Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14
वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हां हां ..आता वाचा शैलजा !
हां हां ..आता वाचा शैलजा !
1. 2. 3. 4. 5. 6. 7. 8
1.

2.

3.

4.

5.

6.

7.

8.

9.

10.

11.

12.

13.

14.

15.

16.

17.

18.

19.

20.

21.

22.

23.

24.

25.

26.

27.

28.

29.

30.
कोणाला फोटो नको असल्यास फोटोचा नंबर विपूत कळवणे म्हणजे तो फोटो डिलिट करता येईल.
>>>> कोणाला फोटो नको असल्यास
>>>> कोणाला फोटो नको असल्यास फोटोचा नंबर विपूत कळवणे म्हणजे तो फोटो डिलिट करता येईल. <<<
त्यामुळे मला १ ते ३० मधला एकही फोटु नकोऽऽय...... 
अबे इत्क्या सगळ्या फोटुंमधे माझा एकही फोटु का नाही?
हिम्याऽऽ, ये ना इन्साफी है...
अबे इत्क्या सगळ्या फोटुंमधे
अबे इत्क्या सगळ्या फोटुंमधे माझा एकही फोटु का नाही?>>>
आत्म्यासारखा भटकत असशील तू इकडे तिकडे कसा येणार फोटो??
हिमांशु, फोटो बाकी मस्त
हिमांशु, फोटो बाकी मस्त सर्व!!
बर्याच जणांचय चेहर्यावर वविचा आनंद प्रतीत होतोय! काही जण मात्र दमले भागलेले जास्त दिसतायेत!
एक तर त्यांनी जास्त चिखल खेळला असावा किंवा एखाद्या खेळाच्या मूड मधून बाहेर पडलेले नसावेत!
माझा पहिला ववि कधी उगवणार आहे
माझा पहिला ववि कधी उगवणार आहे कोण जाणे.. नेहमी हुकतोय!>>>>> सहमत आहे मी पण
दक्षे, वृत्तांत मस्त
दक्षे, वृत्तांत मस्त लिहिलास!
तु तर अगदी राजकुमारीच दिसतेयस. तिकडे पण बरोबर "डबे" घेऊन गेली होतीस का?
वावा मस्त वृत्तांत व फोटो.
वावा मस्त वृत्तांत व फोटो. अकुचे फोटो तर लय भारी.
@अकु, तु पोस्टलेले फोटो अफलातुन नेत्रसुखद आहेत. बाकी मी नेहेमी म्हणते वविला तुझ्याशी बोलेन पण नेहेमी राहुन जाते. तुझ्या संतुलीत पोस्टमुळे व बाकी कामगीरींमुळे तुझ्याबद्दल आदर वाटतो. पण गडबडीत कधी बोलायला जमलेच नाहिये.
@कविन तुझे मुद्दे पटले. माझ्या मागच्या वविला मी पण थोडी लेट झाले होते. (लेक तेव्हा अगदिच लहान होता). ह्यावेळी मात्र मी वेळेत आले होते. पण मग नंतर वाटले उगाच मी मुलांची झोपमोड करुन त्यांना इतके धावडवत आणले. अर्थात तिथे स्टॉपवर पण गप्पांचा फड रंगतोच सो वेळ वाया जात नाही. पण तिकडचा वविचा आनंदाचा वेळ कमी होतो हे मात्र नक्की. अजुन एक जर आधीपासुन ओळख नसेल तर मुंबई व पुणेवाले वेगवेगळे रहातात. बोलायला ओळख करुन घ्यायला वेळ मिळत नाही.
पुढच्या वविला हेही करा - मुद्दाम मुं-पु असे गृप करा खेळ घेताना म्हणजे ओळखी (दृढ) होतील.
अच्छा! हाहीहू हे खेळाचं नाव
अच्छा! हाहीहू हे खेळाचं नाव होतं काय... मला वाटलं सांका झाले नाहीत म्हणून तुम्ही हाहाहीहीहूहू करत होतात
माझा हा दुसरा ववि होता.
माझा हा दुसरा ववि होता. गेल्या वेळेस ववि ना जाणार्यांची संख्या बरीच कमी होती. त्यामुळे बरीच जणं न आल्याने ओळखी होऊ शकल्या नाहीत. यंदा संख्या जरा जास्तच असल्याने, कुणाकुणाशी बोलू या भानगडीत फारश्या ओळखी होऊ शकल्या नाहीत.
)
पण मजा आली हे सांगणे नलगे. वविचे ठिकाण माझ्या कल्पनेहूनही सुंदर होते! अगदी हरवून जायला झाले त्या निसर्गात! तिथे येउन दिवसच नव्हे तर हा संपूर्ण ऋतू सार्थकी लागल्याची भावना झाली. इतकं सुंदर आणि स्वर्गीय होतं ते सारं की मला शब्दात सांगता येणार नाही. ती हिरवीगार शेते, तळी, भुरभुर पाऊस... निव्वळ स्वर्ग! संयोजकांचे हे ठिकाण निवडल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
बाकी जेवण वगैरे अप्रतिम होतं हे झालंच. कारण सगळा स्वयंपाक तिथंच पिकवलेल्या धान्यापासून केला जातो असे सांगितले गेले होते. ते ऐकल्यापासूनच भूक लागलेली खरेतर.
ते ससे, मासे, बदकं, कोंबड्या झालंच तर वाघ, हरणं यांचं कौतूक अजूनही लेकीमार्फत घरी चालू आहे. (वाघ, हरणं खोटी खोटी होती हे मला सांगावे लागते दरवेळेस ऐकणार्याचे डोळे मोठ्ठे झाले की
यंदा माझ्या आग्रहाला मान देऊन माझी माबो वरची आद्य मैत्रिण सखी-माऊली सुद्धा आली होती वविला तिच्या लेकीसह. तिनेही तिचा पहिला ववि एन्जोय केलेला दिसतोय हे बघून मलाच हायसे झालेय.
हिमांशू, मस्तच फोटो आहेत सगळे
हिमांशू, मस्तच फोटो आहेत सगळे

