नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो देविकाचा झोल काही कळत नाहीये. मला वाटतं, खर्या देवीकाला माहितीच नाही की आपल्या नावावर दुसरं कोणितरी सुमीतला भेटतय.
आणि खरी देविका समोर आली की सुमीत तिच्यावरच रागावणार.

पण सुमित दिसण्यावर प्रेम करतो की बोलण्यावर ? काय माहिती. फोटो आवडला म्हणून प्रेमात पडलाय. त्या दोघी आवडल्या नाहीत मला त्याच्यासाठी Sad . जणू माझं काही तो ऐकणारच आहे ;). ह्या नवीन घडामोडीन्मुळे मी सिरीयल बघणं मात्र सोडलं.

पण मी कळवलं मागेच त्यांना फेसबुकवर सुमितसाठी काव्याच बेस्ट.

हेहे! त्या फोनवर बोलणार्‍या मुलीचे संवाद किती बोरिंग होते तरी सुमीत तिच्या प्रेमात पडला :p

बन मस्काची हिरॉईन खरच डोक्यात जाऊ प्रकार आहे!

बन मस्काची हिरॉईन खरच डोक्यात जाऊ प्रकार आहे! >>> +१००००००००००० माझ्याकडून अजून चार शून्य Happy

मी कधीमधी बघते. हिरो, आई, बाबा अगदी विघ्नेश पण आवडतो पण ही आली की जाम बोअर मारते.

मी हिरोसाठीच बन मस्का बघायचा प्रयत्न केला पण रगोळेबायमुळे सोडायला लागली. सतत असतेच ती. हिरो सॉलिड अभिनय, चेहेरा फार बोलका.

प्रोमोजवरुन बन मस्का मधे फार बालिशपणा चाललाय असं वाटतंय. डी 3 च्या विनोद लव्हेकर यांच्याकडून हि अपेक्षा नव्हती.

L3 च्या प्रोमोजमध्ये, ती फोनवाली सुमितकडे दीड लाख मागते आणि तो भरतो, फोनच्या ओळखीवर एवढं करतो सुमित. डोक्यावर पडलाय का, ह्यालाच हनीtrap म्हणतात का? मला खरंच माहिती नाही म्हणून विचारते.

हो अन्जू, सुमीतने फोनवरच्या ओळखीतून तिला रु. ७५,००० दिलेत. बावळट कुठचा. आता तिने दिलेला हाॅस्पिटलचा पत्ता पण खोटा आहे.

freshers कोोण बघतय? सगळे छान काम करतायत. प्रग्लभा जाड झालीये केवढी..

बन मस्काची हिराँईन फार बालिशपणा करते..

बन मस्काची हिराँईन फार बालिशपणा करते.

>>>मुद्दामच तिला असा रोल दिला असावा. हिरोच्या मॅच्युअर वागण्याला कॉन्ट्रास्ट. असेही ती एकदम लाडात वाढलेली दाखवलीये, त्यामुळे तिचा बालीशपणा खटकत नाही.

सुमीतने फोनवरच्या ओळखीतून तिला रु. ७५,००० दिलेत. बावळट कुठचा.

>>>>फार थोडी रक्कम आहे. रोजच्या पेपरमध्ये एक दोन घटना तरी अशा असतातच फसवणुकीच्या. त्यात कित्येक लोकांना फेसबुक किंवा इंटरनेटच्या ओळखीतून लाखोंना गंडा घातलेला असतो. परवाचीच बातमी होती, एक बाईला लग्नाचे अमिष दाखवून ४२ लाखाला लुटले. त्या बाईने न पाहताच विश्वास ठेऊन पार घर वगैरे विकून त्या माणसाला मदत केलेली. त्यामुळे तो ७५ हजाराला डुबला यात फार काय वेगळे वाटले नाही.

बन मस्का बालिश वगैरे वाटत असली तर ईतर वाहिन्यांवरील त्याच त्या सासु-सुन, कटकारस्थाने, कुचाळक्या अश्या कथांपेक्षा झी युवा वरील मालिका बघणेबल आहेत.

आजचं बन मस्का आवडलं... ज्योती सुभाष मस्त काम करतात.

लव लग्न मधे काव्याच्या फिलिंग्ज कोणाला कळत नाहीयेत का? ती इतकी रडवेली झाली होती तरी सगळे आपापल्या वाटेने निघून गेले काहीच न झाल्यासारखं..

आजचा बन मस्काचा एपिसोड खूप छान होता. नेहमी छान असतो. शिवानी (मैत्रयी) आणि शिवराज (सौमित्र दोघांचा अभिनय खूपच मस्त आहे. मी रोज बनमस्का न चुकता पाहते.

