Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49
रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
suhasg | 17 December, 2016 -
suhasg | 17 December, 2016 - 22:49 >>>>>>>> लै भारी, पोष्टीशी सहमत
कुठेतरी वाचलं की पन्नास भाग
कुठेतरी वाचलं की पन्नास भाग झाल्यावर जबरदस्त twist आणणार आहेत. नेटवर बरेच पेपर चाळते, त्यामुळे नक्की कुठे वाचलं लक्षात येत नाहीये. आता झी ची twist ची कल्पना कुठपर्यंत मजल मारते हे कळेलच.
त्याला केस वरून हटवला असं तर दाखवणार नाहीतना, म्हणजे खरं शोधून काढण्यासाठी उगाच तसं भासवणार मग हा तिच्या प्रेमात पडेल असं दाखवतील मीन्स नाटक करेल आणि मग तिला गाफील ठेऊन डाव उलटवेल शंभराव्या दिवशी.
<<त्याला केस वरून हटवला असं
<<त्याला केस वरून हटवला असं तर दाखवणार नाहीतना, म्हणजे खरं शोधून काढण्यासाठी उगाच तसं भासवणार मग हा तिच्या प्रेमात पडेल असं दाखवतील मीन्स नाटक करेल आणि मग तिला गाफील ठेऊन डाव उलटवेल शंभराव्या दिवशी.>> अंजू तशीच अटकळ आहे . मी पण आधीच्या प्रतिसादात तेच म्हटलंय . याला तिच्या केस मधून हटवतील . मग तो तिच्या बोलावण्यावरून सारखा बंगल्यावर म्हणजेच वाड्यावर जाईल आणि केस सॉल्व्ह करेल
येस सुजा, तू लिहिलेलं बरोबर
येस सुजा, तू लिहिलेलं बरोबर वाटतंय.
अजय ठाकुरच हे सर्व करत असेल
अजय ठाकुरच हे सर्व करत असेल तर! तसाही तो त्या नेहाच्या प्रेमात वाटतच नाही.
आज एकदम कहानी में ट्विस्ट
आज एकदम कहानी में ट्विस्ट . धमक्या द्यायला शरदला नेमलाय राणीने . तो जेव्हा पाठीमागून दाखवला तेव्हा तो शरदच असेल असं वाटलं होत . तो जेव्हा बंगल्याच्या पायऱ्या चढतो ( नुसता पायावर कॅमेरा होता ) तेव्हा तर खात्रीच पटली आणि सगळ्यात शेवटी मात्र अंदाज खरा ठरला पण ती राणी त्याला मिठी का मारते ? ते मात्र उलगडलं नाही
संगीता जेव्हा धनंजय च्या बहिणीला फोन करत असते त्या वेळी तो तिला एकदा पकडतो असं दाखवलंय पण त्यावेळी तो राणीच्या खुनाच्या प्लॅन मध्ये नसावा पण आता राणीने त्याला पैसे मोजून धमक्या द्यायला घेतलाय हे स्पष्ट झालं . संगीता धनंजय च्या बहिणीला फोन करते हे आता तो राणीला सांगेलही किव्वा स्वतःकडेच गुप्त ठेवेल
काय? राणी शरदला मिठी मारते???
काय? राणी शरदला मिठी मारते???
शरद कोण? तो नोकर का, ज्याला
शरद कोण? तो नोकर का, ज्याला राणी आवडत नसते.
काय? राणी शरदला मिठी मारते???
काय? राणी शरदला मिठी मारते??? >> हो , कहाणी मे ट्विस्ट ! शरद , राणीसोबत आहे , काल पण त्या पॉलिटिशिअन ला घरी बोलावते तेव्हा शरद तिथेच असतो टेबल पुसत तेव्हा मला जरा शंका आली होती .
काय? राणी शरदला मिठी मारते???
