Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झक्की, आयपीएल वरचा धागा: http
झक्की, आयपीएल वरचा धागा: http://www.maayboli.com/node/61770
आय पी एल वरच्या धाग्याची
आय पी एल वरच्या धाग्याची लिंक देणार्या सर्वांना माझे धन्यवाद.
वरची सगळी चर्चा वाचली .
वरची सगळी चर्चा वाचली . शिव्या आपण इतरत्र पाहतो , म्हणून याचे समर्थन कसे करता येते ?
मी माझ्या फॅमिलीबरोबर बसून मॅचेस पाहतो, गॅंग्ज ऑफ वासेपूरला जात नाही.
आता आम्ही नॅशनल टीव्हीवर एमसी बीसी करणारच , तुम्हाला बघायचे नसले तर बघू नका अस असल तर कठीण आहे.
आज सकाळी cricinfo वरची
आज सकाळी cricinfo वरची कोहलीच्या अनुपस्थितीत ABD आरसीबीचे नेतृत्व करणार असल्याची बातमी आणि त्याखालच्या कॉमेंट्स वाचताना असे जाणवले की ABD ची (किंवा एकूणच साउथ आफ्रिकन खेळाडूंची) इमेज आपण भारतीयांच्या मनात चांगली आहे, किवींबद्दलही थोडेफार तसेच म्हणता येइल पण इंग्लिश आणि ऑसीज खेळाडूंचे याच्या अगदी विरुद्ध आहे.... आणि याला कारण मैदानावर आणि मैदानाबाहेरही त्या लोकांनी दाखवलेला डॉमिनन्स, ओव्हर ॲग्रेशन आणि माज (किंबहुना समोरच्याला तुच्छ लेखण्याची सवय) आहे
अगदी आपल्या मनातील जॉन राईट, गॅरी कर्स्टन आणि ग्रेग चॅपेल यांच्या इमेजची तुलना करुन बघा!
भारताबरोबर किंवा अगदी आपापसात (ॲशेस) माज करुन हे लोक आपापल्या देशात पॉप्युलर होवू शकतात पण ग्लोबल फॅन्सची मने अश्याने जिंकता येत नाहीत... सचिन, द्रविड, धोनी वगैरेंचे जे बाहेरच्या देशात फॅन फॉलोइंग आहे, त्यांना जो रिसपेक्ट आहे तो कोहली आणि गांगुलीबद्द्ल असेलच असे मला वाटत नाही.....आता काहीजण असेही म्हणतील की बाहेरच्या लोकांची मने जिंकण्यापेक्षा त्यांच्याबरोबर मॅचेस जिंकणे जास्त महत्वाचे आहे.... तर आहे नक्कीच.... पण मॅचेस जिंकण्यासाठी मने दुखवलीच पाहिजेत असे नाही.... मॅचेस जिंकण्याबरोबरच एका क्रिकेटरला आपसूकच चिकटणारे "जंटलमन" हे बिरुद जपणेही महत्वाचे आहे!
आणि म्हणूनच ABD सारखे लोक अजातशत्रू आहेत!
रहाणेच्या धर्मशाला टेस्ट
रहाणेच्या धर्मशाला टेस्ट मधल्या चौथ्या डावातल्या फलंदाजीच्या मागे मुख्य कारण हे कॉन्फिडन्स असावं.
आज मी कॅप्टन आहे, आज मला कुणी काढणार नाहिये, कसं खेळायला पाहिजे वगैरे सांगणार नाहिये. हे दडपण झुगारून द्यायला मदत करणारं पॉझिटिव्ह फीलिंग.
करिअरच्या सुरवातीला खूप काळ बेंचवर घालवल्यानंतर मिळालेल्या संधी, इतर प्लेअर्सचा परफॉर्मंस, बॅड पॅच अशा अनेक गोष्टींच तो जबरदस्त दडपण घेणारा माणूस आहे. कोहली अन कुंबळेनी त्याला हा विश्वास सतत देत रहायला लागणार की बाबा रे, तू टीमचा महत्वाचा पार्ट आहेस. तरंच तो नॅचरल गेम खेळू शकेल असं वाटतं.
स्टंपने कोहलीला भोसकणार होतो
स्टंपने कोहलीला भोसकणार होतो - कोवान
http://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/once-i-w...
भाई आता आपापसतली भांडने विसरा... आपल्या कोहालीला कोणी टच पण नाय केला पाहिजे..
सचिनच्या पिक्चरचा ट्रेलर -
सचिनच्या पिक्चरचा ट्रेलर - https://www.youtube.com/watch?v=8gTeE6pa4Kg
सगळ्यांनी पाहिला असेलच, पण तरी इथे दिलाच पाहिजे. सचिन! सचिन!
