Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14
वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
संयोजकांनी उत्तरं देऊ नयेत
संयोजकांनी उत्तरं देऊ नयेत म्हणुन लिंबु फिरवलाय
१. कधी पुणे तर कधी मुंबई असते
१. कधी पुणे तर कधी मुंबई
असते चालू वारी
गोगादादाचं ऐकलं आणि
लावली इथे हजेरी - विवेक देसाई
२.नृत्य माझी पॅशन
आता वविचं लागलय व्यसन
गोगाभावजींचे आभार मानून
संपवते मी भाषण - पर्णिका(नंदिनी देसाई)
३.झांजा मी वाजवते
कोपु मी गाजवते
नावात माझ्या दिशा एक
उतरवलय मी माझ वेट - दक्षिणा
४.रेशीमगाठीची मी हिरॉईन
आयडी सांगा काय?
मिळेल खाऊ इन टू मिनिटस
हा वादा माझा हाय! - मॅगी
५.बिफोर-आफ्टरचे फोटो माझे
माबोवरती लागलेत
व्यायाम डाएट शब्द आता
माझी ओळख बनलेत - केदार जाधव
६.रहातो मी पुण्यात
रमतो मी गाण्यात
वविआधीचा वेळ माझा
जातो टिशर्ट करण्यात - हिम्सकूल
७.लष्कराच्या भाकऱ्या भाजायची
आहे मला आवड
सामाजिक कार्यासाठी नेहमीच
काढते मी सवड - अरुंधती कुलकर्णी
८.माबो मॅरेज ब्युरोचा
मी ही एक लाभार्थी
कार्याध्यक्ष बनुन करतो
सेवा मी निस्वार्थी - मयूरेश
९.वेबसाईट डिझाईन नि इमेज बिल्डींग
व्यवसाय माझा आहे
कार्याध्यक्षांची अर्धांगी
ही पण ओळख माझी आहे - रुमा
१०.वकील आहे पण घालत नाही
मी अताशा वाद
रांजणगावच्या गणेशाने
दिलाय मला प्रसाद - दक्षा मोकशी
११.सोलापुरकर मी जन्माने
मला ट्रेकिंगचा चावलाय किडा
हाडाचा ट्रेकर बनायचा
उचललाय मी विडा - मल्ली
१२.पुण्यात मी रहाते
कट्ट्यावर बागडते
लिखाणात मी आळशी आहे
असं आमची ताई म्हणते - मंजिरी सोमण
१३.कथा कविता श्वास माझा
लिखाण मला आवडते
रस्ता "गुब्बी" कार मी
ही ओळख मला सुखावते - शुभांगी कुलकर्णी
१४.हातभर पोस्टी माझ्या
ज्योतिष माझा छंद
पावसामुळे सध्या माझी
सायकल ठेवलेय बंद -लिंबूटींबू
१५.ढोलकीवाला ओळख माझी
आहे मला प्रिय
वविमधे कल्ला करण्यात
असतो मी सक्रीय - वैभवआयरे१२३४५
१६.संस्थापक मी कट्ट्याचा
मला प्रेमाने म्हणतात मालक
मी तर आहे बोरीवलीचा
छोटासा एक बालक - विनय भिडे
१७.मैत्र्य जोडण्यास उत्सुक मी
मला ऍक्टींगचा चावलाय किडा
हसमुखराय आहे मी
कोणी चिडवा अथवा चीडा - आनंदमैत्री
१८.कभी कभी मेरे दिल मे
हा खयाल आला आहे
ती, मी आणि १८ ऑगस्ट
काहीतरी साम्य आहे
१९.सोलापुरी ठसका मी
पेशाने वकील मी
संयोजनाची आवड म्हणून
काढत असते सवड मी - मुग्धानंद
२०.आयडीत माझ्या डॉट
वविसाठी प्राईम स्लॉट
जाहीराती आणि पोस्टर्स साठी
कायम असतो रेडी प्लॉट - नील.
