लोकं दारू का पितात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07

लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्‍याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्‍यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अ‍ॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कांदाजी, पावसाळा असल्याने जरा बाथरूम ब्रेक मोठा होतोय Happy

ईतर उत्तरे देतोच, आधी हा मुद्दा क्लीअर करणे गरजेचे वाटते, अन्यथा आपण माझ्या सर्वच उत्तरांना दूषित नजरेने बघाल.

<<<<<<<<< तुमचा दारू द्वेष हा तितक्याच पराकोटीचा व मद्यपान करणार्‍या सर्वच लोकांना "दारूडा" या एकाच माळेत गुंफून शिव्या घालण्याच्या कॅटॅगरीतला आहे. >>>>>>

दारू द्वेष म्हणाल तर येस्स! दारू ही काही पवित्र गोष्ट नाही जे तिचा द्वेष करणे गैर आहे. अन्यथा मंदिरात नसती प्रसाद म्हणून वाटली गेली Happy

पण मद्यपान करणार्‍यांना मी शिव्या घालतोय हा सूर आपल्याला कुठे आढळला?
माझे कैक मित्र मद्यपान करतात. माझ्या घरात, माझ्या नातेवाईकांमध्ये मद्यपान करणारे आहेत. मद्यपान करणार्‍यांचा द्वेष करायचे म्हटल्यास मला सरसकट या सर्वांचा द्वेष नाही का करावा लागणार. पण नाही का करत, ते अजूनही माझे मित्र आणि नातलग आहेत.
किंबहुना मी आमच्या नातलगांमध्ये मद्यपानाने उद्ध्वस्त होणारे कुटुंब पाहिले आहे. त्यामुळे जर मी लोकांना मद्यपान करू नका असे सांगत असेल तर त्यामागे द्वेष कसा असेल. असल्यास कळकळच असणार नाही का.
तुम्हीही मला तुमचा शत्रू वगैरे समजू नका. जर तुम्ही असा अर्थ काढलात तर ज्या हेतूने मी हे लिखाण केले आहे आणि प्रतिसाद लिहित आहे त्यामागचा हेतू सफल होणारच नाही.

आपण दारू पित नाही म्हणजे काहीतरी सॉलिड मोठा तीर मारतोय, त्यामुळे जगाचे ज्ञान जे काय आहे ते स्वतःलाच आहे. अधूनमधून ते रेग्युलर दारू पिणार्‍या प्रत्येक माणसाला वाटेल ती नावे ठेवणे, माणूस म्हणून कमी समजणे हा आपला अधिकारच आहे अश्या प्रकारच्या बहुतेक पोस्टस बघून मजा आली.
वाढदिवस झाल्यास तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

आपण दारू पित नाही म्हणजे काहीतरी सॉलिड मोठा तीर मारतोय, त्यामुळे जगाचे ज्ञान जे काय आहे ते स्वतःलाच आहे. अधूनमधून ते रेग्युलर दारू पिणार्‍या प्रत्येक माणसाला वाटेल ती नावे ठेवणे, माणूस म्हणून कमी समजणे हा आपला अधिकारच आहे अश्या प्रकारच्या बहुतेक पोस्टस बघून मजा आली

_>>>>>>>

ईतरांचे माहीत नाही, पण यातली पहिली गोष्ट मी करतो.
ती म्हणजे स्वत:च्या निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगणे Happy
आणि ईतर निर्व्यसनी लोकांनाही हे करायला सांगतो.
कारण हल्ली समाजात दारूला मिळणारी प्रतिष्ठा वाढू लागलीय. ईंग्रजी दारू पिणे म्हणजे काही दारूडे होणे नाही, ते तर ते गावठी, देशी, हातभट्टीची पिणारे झाले असा समज प्रचलित होऊ लागलाय.
एखाद्या ग्रूपमध्ये पार्टीचा प्लान बनतो आणि दहातले आठ पिणारे निघतात, मग त्या उर्वरीत दोन जणांकडे काय बचकांडे आहेत अश्या नजरेने बघितले जाते आणि तश्या कॉमेंट केल्या जातात. आणि ते बिचारे दोघे आपल्या निर्व्यसनीपणाची किंमत समजून ते ऐकून घेतात. हा जो प्रवाह वाहत आहे, जो मला चुकीचा वाटत आहे, त्यात खडक बनून पडून राहण्याऐवजी मला त्याच्या उलटे पोहायला आवडेल Happy

मंदिरात प्रसाद म्हणून वाटली जाणारी दारू/वाईन पाहिली नाही का?
>>>>>>

मी वरची पोस्ट लिहीतानाच माझ्या मनात आलेले की हा प्रतिसाद हमखास येणार Happy
शेवटी मंदीर, देव, धर्म, या माणसांनीच बनवलेल्या जागा आणि संकल्पना आहेत. आपल्या सोयीने ठिकठिकाणी त्यात बदल असणारच. सांगायचा मुद्दा हा होता की असा अपवाद वगळता बहुतांश समाज दारूला अपवित्र गोष्टच समजतो तर मी तिला वाईट समजण्यात गैर नाही ..

