100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>पण गर्लफ्रेंड बरोबरच्या सीन्स मध्ये देखील उगीच दूर कुठेतरी शून्यात बघितल्यासारखे भाव वाटतात चेहऱ्यावर..

क्या करे मिया सूरतही ऐसी Happy

>>मला ह्या पुचाट पो. ऑ. पेक्षा विश्वासराव आवडला होता. कुणाचा कुणाला ताकास तूर लागून देत नव्हता.

मला विश्वासरावला पाहिलं की तळपायाची आग मस्तकात जायची. पण आता अजयच्याने केस सॉल्व्ह होत नाही म्हणून त्याचे सुपिरिअर विश्वासरावला आणतात असं दाखवतील तर बरं असं वाटतंय.

>>ही बाई इतके खाजगी प्रश्न विचारतेय त्या ठाकूर ला.. मी थोबाड फोड उत्तर दिलं असतं

अग्दी अगदी अगदी.

काल मीरा, नेहा आणि राणी तिघींनी अजयला 'सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतेय' हे वाक्य ऐकवलं. पांडोबा इथेही संवादाचा रतीब घालताहेत. राखेचा मधला 'आता घरात काय चाललाहा ते तुका वेगळं सांगायची गरज नाही' हा संवाद आठवला.

तरी काल अजय कुठे राणीला म्हणाला 'मी आत्ता ड्यूटीवरच आहे'. क्षणभर त्याला कणा असल्याचा साक्षात्कार झाला मला.

काल अजयची आई झोपेत भारी डोळे हलवत होती. बहुतेक अजयचे बाबा दिसत होते वाटतं स्वप्नात.
त्या अजयच्या वडिलांचा भिंतीवरचा फोटो पोलिस हवालदाराच्या ड्रेसमध्ये का आहे?

नेहाची आई म्हणते की मी चांगले १०-१२ पदार्थ केले होते तरी अजय थांबला नाही. म्हटलं बाई ग, बटाट्याची भाजी केली होतीस का? ती केली असतीस तर सनी लिओनीने फोन केला असता तरी अजय गेला नसता.

नेहाने टी प्रिमिक्स पावडरचा चहा करून आणला की काय. लगेच घेऊन आली ते.

'मुलीची जात' हे शब्द २-३ वेळा वापरले ह्या एपिसोडमध्ये. तीव्र निषेध!

पण गर्लफ्रेंड बरोबरच्या सीन्स मध्ये देखील उगीच दूर कुठेतरी शून्यात बघितल्यासारखे भाव वाटतात चेहऱ्यावर>>>> आता गफ्रेच जर का अशी (मंद) दिली आहे, तर तो तरी बिचारा काय करणार ????? Happy

म्हटलं बाई ग, बटाट्याची भाजी केली होतीस का? ती केली असतीस तर सनी लिओनीने फोन केला असता तरी अजय गेला नसता. >>>

Biggrin

म्हटलं बाई ग, बटाट्याची भाजी केली होतीस का? ती केली असतीस तर सनी लिओनीने फोन केला असता तरी अजय गेला नसता. >>> Rofl

काल चा भाग पण काय फालतू होता छ्ये! Sad

तिवारी ने फोन वर मला सोडले पण मी काही बोललो नाही हे फोनवरच राणीला सांगितले आणी माती खाल्ली. बहुधा त्याचे कॉल्स ट्रेस होत असणार.

बाकी वेळ लग्न ठरवू चा खेळ सुरू होता. त्यातल्या त्यात ढगोबा च्या आईने घेतलेला stand मला आवडला.

थोडक्यात ही मालीका म्हणजे अस्मिताच्या दोन भागात गुन्हेगार पकडला जाणार्‍या स्टोरीला ग्लॅमरस बनवुन व चांगले नट नट्या घेऊन तेच दोन भाग १०० तुकडयात दाखवुन लोकांचा पोपट करणार आहे.

दर आठवडयाला एक वेगळे वळण दिले तर मजा येईल या शिरेलीत. एकदा राणीचे पारडे वर एकदा अजयचे.

लोकांचा पोपट करणार आहे. >> करणार आहे ? Uhoh
झी ने ऑलरेडी आपला कित्येकदा हिरवागार पोपट केले ला आहे :नामुभा:

सुजा Lol , त्रास देणाऱ्या लोकांपर्यंत भावना पोचवून येते Wink . पण संयम ठेऊन नाहीतर माझा आयडी ढगात पाठवतील.

राणी ड्रायव्हरला म्हणते की धनंजयचं सिम कार्ड तुझ्याकडे आहे ते पोलिसांना सापडलं असतं तर? अग मग बयो, तू काढून घ्यायचंस ना त्याच्याकडून. तू खुनाचं प्लानिंग केलं आहेस, त्याने नाही.

अजयच्या टेबलवर एकही केस पेंडींग नाही हे किती वेळा ऐकवणार आपल्याला?

