100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदिनाथ कोठारे जरा बच्चा वाटतो तेजस्विनी पंडीत समोर....पण सस्पेन्सचा दर्जा चांगला ठेवला झी वाल्यानी तर सिरियल छान होऊ शकेल. नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल.

<< नेहमीच्या सास-बहूपेक्षा वेगळं काहीतरी बघायला नक्की आवडेल. >>सहमत .
[ आपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. Wink ]

आपल्या आवडत्या 'इन्स्पेक्टर'च्या रोलचा वारसा व त्यांच्या तरुणपणीच्या मापाचे युनिफॉर्म आदिनाथच्या सुपूर्द करायला तर महेश कोठारीनी नाही ना काढली ही सिरीयल , असा एक गंमतीशीर विचार मनात डो़कावून गेला. Wink >>> Proud

कोठारे व्हिजनचीच आहे सिरियल. मला आदिनाथ आवडतो. त्याचे बाबा नाही आवडत. अर्थात १०० दिवस असेल का ही तर पहीला आणि शंभरावा बघेन. मधे हा धागा वाचेन ;).

मालिका हॉरर वगैरे नाहीये आय गेस. सस्पेन्स आहे ना?>>> मला प्रोमोवरुन मालिका आमीर खानच्या 'तलाश' वरुन बेतलेली वाटते.

हो, मस्त पिक्चर होता. त्यात माधूरी बरोबर जॅकी श्रॉफ, जावेद जाफरी आणी मुनमुन सेन पण होते. गाणी पण मस्त टाईमपास होती

ती तेजस्विनी पडद्यावर जितकी थोराड दिसते त्यापेक्षा कितीतरी नाजुक प्रत्यक्षात दिसते. लेकीच्या शाळेत कुठल्याश्या प्रोग्राम्साठी आली होती माजी विद्यार्थीनी म्हणुन तेंव्हा जवळुन गेली तरी कळ्ळ नव्हत मला की ही कुणी सेलिब्रिटी आहे. अगदी साधी जीन्स टी मधे होती ती.
पडद्यावर मला ती उंच वाटते पण प्रत्यक्षात ५'४" वगैरे असेल अगदी. मला मान उंचवावी लागली नाही म्हणजे नक्कीच नाही Wink

दुसऱ्या प्रोमोत तर आदिनाथ फारच कोवळा वाटतो तेजस्विनीसमोर. तो गोड दिसत होता. ती नाही मला एवढी आवडत. काम छान करते. उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना, त्याचंच तर production आहे.

उर्मिला कानेटकरलाच घ्यायचं ना>> तेजस्विनी बहुधा निगेटिव्ह शेडच्या भूमिकेत असावी. सूनेला व्हॅम्प दाखवायचं नसेल त्यांना Wink उर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाहीत. तेजस्विनी फिट्ट आहे या भूमिकेला.

उर्मिलालाही अशा भूमिका शोभत नाहीत.>>>> ती तर अजुनही माझ्यासाठी शुभ्रा च्या च भुमिकेत फिट्ट आहे.खुप च सही पात्र होत ते असंभव मधल.

>>>>तेजस्विनीला बघितले की का कोण जाणे मला फ्रेंडस मधली फिबी आठवते.
पण तस्लं कॅरेक्टर काही जमायचं नाही.
इथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अ‍ॅकरिंग बघवायचं नाही..

इथे कॉमेडीची बुलेट ट्रेन चं अ‍ॅकरिंग बघवायचं नाही.. खरं आहे.

मी ती कॉमेडीची बुलेट ट्रेन बघणं आधीच सोडलं होतं, आधीची ती सध्या इथेच टाका तंबुमधे आहे ती हिरवीण करायची तीपण नाही आवडली, मग ही आल्यावर बघुया म्हटलं कसं करते तर हीपण नाही आवडली.

बाकी फ्रेंडस बघितली नाहीये कधी त्यामुळे त्याबद्दल नाही सांगू शकणार.

तेजस्विनी मस्त दिसतेय प्रोमोमध्ये आणि भूमिकेसाठी फिट्टही वाटतेय. मला आवडली. पहिल्यांदाच तिच्या लूकला साजेशी भूमिका तिला मिळाली आहे असं वाटतंय. आदिनाथही मस्त दिसतोय.

मालिका बघण्याची उत्सुकता आहे, नेहमीसारखा दोन-चार भागात पोपट नाही झाला पाहिजे. कितीतरी वर्षात समरसून अशी एकही मालिका पाहिली नाहीये मी.

मला तर प्रोमो पण पूर्ण पाहता आले नाहीयेत. यातली तेजस्विनी विचित्र हावभाव करत स्क्रिनवर दिसली रे दिसली की साबा शिव्यांचा जप सुरु करतात. Proud त्यापेक्षा चॅनेल चेंज केलेला परवडतो. Happy

निधी Biggrin
खरंच आहे पण.....किती भेसूर पार्श्वसंगीत आहे त्या प्रोमोत आणि!
म्हणजे ही सस्पेंस स्टोरी आहे की भुताटकी ची? सस्पेंस मधे भुताटकी नसते ना?

Pages