वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14

वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

16.jpg

आभाळाच्या कुशीत वसलेल्या टुमदार झोपड्या

17.jpg

स्वागताला सज्ज मंडळी

18_0.jpg

धुकं डोंगरावरून खाली येताना

19.jpg

लाल पांढरे सुगंधी शिलेदार

15.jpg

टपोरे जास्वंद!

20.jpg

जलविहार करणारे वविकर

वाविकर....न म स्का र...न म स्का र ...

मॅगी , मनिशा , ल सी ...मस्त लिहिल आहेत.
वाह मस्त फोटोज स्मित परत जावंसं वाटतंय..उठून दिसणारा हिरवा डोंगर..जलविहार करणारे वविकर

कविन,चारोळी कोडी भारीच आहेत माझ्याविशयी ..चारोळी भेट्ली नाहि का ?
केदार साहेब थोड्क्यात मस्त लिहिले आहे..कालचा ववि छान झाला... मज्जा आली.
माझा दिवस सकाळी ४.३० ला सुरु झाला ५.१२ ची ट्रेन सी एस टी हुन मुलुड ला आलो होतो.
एक वेगळी मजा होति ...बसमधला दंगा

खुप आभार....विनय साहेब....

बोरिवली हून आम्ही तीघेच चढलो>>>>>>>>>>>>>>> बोरीवलीहुन मिनु किटुंब, थंड, आणि श्रुती एवढेच होते तु कुठे होतीस?...... कमाल आहे तु बस चालवत होतीस का? Uhoh Proud

बोरिवली हून आम्ही तीघेच चढलो>>>>>>>>>>> कैच्याकै... श्रुती, थंडू, रिया, 3 गोडबोले एवढी मंडळी होती की गं बोरीवलीतून.... झालं कस्काय

चनस, का नाही आलीस? बसमधे इतका गाणेदंगा केला की म्युझिक बडवायची सोय असलेली बस आयोजित करूनही बशीतल्या वविकरांनी स्वगायनाने(च) बस दुमदुमून टाकली. जेमतेम काही सेकंद वाजली असेल बशीतली म्युझिक सिस्टिम! Lol सॉलिड मजा मिस् केलीस. गाण्यांच्या पुरात पुणेकर डुंबले, बुचकळून निघाले व शेवटी तर अफाट कुडकुडले!! Biggrin

डिस्क्लेमरः वविमधल्या मजे बद्दलचा हा प्रतिसाद नाही. तेव्हा ज्यांना मजा वाचायची आहे त्यांनी इग्नोर करावे ही विनंती

वेळेचा आदर करा मग ती स्वतःची असो की इतरांची...या असल्या आताशा आउटडेटेड अनफॅशनेबल वाटणार्‍या स्कूलगृपची मी स्टुडंट आहे. श्रावण मी पाळत नाही कारण तो काही पाळीव प्राणी नाही असा एक कोट फिरतोय सध्या पण वेळ ही प्राणी पक्षी नसूनही मी पाळते आणि इतरांकडूनही तशीच अपेक्षा मात्र करते. अगदीच घड्याळबाबा बनून सेकंदसेकंद मिनीटामिनीटाची वेळ पाळावी समोरच्याने अशी वेडिबिद्री अपेक्षा नसते माझी पण तरी याबाबतीत एकंदरच माझा टॉलरन्स इतरांपेक्षा कमी आहे हे मला दर वविला प्रकर्षाने जाणवतं.

पुर्वी मला आश्चर्य वाटायचं कोण इतक्या कंझिस्टंटली तासभर वगैरे कसं लेट येऊ शकतं आणि ते ही त्याबद्दल एक अंशानेही गिल्टी न वाटता? पण प्रत्येकाचा टॉलरन्स वेगळा तसा प्रत्येकाचा गिल्टी वाटण्याचा कोटाही वेगळा असतो जसं कोणी एका पेग मधे हाय जातो कोणी खंबा रिचवून पण नॉर्मल रहातो तसं असाव कदाचित हे आता मीच माझं मला समजावते.

