च्या काळात सचिन हा तिसरा स्पिनर होता. तसा कामचलाऊ स्पिनर नसेल तर पाच बॅट्समन शिवाय पर्याय नाही. कारण एकदा स्पिनर्स लौकर सुरू झाले की बॉल ची चमक गेल्याने मधल्या ओव्हर्स मधे फास्ट वाले पण फारसे काही करू शकत नाहीत.
अशा वेळेस कोहली मुरली लोकेश
अशा वेळेस कोहली मुरली लोकेश यांनी गोलंदाजी केली पाहिजे होती.
सहमत.
सहमत.
अश्विनला रिकगनाईझ्ड बॅट्स्मन
अश्विनला रिकगनाईझ्ड बॅट्स्मन म्हणून सिरियसली प्रमोट करायला हवे, थोडेफार करतात पण करूण नायरला घेणे हे प्रमोशन सिरियस नसल्यासारखेच वाटते. त्याची टेक्निक चांगली आहे, आणि तो जबाबदारीने पण खेळतो. जडेजा चे बॅटिंग पर्फॉर्मन्स मात्रं डिटेररोरेटिंग आणि अनप्रेक्टिबल वाटते. रणजी (त्रिशतक वगैरे) मध्ये आणि धोणीच्या काळात तो चांगल्या ईनिंग्स खेळला आहे. मोठा स्कोअर असतांना तो बरा खेळतो पण घसरण सुरू असतांना आजिबातंच पेशन्स दाखवत नाही. मला अपेक्षा होत्या त्या पेक्षा साहाचे प्रदर्शन खूपच चांगले होत आहे पूर्ण सिरिज मध्ये.
आजघडीला अश्विन, जडेजा हे बर्
आजघडीला अश्विन, जडेजा हे बर्यापैकी बॅटिंग करू शकतात. भुवी ही ठीकठाक बॅट्समन म्हणता येईल (भारतीय बोलर्स च्या स्टँडर्ड्स नी). त्यामुळे ५ बॅट्समन, ५ बोलर्स अन १ कीपर घेऊन खेळायला काही हरकत नसावी.
पण प्रश्ण आहे तो माईंडसेटचा.
जयंत यादवच्या शतकापुढे करुण नायरचं त्रिशतक भाव खाऊन जातं, अन यादवच्या बोलिंग केपेबिलिटीजकडे पूर्ण दुर्लक्ष होतं.
एक बंगळूर सोडले तर एवढ्या
एक बंगळूर सोडले तर एवढ्या महत्वाच्या दौर्यात टेस्ट क्रिकेटसाठी नॉन ट्रॅडिशनल - अन एस्टॅब्लिश्ड तीन-तीन मैदानांची चॉईस विचित्र वाटते आहे .
प्रयोग म्हणून एखाद्या नवीन मैदानावर एखादी मॅच खेळवणे ठीक आहे किंवा नवीन मैदानांवर त्यांच्या पीच चा नेमका अंदाज येईपर्यंत लो रँक्ड टीम्स ना बोलावून खेळणे हेही करण्यासारखे आहे. पण एकदम ४ पैकी तीन मॅचेस नवख्या पीचेस वर ?
पुण्यात ल्या ग्राऊंडवर फारसे एकदिवसीय सामनेही होत नाहीत तिथे थेट कसोटी , ह्या ग्राऊंडवर आधीच्या कसोटी (झाली असल्यास) चा निकाल कसा होता? रणजी मॅचेस च्या दम्यान हे पीचेस कसे बीहेव करतात त्यांचा डेटाही क्युरेटर्स कडे असेल ना?
मागच्या श्रीनिवास वादांमधे
मागच्या श्रीनिवास वादांमधे झालेल्या गटांमधे जी साठमारी झाली त्यानंतर आपापल्या बाजूच्या स्टेट पार्टींना मदत करण्याच्या उद्देशाने टेस्ट मॅचेस ची सेंटर्स विस्तारण्याचा निर्णय घेतला गेला त्याचा हा परीपोष आहे. तसेही धर्मशाळेसारख्या ग्रीन पीचवर आपल्यापेक्षा सरस पेस बॉलर्सबरोबर मॅच ठेवणे हे एकतर अति धाडसाचे किंवा अति आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणायचे का ?
हाब - पुण्यात पहिल्यांदाच
हाब - पुण्यात पहिल्यांदाच कसोटी झाली त्या ग्राउण्डवर. रणजीचे रेकॉर्ड माहीत नाही. पण तेथे टेस्ट मॅच ला मागणी असण्याची कारणे इतर ठिकाणपेक्षा थोडी वेगळी आहेत. इतर मोठ्या शहरांच्या मानाने पुण्याला कमी मॅचेस मिळाल्या आहेत सहसा.
मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता - ही प्रमुख चार धरली
अहमदाबाद, कानपुर, हैदराबाद, बंगलोर, मोहाली - ही त्यानंतरची धरली, तर यात पुणे असायला हवे. नागपूर, लखनौ वगैरे प्रमाणे.
पण इतकी वर्षे पुण्याला महाराष्ट्र क्रिकेट असो. चे स्वतःचे ग्राउण्डच नव्हते. नेहरू स्टेडियम हे मनपाच्या मालकीचे. तेथे मॅच च्या थोडे आधी सुद्धा मोटोक्रॉस डर्ट ट्रॅक वगैरे होत :). बालेवाडी चे मैदान बनवले तेव्हाच थोडे मोठे बनवून लागले तर क्रिकेटही खेळता येइल असे बनवायची संधी कलमाडी वगैरेंनी दुर्लक्षित केली, किंवा इण्डियन ऑलिम्पिक असो. व एमसीए च्या राजकारणात वाया गेली. त्यानंतर इतक्या वर्षांनी गहुंजेचे बनल्यावर एमसीए ने खूप आग्रह केला असेल मॅच करता.
रांची व धर्मशाला ही ठिकाणे सरप्राइजिंग आहेत. इतकी वर्षे ऑस्ट्रेलियाला कायम प्राइम टेस्ट सेण्टर्स देण्यात येत.
तो चलो माहौल बना लेते है
तो चलो माहौल बना लेते है
ही एक भन्नाट क्लिप सापडली काल. १९९३ च्या इग्लंड वि. च्या होम सिरीज मधली मुंबई कसोटी.
https://www.youtube.com/watch?v=9hI4T1mwvio
ही क्लिप केवळ मॅच ची नाही. भारतातील मॅच सुरू होण्याआधीचे वातावरण, विविध प्रकारची तयारी, याचे सुरेख चित्रण यात आहे. क्रिकेट प्रेमींना नक्की आवडेल. १९९३ ची मुंबई - म्हणजे अगदी जुनी नाही पण तरी आत्तापेक्षा जुनीच. काँक्रीट सीट्स वाले वानखेडे स्टे. जुन्या स्टाइलची बस (इंग्लंड टीम ला आणणारी). इकॉनॉमी ओपन केल्यावर लगेच हे सगळे बदलले.
याच क्लिप मधून पुढच्या क्लिप्सही दिसतील. मस्त आहे एकदम. फॉर्म मधला कांबळी व यंग सचिन!
Pages