100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणाच्या लक्षात आले का. तो शेजारचा इनिस्पेक्टर मधेच स्वच्छ बोलतो व मधे हेल काढुन गावाकडे बोलतात तसे बोलतो.

आख्ख्या पोलिस चौकीत ही एकच केस आहे. कारण सगळे लोकं अजय ठाकूरांच्या दिमतीलाच असतात.

साहेबांना कुठनं प्रेशर येतंय कुणास ठाउक? कोणी ही टाकत नाहीये एक मीरा सरदेसाई सोडली तर..

राखेचा विरुध्द कोकणाचं नाव खराब केल्याची तक्रार होती तशी आता पोलिस लोकं स्व्तः करणार १०० डेज बद्दल...
अरे साधा आर्डर्ली पण फास्ट विचार करेल ह्यांच्या पेक्षा Angry

त्याशिवाय १०० days होणार...
अखिल भारतीय पाणी डालो आणि programme बचाव संघटना यांचे अध्यक्ष zee मराठी

कारण सगळे लोकं अजय ठाकूरांच्या दिमतीलाच असतात.>> काय मॅक्स, मीरा सरदेसाई विकीने हल्ला केलेल्याची टिप द्यायला पोस्टेला आली तेव्हा तिला एक स्मार्ट पोलिसबाई भेटलेली दाखवली, ती पाहिली नाहीस का?
ती नसे अजयच्या दिमतीला.
बरं, दुसरे पोलिस लोक दाखवले तर १०० भागच दाखवायचेत, त्यात अनावश्यक तपशील कशाला म्हणत तुम्ही लोक नावं ठेवणार.
एकूण काय, असं नाहीतर तसं, तुम्ही फक्त नावंच ठेवणार.

Lol नाही गं मंजूडे Happy तेजू = तेपं = राणी

त्या अजयच्या लग्नाचं इतकं दळण टाकतात मधे की असह्य होतं. आणि तपास तर माशाल्ला चालू आहे. राणी तर प्राइम सस्पेक्ट असायला हवी आणि सरदेसाईच्या घरचे नोकरसुद्धा सस्पेक्ट्स असायला हवेत. त्यांना ट्रॅक करायचं सोडून सगळे पोलिस नुसते 'अजून ही केस का सुटत नाहीये?' असले भंपक ड्वायलाक बोलताना दाखवतात. विकी अजयला भेटणार ही गोष्ट राणी आणि पटवर्धन या दोघांनाही माहिती होती. त्यांची चौकशी नाहीच?

अपघात केलेल्या ड्रायव्हरची चौकशी काय बाळबोध चालली होती.. आम्ही चोर-पोलीसांच्या खेळातही यापेक्षा चांगली चौकशी करायचो. Proud

मला वाटतेय तो तिवारी राणीच्या डोळ्यात धूळ फेकत असावा.

अपघाताचा भाग पाहिला नाही.

ती डेडबॉडी सापडल्याच्या एपिसोड मधे...एक संवाद असा होता..
अजय.. फ़ोरेन्सिक डॉ. ला-
"ही बॉडी केंव्हा डेड झालीये?"
अरे काय..'डेथ टाईम', 'रिगर मॉर्टिस' हे शब्द काय मेले होते का?
आवरा संवाद आहेत.
या पेक्षा प्रद्युम्न, दया, अभिजीत, फ़्रेडी झालच तर, डॉ. साळुंके, तारिका...सगळे सगळे परवडले.

अपघात केलेल्या ड्रायव्हरची चौकशी काय बाळबोध चालली होती>> अगदी अगदी! प्रश्न पण काय भारी?...+१
छोटारे ओरडत होते...मनी मनी...
म्यांव करावस वाटल अगदी.
..........
बॅडली मिसिंग दिदोदु Sad

तो अजय खरोखरच माठ आहे .
ती राणी सांगते विल मिळालं , माझ्या नावावर आहे , तर लगेच विश्वास ठेवतो .
त्याचे सिनियर सांगतात , डिटेल्स मागवा .
म्हणे आता राणीवर संशय घ्यायला वाव कमी आहे.

याच्या तपासाची काही दिशाच नाही .
आमच्या बॉसच्या भाषेत बोलायच तर ,
" working re-actively rather than being proactive"

मला तर मुळात हेच समजलं नाही की धनंजयला शोधताना तो जिवंत सापडेल असं अझम्शन का केलं! दोन्ही शक्यता गृहीत धरून तपास व्हायला हवा होता सुरूवातीपासून.

त्या अजयला सीआयडीवाल्यांकडे ट्रेनिंगला पाठवा. अजून काही नाही तर इन्स्पेक्टर महेश जाधव यांची शिकवणी तरी लावा Proud

तो शेजार चा हवाल्दार पण बरं काम करतो ..

अपघात केलेल्या ड्रायव्हरची चौकशी काय बाळबोध चालली होती>>> +१११

सीआयडी पेक्शा खालच्या लेव्हला आहे ही स्टाईल..
तो ड्रायव्हर एकदा नाही म्हणाला तर हे लोकं म्हणतात.. बोल .. काय रे नाही ना माहिती? Uhoh

मॅक्स, सीआयडी को कुछ बोल्नेका नै Proud

बोल .. काय रे नाही ना माहिती? >>> Rofl तिवारीला पण असंच सोडलं नाही का! अजय ठाकूर कोणाचीच चौकशी करताना दिसत नाहीत. त्यांना एकतर राणी कॉल करून माहिती देते किंवा मीरा. त्यात पण राणी सांगेल ते लगेच मान्य करतात आणि मीराने काही सांगितलं की पुरावा द्या म्हणतात.

त्या अजयला सीआयडीवाल्यांकडे ट्रेनिंगला पाठवा. अजून काही नाही तर इन्स्पेक्टर महेश जाधव यांची शिकवणी तरी लावा >> +१. Lol

राणीच्या नावावर विल आहे तर ती पहिली संशयित होते ना?? >> ठाकूर म्हणतायेत राणीला माहीत नव्हत ,तिला अचानक विल सापडले . म्हणजे तिच्याकडे मोटीव्ह असणार नाही.

अरे इथे कोणी अस्मिता ला का नाही बोलवत..>>> ती फक्त ३ दिवसांत शोधतेना, इथे १०० दिवस लावायचेत. इतक्या लवकर नाही शोधायचं.

अजय मुद्दामून करतोय असं दाखवतील शेवटी, तो सांगेल तू मला नाही, मीच तुला खेळवत होतो. (हे उगाच असेल मोठेपणा घ्यायला Wink )

पटवर्धन ना भेटायला मीरा आणी ती पहिली बायको किती नटुन गेल्या. लिपस्टिक काय, मोत्याचे दागिने काय! काहिही दाखवतात.

म्हणजे राणी तर नटतेच पण या दोघी पण ? मग फरक काय ? आणि ती गायत्री पांढऱ्या साडया . पांढरे कानातले / गळ्यातले म्याचिंग वगैरे . बर नाही दिसत . तिने काय धनंजय गायब झाल्यापासूनचं पांढऱ्या साड्या नेसायला सुरवात केली कि काय ? राणीला तिच्या वरती संशय घ्यायला एक पॉईंट आहे . कालचा एपिसोड चांगला होता Happy

Pages