नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बन मस्का मध्ये भावी सून आणि सासूचे नाते खूप छान घेतले आहे. सतत कट कारस्थान बघून विटलेल्या लोकांना मस्त फ्रेश पाण्याचा शिडकावा

बन मस्का मध्ये भावी सून आणि सासूचे नाते खूप छान घेतले आहे. >>+१.

सौमित्र त्याच्या आईबाबांना मैत्रेयीचे आईबाबा गेलेत असं का सांगतो??

L3 प्रेडिक्टेबल झालीय. नेहमीच्या ट्रॅकवर घसरतेय गाडी. बोअर व्हायला लागलीय थोडक्यात.

निधी, सौमित्र असं सांगतच नाही. तो बोलताना एकदा वर बघतो व म्हणतो काही पास्ट ईश्युज.. तिथेच त्याच्या वडीलांचा गैरसमज होतोो व ते त्याच्या आईला तसच सांगतात. ईश्युज हा शब्द ते ऐकतच नाहीत. पास्टचा अर्थ ते पास्ड अवे असा घेतात.

'लव लग्न लोचा' - हे आकांक्षा-विनय प्रकरण कुठपर्यंत आलयावर ब्रेक अप होणारे? छान आहे जोडी. आकांक्षा ला विनय आवडतोय बहूदा पण विनय च्या बाजुने तसं काही दिसत नाही.
---------

मैत्रेयी चे आई-वडील फारच हिडीस-फिडीस करतायत तिला. वाईट वाटतय आता तिच्यासाठी.
तिच्या आजीला कुठे गायब केलयं?

विनयचे आईवडील धमाल आहेत,
आकांक्षा तुम्हले म्हणते तेव्हाचे एकप्रेशन जबरी

मैत्रेईची आईवडील ट्रॅक फारच अति चाललाय, इतकेही नाही कोणी करत च्यायला

तिकडे फ्रेशर ला मनवा निरव चा ट्रॅक सुरु आहे, आता श्रीमंत गरीब चा क्लिशे आणला नाही म्हणजे झालं

मनवा - नीरवचं जमेल असं दिवाळीत ते दोघे शंकरपाळ्या लाटत होते तेव्हाच वाटलेलं. Wink
नीरवच्या बाजूने काही वाटत नाही पण मनवाच लाईन ओढतेय.

आकांक्षा विनय जमणारच आहे. विनय आपल्या भावना सांगायला घाबरतो आहे, पण मागे राघव तिच्यावर लाईन मारत होता तेव्हा विनय जेलस व्हायचा.

मनवा - नीरवचं जमेल हे आधीपासूनच बारिक सारिक घटनांमधून दाखवत होते. उदा. संग्राम मनवाला फ्रेशर्स पार्टीला पार्टनर होशील का विचारतो तेव्हाचे नीरवचे एक्स्प्रेशन्स. कालच्या प्रोमोवरुन वाटतंय कि सायलीलासुद्धा नीरव आवडतोय..

अच्छा तो शंकरपाळी चा एपिसोड मिस केला वाटत मी,
भीती हीच आहे की पॉप्युलर व्हायला लागली मालिका कि निर्माते भसाभस पाणी ओतायला सुरु करतात आणि मग लई बोर होतं. अजून तरी या मालीका चांगल्या चालल्या आहेत, त्या तशाच राहाव्यात

अशी गृपमधल्यांमध्येच प्रेमप्रकरण कशाला दाखवतात उगीचच. त्याने बोअर होतं जास्त.

मनवाचे बाबा नीरवला मदत करणार बहुतेक.

परीपण वाॅटसप गृपमध्ये रुचिरा नको म्हणते ते फार पटलं मला. फ्रेंडस् आहात तर फ्रेंडचाच गृप ठेवा त्यात लवर्स लोक नकोत. Happy

इ टा तं मधे सिद्धार्थ मेनन येणार, ती हिरॉईन आवडत नाही मला पण लकी आहे ब्वा. शशांक आणि सिध्दार्थसारखे हिरो दिलेत. मी ही एकच बघते येता जाता.

मला L3 आवडते पण सुमित काव्या जमवत नाहीये, दिसल्यावर मी सोडली.

लव लग्न मधे २ दिवस ऊगाच टाईमपास केला हरवाहरवी दाखवुन.

काव्याने accept केलेलं दिसतय सुमीत तिचा फक्त मित्रच राहू शकतो म्हणुन. Sad

काव्याने accept केलेलं दिसतय सुमीत तिचा फक्त मित्रच राहू शकतो म्हणुन.>>> Sad . त्या सौम्याला माहिती असतंना ती काव्या प्रेम करते सुमितवर. पहिली भेट बघितली होती.

जाऊदे मी नाही बघत ती.

इ टा तं मध्ये ती मधुरा नाही आवडत मला, दुसरी कोणी घ्यायचीना, एवढे छान छान दोन हिरो दिलेत. मला तो propose सीन तिच्यामुळे बोअर झाला, मी बंद केला टीव्ही. तिच्यामुळे मला शशांक आणि तिचे romantic सीन बोअर होतात. शशांक आणि सिद्धार्थ दोघेही क्युट. अभिनय पण जबरदस्त.

नाही सौम्याला नाही माहीत. पहिल्या भेटीत तिने नाव नसतं सांगितलेलं.
विनय खरचं माठ आहे.
फ्रेर्शसही छाम चाललीये. तो चक्रदेव ही छान काम करतो सगळ्यांना इरीटेट करण्याचं.

'लव लग्न..' मधे सगळ्यांना अचानक साक्षात्कार झालाय, काव्याचं सुमीत वर प्रेम असल्याचा..
मग राघव सुमीत-काव्याचच का नाही जमवुन देत? उगाच त्याला सौम्याला पटवण्याच्या टिप्स का देत बसलाय.?

--------------
'बन मस्का' मधे ज्योती सुभाष यांना का पाठवलय सुट्टीवर?

झी युवावरच्या इथेच टाका तंबू ह्या सिरियलचे संवाद गेल्या काही एपिसोड्स पासून मी लिहिते आहे. संवाद्लेखक म्हणून मा़झं नावही ऑफिशियली यायला सुरुवात झाली आहे.

तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत...

अरे वा वेल, अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा.

हल्ली काही दिवस मी नाही बघत पण आता बघेन. ती हिरॉईन मला नाही आवडत त्यामुळे ते रोमान्स एपिसोडस बोअर होतात मला.

शुभेच्छा वेल.

मला हिरो हिराॅइन दोघेही आवडत नाहीत त्यामुळे मी एकही एपि पाहिलेला नाही. आता तुझ्यासाठी पाहण्याचा प्रयत्न करेन. Happy

पलक थँक्यु.
नताशा, आम्ही संवाद लिहिताना कॅरॅक्टर वाईज नाही लिहित. सीनवाईज लिहितो. त्यामुळे प्रत्येक एपिसोडमध्ये मी लिहिलेले चार सीन तरी असतातच.

मला टाटा स्कायवर हा चॅनल बघता येत नाहिये... एच.डी नाहिये साधं आहे... पन तो चॅनल लावल्यावर १३ रु प्र म भरा असा मेसेज येतोय... आम्ही खुप जुने सबस्क्रैईबर आसल्यामुळे आसेल का? कारण आत्ताचे पॅक्स नविन काढलेत त्यांनी आमचा जुना ८ वर्षापूर्विचा सुपर सेवर पॅक आहे.... आता काय करावे? चॅनल तर मस्त आहे.... पन मंथली रिचार्ज अमाउंट खुपच जास्त आहे...

Pages