लोकं दारू का पितात?

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2016 - 16:07

लोकं दारू का पितात? बरेचदा हा प्रश्न पडतो मला. कारण चव काही खास नसते. चाखून झालीय माझी.. आज ऑफिसमधून सुटलो, ट्रेन पकडली, ट्रेनमधून उतरलो, प्लॅटफॉर्मवरून चालू लागलो. ट्रेन सुटली आणि माझ्या विरुद्ध दिशेने धावू लागली. तिच्यापासून थोडेसे अंतर ठेवून मी देखील चालू लागलो. नजर समोर असल्याने तशी भिती काही नव्हती. पण माझ्या पुढे चालणारा माणूस मात्र ट्रेनच्या फारच जवळून चालत असल्याचे जाणवले. ट्रेनमधील प्रवाश्यांना हूल देत असल्यासारखा अधूनमधून ट्रेनच्या बाजूला झुकतही होता. वेडा आहे का हा, मनात आले. पण बेवडा निघाला. माझ्या चालण्याचा स्पीड त्याच्या तिप्पट असल्याने दहाबारा पावलांतच मी त्याला गाठले आणि नाकातल्या नाकात श्वास गुदमरून जावा असा घमघमाट! स्साला एवढा पैसा खर्चा करतात, बनवणारे आणि पिणारे, तर जरा सुवासिक नाही का बनवत येत यांना.. बरं ते जाऊ द्या.. त्याला ओलांडून मी पटकन पुढे जाऊया म्हटले तर त्याने पुन्हा एकदा ट्रेनच्या दिशेने झोकांडी खाल्ली. पुन्हा स्वत:ला सावरले. पण ट्रेनपासून दूर राहून चालावे किंवा एकाच जागी थांबावे एवढी अक्कल, वा शुद्ध त्याला कुठून असावी. दारू सरळ मेंदूवरच हल्ला करते म्हटल्यावर सर्वात पहिले अक्कल गहाण पडणे स्वाभाविकच आले. त्या स्थितीत त्याला सोडून मला पुढेही जाववेना. तसेच त्याला दूर खेचायला स्पर्शही करवेना. म्हणून मग मी माझ्या चालण्याचा स्पीड कमी करत, त्याला कवर करत, त्याच्या मागे मागे चालू लागलो. सेफटी मेजर. पण ईथे ट्रेनचा स्पीड वाढला होता. एखादा हलकासा फटका आणि खेळ खल्लास. किंबहुना तोल जात तो नेमका दोन डब्यांच्या मधल्या फटीत शिरण्याचीही शक्यता होती. त्याची एक जोरदार कलती झोकांडी मला धोक्याची सूचना देऊन गेली आणि आता बस्स, उगाच टेंशन नको म्हणत मी त्याच्या हाताला धरून दूर लोटले. दुसर्‍याच क्षणाला मला माझ्या परोपकाराचे फळ मिळाले... "कोण आहे रे भें## , बापाशी नडतो काय, ## च मारेन तुझी.." .. जेवढा किळसवाणा तो दर्प, तेवढाच किळसवाणा तो शिव्यांचा सूर .. एक सण्णकन पेटवून द्यावी असे वाटले.. क्षणभरच.. पण मोह टाळला. कदाचित मला अश्यांच्या नादाला लागायचे नसावे. कदाचित त्याच्याकडून दुसरी काही अपेक्षाही नसावी. कदाचित तो खरेच माझ्या बापाच्या वयाचा असल्याने असावे. वा कदाचित आपले नेहमीचेच, "जाऊ दे बेवडा आहे, काय बोलतोय त्याचे त्याला तरी माहीत आहे का?" या विचाराने मनावर घेतले नसावे. दुर्लक्ष करून तसाच पुढे निघालो. ईथे ट्रेनही आपल्या वाटेने प्लॅटफॉर्मच्या पार झाली. माझ्यासाठी विषय तिथेच संपला. संपायला हवे होते खरे तर. पण डोक्यात रेंगाळत राहतात काही विषय. का पितात लोकं उगाच दारू? गेल्या आठवड्यात ओळखीचा, दूरच्या नात्यातील एक जीव गमावला या दारूपायी. शुद्ध हरपून कडेलोट. फेसाळलेल्या पाण्यासह धबधब्याला सोबत घेऊन कोसळला खडकांवर. तिकडेच कपाळमोक्ष. तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने तासाभरात दुर्दैवी मृत्यु. घरच्यांना खबर थेट मृत्युचीच मिळाली. हाती लागली ती एक फुगलेली बॉडी. काळजाचा भुगा पाडणारी ही बातमी वडील जेव्हा सांगत होते, आपला मुलगा पित नाही एवढेच काय ते समाधान आईच्या चेहर्‍यावर दिसते होते. ते आज पुन्हा आठवले. म्हणूनही कदाचित त्या बेवड्याच्या फारसे नादी लागलो नाही. उपयोग शून्य ठाऊक होते. त्याचा रस्ता वेगळा. माझा रस्ता वेगळा. तोच पकडून घरी आलो. घरी येताच वायफाय कनेक्ट झाला. न्यूजहंट अ‍ॅपच्या बातम्या मोबाईल नोटीफिकेशनमध्ये धडाधड जमा होऊ लागल्या. राजकारण, पेज थ्री, क्रिकेट, बलात्कार या नेहमीच्या बातम्यांवरून भरभर फिरणारी नजर पुन्हा एका बातमीत अडकली. मुंबईत दारूच्या नशेत गाडीचालकाने २० ते २५ जणांना उडवले.. आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. लोकं दारू का पितात? .. मरायला