४.३० ला घर सोडावं लागणारे रामदास असोत किंवा त्याच दरम्यान १० वर्षाच्या लेकीला घेऊन विरार मधून वेळेवर आलेली थंड असो.... मला माझ्यासोबत या सगळ्यांच्या वेळेची कदर न करणार्‍या आणि त्याबद्दल थोडाही खेद न बाळगणार्‍या व्यक्तींबद्दल प्रचंड राग दाटून येतो. संयोजकांचा नाईलाज असतो. त्यांना डोक्यावर बर्फ ठेवून सगळ्यांना सोबत घेऊनच जाव लागतं. त्यामुळे याबाबत त्यांच्याकडे माझी कसलीच तक्रार नाहीये.

इतर ठिकाणी माबोबाहेरही मी माझ्यापुरतं अशा कोणत्याही लेट लतिफ नवाबजाद्यांसोबत वेळेच्या बाबतीत स्वतःला जोडून घेत नाही. पण अशा कॉमन सहलींमधे माझाही नाईलाज होतो. वविची मजा, मित्र मैत्रिणींसोबत घालवलेले आनंदी क्षण याचं पारडं निश्चीत जड असूनही मला दरवेळी "या" लेट च्या मनस्तापामुळे नकोच जाऊया वाटायला लागतं

दक्षे तू विचारलेलस तुझ्या बाफ वर वविला न येण्याची कारणं तर हे कारण पुढच्या वविकरता माझ्यानावापुढे लिहून ठेव.

लोकांना बदलण्यापेक्षा स्वतः बदला असं म्हणतात. मी माझा टॉलरन्स वाढवून स्वतःला बदलायचा पुर्ण प्रयत्न केला गेली काही वर्ष पण नाही जमलं. मे बी माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे या बाबतीत.

हा वविचा प्रतिसाद नसला तरी हा इथेच टाकावासा वाटला कारण हा वविमधे घडलेल्या घटनेचाच भाग आहे.

कोणाला हा प्रतिसाद हार्श वाटू शकतो. कोणाला अनाठायीही वाटू शकतो. कोणी म्हणेल यायचं नाहीये पुढच्यावेळी या कारणाने तर येऊ नका इथे कारण का देताय तर हे ही एक कारण असतं एखाद्याचं याची नोंद आहे ही बाकी काहीच नाही.

वैभ्या किती मस्करी करशील मनीशा उर्फ श्रेया फाटक ची>>>>>>>>>>> Uhoh ओके ती श्रुति म्हणजे मनीशा? ............... मनीशा नावामुळे माझा गोंधळ झाला, सॉरी

कविन, मजकुराशी सहमत.
इथे ही पोस्ट देण्यास काहीच हरकत नसावी. निदान पुढच्या वेळेस तरी लेट लतिफ सुधारतील अशी अपेक्षा. अन याच पोस्ट्मुळे जे वेळेत येतात, त्यांचेही कौतुक होतेच की. Happy

आपण बोवा वेळेत हजर होतो हं , सगळ्यात पयल्यांदा माजा नम्बर लागलेला पवनाहट्स पाशी, तिथले मालक चुकुन मलाच "संयोजक" वगैरे समजले होते..... (नंतर मी समजावले त्यांनी, मी "आम आदमी" आहे Wink )
माझ्या मागोमाग पाच मिनिटात योकु आला बहुतेक. (म्हणजे जो आला त्यांची आयडी योकु असावी) .
मग दहा मिनिटात मुंबैची बस आली.
त्यानंतर बर्‍याच उशीरा ( पोहोचण्याची जाहीर वेळ ९.२० अन पोहोचले १०.२५ तब्बल एक तास उशिरा) पुण्याची बस आली...... !
तर कविनने उपस्थित केलेल्या विषयावर स्वतंत्र धागा काढून खरेच चर्चा व्हायला हवी आहे.
वैयक्तिक तुम्ही वेळा पाळा वा न पाळा, कोण विचारणार नाही, पण सामुहिक कार्यक्रमात सहभागी होताना वेळ पाळली गेलीच पाहिजे या सार्वजनिक शिस्तीचा उदोउदो व्हायलाच हवाय.
पुण्याची बस उशिरा का आली याचे "जाहिर ऑडिट" व्हायलाच पायजेल... Proud

बायदिवे, कविन, तुम्ही पुण्याहुन आलेलात की मुंबैहुन?