सुप्रिया, वृत्तांत छान लिहिलायस
दक्षी प्रत्येक फोटो मधे आहे
दक्षी प्रत्येक फोटो मधे आहे
अणि लिंब्या एकाही फोटोत नाही ? वाळीत टाकलेला का ?
मस्त फोटो! मस्त वृ ! कविचा
मस्त फोटो!
मस्त वृ !
कविचा वेळ पाळण्याबद्दलचा मुद्दा फार्फारच पटला.
>>> अणि लिंब्या एकाही फोटोत
>>> अणि लिंब्या एकाही फोटोत नाही ? वाळीत टाकलेला का ? <<<<

नाही, सुरक्षितरित्या "झाकुन/लपवुन" ठेवलेला.....
सई धन्यवाद ! फोटो झकास !
सई धन्यवाद !
फोटो झकास !
आता वविचा वृत्तान्त लिहिणे
आता वविचा वृत्तान्त लिहिणे म्हणजे खुपच उशीर झाला, नै?


पण वविवरुन आल्यापासुन मी रोजच्या रोज "कपाळबडविती" मोड मधे आहे...
कायेना, की तिकडे ससे होते, सशांना बहुतेक चिल्ल्यापिल्ल्यांनी वर्षभराचे खाणे खाऊ घातले असाही बर्याच जणांनी उल्लेख केलाय.
त्यात आमची धाकटीही मागे नव्हती.
फक्त ती अजुन एका बाबतीत पुढे गेली, कदाचित बाकी चिल्यापिल्यांपेक्षा मोठी असल्याने असेल, पण सशांकरता हट्ट करुन बसली.
लगेच तेथिल चालकांना ते ससे विकाऊ आहेत का विचारुन झाले, किंमत कळली. अन धाकटी मागेच लागली की घेउयात ....
मी खिशाचा अंदाज घेतला. तिला परत परत बजावले की घरी गेल्यावर लिंबीचा ओरडा तुलाच खायचा आहे. सशांचे सगळे तुलाच करायचे आहे , हे मान्य असेल तरच घेऊ. नैतर परत कधीतरी इकडे येऊ.
पोरगी हटून बसली, की परत कधी येणे होणार.... चेहर्यावर अगदी कसलेसे करुण वगैरे भाव म्हणतात तसे आणलिनी.
मग अस्मादीक पाघळले, व सशांच्या पिल्लाची एक जोडी घेऊनच घरी परतले.
अन तिथुन सुरु झाला माझा कपाळबडविती मोड ....
घरी गेल्या गेल्या लिंबीने फुरंगटुन, (स्वतःच्या) कपाळाला हात लावुन झाला
आधीच घरात कामे थोडी, त्यात ही भर कशाला? कोण करणार त्यांचे ? त्यांच्या खाण्याचा रोजचा मीटर चालू झाला... मला नै हो जमणार यातले काहि इत्यादीक जाहिर करुन झाले.
दोन दिवस पोरीने सशांचे खाणेपिणे बघितले.
दोन दिवसानंतर तिचा उत्साह ओसरला. मग सगळे काम, स्वच्छता वगैरे, वेळच्या वेळी खाणे देणे, बाजारातुन रोजच्या रोज सशांकरता भाजी आणणे (ती आणल्यावर लिंबीचे टोमणे ऐकणे की बघा एरवी घरात कधी भाजी आणतील तर शपथ, आता कसे आणताहेत वगैरे वगैरे...) , मग सशांनी केलेल्या घाणीचा वास घरभर भरतोय, आधी त्यांना घराबाहेर काढा वगैरे आदेश रोज ऐकणे अन दुसर्या कानाने सोडून देणे....
आता त्यांच्याकरता वेगळा पिंजरा तयार करण्याची तजवीज करणे...... त्याकरता पैका..., वेळ, श्रम.....जागा निश्चिती.... आजुबाजुच्या मोकार मांजरांपासुन /घुशींपासुन त्यांना कसे वाचवायचे याचे प्लॅन्स.... अरे लहान पोरे वाढवली, त्यांचेही इतके बघायला लागले नव्हते कधी....
तर आमच्या शेजारच्यांनीही एक जोडी आणली होती, त्यांना तिन पिल्लेही झाली, तर त्यांच्याकडे देऊन टाका ते ससे इथवर अल्टिमेटम मिळाला....
