वर्षाविहार २०१६-वृत्तांत आणि प्रतिक्रिया

Submitted by ववि_संयोजक on 31 July, 2016 - 12:14

वविकर्स,
इथे वविविषयक आपले वृत्तांत आणि प्रतिक्रिया टाकाव्यात.पहिल्यांदा वविला आलेल्यांनी तर जरूर आपले अभिप्राय दयावेत.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. नेमेप्रमाणे उत्साहाने फसफसणारे वृ. आले. फोटो पण आले. Happy

संयोजकांचे कौतुक इतकी छान जागा निवडली आणि इतके देखणे आणि नेटके संयोजन.

पावसाने विशेष हजेरी लावून ववि चे नाव गाजवले.

बरे, आडून आडून उशीरा येणार्या ज्या आयडी चा उल्लेख करताय तो माझा बरे का! नाही, बाकीच्यांच्या सोयी साठी सांगितलेले बरे, नाही का?

कविन, तुझ्याकडे किंवा संयोजकांकडे रेकॉर्ड असेल ना मी कोणकोणत्या ववि ला उशीरा आले, मला जाणून घ्याय्ला आवडेल. Happy

हा माझा ५ वा ववि होता. २०१० चा युकेज चा पहिला ववि होता आणि मी मान्य करते तेव्हा मी, मोदक आणि नन्या लेट आलो होतो कारण मी माबोवर नवीन होते आणि ववि चा उत्साह इतका दांडगा असतो याची कल्पना नव्हती. त्यासाठी तेव्हाच दिलगिरी व्यक्त केली होती.

पुढील ववि (२०११) बहुदा कर्जत च्या फार्मव्हिले चा होता आणि आम्ही स्वतःच्या कारने आलो होतो. तेव्हा माझ्यामुळे वविची बस उशीरा सुटली असे म्हणण्यास वाव नसावा.

पुढच्या एका वविला त्या जागोजागी चारोळी लिहिलेल्या रीसॉर्ट मध्ये गेलेलो. मग परत एकदा युकेज ला गेलेलो.ह्या दोन्ही वेळेस मी एकटीच आले होते.

पहिले तीन ववि मी सलग आले होते आणि तिसरा ववि माबो वविचे १० वे वर्ष होते. अजय गल्लेवार आले होते हे आठवते.

यापैकी कुठल्यातरी एका वविच्या वेळेला मी बस मध्ये वेळेत हजर होते. बॅनर लावणे चालले होते. सर्वांनी टपरीचा चहा प्यायल्याचे ही स्मरते. तेव्हा त्या ही ववि मध्ये माझ्यामुळे बस लेट झाली नव्हती. उरलेल्या वेळच्या वविचे आठवत नाही. रेकॉर्ड शेअर करणे प्लीज. म्हणजे त्याही वेळेकची माफी पुन्हा नव्याने मागण्यात यीएल.

जेव्हा एकटी आलेय तेव्हा वेळेवर आल्याचेच मल स्मरते.
फ्एमिली सोबत येताना काही अडकचणी येउ शकतात्.

यँदा माज़े साठीचे आई बाबा बरोबर होते. ओला कॅब ने आलो. सर्व वेळेवर तयार होतो पण ओला वाल्याने घात केला.
गेली २ वर्षे मी वविला आलेच नव्हते. तर मग माझ्या उशीरा येण्याची कन्सिस्टंसी कशी ट्रॅक केलीस हे ही जाणून घ्यायला आवडेल.
कोण इतक्या कंझिस्टंटली तासभर वगैरे कसं लेट येऊ शकतं आणि ते ही त्याबद्दल एक अंशानेही गिल्टी न वाटता? >>
‘गिल्टी न वाटता’ हे कसे ठरवले? काय करायचे म्हणजे गिल्टी वाटतेय असे दाखवायचे असते? उदा. बसमधल्या दंग्यात सहभागी व्हायचे नाही? किंवा पनिशमेंट म्हणून पैसे भरायचे? किंवा अजून काही? पुढच्या वेळी तो गिल्ट दिसू देण्याचे लक्षात ठेवेन.
वविच्या दरम्यान सांस कार्यक्रमाच्या वेळी सांगितले असतेस तर जाहीर माफी मागितली असती Happy

उशीरा येणार्‍या माबोकरांमुळे वविकरांचा विरस असा शेपरेट धागा काढायचास ना! इथे उगीच वृ. च्या अध्ये मध्ये ही चर्चा! Sad

बर आधी सविस्तर वृत्तांत.
बसमार्ग बघितल्यावरच लक्षात आलं होतं की, मला बसमधे चढण्यासाठी बरेच पर्याय आहेत. कारण बस दोनदा चांदणी चौकातन जाणार होती. मग अर्थात मी उशीराच पर्याय स्विकारला. (पुढे माझा तासभर पुतळा होणार आहे हे माहित असत तर आधी चढले असते Uhoh )

८.२० आईचा पुतळा ची वेळ होती तिथुन चांदणी चौकात यायला ५ ते १० मिनिटे लागू शकतात या अंदाजानी मी वेळेच्या आधी म्हणजे ८.१० ला चांदणी चौकात पोचले होते. पोचेतो हिम्याने मी निघाले का नाही हे फोन करुन कन्फर्म करुन घेतल होतं. चला बस वेळेत येते आहे अस म्हणून मी प्रत्येक येणा-या बसकडे आशेनी बघत उभी होती. तेवढ्या तासाभरात चार ट्रॅकस वाले , टमटमवाले, ३ कुठले कुठले ट्रॅव्हल वाले येऊन मला बावधन?, वाकड? नॉन्स्टोप मुंबई अशा ऑफर देऊन गेले. मी एकदा भिजून वाळले तरी बसचा पत्ता नाही :\ तर आईच्या पुतळ्यापासून निघालेल्या बसला माझ्या पुतळ्यापर्यंत यायला तब्बल तास Angry लागला. आणि त्यासाठी हिम्या मया आणि मल्ल्यानी भरपुर शिव्या खाल्ल्या.
आपण एखाद्या ग्रुप सोबत जात असताना किमान वेळेच्या जवळपासची वेळ पाळण्याच सौजन्य तरी दाखवायला हव अस मला वाटत

तर बस मधे चढल्यावर जल्लोष काय सांगायला नको. एकापेक्षा एक जोशात होते. मजा येतेच तशी आलीच .
ते इथे सविस्तर सांगण्यात अर्थ नाही Lol अनुभवायची गोष्ट आहे ती Proud

दरवर्षी आपण (संयोजक) बसमधे खायला म्हणून काहीतरी घेत असतो, यंदा घेतलं नव्हत का? तिथे पोचून नाश्ता मिळायला १०.३० झाले होते.