- ऋ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव, हर्पेन, चान्गल्या आहेत पोस्ट्स तुमच्या. Happy

>>>> एखादा अट्टल हि चर्चा वाचत असेल का <<<<
सुनटुन्या, अट्टल "वाचण्याइतक्या" शुद्धित अस्तो का कधी? Wink
पण अट्टल बनायच्या आधी/बनु पहात असणारे, प्रथमच दीक्षा घेऊ इच्छिणारे/घेतलेले अशांनी जरी हे वाचले तरी खूप काम होईल.

अति तेथे माती... बस्स....
बाकी नशा शराब मे होता तो नाचती बोतल... हे हि खरेच न ?

हर्पेन, मी कोरियात २-२ बाटल्या पिलेली पण आपण काय बोलतोय/ करतोय याची शुद्ध असलेली कित्येक माणसं बघितली आहे. जर एखाद्याला दारु म्हणुन कडू औषध पाजले तर कदाचित त्याला तेही चढेल, तसच दारु पिउनही स्वतःवर कंट्रोल ठेवता येतो, हेही तितकेच खरे.

दारुने माणसाला कंट्रोल करावे की माणसाने दारुला त्यावरुन वरचे वाक्य म्हटले आहे.

दारू, किंवा अल्कोहोल अनेक रूपांत पुरातन काळापासून माणसांच्या पिण्यात, खाण्यात आहे.
होय, श्रीकृष्णाच्या अंतावेळेस दारू पिऊनच "यादवी" माजली होती, त्याची आठवण आजही ठेवली जाते, व त्यामुळे दारू वाईट असा संदेश दिला जातो, तो सोईस्कररित्या नजरेआड करुन तेव्हाही काही नाठाळ पित होते म्हणून आजही प्यायला हरकत नाही असा अर्थ काढायचा असेल, तर इतका तरी "युक्तिवाद " करण्यात वेळ का घालवावा? नै का? Wink अन हाच न्याय लावायचा, तर दु:शासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घालुन फेडू लागला असा पुराणातला दाखलाच आदर्श मानुन मग दारु शोधत फिरता, तसे द्रौपद्याही शोधत फिरु लागायचे का? रावणाने सीता पळवली, म्हणुन आपणही रावण बनायचे का? रामाने कुणा धोब्याच्या "गॉसिपला" घाबरुन सीतेला टाकले तसे आपणही आपापल्या पत्नि/नवर्‍यांना सोडुन देत सुटायचे का?
पुराणात्लया गोष्टी चांगल्या अन वाईटातला फरक कळावा म्हणून सांगितल्या गेल्या आहेत, त्यातिल वाईटाचाच आदर्श धरुन "रिडल्स" गाजवायची असतील, तर गाजवा बोवा.... मला काय त्याचे? इट्स नथिम्ग माय बिझनेस...