काय? राणी शरदला मिठी मारते??? >> हो तो तिच्या खोलीत आल्यावर दार बंद करते आणि त्याला मिठी मारते . आल्रेडी संगीताला विचारलेलं /सांगितलेलं असत ( हिडीस फिडीस स्वरात ) कि शरद आहे कुठे ? कुठे असतो कुठे आजकाल? तो आल्यावर मी बोलावलंय म्हणून सांग वगैरे वगैरे आणि नंतर तो खोलीत येतो तर लगेच दार बंद करून त्याला मिठी वगैरे हे असं
१०० डेज पेक्षा १०० दिवसात खेळ
१०० डेज पेक्षा १०० दिवसात खेळ चाले सार्थ आहे.
राखेचा पेक्षा कैतरईच ट्वीस्ट देताहेत. ओढुन ताणुन रहस्य
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा मामा निघणार!
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा मामा निघणार!>> असू शकतो पण मग तो नोकर म्हणून कशाला राहील?. तीच सारखं हिडीस -फिडीस ऐकत ? हा हि प्रश्न आहेच आधी ती दोन्ही नोकरांना गावाला जायचंय का ? जायचंच . पगार वाढवते वगैरे त्या दोघांना बोलत असते ना
अरे किती वेळा त्याच त्याच
अरे किती वेळा त्याच त्याच रस्त्या वरुन गाडीवरुन जाताना दाखवतात
छोटारे आणि मेमाणे बुलेट वरुन जाताना ३ दा त्या टेंपो जवळुन गेले. मग तो सर्व्हिलियंस डिव्हाईस घेतलेला इन्स्पेक्टर एक्दा त्याच पार्क केलेल्या टेम्पो वरुन गेला मग परत छो+मे त्या टेम्पो च्या बाजूने गेले.
दौड मधला शिकारी सीन आठवला
पोलिसांच्या गाडीत छो+मे बसल्यावर त्यांच्या पुढची सीट रिकामी होती ज्या ठीकाणी तो दुसरा इन्स्पेक्टर डिव्हाईस घेउन बसला होता.
एडीटर झोपा काढत असतो काय?
अरे एक ठराविक शूटिंग घेऊन तेच
अरे एक ठराविक शूटिंग घेऊन तेच तेच सीन्स टाकत होते.
मॅक्स अगदी अगदी!
मॅक्स
अगदी अगदी!
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा
तो शरद तिचा मोठा भाऊ किंवा मामा निघणार!>> राणी ज्या पद्धतीने मिठी मारताना दाखव्लिये तस वाटत तरी नाहिये, हा बळच ट्विस्ट!
छोटारे काय डोक्यावर पडलाय का? तावडे साहेबाना देत नाही येवढे अपडेट तो राणि ला देतो, काहीही काय? अरे माणसा ! असे सगळे डिटेल्स सगळ्याना नसतात सान्गायचे रे! ... प्रत्यक्षात पोलिस लोक प्र्त्यक्ष केस शी सबध नसेल तर खात्यात सुधा एकमेकाना आपाप्ल्या केस विषयी सान्गत नसतिल, ह्याला कुणावर सशय कसा येत नाही. इतक्या गळेपडु बाइवर तर पहिला सन्शय हवा याचा.
कहानी मे ईतका 'अचाट' ट्विस्ट
कहानी मे ईतका 'अचाट' ट्विस्ट टाकलाय पण कहाणी ची हाताळणी मात्र ट्विस्टेड च आहे...
राणी ने लवकरच चित्रपटात दिसावे... ईथे सगळी मेहेनत वाया जातीये
अजय ठाकूर ने घरची शिकवणी लावावी 'डॅम ईट'!
(एकंदरीत सर्व अंदाज आधीच आल्याने झी वाल्यांनी यांना फक्त १०० दिवसच दिले असावेत.)
असो. धनंजय चं जाऊदेत, आता कहानी मध्ये अजून काय काय ट्विस्ट घालू शकतील याची चर्चा करायला हरकत नाही.
त्या शरदला राणीचा प्रियकर
त्या शरदला राणीचा प्रियकर म्हणवेना झालं आहे.
खरच फार बळच ट्विस्ट आहे हा!!
बिचारी राणी. गणेश काय, शरद
बिचारी राणी. गणेश काय, शरद काय, धनंजय काय. तो आदी हाताला लागेल तेव्हा नशीब उघडेल
.
(No subject)
नेहेमीच्या रागिट राणी पेक्षा
नेहेमीच्या रागिट राणी पेक्षा मुखवटा उतरवलेली राणी आवडली.
छोटारेंचा तपास फारच संथ गतीने चाललाय !
छोटारे कडुन खरच केस काढुन
छोटारे कडुन खरच केस काढुन घ्या आता! माबोकर सोडवतिल सगले ट्विस्ट आणी टर्न टाकुन (म्हणजे केस सुटलेली आहेच हव तर गुतवुन देतिल हवी तशी हाकानिका )
राणी शरदला मिठी मारते???????
राणी शरदला मिठी मारते???????
फारच डेस्परेट झालेली दिसते बाई!
पुढचा ट्विस्ट म्हणजे राणी अगदीच सहन होत नाही मोडात जाऊन पोलिसस्टेशनमधे जाऊन अजय ठाकूरला मिठी मारेल. तावडे साहेबांना आणि संपूर्ण टीमला अजयचा संशय! भरीस भर म्हणजे नेहाची आई अजयचं मॅरेज कौन्सेलिंङ करण्यासाठी सकुसप पोस्टेमधे बसलेली असेल, मिठीचा सीन पाहिल्यावर ती तडक जाऊन नेहाचं नाव मॅरेज ब्युरोमधे नोंदवेल.
आधी फिंगर्प्रिंट्स च्या
आधी फिंगर्प्रिंट्स च्या एपिसोड मधे पण विल ची फाईल (बेडरूम मधल्या कपाटातून) आणायला शरदला सांगते तेव्हा जरा विचित्र वाटलं होतं. पण पुढच्या ट्विस्ट ला धरून वाटतय आता.
शरद आणि राणी... झेपेना
शरद आणि राणी... झेपेना झालंय. खरंच अचाट ट्विस्ट टाकलाय हा.
पहिल्या काही भागात राणी खोलीत एकटी असताना शरद नाॅक करुन आत येत नाही म्हणून राणी त्याच्या अंगावर खेकसताना दाखवली होती. जर त्यांची लहानपणापासून ओळख आणि पुढे प्रेम वगैरे होतं तर तीने त्याला असं ओरडणं कसं योग्य असेल?? हा ट्विस्ट लेखकूच्या डोक्यात आता अचानक आलेला असणार बहुतेक.
राणी शरदला मिठी मारते???????
फारच डेस्परेट झालेली दिसते बाई!>>
नाही गं, डेस्परेट वगैरे नाही. ते दोघे एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात, असं काल तो शरद म्हणत होता. म्हणजे सगळंच वेल प्लॅन्ड आहे त्या दोघांचं, असं वाटतंय. अगदी राणीने धनंजयला फसवून लग्न करणं आणि मग प्राॅप्रर्टीसाठी त्याचा खून करुन मग दोघांनी त्या पैशावर मजेत जगणं वगैरे. शरद तिचा नोकर बनून पण त्याचमुळे राहत असणार. (थोडक्यात हमराजचं कथानक)
छोटारे रच्याकने, तुम्ही
छोटारे
रच्याकने, तुम्ही केलेल्या उल्लेखातला गणेश कोण?
पुढचा ट्विस्ट म्हणजे राणी अगदीच सहन होत नाही मोडात जाऊन पोलिसस्टेशनमधे जाऊन अजय ठाकूरला मिठी मारेल. तावडे साहेबांना आणि संपूर्ण टीमला अजयचा संशय! भरीस भर म्हणजे नेहाची आई अजयचं मॅरेज कौन्सेलिंङ करण्यासाठी सकुसप पोस्टेमधे बसलेली असेल, मिठीचा सीन पाहिल्यावर ती तडक जाऊन नेहाचं नाव मॅरेज ब्युरोमधे नोंदवेल.>>>>>>

गणेश म्हणजे विकी पटवर्धन.
गणेश म्हणजे विकी पटवर्धन. राखेचामधला गणेश.
काही घडत नाही मेलं या शिरेलित
काही घडत नाही मेलं या शिरेलित
उगिच्च काही ही दाखवतात.
ते दोघे एकमेकांना
ते दोघे एकमेकांना लहानपणापासूनच ओळखतात, असं काल तो शरद म्हणत होता.>> अच्छा! अरे देवा!
Pages