तर असो..

पवना ह्टस हा नितांत रमणीय रिसोर्ट बुक केल्याबद्दल संयोजकांच मनापासून अभिनंदन आणि आभार. लोकेशन च्या प्रचंड प्रेमात. छोटासा टुमदार रिसोर्ट आहे. रिसोर्ट चे मालक पण मुरलेले मायबोलीकर असावेत असा संशय त्यांच्या एकंदर भाषणावरुन आला. (आयपी अ‍ॅड्रेस चेक करायला हवा काय ) Wink सोयीपण चांगल्या आहेत. दिलेली डोर्मेट्री ब-यापैकी ऐसपैस होती. त्यानी थोडक्यात रिसोर्टची ओळख करुन दिली. मग दोन वाजता तुमच्या जेवणाची वेळ होईल हे सांगितल. तोवर पाण्यात डूंबणे, चिखलात लोळणे, कयाकिंग अशा विविध गोष्टी करुन जनता कुडकुडायला लागली होती. संततधार पाऊस आणि जोडीला वारा त्यामुळे थंडी आणि भुकेनी कुडकुड वाढत जात होती. त्यांनी जेवणाची वेळ दोन सांगून सुद्धा सगळी जनता सव्वा वाजल्यापासून जेवणासाठी आत बाहेर करायला लागली. मग मालकांनी शेवटी लहान मुलांना जागा होईल तस तस जेवायला बसवायला सुरवात केली. त्यांच्याकडे जागा कमी आहे जेवायला आणि लोक जास्ती झाले त्या दिवशी त्यामुळे थोडा गोंधळ झाला. पण जेवणाच्या चविनी बहार आणली. गरम गरम भाक-या आणत होते. जेवण आणि लोकेशन साठी पुन्हा संयोजकांना फुल्ल मार्क्स.

लाईट नसल्यामुळे सांस चे सगळे कार्यक्रम घेता आले नाहित. पण जे खेळ झाले त्यात पब्लिक नी एजॉय केलेल दिसत होत.

चहा जरा अजून आणि चांगला असता तर चालला असता. यावेळी चहाबरोबरची भजी पण मिसिंग होती.

मग फोटोसेशन. मग परत निघालो. पाऊसराव फॉर्मात होते.

.

यावेळेचा ववी मस्तच झाला. माबोकर्सही उदंड संख्येने आल्यानी आणि त्यांच्या अ‍ॅक्टीव्ह पार्टीसिपेशन मुळेच हे सगळं शक्य झालंय.
तर सुरवातीपासून सगळं सांगतो, वविसंयोजनाचं कामही येइलच यात...
वविधाग्याची घोषणा झाली आणि मेंम्ब्र जमली. पुण्यातून आणि मुंबईतून संयोजक टीम तयार झाली आणि व्हॉअ‍ॅ गृप बनवला गेला. त्यानंतर उपसमित्या तयार केल्या गेल्या ववि/टीशर्ट्/सांस इ.

पायलट ची तारीख, वार ठरलं आणि एका रवीवारी मुंपु संयोजक टीम रिसॉर्ट्स पाहायला निघालो; त्याआधी अर्थातच कुठले रिसॉर्ट्स पाहायचे ते शॉर्ट्लिस्ट करून ठेवले होतेच.

पवना हट्स एका पाहाण्यातच आवडलं आणि शॉर्ट्लिस्ट केलेल्यातले बाकी रिसॉर्ट पाहीलेही नाही यावेळेला.

नंतर मग टीशर्ट समिती, सांस आणि ववी समिती यांची कामं सुरू झाली.

टीशर्ट वाल्यांनी पायलट्ला फायनल केलेलं डिझाईन, रंग वापरून कामाला सुरूवात केली.
धागा उघडल्या गेला. अ‍ॅड्स बनवून त्या फिरवल्या गेल्या इ...

ववी समीतीनी तोवर ववि २०१६ धागा काढला. त्यानुसार वेमा/अ‍ॅड्मीन यांची मदत घेऊन साईटवर अ‍ॅडस दिसतील या मापानी अ‍ॅड्स करून त्यांना दिल्या. धाग्यांवरही अ‍ॅड्स फिरवल्या.

सांस वाल्यांनी कुठले खेळ घ्यायचे, ओळखपरेड वगैरे सगळं प्लॅन केलं. त्यानुसार लागणारी खरेदीही झाली.

टीशर्ट वाटपाला ववी वर्गणी जमा झाली आणि बसेस बुक केल्या गेल्या. बस चा रूट ठरवून त्याचाही वेगळा बाफ काढला.

मग ठरल्या दिवशी... म्हणजेच ववीवारी;
मी सकाळी साडेनऊदरम्यान पवना हटस ला पोहोचलो. माझ्याआधी लिंबूदा आणि त्याची मुलगी ऑलरेडी होतेच. प्रसाद (पवना हटस) नी त्यांनाच डोर्मेटरीच्या किल्ल्या आणि माबोकर्स चा गट ओळखू यायला हवा म्हणून प्रत्येकाकरता रिस्ट्बँड्स देऊन ठेवलेले होते. लिंबूदा अगदी मन लावून ते एकएक सुट्टे करत बसले होते Happy
त्यानंतर आम्ही आपापल्या ब्यागा डॉर्मेटरीत ठेवून बस करता समोर जाऊन थांबलो. या सगळ्याच्या आधी, प्रसादला आगावू कळवले होतेच, सो त्यानी अगदी ताजा, गरम नाश्ता; चहा तयार ठेवला होता.

मुंबईची बस आधी पोहोचली. ते लोक्स डॉर्मेटरी त रिफ्रेश होईतो पुण्याचीही बस पोहोचली. मग सगळ्यांनी कपडे बदलून नाश्त्याकडे मोर्चा वळवला. गरम गरम उपमा, पोहे आणि चहा यांनी त्या गारठ्यात मजा आणली.
संपूर्ण रिसॉर्ट्वर जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाई होती. हिरव्याच्या अगणीत छटा होत्या. मस्त पाऊसही होताच.