वाईन व ब्रेड, हे 'अन्न' आहे. वाईन, बियर, इ. प्रकारच्या दारवांतून चक्क न्यूट्रिशन वगैरे मिळते म्हणतात.
एकतर हे विधान मोघम आहे "म्हणतात" म्हणजे तुम्हाला नक्की माहिती/खात्री नाहीच्चे, तरी तुम्ही ठोकुन देताय.... तर असो, क्षणभर हे देखिल खरे मानु, पण मग आमचे एक महाराष्ट्र व देशाचे थोर नेते "शिवांबु" प्राशन करायचे , त्यामागे देखिल तेच तत्व आहे, न्युट्रिशनचेच हो..... असे चमकताय काय? Proud तर ते नेते प्यायचे म्हणून उद्या सक्काळपासुन पहिल्या धारेचे शिवांबु प्राशन करु लागणार का? तुम्हांला शुभेच्छा !

दारू, अधिकृतपणे, सैन्याचा जोष वाढविण्यासाठी वापरले जाणारे उत्तेजक द्रव्य आहे. मिल्ट्री कँटीनला स्वस्तात मिळते, ती उगंच नाही. चॉकलेट व दारूचे रेशन 'जवानांना' मिळते, तेही उगंच नाही.

तुम्ही सैनिक आहात काय? त्यांच्या इतके व्यायामाचे विविध काबाडकष्ट तुम्ही केले आहेत्/करत आहात काय? तुम्ही लढाई/युद्ध केले आहे काय? गेला बाजार "मारामारी" तरी केली आहे काय? मुख्य म्हणजे सैनिकीपेषा आहे का तुमचा? जर हे नसेल, तर सैनिकांना मिळणार्‍या दारुच्या रेशनवर "टुकत" का बसता आहात? असे दुसर्‍यांचे "खाणेपिण्यावर" लाळ गाळणे बरे नव्हे.. Proud

अल्कोहोल इन मॉडरेशन इज ऑल्सो सपोज्ड टु बी गुड.
पुन्हा मोघम विधान, फकस्त सोजिरांच्या भाषेत.... म्हणे "सपोज्ड" , म्हणजे नक्की खात्री नाहीच.
अन कसल घंट्याच मॉडरेशन? काय गुड्ड? काहीही हं (श्रि)... उगा आधुनिक "अंधश्रद्धा" पसरवु नका....

दारूला हात लावला रे लावला की तो दारूड्याच झाला असेही नसते.
सांभाळा बर. जितका रस्त्यावरील्/बस लोकल ट्रेनमधिल वा कुठल्याही बाईला हात लावला/लागला रे लागला की तो पुरुष हा "नतद्रष्ट/वासनांधच" समजला जातो व पब्लिक त्याला ठोकुन काढते, तितकेच गंभिर प्रकरण दारूचे आहे. अहो दारुला हात लावणे सोडाच, साधे हातभट्टी/दारुच्या दुकानाबाहेर चणेफुटाणे खात खात उभे र्हावा, तुम्ही दारु न पिताही लोक तुम्हाला बेवडा समजु लागतील, अन तुमच्यापासुन चार हात लांबच राहु लागतील. विश्वास नै बसत? मग जरुर प्रयोग करुन बघा.... Proud