बाकी लोकहो, वृत्तान्त येऊद्यात की... अजुन काहीच नीटसे कळले नाहीये...... सांस्कृतिक कार्यक्रमात काय काय झाले, यंदाची समिती किती "पिळत" होती, वह्गैरे वगैरे... Proud

IMG_20160802_141547.jpg

देखणे रूप

IMG_20160802_141009.jpg

मोहक गुलाब

IMG_20160802_140820.jpg

मंद सुगंधाचे वरदान

IMG_20160802_141711.jpg

पावसात निथळलेला परिसर

IMG_20160802_141811.jpg

रम्य दृश्य

IMG_20160802_141958_0.jpg

चिंब भिजलेली तृणपाती

IMG_20160802_142220_0.jpg

कोसळणाऱ्या पावसातला जलविहार

कवि +११११

पुढच्या वेळी दिलेल्या वेळेपेक्षा फार तर 10 मिन जास्त थांबेल बस असा नियम ठेऊया. त्यापेक्षा लेट येणाऱ्या लोकांचे रिसॉर्ट चे पैसे परत दिले जातील. बस चे मिळणार नाहीत.

अरे वविमधे कुणा माबोकराने माझा फोटु काढला आहे की नाही?
(मागे युकेज रिसॉर्टला बरेच सारे काढले होते माझे फोटो)

अरे वविमधे कुणा माबोकराने माझा फोटु काढला आहे की नाही?>>

लिम्बु, तू वविला असतोस का? पुर्वीपासून तुझी वविच्या वेळी वा गटग च्या वेळी दांडी असायची आणि मग परत वर आणि हात दोन हात वृतान्त देखिल यायचा! Wink

>>> लिम्बु, तू वविला असतोस का? <<<< Proud अरे किस्ना, काही "गुपिते" अशी उघड नयेत करु.... Wink
वविला माझे ड्युप्लिकेट्स जातात... Lol (यंदा कोण गेल होत, त्याचेच फोटो हवेत मला Wink )

मी संयोजक म्हणून नव्हे तर एक माबोकर म्हणून ही पोस्ट टाकते आहे.

कविताच्या संपुर्ण पोस्टशी सहमत. कवे ही पोस्ट इथे अनाठायी नाही. उलट वविला जितकी मजा केली तिथे काही सुधारणेला वाव असेल तर मजेला अजून चार चाँद लागतील.

नील शी सुद्धा संपुर्ण सहमत. काही नियम वविसंयोजकांनीच कडकपणे पाळणं हितावह ठरेल. बस चे वेळापत्रक ठरलेल्या वेळेनुसार पाळले गेलेच पाहिजे असा दंडक करायला हवा.
आणि वेळेत बस न पकडल्याने ववि हुकलेल्यांना ट्रान्स्पोर्ट कट करून उरलेले पैसे परत करावेत हे मत माझंही आहे. असं एकदा दोनदा घडलं की मग कुणी उशिरा येणार नाही.

लेट येणार्‍यांनी इतरांचा विचार केला पाहिजे. आपलेच लोक आहेत आपल्याला घेतल्याशिवाय जाणार नाहीत हे गृहितक आधी मनातून काढून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. बस मध्ये म्हातारे-कोतारे, डायबेटीसवाले, लहान पोरं असतात. येरवाळी निघाल्याने पोटात फारतर चहा बिस्किटे असतात. त्यांच्या भुका, औषधांच्या वेळा आपल्या उशिरा येण्याने अधिक बळावतात हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाय वविच्या कार्यक्रमात बदल होतात ते निराळेच. वेळेत न पोहोचल्याने नाश्ता उशिरा, डुंबणे उशिरा, जेवण उशिरा.. सगळंच उशिरा...