नाश्ता झाल्यावर मंडळीना प्रसादनी रिसॉर्ट ची संपूर्ण माहीती दिली. जरा लांबलच म्हणा ते कारण लोक्स पाण्यात उड्या घ्यायला उतावीळ होते Wink

नंतर तर काय, रिसॉर्ट्वरच्या फ्रेश वॉटर पाँड मध्ये एक एक करत मंडळी उतरली आणि धमाल करायला सुरूवात केली. वॉटर पोलो, कयाकिंग वगैरे काही लोक्स खेळत होते. काही कठड्यावर बसून पाण्यात पाय सोडून मजा पाहात होते. बच्चेकंपनी तिथे असलेया बर्माब्रिजवगेरे गोष्टींवर हात जमवत होती. काही बच्चेलोक्स सश्यांना खाऊ घालत होते (सश्यांनी तर त्यादिवशी पूर्ण वर्षभराचं एकदमच खाल्लं असेल!), काही तिथल्या बदकांशी बोलू पाहात होते. काहींना तिथल्या कोंबड्या पाहून लगेच भुकाही लागल्या! Light 1

त्यानंतर मग मडबाथ/ चिखलफेक खेळायला गेलो. मस्त मऊ शेतातल्या मातीचा मुद्दामहून केलेला चिखल होता. चांगला गुडघाभर होता! त्यातही नाच, खेळ झालेच. अक्षरशः लोळलो/ लोळवल्या गेलो...
ती सगळी मजा इथे शब्दात मांडणं जरा कठीणच आहे. प्रत्यक्ष अनुभवायलाच हवं हे सगळं.

त्यानंतर मग आंघोळ करून कोरडे कपडे घालणं वगैरे कार्यक्रम आटपेस्तोवर दीड चा सुमार झाला आणि पोटात कावळे ओरडायला लागले. प्रसादनी जशी जशी जागा होईल तसे तसे लोक्स जेवायला सोडायला सुरूवात केली.
यामुळे थोडा खोळंबा होत होता पण, त्यांना साथ दिल्यामुळे सगळ्या पब्लिकला गरम गरम भाकरी आणि पोळी मिळाली.
जेवणाचा बेत साधाच पण अतिशय रुचकर होता. पिठलं, लाल चटणी, भाकरी, कांदा; पोळी, फ्लॉवरची भाजी, काबुली चण्याची उसळ; पांढरा भात आणि फोडणीची डाळ; गोडात शिरा होता. असं भरगच्च जेवणं जेवलं आणि सुस्ती यायच्या आतच सांस वाल्यांचे फर्मान आले - मोठ्या गझिबोमध्ये जमा.

तोवर, मुंबईच्या बस मधली (मुंबईहून आणलेली) साऊंड सिस्टीम काढून गझिबोत नेली कारण यावेळेला रिसॉर्ट्वर ही सोय नव्हती.

सांसचे खेळ सुरू झाल्यावर मात्र मी पर्सनल कामं असल्यानी नाईलाजास्तव निघालो.

तर दोन गोष्टी यावेळेला झाल्यात त्या नमूद कराव्याश्या वाटतात.
पहीली - आवर्जून फर्स्टेड किट नेणे. गरज शक्यतो पडत नाही पण; ऐनवेळेला रिसॉर्ट्वर नसेल तर आपली आपल्याकडे हवी म्हणून.
दुसरी - एका माबोकराची तब्येत अचानक बिघडली आणि घरी परत जायला लागलं. वेळेला एका माबोकराची गाडी उपलब्ध होती त्यामुळे काम झालं.
याबद्दल आभार!

संयोजनाच्या कामामुळे टीमवर्कचा अनुभव जमा होतो. नवीन गोष्टी कळतात. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर गुळाची भेली ठेऊन बाकी लोकांची मोट बांधायची कसरत कशी करायची याचं शिक्षण मिळतं Wink नवीन माबोकरांनी जरूर हे काम करून पाहावं, मस्त अनुभव असतो.

सर्व संयोजकांच्या मेहेनतीमुळेच हा इव्हेंट होऊ शकला आणि पुढल्या वेळीही होईलच! तर मंडळी भेटू पुन्हा Happy

सगळे वृत्तांत वाचुन खुप मजा आली...पुढच्या वेळी नक्की प्लॅन करणार ववी ला यायचा...
अजुन मस्त मस्त वृतांत येउदेत....

योकु, आढावा चांगला घेतलास!
यावेळी मुंबईसारखीच पुण्याहूनही विकरांची संख्या लक्षणीय होती. खूप नवे लोक होते व याचे श्रेय दक्षिणाच्या धाग्याला व तेथून येणाऱ्या विचारणांचा व्यवस्थित पाठपुरावा करण्याला जाते. मुंबईकरांचा उत्साह नेहमीच ओसंडून वाहात असतो पण नेमस्त पुणेकरही यंदा वविच्या वातावरणात पुरते झपाटून गेले होते.
नावनोंदणी करणाऱ्यांचे ईमर्जन्सी फोन नं घेऊन ठेवणे, प्रथमोपचाराचे किट बाळगणे, गाडीत कचरा होऊ नये महणून कचऱ्यासाठी वेगळ्या बिन बॅग्ज ठेवणे वगैरे गोष्टींमधून संयोजक टीमला प्रत्येक वविकराबद्दल वाटणारी आस्था व ववि यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने घेतलेले पुरेपूर प्रयत्न हेच दिसून येतात.

क्षण आठवांचे - ववि २०१०
निंबुडा | 22 July, 2010 - 09:59
कधी एकदाचा १८ जुलै चा रविवार उजाडतोय असं मला, मोदकला आणि नन्या१० ला झालं होतं. आम्हा तिघांकरताही हा पहिला वहिला ववि असल्याने खूपच उत्सुकता होता.

रविवारसाठी पहाटेचा ४ चा गजर लावून मनातल्या मनात वविची स्वप्ने रंगवत झोपलो. (माझे आई-बाबा त्यांचा दोघांचा सेपरेट 'ववि' करण्यासाठी शनिवारीच तळेगावला गेले होते. त्यामुळे नन्या शनिवारी रात्री माझ्या घरीच आली झोपायला. दुसर्‍या दिवशी तिघानांही एकत्र निघायला बरे पडणार होते, हे ही एक कारण होतेच!). नेहेमीप्रमाणे ४ वाजता वाजलेला गजर शिस्तीत बंद करून पुन्हा पावणे पाचचा गजर लावून पुन्हा निद्राधीन झालो. डोळा मारा कविने शुक्रवार पासूनच फोन करकरून स. ५-४० पर्यंतची ट्रेन कल्याणहून पकडण्याची आणि ६-३० पर्यंत मुलुंड स्टेशनवर पोचण्याची तंबी दिली होती. पण आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक न घालणारे. फिदीफिदी त्यामुळे तब्येतीत आवरून कसेबसे ६-१५ पर्यंत तयार झालो. तर नन्याने ती ट्रेनचा फर्स्ट क्लास चा पास घरीच विसरल्याचे जाहीर केले. माबोवर वेंधळेपणाचे अकाउंट उघडण्यासाठी म्हणून मुद्दामहून तिने हे केले असावे अशी शंका मला आली. सकाळी-संध्याकाळी २ ही वेळेला सेकंड क्लास ने जायचे-यायचे मला जीवावर आले. शिवाय तिकिटासाठी रांग वै. असलीच तर अजून उशीर होईल म्हणून मी तिला तिच्या वेंधळेपणाची शिक्षा म्हणून घरी पिटाळले.