ऑकेजनल अल्कोहोलिक्स, सोशल ड्रिंकर्स, रेग्युलर मॉडरेट ड्रिंकर्स, बिंज ड्रंकार्ड्स, विनोज, अ‍ॅडिक्ट्स असे अनेक प्रकार दारू पिणार्‍यांत आढळतात.
या मद्याच्या व्यसनाच्या स्टेजेस आहेत असे वर मानव यांनी सांगितलेच आहे.
पण माझे काय म्हणणे आहे? वरील नावे घेतलीत तुम्ही, ती काय तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीतुन मिळणार्‍या डॉक्टरकीच्या पदव्या वगैरे वाटल्यात का? Wink सर्टिफिकिटाची गुंडाळी वा छातिवर लावायचे बिल्ले आहेत ती नावे म्हणजे? मोठ्या अभिमानाने मिरवायला? यातिल एक तरी विशेषण तुम्ही घरीदारी वापरुन स्वतःचे वर्णन करु शकाल का? "गडे की नाऽऽ मी की नै, कालपर्यंत ऑकेजनल अल्कोहोलिक्स होतो, आता मला डब्बल प्रमोशन मिळालय, अन मी डायरेक्ट रेग्युलर मॉडरेट ड्रिंकर्स बनलोय , तर ना आजपासुन मला चकणा थोडा जास्तच हवा असेल".... सांगु शकाल का असे तुम्ही घरीदारी? Wink

कायेना, अर्धवट माहितीवर उचलली जीभ लावली टाळ्याला असे करु नये, अगदी ड्युप्लिकेट आयडीजनी सुद्धा असे करु नये.... असे आपले माझे मत बर्का..... !

बाकी तुम्हाला अजुन काय सांगावे? तुमचा "निश्चय" झालेलाच दिस्तो....
तर अजुन दारु पिण्याचा ज्यांचा निश्चय झाला नसेल , वा आत्ता आत्ताच चाखली असेल, अशांकरता ही पोस्ट, बर्का... तुम्ही नका लोड घेऊ... Happy नथिंग पर्सनल फॉर यू.....

>>>> बाकी नशा शराब मे होता तो नाचती बोतल... हे हि खरेच न ? <<<<
हो, खरेच आहे, तर तर? कुणाला काही शंका?
फक्त होते काय, की दारु भरलेली "बाटली" नाचत नाही, दारु पिलेला माणूस मात्र "नाचू" लागतो....
अन दारुला बिचारीला ते कळत नाही, की मगाशी तिकडे तर अस होत, अन आता इकडे अस होऊ लागलय....
मग दारू काय करते? त्या माणसाचेच "ठोकळ्या बाटलीत" रुपांतर करुन टाकते... बरेच लोक त्याला मोठ्या अभिमानाने (प्राऊडने हो) "टॅन्कर" असेही संबोधतात.... Proud असो. नथिंग पर्सनल, बर्का... Happy

विजय देशमुख,
कोणी कोणाला कंट्रोल करायला हवे हे वाटणे वेगळे आणि प्रत्यक्षात कोण कोणाला करते हे वेगळे !

नशा शराब मे ही होता है | बोतल मे जान होती तो उसका भी अंजाम वही होता जो इन्सानोंका होता है|

बाकी नशा शराब मे होता तो नाचती बोतल... हे हि खरेच न ?

हे "दूधात प्रोटीन्स असते तर बाटली वाढली असती" किंवा "पोटॅशियम साइनाड विष असतं तर बाटली मेली असती" असं म्हटल्यासारखं नाही वाटत?

>>> हे "दूधात प्रोटीन्स असते तर बाटली वाढली असती" किंवा "पोटॅशियम साइनाड विष असतं तर बाटली मेली असती" असं म्हटल्यासारखं नाही वाटत? <<<< Lol कस्ली अचूक उदाहरणे दिलियेत.... व्वा, मान गये उस्ताद !