कारण हल्ली समाजात दारूला मिळणारी प्रतिष्ठा वाढू लागलीय. ईंग्रजी दारू पिणे म्हणजे काही दारूडे होणे नाही, ते तर ते गावठी, देशी, हातभट्टीची पिणारे झाले असा समज प्रचलित होऊ लागलाय.
एखाद्या ग्रूपमध्ये पार्टीचा प्लान बनतो आणि दहातले आठ पिणारे निघतात, मग त्या उर्वरीत दोन जणांकडे काय बचकांडे आहेत अश्या नजरेने बघितले जाते आणि तश्या कॉमेंट केल्या जातात. आणि ते बिचारे दोघे आपल्या निर्व्यसनीपणाची किंमत समजून ते ऐकून घेतात. हा जो प्रवाह वाहत आहे, जो मला चुकीचा वाटत आहे, त्यात खडक बनून पडून राहण्याऐवजी मला त्याच्या उलटे पोहायला आवडेल>>>>>>>>>>>
वा! वा! ऋ मान गये.

ईतरांचे माहीत नाही, पण यातली पहिली गोष्ट मी करतो.
ती म्हणजे स्वत:च्या निर्व्यसनी असल्याचा अभिमान बाळगणे
>>
ओह रियली?? आय मीन यु डोन्ट हॅव अॅनी अडिक्शन?

साती, सस्मित धन्यवाद Happy

ओह रियली?? आय मीन यु डोन्ट हॅव अॅनी अडिक्शन?
>>>>>
कोई शक Happy

व्यसन याचा शब्दकोशातला अर्थ काय बरे?
दारू असा लिहिलाय का?
>>>>>>
बहुतेक नसावा. अन्यथा दारूचे व्यसन याचा अर्थ दारूची दारू किंवा व्यसनाचे व्यसन असा झाला असता. Happy

पण नेमका मुद्दा काय आहे,
"दारूच्या व्यसनालाच का टारगेट करता? ईतर व्यसने तुम्हाला दिसत नाही का? जाओ पहले ऊस आदमी की साईन लेके आओ जो तंबाखू खाता है, गांजा पिता है... "
असे काही म्हणायचे आहे का ?

निधपची 10.05 ची पोस्ट आणि ऋचे त्यावरचे उत्तर या दोन्ही पोस्तीत लिहिलेल्या दोन्ही गोष्टी आज सर्रास पाहायला मिळतात. दोन्ही गटातले लोक एकमेकांकडे कुत्सित नजरेने पाहतात आणि प्रसंग येताच टोमणे हाणले जातात. सगळे लोक सज्जन बनून फक्त स्वतःचे आचरण पाहतील, इतरांच्या कुठल्याही भानगडीत नाक खुपसणार नाहीत हे आपल्याच काय कुठल्याही समाजात शक्य नाहीय त्यामुळे आपण अशा धुमश्चक्रीचा आनंद घ्यावा एवढेच आपल्या हातात असते. असो.

ऋचा मूळ विषय अतिमद्यपान करून स्वतःचा तात्काळ किंवा झिजत झिजत जीव गमावणारे लोक मुळात झेपत नाही इतकी का पितात हा आहे असे मला वाटले. आणि त्याचे त्याने जे उत्तर दिलेय तेच उत्तर शीर्षक वाचल्यावर माझ्याही तोंडावर आलेले - मरायला.

बाकी जे स्वतःची कुवत ओळखून झेपेल इतकी पिण्यात आनंद मानतात ते व्यसनी आहेत असे मला तरी वाटत नाही. माझ्यासारखे लोक ज्यांनी दारूची चव डेव्हलप केली नाही त्यांना त्यातली मजा कळणार नाही, जी मजा आपल्याला येत नाही, ती ज्यांना येते त्यांना घेऊद्या कि आनंद... उगीच नावे का ठेवा?

(नावे ठेवली नाही तर टीपी कसा होईल हेही आहेच)

मला तंबाखुचे व्य्सन होते ,काही प्रमाणात आजही स्मोक करतो ,पण आता बरेच कमी आहे.दारुच्या बाबतीतही हे सत्य आहे.गंमत म्हणून पिलेली दारु मग सवय बनते हे ९९% लोकांच्या बाबतीत सत्य आहे.त्यामुळे पेताड लोकांनी इथे दारुचे समर्थन करु नये.
( फुकाड्या सिंजी)

दारु विकणारा कर्ज बाजारी झाला
दारू पिणारा कर्ज बाजारी झाला
कर्ज देणार्‍या बँका कर्ज बाजारी झाल्या.