vaibhavayare12345 | 24 July, 2012 - 15:49
नमस्कार मंडळी, मी पहिल्यांदाच वविचा वृतांत लिहायचा प्रयत्न करत आहे सांभाळुन घ्या

ठिक सकाळी ५ वाजता माझा बोंबल्या (म्हणजे माझी तिसरी बायको) बोंबलायला लागला, त्याचा गळा आवळला आणि ऊठलो पहिली बायको अपेक्षे प्रमाणे लवकर उठुन माझ्या तयारीची तयारी रागारागाने करत होती याचं कारण असं की मी दुसर्‍या आणि तिसर्‍या बायकोला घेऊन जाणार होतो म्हणुन हा राग. (पण लटका)
सकाळी ५.४५ वाजता सगळी तयारी करुन पहिलीचा निरोप आणि तीसरी ला बरोबर घेऊन निघालो, ते एक बरं की मी दुसर्‍या बायकोला शनिवारीच ठाण्यात ठेवुन आलो होतो, सकाळी सकाळी गोंधळ नको म्हणुन.... तर अशी झाली वविची पहाट.

सुची:
पहिली : आमच्या सौ.
दुसरी : ढोलकी
तिसरी: माझा बोंबल्या (म्हणजे मोबाईल)

तर काय म्हणत होती मी?.... हा सकाळी ५.४५ ला निघालो, ऑटो मधुन विन्याला फोन केला तेव्हा कळलं की बोरीवली वरुन ६.०० वाजता निघुन ६.२० वाजाता मला जोगेश्वरीला उचलणारी वविची बस तिच्या नियोजित वेळेत धावत होती हे ऐकुन अंगात आणखी चैतन्य सळसळलं आणि त्या भरात एक चैतन्य कांडी शिलगावली.

बस ठिक ६.२५ ला हजर झाली. पहिली नजर भिडली ती विनय भिडेशी आणि बस मध्ये चढताच नजर भिड्ली ती उल्हास भिडेंशी, दोन पावलं पुढे जातो तोच सौ. मधुरा भिडे, उजवी कडे मान वळवतो तर लहान भिडे अश्या भिड्यांच्या शिडया पार करत करत बसच्या मध्यावर पोहोचलो तर साक्षात देव समोर बसलेले म्हणजे प्रमोद देव काका. त्यांनी माझ्या दुसर्या बायको बद्दल आस्थेने विचारपुस केली तेव्हा ती मुलंडहुन येणार असल्याचे त्यांना सांगताच त्यांनी समाधान व्यक्त केले.

एव्हाना बस पवई पार करुन मुलुंड च्या दिशेने धावत होती. मध्येच एक अडथळा आला तो म्हणजे राखीचा, तिच्या पिक अप साठी बस थांबवावी लागली. अशी मजल दरमजल करीत ७.१५ वाजता बस मुलुंडला पोहोचली.

मुलुंड्ला सगळे माबोकर अगदी वेळेत हजर होते आणि सालाबाद प्रमाणे याही वर्षी निंबुडाची गाडी नियोजित वेळेपेक्षा ४५ मिनिटे उशीराने धावत होती. ती आल्यावर तिला या झाल्या प्रकाराचा खुलासा विचारल्यावर तिने उत्तर दिले " आम्ही आमच्या मोडक या आडनावाचा आदर करुन प्रत्येक गोष्ट मोडतो आणि यात वेळ आणि नियम ही आलेच " कशी बशी तीला बशीत कोंबुन

२०१६ बद्दल बोलायला हवय का वेगळं? मला वाटतं गरज नाही

यात वर जे प्रतिसादात वापरले गेलेले शब्द बघता याला गिल्टी वाटणं म्हणत असल्यास मला शिकवण्यात आलेला गिल्टी वाटण्याचा प्रकार आणि यात फरक आहे. माझी शाळा जुनाट आहे बहुतेक सो तो दोष माझ्या शाळेच्या सिल्याबसचा आहे म्हणायला हवा

निंबुडा | 25 July, 2011 - 15:32
एका स्नेह्यांनी केलेल्या सूचनेवर अक्कल गहाण ठेवून विश्वास ठेवून आम्ही निवडलेला रीसॉर्टचा रूट (कल्याणहून शीळफाटा मार्गे पनवेल मग चौक फाटा आनि मग वडव,कशेळा, सुगावा, वारे इ. अगम्य नावांच्या गावांमधून वाकडा-तिकडा, चिंचोळ्या मार्गाने केलेला प्रवास राग ), अखेर कुठल्यातरी भलत्याच रीसॉर्ट ला आपण पोचणार बहुतेक अशा भितीने ग्रासलेले मी आणि मोदक, १२ वाजता रीसॉर्ट मध्ये पोचल्यावर

>>हे २०११ च्या बाबतीतलं. तेव्हाही लेटच होता पण त्याच्याशी बसमधल्यांना काही बुर्दंड बसत नसल्याने तो नजरेआड करता येईल. फक्त कंझिस्टंटली का म्हंटलं त्याकरता आहे ते. ५ पैकी ४ वेळा लेट झालं तर त्याला आमच्या ओल्ड स्कूल शिकवणीप्रमाणे कंझिस्टंटली असच म्हंटलं जातं. अगेन, माझ्या जुनाट स्कूलच्या आउटडेटेड सिलॅबसचा तो दोष आहे.

तू चूक नाहीस, चूक माझी आउटडेटेड होत चाल्लेली अपेक्षा आहे. तसही तू बदलावस अशी अपेक्षा नाहीच आहे. अजून कोणी लेट येत असेल तर याव. चालणार्‍यांना चालतय. नाही चालत ते माझ्यासारखे ऑड मॅन आउट होतील. काय फरक पडतो. काही नाही. वेळ पाळणं हे माझं तत्व आहे आणि ते फक्त आणि फक्त माझ्यापुरतं आहे. दुसर्‍या कोणालाही ते बंधनकारक नाही. जे खटकलं ते बोलून टाकलं इतकच. जसं कौतुक करतो आवडेल्या गोष्टींच तसच हे. बाकी मला जे झेपत नाही तिथे मी न जाण्याचा पर्याय तर नक्कीच घेऊ शकते की.

