नवीन चॅनेल - नवीन शिरेल्स... झी युवा

Submitted by वेल on 8 August, 2016 - 06:08

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...

लव्ह लग्न लोचा

फ्रेशर्स

बनमस्का

इथेच टाका तंबू

श्रावण बाळ रॉ़क स्टार....

सध्या सांगा काय वाटतय प्रोमो बघुन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ho ti family saumitra chi ahe ...n ti ek aaji ahe ti heroine chi aaji ahe ...pn te cross gharat ka rahtat ky mahit..

ओके thank u. मी पहिला भाग नाही बघितला. बन मस्का आणि रजनीकांत उड्या मारत होते आजपण.

बन मस्कामधे पिंट्या आहे हो सु मि या घ मधला.

ओह बन मस्का मधे ते एकमेकांच्या घरात राहतात का ? कालचा भाग आवडला, निदान मा.न.बा. आणि खुल.क.खु. पेक्षा चांगला आहे, डोक्याला ताप तरी नाही.

ओमकार गोवर्धन म्हणजे तोच तो जो मला घो असला हवा मधे आहे. तरीच त्याला कुठेतरी पाहील्यासारखं वाटत होतं. तो खरंच खुप cute दिसतो.
बन मस्का पण मस्त आहे. मला आवडली. सौमित्र पण छान आहे.

ओमकार निळकंठ मास्तर मधे पण हिरो होता. ह्या सर्व चांगल्या असुदेत मालिका, पाणी नको त्यात मग चांगला पर्याय आहे प्रेक्षकांना.

२२ ऑगस्ट पासून झीचं नवं चॅनल येतय. त्यावर असलेल्या सिरियल्सचे मोठे मोठे प्रोमोज सुद्धा दिसताहेत. चला पीसं काढायला...>>

हे चॅनल व्हिडिओकॉन डी२एच वर नाही का? मी शोधले!

नाहीये बहुतेक कृष्णा, नवीन सेट टॉप बॉक्स घ्यायला सांगतायेत. ते बरेच जण टीका करतायेत झी युवाच्या चॅनेलवर त्याचे ग्राहक. ते वाचलं झी युवा फेसबुकवर.

नाहीये बहुतेक कृष्णा, नवीन सेट टॉप बॉक्स घ्यायला सांगतायेत.>>

हे बरयं !! मी दोन महिण्यापुर्वीच इथे डी२एच चे कनेक्शन घेतलय नवा सेटटॉप बॉक्स आता ह्य चॅनेल साठी परत नविन बॉक्स! Uhoh

Zee Yuva is offered as part of Zee Bouquet to all DTH & Cable providers. Kindly request your DTH service provider for availing this channel. You may write to Videocon d2h at customercare@d2h.com or call on 73558 73558

हे उत्तर दिलंय काहीजणांना त्या फेसबुक पेजवर.

करेक्ट प्राजक्ता, हिरो मस्त आहे. मला ती नाही आवडली म्हणून सिरीयल नाही बघत मी. तसंच तंबू मधली हिरोईन पण नाही आवडली पण ती बघतेय. कारणं वर दिली आहेतच.

तंबूची हिरवीण म्हणजे कन्यादानची गायत्री आहे ना?

बन मस्काची हिराॅइन आणि तंबूची हिराॅइन दोघींना पण ते नोझपिन अज्जिबात शोभत नाही.. कळत नाही का त्यांना. Uhoh कुणी सांगत पण नसेल का.

तो चिखलू मला कायम पक पक पकाक मधून उचलून इतर सिरियलींमध्ये काम करायला आणल्यासारखा वाटतो. तो चिखलू म्हणूनच डोक्यात फिट्ट बसलाय. मोठा झालाय असं वाटतंच नाही.. कायम छोटा मुलगाच वाटतो. Happy

Love, Lagna, Locha mast chalaliy...sagalech actors mast aahet..
Shravanbal aani itar malika pan Ok aahet..
Z Marathi var 'Chala Hava Yeu dya' aani baki vel' Z Yuva' pahate.

मला लव लग्न लोचा जास्त आवडतेय. सर्वांनी कामे फार सहज केलीयत. बाकी फ्रेशर्स, बन मस्का आणि श्रावणबाळ नाही बघत. इ टा तं ठीक आहे. श्री जाडा वाटतोय.

' बन मस्का ' च्या आजच्या भागात मजा आली.
सौमित्रच्या आईला त्याच्या gf चा फोन आल्यावर ती म्हणते,'जिचं नाव घेऊ नये ह्या घरात तीचा फोन आलाय..'
एकदम harry potter आठवला..he who should not be named.. Lol

बिचारा शशांक.>> ती अजिबातच शोभत नाही त्याला. Sad

मला फ्रेशर्स, लललो Proud , श्रावणबाळ या तीनही आवडतात.
बन मस्का आणि इटातं नाही आवडत. त्यांचे तीन चार भाग पाहिले पण नाॅट इंटरेस्टेड.
बन मस्काच्या हिरोचे एक्स्प्रेशन्स बाकी जबरदस्तच.

अरेरे. ह्या चॅनलवर पण मालिकाच आहेत का? मला वाटलं होतं की घरातील ज्ये ना इतर चॅनलवर मालिका बघत असतात, म्हणुन युवा पिढीला आवडतील असे कार्यक्रम ह्या चॅनलवर चालू करून युवा लोकांची सोय करतील. ट्रॅव्हल, क्लेव्हर गेम शोज्, इन्व्हेंशनस् वगैरे काहितरी...

राखी, संध्याकाळी असतो एक युवागिरी नावाचा प्रोग्रॅम. तो छान असतो. पण त्याची वेळ संध्या ५.३० ते 6.३० असते. त्यात वेगवेगळे विषय हाताळले जातात. आज लोणावळ्याचा एक adventure grp त्यातल्या सर्वांची मुलाखत होती, जोशी म्हणून एक खानावळ चालवतात लोणावळ्यात त्यांची होती. मी फार कमी बघते, पण आवडतो मला. वेगवेगळ्या ठिकाणी जातात शोचे anchor. तसं लोणावळा दाखवलं.

परवा कोडमंत्र नाटकाबद्दल दाखवलं. अमर फोटो स्टुडीओ ह्या नाटकाबद्दलपण दाखवलं.

झी युवा सुरु व्हायच्या आधीच एकाने करियर गायडन्ससारखा पण प्रोग्रॅम करा सुचवलं, त्याला आम्ही नक्की विचार करू असं उत्तर दिलं. पण सध्यातरी युवागिरी हा एकच जरा वेगळा कार्यक्रम आहे (पण इथेही मध्ये मध्ये गाणी असतात हिंदी मराठी नवीन मुवीजची) ज्यात स्पोर्ट्स, ट्राव्हेल्स etc आहे. बाकी सिरियल्स आणि मुविज.

Pages