यावेळी तर मी पण रिसॉर्टला पोहोचेतो भुकेने हडाडले होते चांगलीच.

पुण्याची बस उशिरा का आली याचे "जाहिर ऑडिट" व्हायलाच पायजेल... फिदीफिदी
>> लिंबू आमची बस अगदी वेळापत्रकाप्रमाणे धावली. सिंहगडरोडला सई ने आणलेली पॅटिस खाऊन बॅनर बांधून, हिहीहूहू करून आरामात निघून सुद्धा बस ८.२० ला राजाराम ब्रिजहून सुटली होती. सर्व जण ठरलेल्या वेळेत स्टॉप ला हजर असल्याने मध्ये मध्ये उभं असणार्‍यांना पटापटा पिक करून आम्ही आईच्या पुतळ्याजवळ पोहोचलो होतो, पण त्या विश्वकर्मा फॅमिलीमुळे खूप उशिर झाला. ऐनवेळी त्यांचे मेंबर वाढले, मग बस ने येऊ का आमच्या कार ने येऊ, मग बसनेच जाऊ, कॉर्डिनेशन फोनाफोनी, त्यात मनालीचे घर अगदी समोर असल्याने ती आलेच म्हणत उतरून गेली... या सर्व घोळात बस निघायला उशिर झाला.
हे ऐनवेळचे मेंबर वेळेत हजर होते पण काही तत्कालिक कारणांमुळे उशिर झाला बस निघायला.

ओके दक्षे. [नो डाऊट, की नेमक्या कुणामुळे उशिर झाला याची इथे चर्चा व्हावी, बसमधिल प्रत्येकालाच ते माहित आहेच, पण कुणामुळेही, उशिर झाला, वा उशिर झाल्यामुळे काय काय नुकसान्/त्रास होतो यावर मात्र जरुर चर्चा व्हावी]

पुढील वेळेस सर्वानुमते उशिरा येण्याबाबतच्या नियमाची पुरेशी जाहिरातही करु Happy जेणेकरुन "चलता है" ही वृत्ती (असेलच तर) काडीचीही शिल्लक रहाणार नाही. शिवाय रिसॉर्टचे भाडे निव्वळ आहे तितके परत न देता, त्यातुन "दंडात्मक" पाचपन्नास/शंभर रुपये कापुन मगच उरलेली रक्कम देण्यात यावी अशी माझी उपसूचना राहील. कापलेली रक्कम अन्य उपक्रमात वळती करण्यात यावी.
आशा अशी आहे, की अशाप्रकारे रक्कम परत देण्याची वेळ "कधीच येऊ " नये. Happy

बाकी तुझे मुद्दे बरोबर आहेत. येरवाळी निघाल्यामुळे भुकेचा/शरिरधर्माचा प्रश्न, वेळेत न पोहोचल्याने होणारे आपलेच नुकसान, जसे की पुणेकरांना पवना हट्सचा अनुभव घेण्याचा मोलाचा एक तास वाया गेला ज्याकरता प्रत्येकानेच पैसे भरले आहेत. मोजक्या लोकांच्या उशिरामुळे बाकि तिसचाळीस लोकांचा एक तास वाया जाणे हे योग्य नव्हे. आपण एकुण जास्तितजास्त ८ तास तिथे वावरतो (९ ते ५) त्यातिलही एक तास कमि झाला, तर "तिथे भरलेला पैका वसुल कसा होणार?"
जोवर सर्व लोक एकत्र येत नाहीत, तोवर अन्य सुचना देणे, खोल्यांची व्यवस्था/ नाष्ट्याच्या संख्येची व्यवस्था वगैरे सर्वच बाबी विस्कळीत होऊन, त्याच त्याच गोष्टी अनेकांना अनेकवेळेस सांगत रहाव्या लागणे हे होते.
असो. पुढील वविच्या वेळेस बर्‍याच काही सुचना/सुधारणा करता येतिल, त्यातिलच कविनने मांडलेल्या विषयात सुधारणा होणे अपेक्षित असेल. Happy