पोपकॉर्न घेऊन आलेले काही असतील त्यांना विनंती की त्यांनी पॉपकॉर्न संपवावेत. कारण याउप्पर इथे याबद्दल मी काही लिहीणार नाही आहे. पुरावे मागीतले ते दिले. हरितात्या मोड ऑफ केलाय. विषय समाप्त. पिक्चर खतम.

आनि मग वडव,कशेळा, सुगावा, वारे इ. अगम्य नावांच्या गावांमधून वाकडा-तिकडा, चिंचोळ्या मार्गाने केलेला प्रवास राग ),

ती गावं म्हणजे वडव नाही कडाव (गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध), कशेळे (इथुन पेठच्या किल्ल्यासाठी जायला फाटा फुटतो, बाजुलाच लालवाडी म्हणुन वेताच्या वस्तु बनविण्याचे प्रसिद्ध ठिकाण), सुगवे (माजी रायगड उपजिल्हाधिकार्‍यांचे गाव), वारे, कळंब, पोशीर वगैरे असणार.

मस्त झालेल दिसतोय ववि. तसा तो नेहमी छान च होतो म्हणा. मी खुप मिस केले ह्या वविला.

उशिरा येण्याबद्दल कविन +१,
वर कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, बस फक्त १० मि. थांबवावी.

मस्त वृत्तांत आहेत सगळ्यांचे. नेहमीप्रमाणेच मजा केलेली दिसते.

कविनचा मुद्दा पटला. कविन + १

होऊ द्या हो उशीर इतके काय मनाला लावून घ्यायचे ते! अगदी पुरावे द्या वैगेरे!

वर्षातून एकदा ववि त्यात एवढे नियमांच्या दावणीला नका बांधू... १० मिनिटात आला नाही तर गाडी निघून जाईल वैगेरे... शेवटी इतरांच्या उशिराचा देखिल आनंद लुटायचा... हां अगदी एवढा उशीर करणारा नको की वविचे २-४ तास त्या व्यक्तीची वाट पहाण्यातच जावेत!!!.. पण आनंदाला असे हेव्यादाव्यांचे गालबोट नको असे वाटते..

पुढच्यावेळी २ बशी करा. एक वेळेवर जाणार्‍यांची अन एक आरामात येणार्‍यांसाठी. हाकानाका.

उशीरा येणार्‍यांना कशाला उगाच वेळेचं बंधन घालताय ? येतील बिचारे कौटुंबिक कामं उरकत संध्याकाळ पर्यंत.

उशीरा येणार्‍यांना कशाला उगाच वेळेचं बंधन घालताय ? येतील बिचारे कौटुंबिक कामं उरकत संध्याकाळ पर्यंत>>> ये रहा मामी का सिक्सर..........

होऊ द्या हो उशीर इतके काय मनाला लावून घ्यायचे ते!>> कृ, मुंबई बसला दुरून दुरून आलेले मायबोलीकर असतात. म्हणजे व्हिटी गिरगावपासून वसई विरार ते अंबरनाथ बदलापूर इतकी रेंज असते. तुम्ही यंदाच्याच वृत्तांतात वाचलं असेल एक मायबोलीकर वविसाठी पहाटे ४:३० ला घरून निघालेले होते. शिवाय बसमधे सगळ्यात पहिला चढणारा मायबोलीकर हा सगळ्यात शेवटी उतरतो. म्हणजे त्याचा पहाटे ५ वाजता सुरू झालेला वविप्रवास रात्री ११-१२ वाजता कधीतरी संपतो. बसला उशीर झाला की वविस्थळी उशीरा पोचणार, म्हणजे आनंदाचा वेळ कमी होणार. खूपच गंभीर कारण (उदा. अतिवृष्टीने गाड्या बंद) असेल तर सगळेच मुंबईकर समजून घेतात/ घेतील. पण 'आपल्यामुळे कोणाला उशीर व्हायला नको' असा दृष्टीकोन असणार्‍यांना दुसर्‍यांमुळे उशीर झाला तर त्यांनी कधीच बोलायचं नाही का?

उशिरा येण्याबद्दलच्या कविनच्या पोस्टला +१

मामी अगदी अगदी Lol

@ कृष्णा.. तुम्ही पुढच्या वर्षी संयोजनात भाग घ्या आणि ह्या उशिरा येणार्‍याना (त्यांच्याच खर्चाने) वेगळ्या बसमधून घेऊन या बरे.. म्हणजे त्यांच्या, तु॑मच्या तसेच वेळेवर हजर रहाणार्‍यांच्या सगळ्यांच्याच मनासारखे होईल. विषय संपला.

पण 'आपल्यामुळे कोणाला उशीर व्हायला नको' असा दृष्टीकोन असणार्‍यांना दुसर्‍यांमुळे उशीर झाला तर त्यांनी कधीच बोलायचं नाही का?>>>

मंजूडी, बोला हो! अगदी बोला! परन्तु ह्यात स्वयंशिस्त मह्त्वाची.. अश्या गोष्टींचा राग येणही स्वाभाविक! पण अगदी बोललो आपण आणि दाखवून दिले एकदा कि पुरे असे मला वाटते.. मग त्यावर चर्चासत्र दोन्ही बाजूंचे पुरावे.. मग अर्ग्युमेण्टस... इतक्या जणांनी एकत्र जमून सुंदर रित्या पार पाडलेल्या कार्यक्रमात कुरबुर असे पर्यन्त ठीक हो... हमरी तुमरी व्हायला नको ही अपेक्षा!

मला तर ह्या संयोजन समितीचा खरोखरी प्रचंड आदर वाटतो! साध्या फुटकळ विषयाच्या एखाद्या धाग्यावर अगदी मी माघार घेतली तर माझी समस्त विश्वात नाचक्की होई ह्या विचाराने लढणारे अनेक लढवय्ये एकत्रीतरित्या ह्या ववित अगदी गुण्यागोविंदाने मजा लुटतात... धाग्यावरील सर्व हेवेदावे विसरून जातात... आणि त्या सकलांना संयोजक मंडळी अगदी सांभाळून घेतात!!!

त्यांचे धैर्य... सहनशिलता... चिकाटी... आणि समजूतदार पणा ह्याला मनापासून सलाम!!!

@ कृष्णा.. तुम्ही पुढच्या वर्षी संयोजनात भाग घ्या आणि ह्या उशिरा येणार्‍याना (त्यांच्याच खर्चाने) वेगळ्या बसमधून घेऊन या बरे.>>>>

आयला म्हणजे मलाच शिक्षा का?? Wink

मी संयोजकांना त्याचे श्रेय आधीच दिलय!