धन्यवाद भा. याची माहिती गेले
धन्यवाद भा. याची माहिती गेले काही दिवस फेबुवर येत आहे. त्यामुळे उत्सुकता आहेच.
आज एक इण्टरेस्टिंग आर्टिकल सापडले. खूप मोठा रन अप असलेल्या बोलर्स बद्दल. ते वाचताना वेस्ली हॉल ची मजेदार कॉमेण्ट वाचली. तो म्हणे निवृत्त झाल्यावर सिनेटर झाला. तेव्हा म्हंटला:
"You think my run up was long. Now you should hear my speeches."
हे सहा नग इथे मिळतील. बहुधा विलीस चा रन अप सर्वात विचित्र होता. तो बॅट्समन व स्टम्प धरून सरळ रेषेत उभा राहायचा रन अप सुरू करताना. मग मात्र वाट चुकल्यासारखा फिरून पुन्हा क्रीज वर यायचा
https://www.sportskeeda.com/cricket/top-6-bowlers-with-longest-run-up
विंडीज चा पूर्वीचा
विंडीज चा पूर्वीचा "बालेकिल्ला" बार्बाडोस ला पुन्हा एकदा विंडीज ने मॅच फिरवली. पाक ला चौथ्या डावात फक्त १८८ करायच्या होत्या, पण ८१ मधे ऑल आउट!
http://www.espncricinfo.com/west-indies-v-pakistan-2017/engine/match/107...
भारताचा १९९७ मधला पराभव आठवला इथलाच.
संपूर्ण टेस्ट मॅच जबरदस्त
संपूर्ण टेस्ट मॅच जबरदस्त झाली. वेल प्लेड विंडीज!
मॅच भन्नाट झाली... विंडीजनी
मॅच भन्नाट झाली... विंडीजनी तुफान बॉलिंग केली शेवटी... पण मिसबाहचे बॅड लक, शेवटच्या दोन्ही मॅचेस मधे शतक एका धावेने हुकले..
भारी जिंकले विंडीज! बायदवे,
भारी जिंकले विंडीज! बायदवे, मिसबाहला वनडेमधे एक 'ऑनररी' सेंचुरी देऊन टाकावी!
पाकिस्तानने कॅरिबिअनमधली
पाकिस्तानने कॅरिबिअनमधली पहिली टेस्ट सेरिज जिंकली! मिसबाह आणि युनूसला रिटायर होताना तेवढाच दिलासा. पण ह्यात विंडिजच्या क्रिकेट बोर्डाचा वाटाही फार मोठा आहे.
पण ह्यात विंडिजच्या क्रिकेट
पण ह्यात विंडिजच्या क्रिकेट बोर्डाचा वाटाही फार मोठा आहे.>>> एकदम बरोबर... पण दुसरी टेस्ट विंडीजनी जिंकल्यामुळे सिरिज मधे जरा जान आली होती.. काल सुद्धा अगदी शेवटाला बळच विकेट टाकली.. नाहीतर मॅच ड्रॉच होती..
काल सुद्धा अगदी शेवटाला बळच
काल सुद्धा अगदी शेवटाला बळच विकेट टाकली>>> आणि सुनिल नरैनसारखा खेळाडू नॅशनल टीमऐवजी आयपीएल खेळतोय.
तस तर काय - सुनिल नरैन, गेल,
तस तर काय - सुनिल नरैन, गेल, सॅमी, ड्वेन स्मिथ, सॅम्युअल्स, ब्रॅथवेट.. असे कितीतरी जण आयपीएल खेळाहेत की..
काल गॅब्रिएल ला एक बॉल खेळून
काल गॅब्रिएल ला एक बॉल खेळून काढायचा होता. नंतर शेवटची ओव्हर चेस ने खेळली असती. पण त्या एका बॉल साठी पाकिस्तान ने सगळे १० फिल्डर्स गॅब्रिएल च्या अवतीभवती उभे केले आणी तो इंटिमिडेट झाला बहुतेक. टेस्ट क्रिकेट is the best!!
मनिष पांडे इंज्युअर
मनिष पांडे इंज्युअर झाल्यामुळे दिनेश कार्थिक ला चँपियन्स ट्रॉफी च्या भारतीय संघात निवडलं. गूड फॉर हिम. पण, रैना, पंत वगैरे ४-५ राखीव खेळाडू आधीच निवडले होते ना, मग त्यांना डावलून ह्याल कसं निवडलं? मला जाने भी दो यारो मधल्या सतिश शाह सारखं, 'तुमसे, लॉजिक मे जीतना मुश्किल है तरनेजा' म्हणावसं वाटलं.
कार्थिक रीझर्व्ड मधे होता रे
कार्थिक रीझर्व्ड मधे होता रे.
http://www.espncricinfo.com/icc-champions-trophy-2017/content/story/1096...
रैना नि यादवला पण न्यायला हवे होते असे राहून राहून वाटतेय.
गंभीर ला का वाळीत टाकलंय
गंभीर ला का वाळीत टाकलंय सिलेक्शन कमिटीने? कोहली आणि धोनीशी मागे त्याचं वाजलं होतं म्हणून का?
"कार्थिक रीझर्व्ड मधे होता रे
"कार्थिक रीझर्व्ड मधे होता रे."- you are right! I missed it. Sorry.
शार्दुल, सिरन, उनाडकट(हा फक्त
शार्दुल, सिरन, उनाडकट(हा फक्त यंदाच चालला म्हणा) थंपी, यासारख्या स्वींग गोलंदाजांना घेऊन जायला हवे होते. इंग्लंडमधे थंपी, सिरन हे भुवनेश्वरच्या नेतृत्वाखाली नक्कीच यशस्वी झाले असते. किती दिवस त्यांना देशात सुरक्षित परिस्थितीत खेळवणार आहे? ज्या मॅच महत्त्वाच्या नसतील अशा मॅच मधे एखाद दुसर्याला संधी द्यायला हवी. आयपीएल मधे गोलंदाजी करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाच्या स्पर्धेत गोलंदाजी करणे हे फार वेगवेगळे आहे. त्याचा अनुभव त्यांना द्यायला हवा. तर तुमची गोलंदाजीची बाजू भक्कम होईल. तो अनुभव लवकरात लवकर द्यायला पाहिजे. नाहीतर शिकण्याचे वय निघून गेल्यावर त्यांचा "अशोक डिंडा"च होतो. झहिर खान अथवा भुवनेश्वर कधीच होणार नाही.
आयपीएलचा धूमधडाका संपल्यानंतर
आयपीएलचा धूमधडाका संपल्यानंतर आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेध. त्याआधी इंग्लंड विरुद्ध द. आफ्रिका सामने उद्यापासून चालू होणारेत. होऊ द्या आता जोरदार चर्चा!
पाकिस्तानी: एक टीव्ही दिखाना
पाकिस्तानी: एक टीव्ही दिखाना

सेल्म्समनः सस्तावाला या महंगा?
पाकिस्तानी: सस्ता ही दे दे, वैसेभी ४ जून को तोडना ही है!
कार्यक्रमः इंडिया वि. पाकिस्तान
मुहूर्तः ४ जून २०१७
स्थळः बर्मिंगहॅम
निमित्तः चँपियन्स ट्रॉफी २०१७
इंग्लंड द. आफ्रिकेविरुद्ध
इंग्लंड द. आफ्रिकेविरुद्ध दणक्यात जिंकले. मॉर्गन फॉर्मात आहे. महागात पडू शकतो.
बांग्लादेशने न्यूझीलंडविरुद्ध पहिली 'अवे' मॅच जिंकली. वन-डे रँकिंगमध्ये ६व्या क्रमांकावर आले.
लेटेस्ट अॅड मस्त आहे
लेटेस्ट अॅड मस्त आहे चँपियन्स ट्रॉफीची.. सगळं सोडून लडाख मधे बिक्षू बनायला जातो आणि तिथे केस कापायच्या वेळेस खालती पेपर मध्ये भारत पाकिस्तान मॅचची जाहिरात दिसते..
इंग्लंड द. आफ्रिकेविरुद्ध
इंग्लंड द. आफ्रिकेविरुद्ध दणक्यात जिंकले. मॉर्गन फॉर्मात आहे. महागात पडू शकतो.>>>
मोईन अली ने देखिल चांगली फटकेबाजी केली! ३३० च्यावर स्कोर गेला तेंव्हाच अवघड वाटलेले पण आफ्रिकेने ४३८ च्यावर केलेले त्यामुळे काहीही होईल असे वाटलेले नंतर ढेपाळले!
बांगला देश वन डे रँकिंग्ज मधे
बांगला देश वन डे रँकिंग्ज मधे श्री लंकेच्या वर न. ६ ला आले
http://www.espncricinfo.com/bangladesh/content/story/1099421.html
चँपियन्स ट्रॉफी च्या वॉर्म-अप
चँपियन्स ट्रॉफी च्या वॉर्म-अप मॅचेस कुणी फॉलो करतय / बघतय का? आज कार्थिक आणी हार्दिक पंड्या मस्त खेळले आणी आता उमेश आणी भुवनेश ने बांग्लादेश च्या ६ विकेट्स काढल्या आहेत. ३०/६ (१० ओव्हर्स). मस्त!
मस्त बॉलिंग केली पठ्ठ्यांनी!
मस्त बॉलिंग केली पठ्ठ्यांनी! अशीच सगळ्यांची पिसं काढा म्हणावं. ब्राव्हो!
Pages