एकंदरित (स्वतः सोडून इतर) कुणी काय खावे व प्यावे यावर कंट्रोल ठेवणारे संस्कृतीरक्षक भरपूर झालेत आपल्याकडे. कसल्ल्या मिर्च्या लागल्यात Biggrin

ज्यांना सोसत व परवडत नाही त्यांनी पिऊ नये. Wink

सदर धाग्याच्या लेखकाने पुर्वी दुस-या एका चर्चेत "एक दिवस मरायचेच तर आहे" असे म्हणुन, स्वतःच्या सिगरेट फुंकण्याचे जोरदार समर्थन केले होते.
तेव्हा त्याला "प्रश्न, मरायचेच असेल तर काय असा नसुन, हेल्दी जगायचेच असेल तर काय" असा आहे असे उत्तर दिले होते.
लेखक महाश्य ते सर्व विसरुन इथे साळसुदपणाचा आव आणुन टीआरपी वाढवणारे धागे विणन्याचे कर्तव्य पार पाडत आहेत.

अकलेचा कांदा - सोसली आणि परवडली म्हणजे दारू चांगली होत नाही.

संस्कृती रक्षणाचा मुद्दा ओढून ताणून आणायची काहीएक गरज नाही.

उलट 'दारू, किंवा अल्कोहोल अनेक रूपांत पुरातन काळापासून माणसांच्या पिण्यात, खाण्यात आहे.' हा मुद्दा आपणच ना मांडला होतात. म्हणजे दारूबंद करायला सांगणे म्हणजे पुरातन संस्कृती बुडवायला बसलोय आम्ही असे म्हणायचंय का तुम्हाला.

चि. रुन्मेष

अापण दारु प्यायलात का? साॅरी चाखलीत का?
दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

हर्पेन,

दारू ही पिण्यासाठी बनलेली गोष्ट आहे. तुम्ही कितीही चिडचिड केलीत तरी लोक ती प्राचीन काळापासून पित आहेत व पिणारच.

कुणी दारू प्याला म्हणजे त्याचे जग बुडालेच ही कन्सेप्ट चुकीची आहे, लोक लिमिटेड व मजेसाठीही दारू पितात व पिऊ शकतात, हे कितीही सांगितले तरी तुम्हाला पटणे शक्य नाही. तेव्हा तुम्ही जौद्या.

माझी पोस्ट वरच्या हिंदूबंधू संस्कृतीरक्षकासाठी आहे, ज्यांनी दारूला हात लावण्याची तुलना कुण्या परक्या बाईच्या अंगाला हात लावण्याशी केलेली आहे Wink असंबद्ध बडबड करण्यात यांचे तोंड कुणी धरू शकत नाही. त्यांच्याकडून मूल्यवान करमणूक वसूल करणे हाही एक उद्देश माझ्या पोस्टींमागे आहे.

तिसरं म्हणजे आपले श्रीमान रुन्मेस. त्यांना दारूबंदी लेक्चर्स देण्याची जाम हौस आहे, ती हौसही फेडून पाहतोय.

सदर धाग्याच्या लेखकाने पुर्वी दुस-या एका चर्चेत "एक दिवस मरायचेच तर आहे" असे म्हणुन, स्वतःच्या सिगरेट फुंकण्याचे जोरदार समर्थन केले होते.

<<

येच ब्बात! पण, हे जरा अजून थोडं ता थैया झाल्यावर आणावं म्हणून सांभाळून ठेवायला हवं होतं Sad सिग्रेटच्या वासाने मला मळमळतं हे लिहिलंय ना राव मी वरती!