२१.भिकबाळी नि शेंडी
ही ओळख माझी आहे
संघ, चहा नि सिगारेटशी
लगीन लागले आहे - घारुआण्णा
२२.जगाची माता असा
बसलाय माझ्यावर शिक्का
उशीरा येते म्हणून आता
माझ्यावर नक्को टिक्का - निंबुडा
२३.टायपिंगच्या चुका
मला पटकन दिसतात
माझ्या घाऱ्या डोळ्यांना
सगळेच घाबरतात - मेधा
२४.मायबोलीकर होऊन मला
वर्ष पाच झाली
तरी लोकरीचं तोरण
हीच पाऊलवाट उमटली
२५.डम्बशेराड्स खेळातला डम्ब
माझ्या आयडीतही आहे
नुकतीत आले माबोवर
तशी कल्याणकर मी आहे
२६.चॅप्टर प्रकरण आयडी माझा
माबोकर मी ताजा ताजा
गॉगल फ़ेटा डिपीधारी
पहिल्यांदाच करतोय ववि वारी
२७.जन्माचे साल माझ्या
आयडीत आहे
शाखाच्या सिनेमात
मी जेन्टलमन आहे
२८.डिपीमधे आहे माझ्या
स्वप्नातलं घर
अर्ची पर्श्या फ़ॅन क्लबची
मी माबिवर घातलेय भर
२९.एक आठवडा वय माझ
मायबोली वरचं
मराठीतली "वरशीप" मी
आता करा माझं बारसं
३०) १२ वर्षांचा वनवास नि
१ वर्षाचा अज्ञातवास
संपवून वविला मी आलेय
ववि ववि करता करता वविमय झालेय
३१.पंढरीचे नाव माझ्या
आयडीमधे आहे
मुग्धमानसी सखी माझी
माझ्या विपूमधेही पाहे - सखी माऊली
३२.चवळीची मी शेंग आहे
भिड्यांची गाववाली आहे
डब्यात नाश्ता काय द्यावा
हा माझाच बाफ़ आहे
३३.मी कानडीतली चिमणी
आले माबोच्या अंगणी
३४.रोमन आहे आयडी माझा
म्हणून रोमातच मी असते
अल्झायमर्सच काउंसिलींग करत
मुंबईभर हिंडत बसते
३५.चांदणशेला मधे आहे
आठवणींची गोडी
हिच्या नावात आहे
दोन आड्नावांची जोडी - श्यामली
३६.मुख्यमंत्र्यांच्या गावचा मी
सध्याचा पत्ता पुणे
होमिओपथीच्या गोळ्यांमधे
काहीच नाही उणे - योकु
३७. आयडी माझा गणपतीला आवडतो
वस्तरा द्या भेट मला
माझ्या बायकोला
टकलूच फार आवडतो
भिडे तुमच्या गावातील सर्व
भिडे तुमच्या गावातील सर्व चवळीच्या शेंगांची नावं सांगा पाहु
१३.कथा कविता श्वास माझा लिखाण
१३.कथा कविता श्वास माझा
लिखाण मला आवडते
रस्ता "गुब्बी" कार मी
ही ओळख मला सुखावते - शुभांगी कुलकर्णी >>> मला वाटतंय, ललिताप्रीति असावी.
चवळीची मी शेंग आहे भिड्यांची
चवळीची मी शेंग आहे
भिड्यांची गाववाली आहे
डब्यात नाश्ता काय द्यावा
हा माझाच बाफ़ आहे>>>> मिनू
मी कानडीतली चिमणी आले
मी कानडीतली चिमणी
आले माबोच्या अंगणी>>>> गुब्बी
जन्माचे साल माझ्या आयडीत
जन्माचे साल माझ्या
आयडीत आहे
शाखाच्या सिनेमात
मी जेन्टलमन आहे>>> राजू७६???
कविता सॉरी पण या चारोळ्या इथे
कविता सॉरी पण या चारोळ्या इथे टाकून तु बाफच्या विषयाला फाट्यावर मारलं आहेस.
लोक वविचा वृत्तांत लिहिण्या ऐवजी चारोळ्यांची कोडी सोडवत बसलेत.
लली नव्हती गेली वविला.
लली नव्हती गेली वविला.
३२.चवळीची मी शेंग
३२.चवळीची मी शेंग आहे
भिड्यांची गाववाली आहे
डब्यात नाश्ता काय द्यावा
हा माझाच बाफ़ आहे - मिनू
३४.रोमन आहे आयडी माझा
म्हणून रोमातच मी असते
अल्झायमर्सच काउंसिलींग करत
मुंबईभर हिंडत बसते - मनी
२७.जन्माचे साल माझ्या
आयडीत आहे
शाखाच्या सिनेमात
मी जेन्टलमन आहे - राजू ७६
२४.मायबोलीकर होऊन मला
वर्ष पाच झाली
तरी लोकरीचं तोरण
हीच पाऊलवाट उमटली - lc
मॅगी , मनिशा , एल सी ...मस्त
मॅगी , मनिशा , एल सी ...मस्त लिहिल आहेत
१३ च उत्तर सोडून बाकीची
१३ च उत्तर सोडून बाकीची बरोबर आहेत
१३ ती कविता करते कथा लिहीते...गुब्बी तिचं नाव नसून ती गुब्बीची रचेती आहे
नंदिनी - श्यामलीच मूळ नाव कामिनी फडणीस केंभावी असं आहे ना!
