100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्ना, <<20 November, 2016 - 15:00>> Lol

इथली फटकेबाजी वाचूनच त्या दिवशी मृत्युपत्राच्या चौकशीकरता महिलापोलीसलासोबतनेले असणार असे खरोखर्वाटले. Lol

काल बड्डे सेलिब्रेशन Uhoh

राणीने केव्हढा मोठ्ठा बुके धाडला होता अजय ला. ते पाहून नेहाचं तोंड जमिनितूनही पडून आरपार खाली गेलं. हत!

काल मी म्हणाले काय हे मी आपली तपासाचं काय झालं ते बघायला सिरेल लावते आणि ह्यंचं बड्डॅ सेलेब्रेशन. माझी लेक म्हणे अगं आला असेल बिचार्याचा बड्डॅ मधेच. मग सेलेब्रेट करायला नको का

पण बड्डे आहे हे राणीला कसं कळलं?

अनुराधा राज्याध्यक्ष, स्टार प्रवाहच्या 'अरे वेड्या मना' मध्ये होती ती सिरीयल जानेवारीत संपली.

इथली फटकेबाजी वाचूनच त्या दिवशी मृत्युपत्राच्या चौकशीकरता महिलापोलीसलासोबतनेले असणार असे खरोखर्वाटले >>> मी फेसबुक पेजला लिहिलं होतं त्यांच्या, की आज तुम्ही तो एकटा गेला असं दाखवताय ते चूक आहे, महिला पोलीस का नाही नेत बरोबर. तो एपिसोड रात्री दाखवणार त्याच्या आधीच लिहिलं होतं. बाकी पण एकदोघांनी पण लिहिलं महिला पोलीस न्यायला हवं असं.

स्वप्ना करू शकते लेखन, दक्षिपण, माझ्याकडे तेवढं नाही.( आणि लिहिलं तरी मार्केटमध्ये आम्हाला कोण विचारणार Lol ) माझा सांगण्याचा उद्देश एवढाच की मी चांगलं वाईट जे वाटतं ते डायरेक्ट त्या त्या सिरीयलच्या फेसबुक पेजवर लिहून येते.

सध्या मी बघत नाही ही त्यामुळे नाही लिहिलं तिथे.

आता तो ते घड्याळ परत कसं करतो हे पहाणं इंटरेस्टींग असेल.

माझ्या मते त्यानी घड्याळाचा मागून - पुढुन फोटोकाढला पाहिजे, विटनेसच्या समोर. मग लेडी कॉन्स्टेबलला घेऊन राणीकडे जाऊन तिला ते परत दिलं पाहिजे. तरच तो बिन-फायलींचा पो. ऑ. शोभेल.

>>तुम्ही बेस्ट क्रिटिक्स (मानता स्वतःला), तर लेखन उत्तम करू शकाल असं मला आपलं वाटलं हो!

प्लीज नोट - मी स्वतःला बेस्ट क्रिटिक वगैरे मानत नाही. जे खटकतं ते स्वच्छ लिहिते एव्हढंच. पूर्वीच्या काळी क्राईम सिरियलीमधून काहीही दाखवलं तरी चालून जायचं. पण आता क्राईमवर इतक्या सिरियल्स येतात, वर्तमानपत्रातून माहिती येते की तपास कसा केला जातो ह्यावर थोडी तरी माहिती मिळतेच. मग असला बाळबोध प्रकार का दाखवला जातो हा माझा सवाल आहे. जर व्यवस्थित दाखवणं जमत नसेल तर अश्या जॉनरच्या वाटेला जाऊ नये. सासू-सून ड्रामा दाखवावा. त्यात काहीही दाखवलं तरी चालतं.

इथे मालिकेची फक्त स्तुतीच अपेक्षित आहे हे मला माहित नव्हतं. बरं झालं कळलं. धन्यवाद!

आजची ते पं ची साड़ी अगदीच ऑर्डिनरी होती। तिचे ओठ मुडपुन बोलणे पण नको वाटते बघायला। आदिनाथ छान दिसत होता आज। राणी विकीलापण संपवेल असं वाट्टय

धनंजय चं नेमकं काय झालं या पेक्षा या मालिकेचा कॅमेरामन प्रेक्षकाना ईतका का 'झुलवतो' हेच मोठं गुपित आहे..
विकी चा पाठलाग सिक्वेंस बाकी मस्त झाला...
खरं तर आता केस बर्यापैकी गुंता गुंतीची झालीये... म्हणजे राणी सोडून बाकी ईतरांवर संशय घ्यायला पुरेसे प्रसंग घडलेत...
(पहिल्या काही दिवसात केस तशी सोपी होती... आता अजय ठाकूर कडून नक्कीच काढून घेतील.) Happy
मग त्याला जाग येईल... आणि मग तो बहुतेक मुद्दामून राणी च्या जाळ्यात अडकल्याचं नाटक करून शेवटी केस सोडवेल असे वाटते.
बाकी राणी सरदेसाई एकदम जोरदार....! शरद वर ओरडते तेव्हा तर आदीच खल्लास दिसते Happy

धनंजय चं नेमकं काय झालं या पेक्षा या मालिकेचा कॅमेरामन प्रेक्षकाना ईतका का 'झुलवतो' हेच मोठं गुपित आहे..>>अगदी अगदी. असे वाटते कि कॅमेरा लटकवत ठेवलाय.

त्या ईन्सपेक्टर च्या ऐवजी मीराच जास्त तपास करताना दिसते. तिच ही केस सोडवणार असे दिसते.

अजय ठाकूर ला तो जो एक निनावी फोन आला त्या माणसाचा आवाज ऐकुन मला एकदम शेजारच्या अतिचांगल्या इन्सपेक्टर चा संशय यायला लागलाय! Uhoh

या मालिकेचा कॅमेरामन प्रेक्षकाना ईतका का 'झुलवतो' हेच मोठं गुपित आहे..>>> हो यार... विशेषतः पोलिस स्टेशनमधले प्रसंग. फार त्रास होतो डोळ्यांना.

विकी चा पाठलाग सिक्वेंस बाकी मस्त झाला.. >> बोअर झाला खरतर. विकीला धडक बसल्यावर उगाच गाडी असताना २-३०० मिटर पळाला अजय गाडी टाकुन. त्याच्या आवाजात पण काही पोलीसी जरबच दिसत नाहीये.

Pages