नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी काहीच नाही बघत हल्ली, मधे मधे वल्लरी आणि भाचीसाठी इ टा तं बघते.

सध्या साडेसातला स्टार प्रवाह वर गोठ बघते आणि रात्री साडेबाराला तु जी रं .

इ टा तं पण बोअर होतेय मला. बन मस्का एकच भाग बघितला होता. हिरो आवडला. सौम्या एन्ट्री झाली मग मी सोडली लव लग्न लोचा.

सगळेच आता जाम बोर करायला लागले आहेत. फ्रेशर्समध्ये ते मंग्या प्रकरण फारच ओढून ताणून वाढवलयं, आणि एकालाही ना दारू पिल्याचा अभिनय करता येत होता, ना पोलिस स्टेशनमध्ये घाबरल्याचा. सगळंच अगदी कृत्रीम वाटत होतं. त्या धवलला इतके मारतात तरी त्याचा चष्मा जागच्या जागी आणि पोलिस स्टेशनात हुशारगीरी करायाला तयार.

श्रावणबाळाने तर उत आणलाय. त्याला कुणीतरी मराठी बोलायला शिकवा राव. कसला घाण मराठी बोलतो. आणि तो साईराज देशमुख आणि त्याचा कोण तो कारकून यांना प्रचंड बथ्थड कलाकार घेतले आहेत. त्यामुळे जे नाट्य उभे रहायला हवे होते ते इतके बालीश वाटते.

इटातं मध्ये ती गौरी घडाघडा चार शब्द बोलेल तर शपथ. इतके आढेवेढे आणि काय काय, कुठल्या जमान्यात राहतात हे लोक. सरळ सांगावे, की बाबा रे जरी आईने आपले लग्न ठरवले तरी मला तू मित्र म्हणूनच बरा वाटतोस, नवरा म्हणून नाही. सो सॉरी.

लव्ह लग्न त्यातल्या त्यात बरी चाललीये. काल शाल्मलीने पंजाबी कुडी बनून धमाल केली. फुल्ल टू धिंगाणा.

बन मस्काही चांगला होता, रोकडे दारू पिऊन जे काही बोलतो ते अफाट आहे

फ्रेशर्स लय बोर मारतायत. मॅच तर कहर. ती परी नि सचिन काय स्वतःच धावत बाहेर जातात. एवढा ग्राऊंडचा अंदाज नाही प्रॅक्टीस करुन पण. संग्रामला हिरो बनवण्यासाठी काहीही दाखवतायत.

श्रावणबाळ, इटातं मी बघत नाही. (वेलसाठी बघायचीय पण वेळ अॅडजस्ट होत नाहीये.)

शाल्मलीने पंजाबी कुडी बनून धमाल केली. फुल्ल टू धिंगाणा.>> +1. काकांनी पण फादर छान केला की.
काव्या पण सुंदर दिसत होती वेडिंग गाऊन मध्ये.

बनमस्का काल चुकली. पण यात हिराॅईन नसलेले आणि विघ्नेश असलेले सगळे सिन मला आवडतात. Happy

सगळेच आता जाम बोर करायला लागले आहेत .. +१
काल शाल्मलीमुळे मजा आली खरी.. पण एकंदर सगळा बोअर प्रकार होता.

बन मस्का मधे ही मैत्रेयी आणि तिचे आई वडील प्रकर्‍अण खुप दिवस चालू आहे. ज्योती सुभाष यांना आणा आता परत.

शाल्मलीने पंजाबी कुडी बनून धमाल केली. फुल्ल टू धिंगाणा.>> +1. काकांनी पण फादर छान केला की.
काव्या पण सुंदर दिसत होती वेडिंग गाऊन मध्ये.>>>>

हो पोट दुखले हसुन हसुन, मला तरी मज्जा आली खास करुन तो प्रेग्नन्ट वाला सीन

इ टा तं मधे सौरभला दोघं ही सांगत नाहीयेत याचा फार राग आलाय आणि ती गौरी काय अभिनय करते, फार बोअर करते. नाहीच आवडत मला.

पल्लवी पाटील येणार आहे आता ल ल लो मधे, रुंजीमधे होती. काम चांगलं करते ती. पण ती सौम्या आहे आणि तीपण माझ्या आवडत्या सुमीतबरोबर म्हणून माझा पास.

मी ल.ल.लो. नुकतीच बघायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सध्या तरी मजा येते आहे.
शाल्मली झालेली कोण आहे? तिचं कॉमेडी टायमिंग चांगलं वाटतं. राघव झालेलाही चांगलं काम करतोय. काव्याचा किंचित हस्की आवाज आवडला. ओंकार गोवर्धन नाटकांमधे जास्त आवडतो.

पल्लवी पाटील आली पण सिरियलमध्ये.
राघवची एक्स गर्लफ्रेंड - जी आता तिच्या लग्नातून पळून राघवशी लग्न करायला आलीय ती.

नाही, राघववर प्रेम करणारी जुनी मैत्रीण.

ती सौम्याची रिप्लेसमेंट असती तर मी हि सिरीयल बघितली असती Wink .

तुम्हाला कुणालाच सौम्या का नाही आवडत >>>>> पूर्वग्रह. मी तिची 'मेंदीच्या पानावर' सिरीयल बघायचे, तेव्हा ती अशुद्ध डायलॉग म्हणायची त्यामुळे डेरिंग नाही माझं.

दुसरं कारण मला सुमित-काव्या जोडी आवडली होती.

काल राघव ने सिक्सरच मारला..त्यानेच केलेला प्लॅन होता तो.. Proud

सौम्याच्या बाबतीत मी neutral आहे. आवडत नाही असं नाही. पण सुमीत काव्या जोडी जास्त आवडली असती.

सुमीत-काव्या बॅकग्राऊंड माहिती नसल्यामुळे मला सौम्या-सुमीतमधला गैरसमज आता कसा दूर करतात हे पाहण्याची उत्सुकता आहे.

मला यातले सुमीत, विनय, अभि, काका हे चार कलाकार सोडले तर इतर कुणीही माहिती नाहीयेत. त्यामुळेही बघायला मजा येत असावी.

तसा गैर्समज दुर झालेलाच आहे. अभिमान्ने कबुल केलच की तिच्यासमोर.
आता फक्त दोघांनी समोरामोर येऊन बोलणं बाकी आहे.

सगळ्याच कलाकारांचा उत्तम अभिनय हे विशेष या सिरियलचे. Happy

मला पण सुमीत काव्याची जोडी आवडली असती.. आणि तसे वाटत असतानाच सौम्या मध्येच कडमडली असे उगाचच वाटतं राहिलं, आणि त्यामुळेच तिचा राग यायला लागला. Wink

यापूर्वी सौम्याला आधी एका सिरियलमध्ये बघितलेलं तिथे ती अजिबातच आवडली नव्हती. हे पण कारण असू शकेल, माझ्या बाबतीत.

अभिमान म्हणजे ससा वाटतो. गोंडस बाळ. Proud

अभिमान म्हणजे ससा वाटतो. गोंडस बाळ. >>>> +१

आणी त्याला शाल्मली पण शोभते अगदी, छान वाटते त्या दोघांची जोडी

सुमीत-काव्या>>>> ना......ही
राघव - काव्याच आवडतात मला

अगं राघव-काव्या मलाही आवडतात. पण काव्याचं प्रेम सुमीतवर असतं ना आधीपासूनच. आणि तेव्हा राघव नि काव्या भयानक भांडायचे. आता जरा जमायला लागलंय त्यांच.

मला असे वाटत आहे की काव्या आणि राघवची जोडी जमवतील. मधल्या एक दोन प्रसंगात अशी हिंट दिल्यासारखी वाटते.

सौम्या थोडी मंद वाटते, पण हसते छान.

बाकी काल शाल्मलीचे थोडे फील झाले. असे वाटले ती खरेच आहे आणि तीची चेष्टा करत आहेत.

अभिमान्ने कबुल केलच की तिच्यासमोर. >>> सौम्यासमोर सुद्धा कबूल केलं का? मी कॅफेतला त्याचा कबुलीजबाब आणि मग सगळे राघवला सॉरी म्हणतात ते पाहिलं होतं.

Pages