वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14

वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे, इतक्या चारोळ्या बनविल्या? ग्रेट जॉब..... आयडिया झकास... कुणी बनविल्या?
हे म्हणजे "फिशपॉण्ड" सारखे झाले, फक्त तिकडे नाव घेऊन चारोळी ऐकवित, इकडे चारोळीवरुन नाव ओळखायचे. Happy

>>> लिंबुदा, काल आम्हाला चिखलात ढकलुन कुठे गायब झालास? <<<<
अड्ड्या/कट्ट्यावरुन तुम्हाला काही विशेष "कंपनी" मिळते का शोधायला गेलो होतो Proud

१९.सोलापुरी ठसका मी
पेशाने वकील मी
संयोजनाची आवड म्हणून
काढत असते सवड मी>> मुग्धानंद!!

१२.पुण्यात मी रहाते
कट्ट्यावर बागडते
लिखाणात मी आळशी आहे
असं आमची ताई म्हणते>> मंजात्या!

१३.कथा कविता श्वास माझा
लिखाण मला आवडते
रस्ता "गुब्बी" कार मी
ही ओळख मला सुखावते>> शुकु

सर्व चारोळ्या कविनने एकहाती (की डोकी?) बनवल्या आहेत. खरंच कल्पकतेच्या व उत्साहाच्या बाबतीत कविनचे कौतुक करावे तितके थोडे आहे! Happy

कालचा वविवार बेस्ट होता!! माझा पहिलाच ववि, त्यामुळे रात्री अजिबात झोप लागत नव्हती. सकाळी पटापट तयार होऊन वेळेआधीच अकुबरोबर किमयाला पोहोचले.. पण बस काही येईना, त्यात मल्लिचा फोन बिझीच बिझी Happy

फायनली एकदाची बस येऊन वेगळ्याच ठिकाणी उभी राहिली. मग आमच्या विरुद्ध बाजूला उभे असलेले माबोकर्स दिसले आणि सगळे एकदाचे बसमध्ये घुसलो.

राजाराम पुलापासून सगळी गर्दी आल्यावर जी काही धमाल सुरु झाली त्याला तोड नाही! दक्षिणा तर ववि व्यवस्थित पार पडूदे म्हणून देवाला साकडं घालून उदबत्त्या वगैरे घेऊन आली. जोरदार अंताक्षरी त्यातच कोट्या आणि जोक्स यांनी जाम धमाल आली.. केदार, मल्ली, देवा, वासंती, शामली, दक्षा यांनी इतका दंगा केला की ओवी आपला बाबा नक्की काय करतोय हे निरीक्षण करत होती :p अजून बऱ्याच id आठवत नाहीत, पुण्याच्या बसला गर्दीच खूप ना Wink हजेरी घेताना मलाही एक पॅकेट, दोन पॅकेट म्हणून जाम पिडून झालं तिकडे मी इग्नोरस्त्र फेकत आहे :p

या गोंधळात पवना हटस कधी आलं ते कळलंच नाही. पण बसबाहेर आल्याबरोबर डोंगरांवर उतरलेले ढग, धुकं, वरून भुरभुर पाऊस, सगळीकडे पसरलेली हिरवाई आणि कौलारू छोट्याश्या झोपड्या बघून एकदम प्रसन्न वाटलं. हाच वर्षाविहार अशी पटकन जाणीव झाली. मुंबईची बस आमच्या दहा(च) मिनिटे आधी पोहोचली होती. (पुणेरी बाणा सोडणार नाय!) त्यातल्या ओळखीच्या असलेल्या मुग्धा, मिनू, राखी या संयोजकांची गळाभेट झाली. मग बऱ्याचशा कट्टर मैत्रिणींबरोबर बाकी कट्टर्सची ओळख झाली. सगळ्या माबोकरांशी जुनी ओळख असल्यासारखेच वाटत होते, पहिल्या वविचा नवखेपणा कोणी जाणवूच दिला नाही.

उपमा चहा घेऊन नाश्ता झाला मग पवना हटसच्या मालकांनी मोठ्ठ लेक्चर दिलं कि त्यांनी इथे शेती कशी सुरु केली, काय काय फॅसिलीटीज आहेत इ. पण माबोकरांना डुंबण्याचे वेध लागले होते त्यामुळे लेक्चर संपताच पटापट सगळ्यांनी ४ फूट पॉंडकडे मोर्चा वळवला. सगळ्यांनी डुंबून, कयाकिंग करून खूप मज्जा केली, कयाकिंग करणारे नव्या दमाचे नाविक वल्हवत जोरात डुंबणाऱ्याच्या अंगावर येत होते तर काही किनाऱ्यालाच चिकटून राहात होते! काही लोक उठून चिखलात पळाले.. चिखलात बऱ्याच मगरी दिसत होत्या Wink

मनसोक्त मडबाथ घेऊन मग खरा बाथ घेऊन लोक्स जेवणावर तुटून पडले. (कधीतरीच) झालेल्या एवढ्या व्यायामामुळे कुणालाच भूक आवरत नव्हती त्यामुळे साधं जेवणपण खूप चविष्ट लागत होतं. तिथला शिरा तर आहाहा Wink