फोटो सुंदरच.. खुप मजा केलेली दिसतेय. अजून सविस्तर वृतांत आला नाही.

पण कविन ने मांडलेले मुद्दे अगदी योग्य आहेत. या बाबतीत ज्यांना त्रास होतो, तो खुपच तीव्र असतो, याचा मला चांगलाच अनुभव आहे. आणि हे असे इतरांना गृहित धरणे फक्त जिथे संयोजक मवाळ ( अर्थात चांगल्या अर्थाने )
असतात तिथेच होते.

युरप मधले काही देश, वेळेच्या बाबतीत खुप कठोर आहेत. उदा. स्विस ! तिथे एका सहलीवर काही भारतीय, दिलेल्या वेळेवर बसमधे चढले नाहीत, म्हणून बस त्यांना सोडून आली. त्यापूर्वी तिथल्या तिथे एक रिपोर्ट करून त्यावर इतर प्रवाश्यांच्या साक्षीदार म्हणून सह्या देखील घेतल्या होत्या. या नियमाची कल्पना आधीच दिलेली असते आणि या साठी कुठलाही परतावा दिला जात नाही.

आमच्या बस मध्ये या वेळी ३ बर्‍यापैकी वयस्कर लोक होते. एक आजी अजोबा विश्वकर्मा फॅमिली सोबत आणि मनालीची आई.

<<बस मध्ये म्हातारे-कोतारे >> ???? कोण ते म्हातारे-कोतारे >>>>>>>>>>>> पुण्याच्या बस मधे असतील....... मुंबईच्या बस मधे सगळे महातारे असतात Proud

हो.. अगदी बरोबर आहे... तिकडे आईच्या पुतळ्याच्या विरुद्ध बाजुला माझा पण पुतळा झाला होता... ८.२० ला राजाराम पुलावरुन निघालेली बस, जी जास्तीत जास्त ५-७ मिनिटात पोहोचायला हवी.. ती ८.५० ला पोहोचली... मी आपली नविन.. पहिलाच ववी....परत कोणीच माझ्यासारखं माबोकर वाटणारं दिसेना...मी मुग्धमानसीला फोन करु करु पिडत होते... असो...

ववी मस्तच झाला.. मी आणि लेकीने भरपूर मज्जा केली... '२ फुट' पाण्यात बुडण्याचा प्रसंग तर कायम यादगार राहील! Proud (त्यात माझ्या फोनची आहुती गेलीये...जास्त कोणी पाहीलं नाही...नाहीतर लाजच काढली गेली आसती...तशी मुग्धमानसीने काढलीच.:P )

सगळ्या ज्युनियर बाळांनी तिथल्या सशांना महिनाभराचं गवत चारलंय... अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला भरवणं सुरु होतं!

सांस्कृतिक कार्यक्रमाची खुप उत्सुकता होती.. पण तो होवू नाही शकला...

बसमधला धिंगाणा तर विचारायलाच नको.... सुरु केलेली गाडीमधली सिस्टिम गायक मंडळीनी चक्क बंद करायला लावली... अकु, मानसी आणि मी पुढच्यांची गाणी अपुर्ण गाणी पुर्ण करत होतो.. आणि आमची गाणी ते (पुढचे गायक) ऐकतच नव्हते.. निषेध....त्यामुळे आम्ही आमची वेगळी मैफिल जमवली....
एकूण छान अनुभव... कुडोज टू संयोजक टीम.. !!!

Pages