नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्रेया लहान मुलगी आहे ना ? हिरवीणीचं नाव गौरी आहे का ? ती कन्यादान पेक्षा मोठी दिसत्ये ह्यात.

बन मस्काची हिरवीण अश्विनी काळसेकर सारखी दिसते ना ? तिची स्टाईल पण मारते मधे मधे.

इटातं मधली श्रेया>> म्हणजे हिरवीण का? असे हे कन्यादान वाली? >> ती गौरी. श्रेया १०-११ वर्शाची मुलगी आहे

ओके. तरीच म्हणलं अ हे क मधली असेल तर गोड वैगेरे अजिबात नाही. श्री कित्ती क्युट दिसतोय आणि ती थोराड दिसतेय.

इ टा तं मध्ये सुहास जोशी काय दिसतात अजूनही, तेजस्वी.

मी L 3 आणि इ टा तं बघते फक्त. वेळ असेल तर संध्याकाळी युवागिरी बघते, साडेपाच वाजता.

जनरली आया करतात मुलांना ईमोशनली blackmail. इथे विनयचे वडील जरा अतीच करतायत. तो नाही कुठे म्हणालाय लग्नाला, फक्त मुलगी मिळत नाहीये म्हणुन अडलय.

अरूण झी फॅमिलीला मी इमेल केली होती असा असा चॅनल अ‍ॅड करा म्हणून. त्यांचा रिप्लाय आला अ‍ॅड केले की कळवतो.. तुम्हीही इमेल करा.. >>>> येस्स. नक्की करतो. धन्स.

फोन नं पण आहेत झी युवावर, मी फोन केला होता.

त्या L 3 मध्ये कोण देविका सुमितला आवडली, न्यू एन्ट्री की काय? काव्या छान होती की.

झी युवा चॅनल डीटीएच आणि केबलवर उपलब्ध आहे. जर हे चॅनल दिसत नसेल तर कॉल करा 8291280152, 8879760655, 9619744407 या नंबरवर!

झी युवाची पोस्ट कॉपी करतेय इथे. मी २१ ऑगस्टला फोन केला की डेन केबलवर टेस्ट सिग्नल नाही येत, पहिल्या नं वर. २२ पासून channel चालू झालं, दिसेना मग परत त्यांना पोस्ट टाकली फेसबुकवर. २३ पासून दिसायला लागलं झी युवा.

श्री कित्ती क्युट दिसतोय >> +१११ खुप गोड दिसतो, परत एकदा आवडायला लागला तो Happy

अंजू, सुहास जोशींसाठी + १

आई कडे ICC केबलवर झी युवा दिसत नाही. सो मी अन्जु ने दिलेल्या नंबर वर फोन केला होता. त्यांचा काही issue चालू आहे. ईतक्यात दीसणार नाही म्हणाले.

ओहह चैत्राली.

आजचे इ टा तं मधले सर्व डायलॉग्ज छान होते, वल्लरी तुमच्या भावाला जरुर सांगा.

आज आमची माधवीपण पहील्या सीनमध्ये फार छान दिसली, आवडली मला जास्त. एरवी सारखी चिंता आणि कपाळ्यावर आठ्या असं आहे तिचं charactor अर्थात तरी आवडते मला Wink .

L 3 चा कालचा फारसा आवडला नाही.

तो विन्या ज्या मुलीशी chatting करतोय ती सुमितला आवडलीय, तो विन्याच्या नावाने तिच्याशी chatting करतोय पण म्हणजे विन्याने sign out केलं नाही का laptop परत देताना. जरी केलं नसेल तरी सुमित करू शकला असताना. असे दुसऱ्याचे msg वाचून, त्या मुलीचा फोटो आवडला म्हणून तिच्याशी दुसऱ्या नावाने chatting करायचं पटलं नाही. सुमित स्वतःच्या नावाने मारू शकतो गप्पा तिच्याशी.

मलाही नाही आवडला कालचाा.
राघवने ही बोलायला नको होतं विनयच्या वडिलांना असं. कोणाला आवडेल ? वर तोच attitude दाखवतोय विनयला.
१तर विनयच्या वडिलांवरचे विनोद ओढुन ताणुन केले होते. गावाकडच्या माणसांवर फक्त असेच विनोद घडू शकतात का ?

अन्जू, मला वाटतंय सुमीत त्या मुलीला आधीपासुन ओळखतोय.

Freshers bari vatatey mala....love lagn locha duniydunri types vatatey.

L ३ बोअर होतेय, उगाच सुमितसाठी कोणी दुसरी आणतायेत, काव्या छान होती. फालतू सस्पेन्स क्रिएट करुन ती मुलगी सो सोच असेल बहुतेक.

राघव आणि काव्याचं जमवणार की काय, काहीही दाखवतील.

त्या विन्याच्या हिरॉईनच्या खळ्या छान पडतात गालाला.

ते पुतळा प्रकरण बोअर झालय.
मला पण वाटलेलं काव्या आणि राघवच जमणार. फिल्मी स्टाईल आधी भांडणं मग प्रेम..

हो मला ते भांडतात पहिल्यांदा तेव्हाच वाटलं, पण मनातून मला सुमित-काव्या जोडी आवडते. शुक्रवारचा एपिसोड धमाल होता.

L 3 सोडली मी बघायची. पण ती देविका आजारी वगैरे असते का, फोटो दुसरीचा देऊन गप्पा मारते, आता हा फोटोवर प्रेम करतो की फोनवर बोलणारीवर. बोअर झालं मला सगळं. ती जवळची मैत्रीण आहे ती सुमितला नकोय.

मी फक्त इ टा तं बघते, तीपण आमच्या माधवीसाठी. प्रत्यक्ष भेट काही होत नाही तिची त्यामुळे तिला भेटल्याचं समाधान.

मी रोज नाही पण अधूनमधून लललो सुरु असेल तर पहाते. पुतळा प्रकार जामच बोअर होता. सुमितच्या बर्थडेचा एपिसोड चांगला होता.. माझ्या मते राघव आणि त्याच्या कॅफेत काम करते ती अकाउंटंट मुलगी ही जोडी जुळेल. सुमित आणि काव्याच शेवटी एकत्र येतील.

हे channel वाटलं तेवढं लोकप्रिय नाही झालं पण.

D 3 इथे आणायला हवी होती, ती बेस्ट होती. त्याची सर बन मस्का, L 3 वगैरेना नाहीच. बन मस्काची हिरोईन माझ्या डोक्यात जाते आणि त्यात ब्रेक अप आणि patch up चालू असतं जास्त. मी बघत नाही पण प्रोमो म्हणून मोठे शॉट दाखवतात त्यावरून सांगते. श्रावणबाळच्या हिरोला बोलताच येत नाही नीट. त्यात फक्त ती boss आवडते मला पण तिच्यासाठी आख्खी सिरीयल नाही बघू शकत.

सर्वात आवडता prgm युवागिरी, फक्त त्यात गाणी तीच तीच दाखवतात. संध्याकाळी वेळ असेल तर हा prgm मी नक्की बघते.

Pages