कोरडे कपडे घालून, जेऊन सगळ्यांना झोपा यायला लागल्यावर सांस सोडून इथेच गाद्या टाकून झोपू अशीही एक टूम निघाली होती जी संयोजकांनी हाणून पाडली Happy शेवटी संयोजकांनी सगळी मेंढरं हाकलत एका मोठ्या गझीबोमध्ये नेली. यावेळच्या वविला जवळजवळ २५ ते ३० जुनियर्सची गॅंग होती त्यामुळे साहजिकच सगळ्यात जास्त मजा त्यांनीच केली. पुढे पिल्लं आणि मागे पळणारे पालक असं दृश्य वविभर होतं. त्यामुळे आधी या बच्चा कंपनीची मजेदार संगीत खुर्ची झाली. पिल्लांबरोबर आमच्यावरही संयोजकांनी चॉकलेट्सची उधळण केली . धन्यवाद संयोजक Happy मग सगळ्यांची ओळख परेड, हाहाहीहु हा खेळ झाला. पण ववि ठिकाण निसर्गाच्या अगदी जवळ असल्याने वीज नव्हतीच, त्यामुळे माईकही नव्हते. त्यामुळे बाकी सांस चे खेळ होऊ शकले नाही.

शेवटी चहा पिऊन झिंग झिंग झिंगाट होऊन एक ग्रुप फोटो झाला. तेव्हा पवना हट्सच्या मालकांनी पण एक फोटो आणि व्हिडीओ त्यांच्या वेबसाईटसाठी घेतला. इथे तिथे भरकटलेले कपडे आणि बॅगा ज्यांच्या त्यांनी कलेक्ट करून, सगळ्यांच्या गळाभेटी घेत वविकर्स जड मनाने आपापल्या बशींकडे गेले. संयोजकांनी आपापली जबाबदारी योग्य पार पाडली आणि एवढी गर्दी असून देखील प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष दिले यासाठी स्पेशल शाब्बासकी! पुढच्या वविला माझी एक सीट फिक्स Happy

lc, केदार जाधव आणि मॅगी मस्त वृत्तांत ... बाकीचे पहिल्यांदा आलेले वविकर पटापटा वृत्तांत लिहा...

मॅगी,छान वृत्तांत. तुझ्यासारख्या वविला पहिल्यांदा येणार्‍या लोकांचे वृत्तांत म्हणजे सयोजकांसाठी समाधानाची पावती असते. Happy

चला आता बाकी नविन लोक्स पटापट वृत्तांत टाका.

माझा पहिलाच ववि. खर म्हणजे दक्षिणाच्या धागा वाचून मनात आले try करण्याचे. त्या साठी दक्षिणा धन्यवाद
बोरिवलीची बस मुलुंडला जाईपर्यत शांत होती मग मात्र Public
चढल्यावर जो दंगा सुरू झाला की वाटले आपण picnic ला जात आहोत. काही काही बदललेली गाणी ऐकून हसायला पण आले. सगळ्यांबरोबर बसने जाण्यात जी मजा आहे ती वेगळीच
तिथे पोहोचल्यावर गरम गरम नाश्ता मिळाला. हळू हळू नवीन नवीन ओळखी झाल्या. पाण्यांत खेळताना वेळ कसा गेला कळले नाही. चिखलात गेले नाही पण बाकिच्यांचा makeup बघायला मजा आली. जेवायला पण गरम भाकरी होती. मध्ये मध्ये फोटो काढणे चालूच होते. मग सगळ्यांनी ओळख सांगितली. खेळ झाले. छोट्या मुले मायबोलीच्या t shirt मध्ये इतकी cute दिसत होती. मग चहा group photo मग निघालो येताना पण बस मध्ये धमाल केली.
काही मुद्दाम उल्लेखनीय वाचलेले बाबी

आपण नवीन आहोत असे बिलकुल जाणवत नाही. सगळे इतके छान वागतात. विनय, नील यांनी नवीन लोकांनी नाश्ता केला का,जेवण झाले का, काही त्रास नाही याची आपुलकीने विचारपूस केली. प्रत्येक जण घरी कसा सुखरुप पोहोचेल ते पहिले. दोघांनाही धन्यवाद काल गडबडी मधे राहून गेले.

एवढ्या लोकांची व्यवस्था करणे सोपी गोष्ट नाही. त्याकरता किती मेहनत असेल ती कल्पना करू शकतो. आपल्याला करायची वेळ आली नाही म्हणुन करणार त्याच्या चुका काढता येतात.

परिसर खरच खूप सुंदर होता ठिकाण मस्त निवडले होते. अजुन बरेच लिहीता येईल पण इथेच थांबते.

बोरिवलीची बस मुलुंडला जाईपर्यत शांत होती मग मात्र Public>>>>>>>>>>>>>>>>>>> तु कुठे होतीस त्यावेळी? : आठवुन डोकं आपटणारा बाहुला:

एल्सी व मॅगी, छान लिहिलेत! नव्या वविकरांना भेटताना माबोचा सामायिक धागा खूपच आश्वासक असतो सर्वांसाठी!

मला सगल्याची उत्तरे माहित आहेत ,पण टाइप करयला घेतल्यावर काहितरी होवुन, ते सगळॅ जात आहेच. काय कराअवे?

Pages