लोकं दारू का पितात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07

लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्‍याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्‍यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अ‍ॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'दारु काय हो, कोणतीही गोष्ट अती केली की उपद्रव होणारच'
'लोकांना कुठे थांबाव हे कळत कसं नाही?'
अशा कॉमेंट्स या एक तर अज्ञानातून किंवा दारुच्या समर्थनार्थ असतात.
थोडीशी प्यायला काहीच हरकत नाही, प्यावी पण योग्य ठिकाणी थांबायला पाहिजे बस्स, असा याचा अर्थ.
न थांबता येण्याच्या स्टेजला आपण अजून पोचलो नाहीत आणि पोचणारही नाही अशी आपलीच समजूत काढल्यासारखे आहे.
या कॉमेंट्स अज्ञानातून असतील तर अल्कोहोल हे ड्रग अ‍ॅडिक्श्न आहे हे लक्षात घ्या. रेग्युलर घेउ लागले की शरीराची या ड्रग बद्दल immunity वाढत जाणार आणि मग कुठे थांबायला हवं होतं ते दुसर्‍या दिवशी सकाळी जाग आल्यावरच कळणार, पिताना नाही.

लोक डोंगरदर्‍यात भटकायला का जातात?
स्काय डायव्हिंग/ बंजी जंपिंग का करतात?
कार रेसमध्ये भाग का घेतात?
अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्स का खेळतात?

काही प्रकारांत (गरज नसताना) जीव धोक्यात घातला तर ते नोबल कॉज आणि काही प्रकारांत मात्र मूर्खपणा अशी विभागणी का करतात?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला अजून शोधायची आहेत.

लोक दारु पितात कारण ते ज्यांना त्यचे आदर्श मानत असतात ते पण मदिरा सोम रस पिणारे असतात..

ऋन्मेश, तुम्हाला एक विषय सुचवु का नविन धाग्याला? शंभरी नक्की पार करेल, कदाचित हजारी देखिल....
तर उघडा एक नविन धागा......
.
.
.
"माणसे वविला का जातात??? " Proud

जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतीत दारु किंवा तत्सम मादक पेये होतीच कि !

अगदी पैगंबर पूर्व काळात मध्यपूर्वेतही होती. पैगंबर साहेबांनी त्याला मनाई केली. त्यावेळी जी दारु करायलाच ठेवली होती, त्याचे काय करायचे असे विचारल्यावर ते म्हणाले, त्याचे व्हीनीगर करा !

"माणसे वविला का जातात??? "
>>>>

कश्यालाही का जात असेनात, दारू प्यायला नक्कीच जात नाहीत, हे या धाग्याशी संबंधित आहे, आणि तरीही जात आहेत हे महत्वाचे आहे! कारण गेले काही दिवस ऊबग आणलाय मला या दारूच्या चर्चेने. पुढच्या शनिवार रविवार विकांताला मित्रांची पावसाळी सहल चालली आहे. आधी एका गडावर जायचा बेत होता, मात्र गडावर दारू पिऊन कसे जाणार असा साक्षात्कार झाल्याने त्यांनी तो बेत रद्द केला. काय ऐतिहासिक वास्तूंबद्दल प्रेम आहे. बरं मग आता एका समुद्रकिनारी चालले आहेत. गेले सात आठ दिवस कोण किती पिणार आणि कुठची पिणार याव्यतिरीक्त काहीच गप्पा होत नाहीयेत. पुढचे दहा दिवस सुद्धा हेच चालणार आहे. पिऊन क्रिकेट खेळायचे, पिऊन गाणी म्हणायची, पिऊन पाण्यात खेळायचे, पिऊन झिंगाट गाण्यावर नाचायचे, जी काही धमाल मस्ती करायची ती पिऊनच करायची. पिकनिकमधून दारू वजा करता आयुष्यात मजाच उरणार नाही अशी स्थिती आहे. मी किती पिणार, तू कुठली पिणार, केवढा स्टॉक नेऊया, तिकडे किती घेऊया, वेळच पडली तर ताडीमाडीचीही सोय करूया. बस्स! आता जाऊन आल्यावरही यांच्या दारूच्याच सुरस कथा ऐकायच्या आहेत..