आज अजयच्या सुपिरिअरने त्याला विचारलं की ही केस तुझ्याकडून हॅन्डल होईल ना. आणा रे कोणीतरी त्या विश्वासरावला. कोई जाये तो ले आये, मेरी लाख दुआये पाये. Happy

>>काल आय लय बोर मारीत व्हती

त्या आईला पाहिलं ना की मला एक जुनी जाहिरात आठवते. कसल्याश्या तेलाची होती बहुतेक. त्यात त्या आजी आजोबांच्या पावलांना तेल लावत असतात आणि ते आजोबा हसताहेत का रडताहेत ते अनेक वेळा ती जाहिरात पाहूनही मला कळलं नव्हतं. अजयची आई पण हसली तरी ते रडल्यासारखंच वाटतं.

आता ह्या ठोंब्याला मूहुर्त लागला राणीला विचारायला की वयात एव्हढं अंतर असताना धनंजयशी लग्न का केलंस म्हणून.

काही काम करत असताना टीव्ही समोर असायचे म्हणून एव्हढे एपिसोड्स सहन केले. आजपासून नाही.

>> त्यातल्या त्यात ढगोबा च्या आईने घेतलेला stand मला आवडला

ढगोबा म्हणजे नेहा का? तर माझं अनुमोदन. स्पष्ट तेच बोलली ती. माझी मुलगी असती तर मीही तेच केलं असतं.

त्या आईला पाहिलं ना की मला एक जुनी जाहिरात आठवते. कसल्याश्या तेलाची होती बहुतेक. त्यात त्या आजी आजोबांच्या पावलांना तेल लावत असतात आणि ते आजोबा हसताहेत का रडताहेत ते अनेक वेळा ती जाहिरात पाहूनही मला कळलं नव्हतं. अजयची आई पण हसली तरी ते रडल्यासारखंच वाटतं.>>> कैलास जीवनची जाहिरात होती ती.

आता पुढच्या भागात धनंजयच्या पहिल्या बायकोला इंट्रोड्यूस करणार बहुतेक . मग आणखीन मजा
एक बर आहे मालिकेचं नावच १०० डेज असल्याने ३ महिने दहा दिवसात मालिका संपेल Happy

इकडे 50 डेज तिकडे 100 डेज. मालिका आणि लाईफ मध्ये फरकच राहिला नाही. दोन्ही भंपक नै?>>> 50 डेज?:अओ:

सिरियल पकाउ आहे, स्टोरी लुपहोल्स मुळे भंपक आहे, पण सध्या चॉइस नाही, पहावीच लागणार तर अगदी पॉझिटिव माइंडने पहायची असं ठरवलं होतं. बाकी काही नाही तर ते.प.च्या डिझायनर साड्या पहाव्यात म्हणुन तरी न कुरकुर करता पहाणार होते. पण ते.प. दोन दोन भागात एकच साडी नेसते Sad , मग आम्हाला मोटिवेशन काय?

त्यात सगळ्या मराठी मालिकांमधला माझ्या डोळ्याला त्रास देणारा भाग म्हणजे भयाण मेकअप आणि कॅमेरामनची क्लोजअपची हौस. यांच्याकडे प्रोफेशनल मेकअपमन्स नसतात का? शाळेतल्या गॅदरिंगमधे असतात तसे पॅची मेकअप्स असतात. ते.प.चे ओठ चांगलेच ड्राय आणि सुरकुतलेले आहेत. ( विंटर इफेक्ट असावा). पण त्या कोरड्या पापुद्रे निघालेल्याओठांवरपण जबरदस्तीने लिपकलर्स थोपलेले असतात. अतिशय भयाण दिसतात लिप्स. त्यात तिच्या चेहर्‍यावर पण खुप वॉर्ट्स, रेषा आणि ओपन पोअर्स आहेत, तरीही किती वेळा तो क्लोजअप. आणि मग नंतर शुटिंग नंतर कोणी पहातच नाही का कि क्लोज शॉट्समधे हिरॉइन कशी दिसते आहे? लांबुन अ‍ॅट्रॅक्टिव वाटणारी ते.प. इतक्या जवळुन पाहिल्यावर आवडत नाहीए आता.

पण तुम्हाला अपेक्षित तरी काये मुलींनो? लगेच गुन्हा घडेल, लगेच तपास लागेल, आरोपी आत व सगळे आलबेल...? स्टोरी एंड!
मग हंड्रेड डेज वगैरे ग्लॅमरस नावांना काय अर्थ राहील?

काल शेवटची ५ मिनिटे मालिका बघितली. इन्स्पेक्टर आणि त्याची गर्लफ्रेंड कुठल्याशा हॉटेलात भेटतात. ती म्हणते, अरे असे काय विचारतो. ह्या हॉटेलात आपण काय मागवतो विसरलास का?!!!
मला एकदम दिल चाहता है मधल्या सोनाली कुलकर्णीच्या बॉयफ्रेंडची आठवण झाली, "रोज एक दिल शेप का बलून" Happy

Pages