आजवर मी जेवढे २-३ केले प्रत्येक वेळी वेळेत होतो किमयाला! एकदा तर फक्त भेटण्यासाठी वविकरांना बसच्या वेळे आधी किमयेला पोहोचलेलो!..

बाकी वर लिहलेच आहे! Happy

मी दोन वविना गेले होते त्यात कुणी खुप जास्त उशिरा आल्याचे आठवत नाही.

सर्वांनी इतरांच्या वेळेचा आदर करावा हे पटते. या 'इतरां'मध्ये लहान मुले आणि व्रुद्ध मंडळी असतात. त्यांना ताटकळत रहावे लागणे योग्य नाही.

आजवर मी जेवढे २-३ केले प्रत्येक वेळी वेळेत होतो किमयाला! >>>> वा.. पुणेकरांना कसा कळणार हो मुंबईकरांना लेट लतिफांचा होणारा त्रास Proud

पुणेकरांना कसा कळणार हो मुंबईकरांना लेट लतिफांचा होणारा त्रास>>>.

अच्छा म्हणजे पुणेकर कसे शिस्तीचे पक्के तर! Proud

काही लोक उशीरा आल्यामुळे वेळ पाळणार्या लोकांना त्रास होतो हे मान्य.
काही लोकांना काही न टाळता येणार्या कारणांमुळे उशीर होउ शकतो हेही मान्य.
पण ही सगळी चर्चा दुसरीकडे होउ शकतेच की....
त्यामुळे मला मनापासुन वाटतेय की आता हा वाद प्लीज वेगळ्या बीबी वर करा...मी गेले ३ दिवस ईथे वृतांत वाचायला येते आहे...आणि हाताच्या बोटावर मोजण्याईतकेच वृतांत वाचायला मिळाले...
ववी ला यायला न जमणारे माझ्यासारखे बरेच लोक वृतांताची आतुरतेने वाट पाहात असतात....शरीराने नाही तर मनाने ववी अनुभवत असतात त्यांचा अतिशय विरस होतो आहे या सगळ्या चर्चा वाचुन.....सोमवारी सकाळी ऑफिसात येताना..." चला आज वृतांत वाचायला मिळतील " अशा उत्साहाने आले होते तर इथे काहीतरी भलतेच सुरु झालेय....
नव्याने वृतांत लिहिणारे देखिल इथल्या चर्चा वाचुन विचार करत असावेत की लिहु की नको...
त्यामुळे एक मनापासुन विनंती....प्लीज प्लीज इथे वृतांत , गमतीजमती (चिखलातल्या मजा, पाण्यातल्या गमती, यावेळेस चहा कोणी सांडला ई ई..;-) ) , फोटो ई टाका...
कोणाला दुखवायचा हेतु नाही...हे फक्त माझं मत आहे...

पण ही सगळी चर्चा दुसरीकडे होउ शकतेच की....
त्यामुळे मला मनापासुन वाटतेय की आता हा वाद प्लीज वेगळ्या बीबी वर करा..>>> हे १०० % पटलयं!

अच्छा म्हणजे पुणेकर कसे शिस्तीचे पक्के तर! फिदीफिदी >>> नाही.. अस काही म्ह्णायचं नाहीये मुळीच.. (पुण्यातल्या अंधश्रद्धांबद्दल तर काहीच बोलयचे नाहीये Wink ) Proud विषय भरकटतोय त्यामुळे असो.

मंजुडीला संपुर्ण अनुमोदन. प्रत्येक शब्दन शब्द मनातला लिहिला आहे माझ्या.

कृष्णा - तु उगिच नसत्या टुमा काढू नको, खरोखरी पुढच्या वविला लोकं उशिरा येतील आणि वविची चव घालवतील.

माझा स्पेशल ववि वृत्तांत :-

या वेळचा ववि माझ्यासाठी खास होता, एक तर वविच्या अगोदरचे दिवस ऑफिसमध्ये खूप बिझी गेले, आणि वविला भरपुर लोकांनी यावं यासाठी पण मी बर्‍यापैकी प्रयत्न केले.
माझा धागा उघडल्यानंतर मला कित्तीतरी आयडींनी फोन केला, आम्हाला वविला यायचंय पण आयडी अप्रूव्ह झाला नाहिये काय करू? मी शक्य त्या लोकांचे आयडी अप्रूव्ह करण्यासाठी साजिराला फोन करून पिडले.
रोज मल्लिला व्हॉग्रु वर आकडा सांग म्हणून भंडावून सोडत होते. रोज पुण्याचा आकडा फुगत चालला होता ते पाहून मी खूप समाधानाने झोपत होते. पण बुकिंग कितीही आली तरी फायनली पैसे किती येतात आणि किती कॅन्सल होतात यावर खरी वविची मजा अवलंबून होती.

पैसे घेण्याच्या दिवशी एकही कॅन्सलेशन नसल्याचं पाहून मला जो काही हर्ष झाला त्याची तुलना फक्त माझे डिग्रीचे शेवटचे २ विषय सुटल्यावर जो झाला त्याच आनंदाशी करता येईल. बस फायनल करायची जबाबदारी मी उचलली होती आणि वविची घोषणा झाल्यापासूनच त्या कामाला लागले होते, त्यामुळे २४ ला रात्री ११ ला ड्रायव्हरला फायनल आकडा कळवला आणि त्याचा "तुम्ही काळजी करू नका आपलीच ५० सिटर घेऊन जाऊ" असा मेसेज आल्यावर आणि मी झोपले, पण वविची आतुरतेने वाट पहात होते.

अखेर तो दिवस आलाच. एरवी ऑफिसचे काम करून दिड दोन ला झोपणारी मी, शनिवारी ३० तारखेला लवकर जेवून लवकर झोपले. कधीकधी अगदी ८ चा सुद्धा गजर बंद करून पुन्हा पहुडणारी मी वविच्या दिवशी बस सिंहगड रोड ला ८ ला येणार होती तरिही ६ लाच उठले.

