100 डेज - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 7 October, 2016 - 12:49

रात्रीस खेळ चाले निरोपतेय. त्याजागी 100 डेज ही नवी रहस्यमय मालिका सुरू होते आहे. त्याबद्दल हा धागा...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थात अजय मुद्दामून जाणून बुजून, तिला गंडवण्यासाठी तिच्या तालावर नाचत असेल तर ठीक >> मला तरी वाटत नाही तो मुद्दाम करतोय असं. त्याला अजून तिचा डाउट पण आला नाहीये.

'तुम्ही ऐकणार माझ्या आवडीचं गाणं?' म्हटल्यावर हा मोरू बसला ऐकायला. मला वाटलं 'आ जाने जा' किंवा 'ये है रेशमी जुल्फोंका अंधेरा' वगैरे काहीतरी लागेल. पण आमचा नेहमी पचका होतो. त्या नेहाच्या घरनं बुडाला चटका बसल्यासारखा उठला....इथे मात्र गुळाला मुंगळा चिकटावा तसा बसला होता. घरकी मुर्गी दाल बराबर असते ती अशी. त्याला अजून तिचा संशय आला नसेल तर तो पुरुष नाही.......महापुरुष आहे असं म्हणावं लागेल.

वर राणी सरकार म्हणतात 'तुम्हाला स्पायसी आवडतं ना'.....त्यावर त्याने 'न आवडायला काय झालंय. पण डॉक्टरांनी पथ्य सांगितलंय....पाईल्सचा त्रास आहे ना' असं म्हणायला हवं होतं अशी माझी तह-ए-दिलसे ख्वाहिश होती. झीने मला एकदा डायलॉग लिहायची संधी द्यावी.

अग काय करू.....परवा रात्री झोप नीट नव्हती झाली. त्यामुळे काल दिवसभर काही काम सुचत नव्हतं. रात्री एपिसोड लागला होता म्हणून झाँबीसारखी बघत बसले तर हा त्रास.....एक seduction पण नीट दाखवता येत नाही ह्या मोरुंना. पुलं म्हणतात तसं कशाला उगाच गाढ्वाच्या ***चा मुका घ्यायला जातात काय माहित....:राग:

आणि एव्हढ्या मोठ्या बंगल्याला एकच सेक्युरिटी गार्ड? सेक्युरिटीला बोलवा म्हटल्यावर मला वाटलं तिघे-चौघे येतील. तर एकच आला. कैच्या कै..

बघ की! केसची प्रायॉरिटी अशी की क्या कहने!! बिल्डर लॉबी वगैरे. आणि घरात ३ नोकर - सिक्युरिटीवाला धरून. हा इन्स्पेक्टर पण नुसते लेडी ऑफिसरला मेसेजेस करत बसला त्यापेक्षा घेऊन जायचं की बरोबर. कालच्या एपिमधे 'मी असा कुठे जात नाही. लेडी इन्स्पेक्टर असते बरोबर' हेच एक वाक्य कितीतरी वेळा म्हटलंय. तेवढ्या वेळात आख्खी फौज पण येऊ शकली असती. बरं पुन्हा सगळं सेफ आहे हा निष्कर्ष कशावरून काढला? त्याने तिला विचारायचं की बये तुझा नवरा गायब आहे आणि तुला जेवणाची आमंत्रणं कसली सुचतायत? अवघडेय!

'मी असा कुठे जात नाही. लेडी इन्स्पेक्टर असते बरोबर' हेच एक वाक्य कितीतरी वेळा म्हटलंय.
>>> हो ना Lol
आधीच शूट झालेलं असतं म्हणून नाहीतर मला उगाच वाटलं असतं मी काल त्यांच्या fb पेजवर लिहून आले, लेडी इन्स्पेक्टरला न्यायचं ना बरोबर त्याचं उत्तर की काय Wink .

ती राणी लक्ष वळवतेय आणि नीट चौकशी करू देत नाहीये ड्रायव्हरची हे त्या अजयच्या लक्षात कसं येत नाही, पटवर्धन आणि धनंजय यांच्यात भांडण झालं होतं हे आधी ती तीन वेळा भेटली अजयला आणि सतत फोन करते तेव्हा का नाही सांगत. बहुतेक शेवटचे १० वगैरे एपिसोड अजयला स्वतःचं डोकं आहे हे दिसेल तोपर्यंत राणी बोले अजय हाले असेल की काय, मग फार बोअर होईल.

स्वप्ना राज, तुम्ही तुमचे स्पुफ कॉमेंट्स चला हवा येवु द्या मध्ये कळवा. त्यांना स्क्रिप्टला आयडिया मिळेल जेव्हा या टिमला बोलावतील तेव्हा. Happy तुमच्यातही पोटेंशियल आहे च.ह.य.द्या सारखे शोज स्क्रिप्ट करायचे

तुमच्यातही पोटेंशियल आहे च.ह.य.द्या सारखे शोज स्क्रिप्ट करायचे>>> अगदी अगदी. स्वप्ना जास्त छान करेल.

पाईल्सचा त्रास >>> Lol

हा हुश्शार विन्सपेक्टर आहे? खरंच?

मला आदि+आई+सुनबाई चे सीन असह्य बोर होतात. अगदी आवरा वाटतात.
विन्सपेक्टर कधी ड्युटीवर जातात असं होतं. तपासाचं काय? असं विचारावं वाटत Happy

त्या आई सून सीन महाबोअर. ते आईचं काम करणारी सीमा चांदेकर आहे का सिद्धार्थ चांदेकरची आई. बहुतेक तिचा सिद्धार्थबरोबर फोटो बघितला.

