लोकं दारू का पितात?
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07
लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला.
विषय:
शब्दखुणा: