Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 04:33
क्रिकेटवरील पहिले तीन धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या बरीच झाली आहे. बर्याच दिवसांत तिथे कोणी काही म्हटलेलेही नाही. सध्याच बर्याच सिरीज संपल्यात, तर काही नव्याने सुरू होतायत. त्यामुळे नवीन धागा काढायला हा आयडियल टाईम आहे. आता क्रिकेट टॉक इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किमान ३५० पर्यन्त धावा करायल
किमान ३५० पर्यन्त धावा करायल हव्यात पहिल्या डावात.... रहाणे राहूल ही रची जोडी टिकायला हवी!
वेल प्लेड राहुल. या ट्रॅकवर
वेल प्लेड राहुल. या ट्रॅकवर ५० केल्या. लगे रहो!!
काय यार थोडावेळ पण आनंद टिकु
काय यार थोडावेळ पण आनंद टिकु दिला नाही.
नजर कशाला लावतात. ?
नजर कशाला लावतात. ?
३५० करू आपण. फिकर नॉट. रहाणे उभा राहणार म्हणजे राहणार
लागली नजर ९५/७.
लागली नजर ९५/७.
नवख्या स्पिनरला विकेट्स
नवख्या स्पिनरला विकेट्स दिल्या आहे. याचा अर्थ खेळपट्टी प्रचंड खराब झाली आहे. किमान जवळपास जायला हवे. त्यांचा डाव सुध्दा असाच गडगडणार .
छे पारच दारुण अवस्था एकाएकी!!
छे पारच दारुण अवस्था एकाएकी!!
१०० पार करु देत!
आपलेच अस्त्र आपल्यावर चालविले!
कसेबसे १०० झाले. जडेजा पण
वाट लावली पार!! धाडकन जमिनीवर
वाट लावली पार!! धाडकन जमिनीवर आपटले कोहली आणि मंडळींना!! ३ तासात केवळ नेस्तनाबूत!! दात घशात घालणे ह्यालाच म्हणत असावेत!!
आजकाल भारतीयांचे दिवस फिरले
आजकाल भारतीयांचे दिवस फिरले वाटते. एकामागून एक अनपेक्षित धक्के लागत आहे
ओ किफी का कोण तो अश्विन किंवा
ओ किफी का कोण तो अश्विन किंवा जडेजा पेक्षा भारी स्पीनर म्हणायला हवा! १५ मिन १२ रणात ७ उडाले!!
जवळपास ३०० चा लीड ६ गडी बाकी!
जवळपास ३०० चा लीड ६ गडी बाकी!
ह्या कसोटीचा निकाल जवळपास निश्चित झाला!
पुण्याची खेळपट्टीने 'हे तर आमचे होमपीच' म्हणणार्या फिरकीच्या 'प्रस्थापिताना' धक्का दिला!
पुण्याने नेहमीच दगा दिला आहे.
पुण्याने नेहमीच दगा दिला आहे.
केटी लागून क्रिटीकल ला विषय
केटी लागून क्रिटीकल ला विषय गेलेल्या ईंजिनीअरिंग च्या स्टुडंट च्या निष्ठेनं, डिटरमिनेशन नं आणी बुडाला आग लागल्या च्या भावनेनं खेळलो तरच ईभ्रत वाचेल आता. नाहीतर दुसरा उपाय म्हणजे सारसबागेतल्या गणपतीसमोर सामुदायिक रीत्या 'ओ पालनहारे' चा गजर करणे.
साठ वर्षांपूर्वीची आठवण आली -
साठ वर्षांपूर्वीची आठवण आली - पहिले एक दोन, विशेषतः चांगला फलंदाज बाद झाल्यावर, जेमतेम हजेरी लावण्यापुरते मैदानावर जाऊन परत यायचे.
एकदा तर इंग्लंडमधे ३२ मधेच सगळे बाद! पहिले चार शून्यात!
काय फरक पडतो म्हणा. खेळाडूंना त्यांचे पैसे मिळतातच. सामने आयोजित करणार्यांना सुद्धा. आता लोकांनी ठरवलेच की कसाहि झाला सामना, कुणिहि कसेहि खेळले तरी भाराभर पैसे घालून जायचेच सामना बघायला, तर काय करणार? घ्यायचे पैसे!
बर्याच लिमिटेड ओव्हर गेम्स
बर्याच लिमिटेड ओव्हर गेम्स खेळल्यानंतर पहिल्या कसोटीत ही कथा यापूर्वी अनेकदा पाहिलेली आहे. मधे एक बांगलादेश ची टेस्ट होउन सुद्धा फरक पडलेला दिसत नाही.
कमाल करताय लोकहो. एका
कमाल करताय लोकहो. एका इनिंगमधे रांग लागली म्हणून लगेच एव्हढे ? पिच एव्हढे वाईट नाहिये फक्त मनात तसे आहे हे धरून खेळल्यासारखे वागताहेत सगळे. It is mental game at this juncture. Look at our fielding - especially close cordon in Aus second inning. Dropped catches will tell you the story that minds are not focused. Hopefully they will regroup tonight and put up fight for the remaining test.
regroup tonight and put up
regroup tonight and put up fight for the remaining test.>>>>>>
Remaining tests ase mhana.
one at a time Sir ....
one at a time Sir ....
कमाल करताय लोकहो. एका
कमाल करताय लोकहो. एका इनिंगमधे रांग लागली म्हणून लगेच एव्हढे ? >>>
भारत-न्यूझीलंड पहिली कसोटी - भारत पहिल्या डावात २०९/५ असताना अश्विन आणि जाडेजाने ४०-४० धावा मारून स्कोअर ३१८ पर्यंत नेला, व ६० धावांची आघाडी मिळवून दिली. मग दुसर्या डावात आघाडी असताना आपली वरची फळी चांगली खेळली, व आपण जिंकलो.
भारत-न्यूझीलंड दुसरी कसोटी - भारत पहिल्या डावात २००/६ असताना साहाने ५० मारून पुन्हा आपण ३१६. दुसर्या डावात ११२ धावांची आघाडी असली, तरी आपण ९१/५ होतो दुसर्या डावात. मग पुन्हा साहाने रोहित शर्माबरोबर खेळून २६३ धावांपर्यंत नेऊन ठेवले, व आपण जिंकलो.
भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी - डेड रबरमध्ये वरच्या फळीने ५५७/५ करून सामना जिंकलो.
भारत-इंग्लंड पहिली कसोटी - इंग्लंड ५३७ असताना आपण ४८८ सर्वबाद. दुसर्या डावात आपण ७१/४ अशा स्थितीत सामना वाचवण्यासाठी डगमगत होतो, मग अश्विन आणि जडेजाने ३०-३० धावा केल्या, व आपण ०-१ होण्यापासून वाचलो.
भारत-इंग्लंड दुसरी कसोटी - वरच्या फळीने ३५०+ धावा केल्या व आपण ४५०+ करून जिंकलो.
भारत-इंग्लंड तिसरी कसोटी - इंग्लंडला २८३मध्ये सर्वबाद केले असताना आपणही २०४/६ होतो, मग पुन्हा अश्विन, जडेजा, आणि जयंत यादवने ४०० पर्यंत नेले, व आपण जिंकलो.
भारत-इंग्लंड चौथी कसोटी - इंग्लंडने ४०० केल्या असताना सामना ३६३/७ असा जवळपास बरोबरीच्या आसपास होता. मग जयंत यादवने शतक करून कोहलीला साथ दिली आणि २३१ ची आघाडी मिळवून दिली.
भारत-इंग्लंड पाचवी कसोटी - इंग्लंडने ४७७ करूनही त्यांचे गोलंदाज गळाठल्याने करुण नायरच्या त्रिशतकाच्या जोरावर आपण ७००+ केल्या, व जिंकलो.
ह्या सर्वांमध्ये खालची फळी मदतीला धावून येण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. वरच्या फळीने चिंता न करायला लावणे हे न्यूझीलंड तिसरी कसोटी (डेड रबर), इंग्लंड दुसरी कसोटी, व इंग्लंड पाचवी कसोटी (डेड रबर) ह्याच सामन्यांत दिसले आहे. बाकी सर्व सामन्यांत खालच्या फळीने निर्णायक खेळी करून हरणारा सामना वाचवणे, किंवा बरोबरीच्या परिस्थितीतून सुस्थितीत नेऊन ठेवणे, हे झालेले आहे. कदाचित हा सामना म्हणजे 'वन टाईम टू मेनी' झाला लोअर ऑर्डरकडून अपेक्षा करण्याच्या बाबतीत. स्पेशली ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स हे खूपच चांगले आहेत. ही सिरीज हेझलवूड-स्टार्क-ओ'कीफ विरुद्ध लोअर ऑर्डर, अशी झाली, तर टिकाव आपलाच लागणार नाही.
मला हे वरचे खूप दिवस म्हणायचे होते, पण बोलाफुलाला गाठ नको, म्हणून म्हणत नव्हतो. पण आपल्या विजयांमुळे ही परिस्थिती झाकली जात होती.
भा आज रांग lower order ची
भा आज रांग lower order ची लागली रे. वरच्या order मधे १-२ जण मोठी इनिंग खेळत होते नि आज खेळले नाहित. प्रश्न हा आहे कि जगबुडि आल्यासारखे का भंजाळले आहेत सगळे एका इनिंग नंतर ? ह्या वेळी रांग लागली म्हणून दर वेळी लागेलच असे धरून का बसायचे ?
कुठल्या मोठ्या इनिंग्ज?! ही
कुठल्या मोठ्या इनिंग्ज?! ही एक इनिंग नाहीच, तो लार्जर पॅटर्नचा भाग आहे, हाच तर मुद्दा आहे. वर ६ विकेट्स गेल्या असताना आपल्या काही खूप फ्लॅटरिंग धावा झालेल्या आहेत, असे ८ मॅचेसमध्ये किती वेळा झालेले आहे, हाच मुद्दा उपस्थित केला आहे. रांग लोअरची आज लागली, पण टॉप ऑर्डरची काही लागत नव्हती असे नाही. तू परसेप्शनवर म्हणतोयस, मी वर आकडे दिलेले आहेत. २०९/५, २००/६, ७१/४ मॅच वाचवत असताना, २०४/६, हे स्कोअर्स काही टॉप ऑर्डरसाठी फ्लॅटरिंग आकडे नाहीयेत कन्सिस्टंटली होत असतील तर. टॉप ऑर्डरने मोठ्या इनिंग्ज लोअर ऑर्डरवाल्यांशी भागीदारीत खेळलेल्या आहेत, एकमेकांशी नाही. प्रेशर सिच्युएशनमध्ये तर स्पेशली ट्रू आहे. पण हे सारखे होण्याने गोलंदाज थकतात. स्पेशली अश्विनसारखा गोलंदाज चेन्नईमध्ये कितीतरी थकलेला वाटत होता.
ह्या वेळी रांग लागली म्हणून
ह्या वेळी रांग लागली म्हणून दर वेळी लागेलच असे धरून का बसायचे ? >> आता गँबलर्स फॅलसी १०१ सांगायचे का ?
भा, परफेक्ट! मलाही शंका येत
भा, परफेक्ट! मलाही शंका येत होती, की Top order has not been pulling their weight, except Kohli.
हायलाईटस पाहिल्या... ना पिच
हायलाईटस पाहिल्या... ना पिच ईतका भारी वाटला ना तो बॉलर तितका जबरी वाटला की विकेट अश्याच फेकाव्यात.. किमान २५० मारायचा पिच नक्कीच होता. ऑस्ट्रेलिया त्यांच्या दुसर्या इनिंगला हे दाखवतेय सुद्धा. मात्र आपण पहिली इनिंग अशी खेळल्यानंतर लास्ट इनिंगला ४००+ मारावे लागतील आणि ते पुरेसे चांगले खेळूनही नाही झेपणार. या खेळपट्टीवर १५० चा लीड खाल्यावर ऑस्ट्रेलियाला दुसर्या इनिंगला १५० च्या आसपास गुंडाळत शेवटच्या इनिंगला कोणीतरी जबर्दस्त खेळत ३०० मारणे हाच एक चान्स होता.. पण तोही आजच गमावला.. एका दिवसात सामना फार लांबवर सोडून आलो.
तरी मला आपला झुंजार फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली कसा लढत देतो हे बघायचेय...
भा "टॉप ऑर्डरने मोठ्या
भा "टॉप ऑर्डरने मोठ्या इनिंग्ज लोअर ऑर्डरवाल्यांशी भागीदारीत खेळलेल्या आहेत" मी ही ह्याच इनिंगबद्दल वर म्हटलय. तुझ्या पोस्टचा अर्थ upper order एकाच वेळी खेळत नाहिये हा आहे. पण कोणी ना कोणी तरी lower order बरोबर उभे राहतेय हे माझ्यासाठी मह्त्वाचे आहे. ह्या इनिंगमधे तसे झाले नाही नि lower order पूर्ण collapse झाली. पण हे दर वेळी असेच होईल ह्यावर माझा विश्वास नाही. अजून परत होईल का ? तर होईलही. केवळ एकाच इनिंगवर पॅनिक व्हायचेय का ? उत्तर हो असेल तर सुपर बॉलची टेप परत एकदा बघ
मी म्हटल्याप्रमाणे लोअर
मी म्हटल्याप्रमाणे लोअर ऑर्डरबरोबर उभे राहण्याची वेळ कमी वेळा यायला पाहिजे. २०० रन्सवर ६ विकेट्स हे होम पिचेसवर इतक्या वेळा होणे मला बरोबर वाटत नाही. मी एकाच इनिंगवर पॅनिक झालेलोच नाही, तर न्यूझीलंड सिरीजपासून माझा हा कन्सर्न आहेच, हे मी वरती म्हटलेले आहेच. दॅट लोअर ऑर्डर गेट्स टायर्ड इव्हेंच्युअली. दर वेळी हे असेच होईल म्हणण्यापेक्षा हे असे होण्याचा पॅटर्न गेल्या ८ टेस्टमध्ये दिसतो आहे, आणि तो फॉलो होऊ शकतो, कारण त्यावर काहीच उपाय झाल्याचे दिसत नाही. ऑस्ट्रेलिया हॅज मच बेटर बोलर्स हू कॅन मेन्टेन प्रेशर फॉर लाँग पिरीयड्स ऑफ टाईम. ओ'कीफ चालणार नाही, ह्या भरवशावर मी होतो, पण त्याने प्रॅक्टिस मॅचमध्ये सुद्धा शॉर्ट बॉल्सचे जास्तीचे प्रमाण वगळता खूपच चांगली बॉलिंग केली, हे मी याचि देही पाहिले, आणि तेव्हाच मला वाटले, की त्याने जर लेंग्थ व्यवस्थित ठेवली, तर त्याला खूप जास्त कंट्रोल मिळेल. त्यातून आपल्या टॉप ऑर्डरने जे करायचे ते केलेच. आजही टॉप ऑर्डर ४४/३ होती, तेव्हा राहुल आणी रहाणे विथ साहा अॅण्ड लोअर ऑर्डर टू फॉलो, हीच परिस्थिती होती. आता ४४/३, मग ९४/४ ह्यावर टॉप ऑर्डरला शाबासकी कशी देणार? दे आर नॉट पुलींग देअर वेट. आजचे स्कोअर त्याच पॅटर्नमध्ये बसतात, फक्त आज रेस्क्यु झाला नाही, जो एनीवेज कधीतरी होणार नव्हताच.
I completely agree
I completely agree भास्कराचार्य!
अश्विन, जडेजा आणि आजकाल जयंत यादव वर आपण बरेच अवलंबून असतो.... आणि म्हणूनच मिश्राला आत घेण्याचे धाडस आपण फारसे दाखवू शकत नाही!
"लोअर ऑर्डरबरोबर उभे
"लोअर ऑर्डरबरोबर उभे राहण्याची वेळ कमी वेळा यायला पाहिजे" हे बरोबर आहे. पण "कारण त्यावर काहीच उपाय झाल्याचे दिसत नाही." हे पटत नाही. उपाय म्हणजे नक्की काय व्हायला पाहिजे असे तू सुचवतोयस ? Individually Top order मधल्या प्रत्येकाने *राहाणे" वगळता धावा काढल्या आहेत. मिसिंग पीस पार्टनरशिप होण्याचा आहे. शाबासकी दे असे मी म्हटलेले नाहिये पण पण आजचा दोन्ही बाजू अशाच दर वेळी फेल जातील असे एका इनिंगवरून धरणे मला धाडसाचे वाटते.
केवळ पूर्वपुण्याईच्या जोरावर
केवळ पूर्वपुण्याईच्या जोरावर नायरला डावलून रहाणेला आत आणणे आजिबात लॉजिकल नव्हते. फिटनेस आणि फॉर्म ह्या एकाच खेळाडूच्या दोन बाजू आहेत . मैदानावरची अॅक्सिडेंटल ईंज्युरी होती तरी ईन फॉर्म आणि फिट नायरला डावलून रिकवरिंग आणि आउट ऑफ टच रहाणेला खेळवून काय फायदा?
वेगळे पीच आणि बांग्ला सारख्या टीमशी एकच मॅच खेळून रहाणे ऑस्ट्रेलियासाटी तयार झाला हे न समजण्यासारखे आहे. अनुनभवी असला तरी सलग तीन मॅचेस खेळून तीन शतकी मजल मारलेल्या नायर डिझर्विंग कँडिडेट होता फायनल ११ मध्ये.
कैक मॅचेस पासून ईशांत शर्मा केवळ एका एंड वरून ओवर्स भरून काढण्याचे काम करत आहे, स्पीनर्सच्या सक्सेस मुळे त्याचे अपयश झाकून जाते. पंड्या ला आणायला हवा त्याच्या जागी. माझ्या मते पार्थिव पटेल आजही साहा पेक्षा बेटर चॉईस आहे.
Pages