"तुम्ही कितीला निघणार आहात? बस कुठे येणार आहे? मी तुम्हाला बाय करायला येऊ का?" - इति सई चा फोन. मी म्हणलं ये की, आणी पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा... ती म्हणली अगं तुला आवरायचं नाही का? Uhoh गप्पा काय हाणतेयस? मी म्हणलं मी फुल तयार होऊन बसले आहे आणि चहा पितेय, ६ लाच उठले.. (तिकडे सई फोनवर धन्य.. असं कायतरी पुसट बोलल्याचं आठवतंय फक्त :फिदी:)

मस्त पाऊस पडत होता, वातावरण निर्मिती झालीच होती. रस्त्यात असतानाच मला अदिती १५५ आणि दक्षा मोकाशी चा फोन आला, मी २ मिनिटात पोहोचले.. तेव्हा अदिती, पूजा, मृदुली आणि दक्षा विथ मनोमय तिथे हजर होते. पुढच्या ३ मिनिटात बस आली. त्यात आधीपासून पिंपरीकर, कोथरूड कर वगैरे बसले होते.
मग हिम्या आणि मयुरेश आले, बॅनरची बांधाबांध झाली. दरम्यान सई गरमा गरम पॅटीस घेउन आली होती. सगळ्यांनी एक तीळ वाटून खावा त्याप्रमाणे लोकांनी मिळतील तसे पॅटीसचे तुकडे मटकावले.. माझ्या दृष्टीस एक पण पडला नाही Sad मी बस मध्ये लावायला छान वासाची उदबत्ती आणली आणि क्लिनर ला दिली तर त्याने माझ्याकडे तु.क. टाकून ते पुडकं पुढे ठेवून दिलं... एकही उदबत्ती लावली नाही. Sad

मागच्या वर्षी अकुने गजरे आणून फक्त तिच्या दोन प्रिय मैत्रिणींना (सई आणि मुग्धमानसी) यांना दिले होते आणि मी तिला धमकी दिली होती की पुढच्या वर्षी माझ्यासाठी आणशील तर बरंय नाहीतर गाठ माझ्याशी आहे. बस निघताना तिने एक गजरा मला दिला आणि मल्ल्याने तो माझ्या डाव्या हातात बांधला. (राखीसारखा :फिदी:)

आमची बस निघाली. पुढे गुब्बी, डु आय, समीर आणि गौरी ला पिकप करून आम्ही नवले ब्रिजला पोहोचलो, तिकडे एक सोहळा झाला मग आम्हाला पुढे निघायला उशिर झाला.

जाता येता बस बावधान वरून जाणार असल्याने श्यामली ने उशिरा बस मध्ये बसणं पसंत केलं. सिंहगड रोडवरून येताना मला पिकप करा असं बोलल्याने सांगितलेल्या वेळेला आईच्या पुतळ्यापासून बस न निघाल्याने तिकडे श्यामलीचा पुतळा झाला. अखेर बस मार्गाला लागली आणि केड्या आणि त्या सिटवर बसलेल्या सगळ्यांनी गाणी सुरू केली. मल्ल्याने म्युझिक सिस्टिम आहे का बस मध्ये, नसेल तर बसवून घे, असं सांगून सांगून मला भंडावून सोडलं होतं. प्रत्यक्षात बस मध्ये स्वतः शांताबाई शांताबाई करत ओरडत होता..आणि ड्रायव्हरला गाणी बंद करायला सांगितली तर त्याने (ड्रायव्हरने) ही माझ्याकडे एक तु.क. टाकला... जणू तो म्हणत होता.. कशाला मग सिस्टिम जोडायला सांगितली? बंद करायला? Angry मी मनोमन दुर्लक्ष केलं.

मी पहिल्या सिटवर बसले होते तिथे हिम्याच्या पोरीने माझा ताबा घेतला होता.. मज्जा करत रिसॉर्टला पोहोचलो. लिंबू, योकु आणि मुंबईची मंडळी अगोदरच येउन पोहोचली होती. मग रिस्टबँड वाटप आणी गळाभेटी झाल्या... ब्रेकफास्टला मस्त उपमा आणि पोहे होते, दोन्ही छान होते. उपमा मला जास्त आवडला.. मग प्रसाद ने छोट्या गझिबोत रिसॉर्ट विषयी थोडी माहिती दिली.. तिथे मी त्याला माबो जॉईन करायचं आमंत्रण दिलं (जेणेकरून पुढच्या वविला काही सुट मिळेल ;))

तिथून तळ्यात डुंबायला गेलो, तिकडे मंजिरी सोमण, मंजिरी वेदक, मेधी आणि अजून ३-४ माबोच्याच साळकाया म्हाळकाया पाण्यात उतरू का नको अशा संभ्रमात होत्या.. मग मी एकेकीला खेचलं.
"ए पाणी किती गारेय... - इति मंजिरी सोमण... आता पावसाळ्यात काय तळ्यातलं पाणी गरम असेल? Uhoh तिथे थोडा वेळ डुंबलो आणि मड बाथ कडे वळलो.. तिथे आयडी रुपी काही वराह आधीपासूनच विहार करत होते ( संबधितांनी Light 1 घेणे) मग आम्ही पण त्यात सामिल झालो. विनय, आनंद, वैभ्या, अम्या, नील, घारू, योकु...मी मंजिरी, मनी.... आणि विद्या.. एकमेकिंवर आणि एकमेकांवर चिखलफेक केली... त्यातच घारू ला कुणितरी 'कमळ' म्हणून संबोधलं त्यावर अम्याने कोटी केली की "घार्‍या तु कमळ नाही नुसता मळ आहेस...." योकु च्या डोक्यावर कुणितरी नारदमुनी सारखा चिखलाचा बुचडा केला.. कुणी ते आठवत नाही कारण सगळेच चेहरे चिखलमय झाले होते. मग विनय, आणि इतर टारगट आयडींनी तिथे चिखलात नाच केला... चिखलफेक करताना कुणीतरी नेम धरून गोळा मारला तो थेट नील च्या डोळ्यावर बसला... तोवर मी पार थकून गेले, आणि तिथेच असलेल्या नळावरच्या पाईपने अंगावरचा चिखल काढायचा प्रयत्न केला... मग पुन्हा तळ्यात जाऊन दोन तिन डुबक्या मारून आले.
भिजून खोलित गेल्यावर ते वेटिंग आणि ओले कपडे मॅनेज करणं ही एक मोठी डोकेदुखी असते. Sad त्या दिव्यातून पार पडल्यावर जाणिव झाली की आपल्याला दोने प्लेट उपमा हाणून सुद्धा प्रचंड भूक लागली आहे. डुंबण्याच्या दरम्यान बरीच कामे सुरूच होती.. जसं की लोकांना हाकणे, ड्रायव्हरला ब्रेफाला बोलवणे (पुण्याची बस रिसॉर्ट च्या दारातच पंक्चर झाली, आणि ड्रा. ने ब्रेफा न करता ते काम आधी हाती घेतल्याने त्याला ब्रेफा मिळतोय का नाही या शंकेने मला घेरलं त्यामुळे त्याला हाल्या हाल्या करायला... प्रसाद चे निरोप लोकांपर्यंत पोहोचवणे इ. मुळे डुंबण्यातून थोडा थोडा ब्रेक झाला होता.