च्यामायला. मग पैसे गेले कुठं Wink

>>लोकं दारू का पितात?<<

एवरीवन हॅज ए हिडन टॅलंट दे डोंट नो अबौट, अंटिल टकिला इज पोअर्ड... Proud

उरलेले 1 टक्के लोक पण असतीलच ना...
>>>
हो नक्कीच !
तसेच आपण त्या १ टक्क्यात आहोत असे समजणारेही नव्याण्णव टक्के असतील Happy

आग, दारू आणि पाणी.. यांच्याशी खेळ करताना मला काही होणारच नाही असे आपण खात्रीने नाही सांगू शकत.

पण आपली वरची पोस्ट पटली. दारूच्या नशेमुळे तात्काळ जीव जाणारे आणि हळूहळू मरणारे, ईतरांना मारणारे ईत्यादी अट्टल पिणार्‍यांवर मी वर हेडरमध्ये लिहिलेले. तसेच जे प्रमाणात पितात अश्यांनाही अधूनमधून सावध करणे गरजेचे असतेच की बाबारे आहारी जात तर नाही ना आहोत हे अधूनमधून चेक करत राहा..

@ कांदाजी,
सैन्याला दारू का देतात? स्वस्त का देतात?

या प्रश्नांची उत्तरे गूगाळून शोधायचे प्रयत्न करता खालील माहिती (ईंग्रजी भाषेत) हाती आली.

१) Liquor has been part of British Army culture since ages and we have followed the traditions. Toasts were raised to honor, Bars in Messes served officers in evening to relax and catch up after a tough day, wine was part of fine dining etc etc. British accepted that even soldiers need this kind of welfare at the end of the day hence every soldier could have his drink too. The traditions have followed through and hence liquor stayed on.

२) In cold regions, liquor helps stay warm. As most of Indian Army is posted on the Northern Border of Indian which are very cold in winter so the liquor helps warm your body, fight the cold, helps in digestion. Thus Rum is so popular.

3) The liquor rates are not subsidised as the asker assumes. They are merely tax free, as are the other things that are available through the canteen.
It just so happens that the government levies a higher tax on liquor and that is why it might seem so inexpensive (relatively)
So the government does not subsidise the commodities, but refuses to charge a tax.

शीर्षकात विचारलेला "लोकं दारू का पितात?" हा प्रश्न तुम्ही ज्याचे भक्त आहात त्यालाच विचारला तर उत्तम.

https://www.youtube.com/watch?v=tG7XBUi0Mio

तसेच जे प्रमाणात पितात अश्यांनाही अधूनमधून सावध करणे गरजेचे असतेच की बाबारे आहारी जात तर नाही ना आहोत हे अधूनमधून चेक करत राहा..
>>>

म्हणजे येथे रिस्क आहे, जे की न पिणार्‍यात नाही. Happy

या विषयावर नेहेमी काथ्याकूट होत असतो. पिणार्‍यांवर त्याचा कितपत परिणाम होतो कुणास ठाउक . ते पीतच राहतात. पण अजिबात न पिणार्‍यांना मात्र कधितरी न्यूनगंड येउ शकतो. तो येउ नये म्हणून त्यांना मी असे सांगत असतो, '' Not drinking is certainly NOT injurious to our health !''
बाकी पिल्याने काय होते/होत नाही हा काथ्याकूट शतकानुशतके चालूच राहील.......

म्हणजे येथे रिस्क आहे, जे की न पिणार्‍यात नाही.
>>>>

हो नक्कीच!
न पिणारेच रिस्क उचलणारे असतात.
पिणारे मद्याच्या आहारी जाण्याचा सोपा मार्ग स्विकारतात Happy

>>न पिणारेच रिस्क उचलणारे असतात. पिणारे मद्याच्या आहारी जाण्याचा सोपा मार्ग स्विकारतात<<

आउट-एफिंग-स्टॅंडिंग...

असं काय नाय बरं.
आमचे एक स्नेही म्हणत असतात, त्यांच्या गावी म्हणे अशी म्हण हायः "सोडता येइना झालो माकडे".
आम्ही तसे दारु इरोधीच.
सिग्नेचर सोडावी वाटली, सोडलीया.

म्हणजे येथे रिस्क आहे, जे की न पिणार्‍यात नाही.
>>>>

हो नक्कीच!
न पिणारेच रिस्क उचलणारे असतात.
पिणारे मद्याच्या आहारी जाण्याचा सोपा मार्ग स्विकारतात
>>

रिस्क ही आरोग्याची आहे, जिवन मरणाची आहे, संसार तुटण्याची आहे, मला हे म्हणायचे होते.,, पिणार्‍यांसाठी. - Happy

Pages