लोक डोंगरदर्‍यात भटकायला का जातात?
स्काय डायव्हिंग/ बंजी जंपिंग का करतात?
कार रेसमध्ये भाग का घेतात?
अ‍ॅडवेंचर स्पोर्ट्स का खेळतात?

>>>

साती,अशी उदाहरणे देऊ नका ओ,
लोकं भ्रष्टाचार का करतात? लोकं वाहतुकीचे नियम का मोडतात? लोकं रस्त्यात कचरा का टाकतात? .. अशी उदाहरणे द्या
तुमची उदाहरणे छान आहेत, उगाच दारूचे उदात्तीकरण केल्यासारखे होतंय ते..

या प्रश्नाचं उत्तर लोकसत्तामधील या बातमीतून मिळू शकेल.

www.loksatta.com/lifestyle-news/garlic-is-harmful-for-pregnant-womens-12...

{{{ वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार गर्भवती असतानाच्या काळात जर वास येणारे पदार्थ खाल्ले तर त्या पदार्थाचा वास गर्भधारणेनंतर मातेच्या दुधाला येतो.

असेही समोर आले आहे की मातेचे दूध ज्या चवीचे असते त्या चवीचे पदार्थ बालकांना आवडतात. ज्याची चव आणि वास जास्त दाट असतो अशा पदार्थापैकी एक लसूण. गर्भधारणेच्या अडीच तास आधी लसूण खाल्ल्यास त्याचा वास स्तनपान करताना दुधाला येतोच. लसूण या पदार्थानंतर जर काही येत असेल तर सर्दी-खोकल्याची औषधे. यांचा वासही त्यातील घटकांमुळे अत्यंत दाट असतो. या वासाचा परिणामही स्तनपानाच्या दुधावर होऊ शकतो. }}}

आता जर मातेने गर्भधारणेच्या काळात सर्दी खोकल्याची औषधे सेवन केले असतील तर त्यात असलेल्या अल्कोहोलमुळे पुढे मुलालाही अल्कोहोलयुक्त पदार्थ प्यावेसे वाटले तर त्या मुलाला का दोष द्या?

. गर्भधारणेच्या अडीच तास आधी लसूण खाल्ल्यास त्याचा वास स्तनपान करताना दुधाला येतोच. >>

काय ठोकतायत लोकसत्तावाले.

स्तनपान करवण्याच्या अडीच तास आधी असे असायला हवेय ते.
Wink

आता जर मातेने गर्भधारणेच्या काळात सर्दी खोकल्याची औषधे सेवन केले असतील तर त्यात असलेल्या अल्कोहोलमुळे पुढे मुलालाही अल्कोहोलयुक्त पदार्थ प्यावेसे वाटले तर त्या मुलाला का दोष द्या?>>>>
>:हाहा:

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) - See more at: http://www.loksatta.com/lifestyle-news/garlic-is-harmful-for-pregnant-wo...

ओह, लोकसत्ताने ऑलरेडी हात वरती केलेले आहेत!
Wink

माझा याबाबत जास्त अनुभव नाही, पण पिणारे पिणे हे चवीपेक्षा त्या निवांत वेळेशी,चांगल्या गप्पांशी, त्या वेळेत विशीष्ठ ऑफिस मधल्या जुळणार्‍या नात्यांशी, मेमरीज शी जास्त जोडत असावेत(जसा मी आल्याचा चहा पावसाशी, माझ्या निवांत वेळेशी, मजा करण्याच्या कल्पनेशी जोडते तसा.)
पिणं सोडावायचं/ कमी करायचं असेल तर त्याचा 'गुड टाईम स्पेन्ट टुगेदर' शी असलेला मनातला संबंध काढायला हवा(सेम अप्लाई़ज टु चॉकलेट्/चहा कॉफी/पेस्ट्री).
बाकी नैतीक अनैतिक बाजूत घुसत नाही, वाईट वागणं हे माणसात असतं, ते दारु पिण्या न पिण्याने विशेष कमी जास्त होत नाही.त्याला वाईट वागायचं असतं म्हणून तो 'प्यायलो, शुद्धीत नव्हतो म्हणून असं केलं' याचा मानसिक आधार घेत असेल.

