100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे त्या राणीचे क्लोजअप्स कमी करा रे. ती लांबुनच सुंदर दिसते. अजय ठाकुरच्या स्कीनपुढे अजुनच खराब दिसतो तिचा मेकअप.

धनंजय सरदेसाईची जी बहिण दाखवली आहे तिचे खरे नाव काय आहे.तिला बर्याच मालिकांमध्ये बघितले आहे.

धनंजयची बहीण आहे मुग्धा गोडबोले-रानडे .
" झुळूक " पुस्तकाच्या लेखिका मंगला गोडबोल्यांची मुलगी Happy

धनंजय चे शव सापडले का? >>>> धनंजयच्या ५-१० मिनिटाच्या रोल साठी रमेश भाटकर घेतला आहे.....मला इतके दिवस वाटत होते की हा धनंजयचाच कट आहे!! आता शव सापडले असेल तर तसला काही ट्विस्ट नाही

मला तर नाही वाटत ते शव धनंजय चे असावे. हे तर फक्त एपिसोड खाऊ प्रकार आहे..
खूप सार नाटक दाखून पुन्हा हे शव धनंजय चे नाही असे राणी सांगणार

माझ्या मते ते धनंजय चेच शव असावे. त्याचा चेहरा विद्रुप झाला आहे. शवाजवळ काही गोष्टी आढळल्यात . त्या राणीला ओळखायला सांगितल्या आहेत त्या राणीने ओळखूनही मुद्दामून नाही सांगितले असावे असं वाटत. आता कदाचित तिची खात्री झालेय कि धनंजय नक्की मेलाय. मग भरीस भर म्हणून धनंजयची पहिली बायको ( गायत्री )आणि बहीण येऊन सांगणार राणी विरुद्ध आणखीन काही किस्से. तिच्या बद्दल चा संशय इन्स्पेकराच्या मनात भरण्याकरता . त्यात धनंजयच्या पहिल्या बायकोचे गायत्रीचे भाऊ पण गेले काही दिवस घरी आलेलेच नाहीत असं प्रेक्षकांनी ऐकलं आहेच . थोडक्यात संशयाच एक पिल्लू गायत्रीच्या भावांवर इन्स्पेक्टर साठी . बाकी प्रेक्षकाना माहिती आहेच खरा खुनी कोण आहे ते . किव्वा राणीने मारे प्लॅन करून ड्रायव्हर ला हाताशी धरून खून केलाय हे तिला स्वतःला माहिती आहे किव्वा ती आणि प्रेक्षक पण समजत आहेत पण खरा खुनी वेगळाच असं शेवटचं धक्का तंत्र Happy

हल्ली कुठलीही शिरेल बघितली जात नाही. इथे वाचून बरंच झालं असं वाटतंय.

झी ने गूढ, सस्पेन्स च्या भानगडीत पडू नये. पाणी घालायला सासू सून चालतं आम्हाला.

मला एक अजुन एंड सुचतोय की ते.प. खरी खुप सिनिअर इन्स्पेक्टर असावी आणि ते शेवटी कळेल..
तोपर्यंत अजय तिच्याकडे पुरता आकर्षित झाला असेल आणि आधीच्या गर्ल्फ्रेंड ला सोडुन देईल...

विल मधे कोणाच्या नावे सगळी प्रॉपर्टी केलेली असते। आणि राणी आणि मीरा च पटत का नसतं।। अजय खूपच सिनसीअर दाखवलाय। एका इंस्पे.कडे एकच केस असते का:अओ:

१-२ दिवस हॉलमध्ये काही काम करत असताना एपिसोडचा थोडा भाग दिसला तर अजय राणीला डेड बॉडीची ओळख पटते का ते विचारत होता. डीएनए टेस्ट केली का आता तरी? धनंजयची बहिण आहे की त्यासाठी. तिला त्या डेड बॉडीसाठी बोलावलं का?

धनंजयच्या पहिला बायकोशीसुध्दा त्याने बोलायला हवं होतं. त्या दिवशी ती मीरासोबत होती तर 'आपली ओळख झाली नाही' असं तिलाच म्हणाला. अरे, तुला धनंजयशी संबंधित सगळे लोक माहित नकोत का?

बर्थडे पार्टीचा प्रोग्राम लपवणं वगैरे अतिच चाललं होतं. सूरज बरजात्याला कन्सल्ट करताहेत का हे लोक?

राखेचा चा सीझन २ पण आनंदाने बघेन मी. पण हे आवरा बुवा.

बड्डे पार्टी सीन चुकून पाहीला, ती कोण ओवाळत होती तिचा नवरा दाखवलाय तो परमनंट इन्स्पेक्टर आहे बऱ्याच शिरेलीतला. Lol

राखेचा चा सीझन २ पण आनंदाने बघेन मी. पण हे आवरा बुवा.>>
राखेचा १ कशी खूप भारी सिरीयल होती हे पटवायला काढलीय ही सिरीयल. Wink

Lol

स्वप्ना १२ डिसेंबरपासून यावेळी कलर्स मराठी जॉईन कर Wink , अर्थात ते पिडणार नाहीत याची काही गॅरँटी नाही हा.

माझी तर आजकाल कादिप चा रिपिट पाहतानाच विकेट पडते त्यामुळे १०० डेज ला न्याय नाही देता येत रात्री १ ला.
नाहीतर निदान पिसं काढता यावीत यासाठी तरी मी मन लावून पाहिली असती शिरेल Proud

राणी सरदेसाई रोज दर्शन देतात... तेव्हडं पुरेसं आहे ही मालिका रोज बघायला. Happy
[गणेशा ला मोठी लॉटरी लागलीये... पण तो अजूनही रा.खे.चा. च्या हँगओव्हर माधे वावरतोय..!]
बाकी, .. "अजय ठाकूर च्या टेबल वर एकही केस आजपर्यंत पेंडीग नाही..". हे पटतं. एकाच आठवड्यात त्याच्या कडून काढून घेत असतील.. Happy

पटवर्धनांचे काम चांगले झाले आहे. ती धनंजय ची पहिली बायको आहे त्या नटिचे नाव काय? ती बर्याच जुन्या मराठी चित्रपटांत असायची.

योग Lol

अनुराधा राजाध्यक्ष!
मस्त आहे ती. तिनेच अल्फा मराठीवरच्या सुंदर अश्या 'रेशीमगाठी' मालिकेचं लेखन केलं होतं. खूप दिवसांनी पुन्हा कार्यरत झालेली दिसतेय.

Pages