साॅरी दक्स मंडळींनो कोडं
साॅरी दक्स
मंडळींनो कोडं सोडवा आणि वविबद्दल पण लिहा बघू नाहीतर दक्शीमावशी माझं घर उन्हात बांधेल
कविन, श्यामलीचे बरोबर आहे..
कविन, श्यामलीचे बरोबर आहे..
मुग्धमानसी आली होती की काय
मुग्धमानसी आली होती की काय वविला?
मंजुडी, करेक्ट! मुग्धमानसीच
मंजुडी, करेक्ट! मुग्धमानसीच आहे उत्तर १३ चं
धमाल येतेय वाचायला
धमाल येतेय वाचायला

पहिलटकरांचे अनुभव आणि दक्षिणाच्या धाग्यावरचे सराईत वविकरांचे प्रतिसाद टॅली होतायत, ग्रेट!
अगदी लोकांचे नेमके फोटो नका टाकू पाहिजे तर, पण ग्रुपची क्षणचित्रं यायला हरकत नाही.
संयोजकांनो, तुम्हा सगळ्यांच्या पाठीवर जोरदार थाप!
कविन, कोडी भारीच!
कविन, कोडी भारीच!
बोरिवलीची बस मुलुंडला
बोरिवलीची बस मुलुंडला जाईपर्यत शांत होती मग मात्र Public>>>>>>>>>>>>>>>>>>> तु कुठे होतीस त्यावेळी? : आठवुन डोकं आपटणारा बाहुवयाने
बोरिवली हून आम्ही तीघेच चढलो
मस्तच, मज्जा येतेय वाचायला.
मस्तच, मज्जा येतेय वाचायला. धमाल केलीय सगळ्यांनी.
कवे चारोळ्या भारी.
अजून वृत्तांत येऊ द्या. नवीन
अजून वृत्तांत येऊ द्या. नवीन जुने माबोकर सगळ्यांनीच लिहा.
संयोजक, चरोळ्यांसाठी वेगळा बाफ काढता येईल का? चरोळ्या मस्त आहेत.
@संयोजक सगळ्यांचा जो एक गृप
@संयोजक सगळ्यांचा जो एक गृप फोटो आहे त्याची High resolution प्रत मिळू शकेल का? इथे जतन करून ठेवता येईल.
https://www.facebook.com/109787955729708/photos/?tab=album&album_id=3200...
वेमा प्रोसेस झाली की फाईल
वेमा प्रोसेस झाली की फाईल पाठवतो तुमच्या आयडीवर..
दक्षे, शैलेशच्या प्रतिक्रीया
दक्षे, शैलेशच्या प्रतिक्रीया काय होत्या?
त्याचे एकंदरीत ववि बद्दल्चे आणि आमच्या बद्दलचे मत काय होते? 
कोडी सुटली असतील तर आता
कोडी सुटली असतील तर आता वृतान्त येऊ देत! एवढी मंडळी जमलेली त्या मानाने वृतान्ताची संख्या नाममात्र आहे!
लिहा पाहू आता बाकी मंडळीनी!
आमच्या सारखे जे मिसले त्यांना वृतान्ताने तरी ववि ची अनुभुती घेऊ देत!
कृ, तेच की, आजवर कसे दणादणा
कृ, तेच की, आजवर कसे दणादणा वृ येत! लिहा की पटापटा!
सगळेजण पवनेच्या थंडगार
सगळेजण पवनेच्या थंडगार पाण्यात, भणाणणार्या वार्यात, धो-धो बरसणार्या पावसात आणि मऊ मऊ चिखलात तुडुंब डुंबून गुडुप्प झाले की काय??
ही आणखी काही प्रवासचित्रे,
ही आणखी काही प्रवासचित्रे, पवनेच्या वाटेवर....
जिथे पाहाल तिथे हिरव्या रंगाच्या असंख्य छटा...
शाळेत निबंधात लिहायचो तशी धरतीमाता हिरवा शालू पांघरून बसलेली...
डोळ्यांचे पारणे हे असे मिटावे...
पाऊस, वारा आणि सळसळणारा हिरवाकंच निसर्ग...
वाह अकु, मस्त फोटोज परत
वाह अकु, मस्त फोटोज
परत जावंसं वाटतंय..
क्षितिजापर्यंत नजर न जाता ती
क्षितिजापर्यंत नजर न जाता ती या हिरव्या गालिच्यावरच खिळून राहात होती!
कृष्णवर्णी ढगांनी झाकोळलेल्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा हिरवा डोंगर
बेधुंद करणार्या वातावरणातही भानावर आणणारी पाटी
दोन डोंगरांच्या मधून धुक्याच्या पडद्यातून डोकावणारे जग
ही वाट दूर जाते...
Pages