{{{ काय ठोकतायत लोकसत्तावाले. }}}

लोकसत्ताचे ते आर्टीकल कदाचित ऋन्मेषच्या गर्ल्फ्रेन्डने लिहिले असेल.

लोक दारू का पितात? ............... कशाला हव्यात फूकटच्या चौकश्या , का पितात हे कळले तरी तू काय त्यांची दारु सोडवू शकणार आहेस काय .........................
कामाच्याला काम नाय आणि रिकाम्याला दम नाय (धागे काढायला Happy )

आता जर मातेने गर्भधारणेच्या काळात सर्दी खोकल्याची औषधे सेवन केले असतील तर त्यात असलेल्या अल्कोहोलमुळे पुढे मुलालाही अल्कोहोलयुक्त पदार्थ प्यावेसे वाटले तर त्या मुलाला का दोष द्या? >>>> Rofl

लोक दारू का पितात? ............... कशाला हव्यात फूकटच्या चौकश्या , का पितात हे कळले तरी तू काय त्यांची दारु सोडवू शकणार आहेस काय

>>>>>>>>

बहुधा आपण फकत शीरषकच वाचले आहे आणि लेख पुरण वाचला नाही. अरथात तो वाचावा अशी माझी सकती नाही. पण निदान तेवढयावरून परतिसाद देऊ नका.

असो, कधी कोणी विचार केला आहे की बेवडा जनगणनेत मुलांचे परमाण किती आणि मुलींचे किती? तयात फरक आहे का, आणि असलयास का...

जोडशबद होत नाहीयेत तयाबददल सॉरी!

{{{ बहुधा आपण फकत शीरषकच वाचले आहे आणि लेख पुरण वाचला नाही. अरथात तो वाचावा अशी माझी सकती नाही. पण निदान तेवढयावरून परतिसाद देऊ नका.

असो, कधी कोणी विचार केला आहे की बेवडा जनगणनेत मुलांचे परमाण किती आणि मुलींचे किती? तयात फरक आहे का, आणि असलयास का...

जोडशबद होत नाहीयेत तयाबददल सॉरी!}}}

मला वाटलं "लोक दारु का पितात?" याचं उत्तर जाणून घेण्याकरिता तुम्ही स्वतःच प्याली की काय?

बाहुबली, पहिली ओळ वाचा स्मित
<<
चाखणे व पिणे यात फरक आहे. ते पिण्याचं विचारताहेत.

चाखणे व पिणे यात फरक आहे. ते पिण्याचं विचारताहेत
>> हो. फरक तर आहेच.

दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

लोकं दारू का पितात?>>>>>

१. असच जम्माडी जम्मत करायला.

२. लोकांची फुकट करमणूक करायला.

३. घरच्यांना वाटेला लावुन स्वताचा संसार उध्वस्त करायला.

४. दारु दुकानदारांची तुंबडी भरायला.

५. नको ते रोग मागे लावुन घेऊन स्वर्ग/ नरकात जायला.

वाईट वागणं हे माणसात असतं, ते दारु पिण्या न पिण्याने विशेष कमी जास्त होत नाही. >> एकदम "नशा शराब मे होता तो नाचती बोतल..." हे नौलखा महाकाव्य आठवले. Happy

अरे या आधी दारू वर दोन ( किव्वा तीन ) आधीच धागे येऊन गेलेत. ते वाचा ऋन्मेष. त्यात हि सगळी उत्तर मिळतील . तुम्ही स्वतःचे हे असे शेप्रेट धागे का काढता ? Lol

{{{ तुम्ही स्वतःचे हे असे शेप्रेट धागे का काढता ? }}}

सुजा,

तुम्ही http://www.maayboli.com/node/58500 हे वाचलं नाहीत का? इथे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

Pages