लिंबोटल्याने "असहकार" पुकारला (कारण आजवर जे जे प्राणी/पक्षी/मासे वगैरे आणले होते, त्यांचे सर्व त्यालाच करायला लागायचे, यावेळेस साहेबांची शिंगे जरा मोठी झाल्याने त्यांना बाबापुता करुन त्याचेकडुन कामे करवुन घेणे.
हे सर्व करताना लिंबीची जळजळती नजर, कुत्सित हावभाव, शाब्दिक फटकारे वगैरेमुळे घायाळ न होण्याइतपत गेंड्याची कातडी पांघरणे......
या सर्वांस कारण धाकटी, या सगळ्यातुन असुन नसल्यासारखी पुर्ण वेगळी होणे....
अरेरे, अरेरे, हेचि फल काय मम तपाला ......
असे म्हणत वविपासुन आजवर मी "कपालबडविती" योग साधत आहे.... वविचा असाही परिणाम असु शकतो...?
या सगळ्यामुळे वविचा वृत्तान्त लिहिण्यायेवढी उर्जा/ताकद/उमेद शिल्लकच राहिलि नाहीये....
यावर काय उपाय? कोतबोत लिहावे काय?
बाकी सशांची पिल्ले मात्र छान आहेत, रोजच्या रोज कोबी/गाजरे/कोथिंबीरीचा खुराक चालू आहे.
त्या सश्यांचे फोटु चिपकवा की
त्या सश्यांचे फोटु चिपकवा की हिथ. बाकी सर्व जुन्या-नव्या वविकरांचे वृतांत एकदम सही आणी उत्साहाने रसरसलेले आहेत.
लिंब्या ववि नको पण ससे आवर!!
लिंब्या
ववि नको पण ससे आवर!! 
वा सगळे वॄतांत वाचुन मस्त
वा सगळे वॄतांत वाचुन मस्त वाटलं....
ससे भारी
ससे प्रकरण भारीये! आता
ससे प्रकरण भारीये!
आता कोणीतरी सश्यांचे वविवृत्त लिहा.
(No subject)
लिम्बु, डोळ्यापुढे आला
लिम्बु, डोळ्यापुढे आला गाताना!
ससा ससा दिसलास असा?
खिशाला चाट देऊन हसतोस कसा?
लाल लाल गाजर छान
भाजीला नाही तरी तुला कोबी आण
कोथमिर खाऊन फुगतो टुम्म
लिबोट्ल्या तुल बघून पळतो धूम
किस्ना...... कान्द्या, बघना,
किस्ना......
कान्द्या, बघना, अस्स अस्त बघ..... पण त्याकरता वविला याव लागत, आपापल्या बाळांना घेऊन...
मला समजुन घ्यायला आवडेल की अजुन कुणाकुणाच्या चिल्यापिल्ल्यांनी सशांकरता हट्ट धरला होता? (अन तो कसा टाळू शकलात?)
मला समजुन घ्यायला आवडेल की
मला समजुन घ्यायला आवडेल की अजुन कुणाकुणाच्या चिल्यापिल्ल्यांनी सशांकरता हट्ट धरला होता? (अन तो कसा टाळू शकलात?)>>>>>>>आत्ता! त्यांचे टाळण्याचे अनूभव आता जाणून काय करणार? तुम्ही तर लिंबोणीचा आग्रह टाळुच शकला नाहीत की. मग आता काय उपेग? उलट तुमचेच अनूभव वाचुन इथले हादरले असतील, आणी भविष्यात अशा आग्रहाला बळी न पडण्यासाठी विचार करत असतील.:फिदी::दिवा:
कृष्णा
शीघ्र बालकविता मस्तय.
मामी सशांचे वविवृत्त तेव्हाच
मामी
सशांचे वविवृत्त तेव्हाच आकाराला येईल जेव्हा लिम्बु भाऊ त्या सशाना एखाद्या वविला नेतील.
>>> सशांचे वविवृत्त तेव्हाच
>>> सशांचे वविवृत्त तेव्हाच आकाराला येईल जेव्हा लिम्बु भाऊ त्या सशाना एखाद्या वविला नेतील. <<<
आजवर कुणी असे आले आहे का पेट्स ना घेऊन?
यावरुन एक शंका......
कुणा प्राणीप्रेमीला त्याचे पाळीव प्राणी/पक्षी वविला आणायचे असतिल तर त्याकरता संयोजकांची काय नियमावली आहे /असेल?
Pages