अंजु बघितलं . हो ग हो त्या सिद्धार्थ चांदेकरची आईच आहे ती आदिनाथची आई. . सीमा चांदेकर.
तशी ती काम बरी करते पण चेहरा खूप ओढल्यासारखा आहे . अतिशय उभट
बेसिकच चेहऱ्यावरचे भाव असे ओढल्यासारखेच आहेत Happy

मला नाही आवडली ती, अति गोड गोड बोलते. सिद्धार्थ आवडतो मला.

आज विकिची एकंदर बॉडी लँग्वेज बघून कोणाही पोलिसाने त्याला पाहिलं ताब्यात घेतलं असतं, पोलीस स्टेशनला दोन रट्टे घातले असते मग तो लगेच बरळला असता. राणी चारचौघात ऑफिसमध्ये पण मस्त अप टू डेट तयार होऊन येतेय, म्हणजे नवरा मिसिंग आहे तर तिने अगदीच गबाळे यावं असं नाही माझं म्हणणं पण थोडं अति दाखवतायेत.

'तुम्हाला स्पायसी आवडतं ना'.....त्यावर त्याने 'न आवडायला काय झालंय. पण डॉक्टरांनी पथ्य सांगितलंय....पाईल्सचा त्रास आहे ना' >> |:D

'तुम्हाला स्पायसी आवडतं ना'.....त्यावर त्याने 'न आवडायला काय झालंय. पण डॉक्टरांनी पथ्य सांगितलंय....पाईल्सचा त्रास आहे ना' >> Rofl

लोक्स Happy

कलर्स मराठी वर 'चाहूल' नावाची रहस्यमय/गूढ वगैरे मालिका सुरु होणार असल्याचं वाचलं पेपरात. इथे कोणी कलर्स मराठी बघणारे आहेत का? मालिका सुरु झाली तर सांगाल का प्लीज? राखेचाने तोंड पोळलंय. पण आमची जित्याची खोड.....

त्या दिवशी शेवटची २-३ मिनिटं सिरियल पाहिली तर इन्स्पेक्टरसाहेबरू सीसीटीव्ही फूटेज बघत होते. हे बघायला आता वेळ मिळाला का? हे सगळ्यात आधी करायला हवं होतं ना? मधलं फुटेज गायब आहे म्हणजे संशयाला वाव. त्या ऐवजी दुसर्‍या कुठल्या दिवसाचं फुटेज त्यात घुसडता आलं असतं की. काय हे राणी....शोनाहो. थोडे हॉलिवुडचे पिक्चर बघत जावे म्हणजे असल्या आयडिया मिळतात.

तुमच्यातही पोटेंशियल आहे च.ह.य.द्या सारखे शोज स्क्रिप्ट करायचे>>> +१
मी तर म्हणते स्वप्ना जास्त चांगले लिहील...
तिथले विनोद तर केवळ पुरुष कलाकारांनी बाईचा वेश केला आणि फेक हसण्याचा soundtrack घातला की होतात...

तुम्हाला स्पायसी आवडतं ना'.....त्यावर त्याने 'न आवडायला काय झालंय. पण डॉक्टरांनी पथ्य सांगितलंय....पाईल्सचा त्रास आहे ना' >> Rofl

..शोनाहो.>>> Biggrin

तिथले विनोद तर केवळ पुरुष कलाकारांनी बाईचा वेश केला आणि फेक हसण्याचा soundtrack घातला की होतात...>>>>+१११२१

आजची राणीची साडी झक्कास होती. ती आणि विकी बोलत असताना एका क्षणी मागच्या खोलीत एकदम कोणाची तरी सावली पडली भलीमोठी.......धनंजयचं भूत तर नाही? Happy

तिथले विनोद तर केवळ पुरुष कलाकारांनी बाईचा वेश केला आणि फेक हसण्याचा soundtrack घातला की होतात...- हो बर्याचदा असेच असते पण कधीकधी स्क्रिप्ट खरच छान असतं. काजोल आणी अजय देवगण आलेले तो एपिसोड छान होता.

मला आदि+आई+सुनबाई चे सीन असह्य बोर होतात. अगदी आवरा वाटतात.
विन्सपेक्टर कधी ड्युटीवर जातात असं होतं. तपासाचं काय? असं विचारावं वाटत स्मित - अगदी अगदी. जुईचे दात का दाखवतात? ते दाखवण्यासारखे मुळिच नाहीत. राणी नुसती निबर दिसते आता.

गोगलगायीच्या चालीने चाललीय हि मालिका. फार बोअर झाले मी आज. काय ते अजय असा अजय तसा चाललेलं राणीचं, आम्हाला नाही अजून दिसला अजयमधला स्पार्क, तुझ्या तालावर नाचतोय. तो विकी तर महाबोअर.

हा अजय परवा हिच्याकडे आलेला तर आईचा एक फोन रिसीव्ह करेल तर शपथ आणि पोलीसस्टेशनमध्ये चौकशी चालू असताना राणीचा फोन बरा उचलतो लगेच. त्या चहावाल्याच्या chara ला नक्कीच काहीतरी पदर असणार, त्याला असेल बहुतेक स्टोरीत जास्त वाव.

खरं म्हणजे आता जुना १३ भागाच्या सिरियल्सचा ट्रेंड यायला हवा.

नवीन म्युझिक काय तर, -- ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुरढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, ढुंग ढुगुर, (खरंच, मी हेड्फोन्स लावुन एकलं नीट). तो ऑफिस ईंटरोगेशनचा सीन चालु होता तेव्हा. इतक्या दिवसांनी आत्ता कुठे महेश कोठरे फील आला.

Pages