प्रसादने शिस्तीत पहिल्यांदा बायका आणि लहान पोरं जेवायला बसवली. मल्ल्याचे मानसिक वय हे त्याच्या पोरापेक्षा ही कमी असल्याने पहिल्या पंगतीतच तो खाली मान घालून ताव मारताना दिसला. मग मी आणि मेधी ने तिथे वर्णी लावली आणि टेबलावर बसून यथेच्छ भोजन केले. इतके सुंदर छोले मी आयुष्यात खाल्ले नाहीत. मी प्रसाद ला म्हणलं असं जेवण मिळालं की आपल्याला एकच पोट असल्याची खंत वाटते. दरम्यान २-३ आयडींनी माझी शिर्‍याची वाटी रिकामी केली.... मग प्रसाद ने 'अरे XXX या मायबोलीच्या मोठ्या डॉन मॅडमला एक शिर्‍याची वाटी आधी आणून दे, असं फर्मान सोडलं Proud मग मी ती वाटी झाकून ठेवली आणि शेवटी त्याचा आस्वाद घेतला..

मग वेळ आली सांस्कृतीक कार्यक्रमाची. गुब्बी (वन ऑफ द सांस समिती) अचानक अजारी पडल्याने तिला मुगु च्या गाडीतून पुण्याला रवाना केल्याने अकु आणि राखी ने सांका ची जबाबदारी घेतली.. गझिबो फार मोठा असल्याने आणि लाईट गेल्याने मुंबईकरांनी आणलेल्या म्युझिक सिस्टिमचा उपयोग करता आला नाही Sad मल्ल्याने आणलेल्या गोळ्या बस मध्येच वाटल्याने मी आणलेली चॉकलेटं सांका च्या वेळी वाटावित असा विचार करून मी तो डबा घेउन तिथे दाखल झाले तर काही बारके (वयाने थोराड) आयडी 'मला मला' करत माझी लुंगी पकडून होते. (संध्याकाळी मी पायघोळ ड्रेस घातला होता तेव्हा अम्या मला म्हणाला 'दक्षे लुंगी का नेसून आलीयेस :फिदी:)
सांका झाल्यावर नील ने माझा आवडता खाऊ (पुस्तकं) दिला... वविच्या रगाड्यात आणि त्याच्या पर्सनल कामांतून वेळ काढून लिस्ट पाठवून मला हवी असलेली पुस्तकं वाहून आणली.
वविला जाताना आणि येताना दोन्ही वेळा माझं नुसतं ओझ्याचं गाढव झालं होतं Proud येताना कुणाचे टिशर्ट, चॉकलेटं, घरी जाताना डबे, पुस्तकं, ओले कपडे.... काय नव्हेच... तरी नशिब मी काही विसरले नाहे तिकडे.

अखेर कार्यक्रम आवरता घेऊन चहाला एका छोट्या गझिबो मध्ये गोळा झालो, तिथे मग विसरलेल्या वस्तूंचा लिलाव झाला Proud पुढे त्या वस्तू कुठे गेल्या... ते मी ध्यान दिले नाही. मग फोटो काढाकाढी, चहा झाला आणि जड अंतःकरणाने सगळे आपापल्या गावी रवाना झाले.

काही ठळक निरिक्षणे :-
* वविची जागा पुण्यापासून जवळ, निसर्गरम्य स्वच्छ आणी रमणीय होती. जेवण अतिशय रूचकर.
*फक्त रिसॉर्ट खूप मोठा असल्याने लोक विखुरले होते आणि घशाला खूप व्यायाम झाला.
* वविला आलेल्या बारक्यांनी तिथल्या सशांना वर्षभराचा खाऊ एका दिवसात खायला घातला. संध्याकाळी निघताना पुन्हा काही बारकी पिंजर्‍याभोवती घुटमळताना पाहून ससे एका कोपर्‍यात जाऊन बसलेले मी पाहिले (पाहुणचाराला घाबरले असतील :फिदी:)
* लाईट्स नसल्याने आणि गझिबो खूप मोठा असल्याने सांस्कृतीक कार्यक्रमांचा थोडा विरस झाला.
* जेवणाची चव उत्तम होती पण जिथे वाढत होते ती जागा छोटी असल्याने वेटिंग खूप झाले. शिवाय गर्दी.
* जेवण आवडल्यास तिथे असणारी एक छोटी घंटा आपण वाजवायची असा शिरस्ता आहे, जेव्हा जेव्हा ती घंटा वाजेल तेव्हा तेव्हा प्रसाद किंवा त्याच्या फॅमिलीपैकी कुणीही, कुठूनही "थँक्यू" असे ओरडत होते. ते 'थॅंक्यू' मोजले असते तर विश्वविक्रम मोडला गेला असता कदाचित. Happy
* वविला पहिल्यांदा आलेले लोक, दुधात पाणी मिसळते तसे जुन्यांमध्ये मिसळून गेले. पूर्णिमा (शुभांगी कुलकर्णी, सुप्रिया जाधव आणि सर्वात जास्त मिसळले ते विश्वकर्मा फॅमिली सोबत आलेले मधुर गोडबोले)
* नव्या आयडीज सोबत मला पर्सनली भेटून त्यांचे अनुभव विचारायचे होते पण मी काही खास करत नसून उगिचच बिझी होते त्यामुळे त्यांच्याशी बोलता आले नाही.
* या वविला मल्ल्याचा बुक्का होणार याची पुर्ण खात्री आणि तयारी मी करून गेले होते. पण बस मध्ये मल्ल्याने मला गजरारूपी राखी बांधल्याने त्याच्या रक्षणाची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या माझ्यावरच आल्याने त्याचा मला बुक्का करता आला नाही.
* व्हॉग्रु वर रोड च्या ऐवजी मी चुकून रॉड लिहिल्याने डु आय ने मला रॉड म्हणजे काय विचारले तेव्हा मी त्याला 'विधात्याने मार खाण्याच्या जागा दिलेल्या आहेत त्या जागी उमटला की कळेल रॉड म्हणजे काय ते" असे फटकेबाज उत्तर दिले होते पण ऐनवेळी रॉड न नेल्याने, राखी न बांधताही डू आय वाचला. Proud
* कंपनीची बस आणि कंपनीचा ड्रायव्हर नेल्याने त्याने माझी २ रूपे पाहिली. रोज बस मध्ये शांतपणे पुस्तक वाचणारी आणि कुणाशीही न बोलणारी दिप्ती जोशी आणि त्या दिवशी ची दक्षिणा, यात जमिन आसमानाचा फरक जाणवला असेल त्याला.. धक्क्यातून अजून सावरतो आहे बिचारा Proud

Pages