श्रावणबाळ पण हलका फुलका आणि मनोरंजक आहे.

फ्रेशर्स पण कधी कधी बरा असतो.

मी बघते फ्रेशर्स.. आवडते मला. Happy

L3 पण मस्त चालू आहे.
लव लग्न मधे काव्याच्या फिलिंग्ज कोणाला कळत नाहीयेत का? >>शाल्मलीला माहित असतं ना काव्याचं सुमीतवर प्रेम आहे ते. पण तिच्याही ते लक्षात येत नाही.

त्यामुळे तिचा बालीशपणा खटकत नाही.>> मला खटकतो बा. Happy
पण मी इतर सर्व कलाकारांसाठी तिला सहन करते. कधीकधी...

एक बाईला लग्नाचे अमिष दाखवून ४२ लाखाला लुटले. त्या बाईने न पाहताच विश्वास ठेऊन पार घर वगैरे विकून त्या माणसाला मदत केलेली>> डोसक्यावर पडलेली का ती?? इतका आंधळा विश्वास कसा काय ठेऊ शकतात लोक?? Angry

मी फक्त इ टा तं बघते. त्यात हिरोईन आवडत नाही मला. श्रीचे शर्टसपण आवडत नाहीत.

श्रावणबाळमध्ये मला केतकी पालव आवडते फक्त, ती उत्तम आणि सहज काम करते. बाकी आभास आणि मित्र एकच हि स्टोरी तशी कॉमन आहे.

फ्रेशर्सची सर्व मुलं आणि मिताली आवडते.

L3 आवडीने बघायचे पण ती फोनवाली आणल्याने कंटाळले.

मलाही खटकतो तिचा बालीशपणा. पण आजी-नातीचं नातं छान दाखवलय.

लवलग्न मधे फोन वालीचा पार्ट संपल्यात जमा आहे. आता तिचा शोध घेत खर्या देविकापर्यंत पोचणार आणि तिनेच फसवलं असं सगळे समजणार..

फ्रेशर्स मधे सगळ्यांची फँमिली दाखवलीये आत्तापर्यंत मनवाची सोडून..

मैत्रैयीने गणपतीत साडी नेसली होती. मग आजच तिला पहिल्यांदा साडीत पाहिल्या सारखं सगळे आश्चर्यचकीत का झाले होोते?

आज ब-याच दिवसांनी लव लग्न लोचा बघितली अगदी शेवटी, सर्व नायक नायिका छान दिसत होते, काव्या साडीत तर एकदम क्युट. आकांक्षा पण गोड दिसत होती.

अन्जू म्हणजे आता सुमीत सौम्या जोडी जमणार का काय?
म्हणजे काव्याला नो चान्स. देविका प्रकर्णानंतर मला वाटलं आता तरी काव्याची जोडी जमवतील..

मला ती सौम्या अजिबात आवडली नाहीये. काव्या मस्तय. बहुतेक काव्या आणि राघवचं जमेल असं मला वाटतंय.. ते सुरुवातीला फार भांडायचे तेव्हापासून.

ते काव्या आणि सुमितचं जमत नाहीये वाटल्यावर मी सिरीयल बघायची सोडलीना, हि सौम्या आणि फोनवाली आल्यावर. मी फेसबुकवर पण लिहीलं त्यांना. काव्या आणि सुमित जोडीच रॉकींग. ती फोटोवाली आणि फोनवाली दोन्ही शोभत नाहीत सुमितला. जाऊदे मी नाहीच बघणार.

ही सौम्या तिला डायलॉग नीट म्हणता येत नव्हते मेंदीच्या पानावर सिरीयल मधे होती, तिचे बाबा म्हणून योगेश सोमण होते. मी बघायचे मग हिला बदलली, दुसरीने चांगलं काम केलं पण फालतू सिरीयल होती, मी सोडली मग ती सिरीयल बंद झाली लवकर. म्हणून तर मला ती आवडत नाही आणि सुमितसाठी आणली.

ही सौम्या तिला डायलॉग नीट म्हणता येत नव्हते मेंदीच्या पानावर सिरीयल मधे होती, तिचे बाबा म्हणून योगेश सोमण होते. >> हां अन्जूताई, मी तेच कधीची आठवत होते. अगदीच आवडायची नाही त्यात पण.

निधी नंतर पण होती एका सिरीयलमधे ती, वामन केंन्द्रेचा मुलगा हिरो होता, स्टार प्रवाहवर दिया और बातीसारखी होती ती सिरीयल पण ही आहे म्हणून मी बघितली नाही.

काव्या आणि सुमितचं जमणार असेल तर लिहारे इथे, तरंच मी बघेन. नाहीतर जाऊदे हिला नाही बघायचं मला सुमितबरोबर.

Pages