बाकी कोणती दारू कोणत्या मोसमात, कोणत्या धातूच्या/मातीच्या इ. पात्रातून प्यावी, याचं डिट्टेलवार वर्णन आयुर्वेदात आहे बरं का. तेव्हा लोकहो, दारूच्या बेनिफिशिअल व मेडिसिनल युजेसबद्दल आधी थोडा गूगल वापरा, नच जमले, तर आपले अकलेचा कांदा साहेब आहेतच समजवून सांगायला. Lol

>>> माझी पोस्ट वरच्या हिंदूबंधू संस्कृतीरक्षकासाठी आहे, ज्यांनी दारूला हात लावण्याची तुलना कुण्या परक्या बाईच्या अंगाला हात लावण्याशी केलेली आहे डोळा मारा असंबद्ध बडबड करण्यात यांचे तोंड कुणी धरू शकत नाही. त्यांच्याकडून करमणूक मूल्य वसूल करणे हाही एक उद्देश माझ्या पोस्टींमागे आहे. <<<<

ओह अस आहे होय...... बरे झाले लौकर सांगितलेत... Wink फक्त वसुल करणे सोडा, तुम्हालाच करमणूक कर भरावा लागेल.... लक्षात असुद्यात..! Wink अन ती दारुतील न्युट्रिशन्सबाबतची तुलना बरे विसरलात? Lol

(तरीच्च म्हणलं....कट्टा गृपपुरता मर्यादित झाल्यावर तिकडे हालचाल होत नव्हती अज्जाबात, तर ती हालचाल गेली कुठ्ठ? Proud )

किन्तु मद्यं स्वाभवेन् यथैवान्नं तथा स्मृतम् |
अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तम् यथामृतम ||

अभ्यास वाढवा. हात लावून पहावा, अशी तुमची मनोमन इच्छा असली तरी हिम्मत होत नाही, ही खरी मेख आहे, हे मान्य करा व बाकी चालू द्या.

** असंबद्ध बडबड करणारे हिंदूबंधू संस्कृतीरक्षक तुम्हीच, हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन Wink

आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला ।
झाला तशांत मग वृश्र्चिकदंश त्याला ।
झाली तयास तदनंतर भूतबाधा ।
चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा ।।'

असे काहीसे स्तवन/कवन आहे ना? ते आठवले Proud दारूचे दु:ष्परिणाम कळण्यास हे पुरेसे ठरावे, नै?
कदाचित धागाकर्त्याच्या प्रश्नाचे उत्तरही यातच सापडू शकेल... कसे?
तर माणुस म्हणे पूर्वी कपिच (मर्कटच) होता, कपिपासुनच त्याची उत्पत्ति... वगैरे वगैरे....
तर मानव काय की मर्कट (कपि) काय, किंबहुना मानव मानव न रहाता त्याचा पूर्वाश्रमीचा "कपि/मर्कट" बनतो तेव्हाच तो मद्य पितो असाही एक तार्किक अर्थ काढता येऊ शकेल, नै? Wink

(थांबा थांबा... वरचा बहुतेक पुराणोक्त असावा, "वेदोक्तही" देतो... Wink Lol हो ना, उगा त्यावरुन कटकट /कलकलाट नको.... घ्या तर मग...
मर्कटस्य सुरापानम् तत्र वृश्चिकदंशनम् |
तन्मध्ये भूतसंचारो यद्वा तद्वा भविष्यति || )

यापुढे मजला अशीही शंका येते आहे की, "कपि" हे संबोधन प्राण्याच्या वास्तव नाम-जातिवाचक असुन, "मर्कट" हे संबोधन अन्य प्राण्यांस विशेषण म्हणून वापरण्यात येते की काय? Proud

महोदय, ते वर्णन तुम्हास पर्फेक्ट लागू पडते Wink तेव्हा कपिवर, माझ्याशी बोलणे थांबवा व आपल्या अगाध व असंबद्ध लीला सुरू ठेवा ही नर्म विनंती.

(तुमच्याशी बोललो, तर अ‍ॅड्मिन)"आबा कावत्यात"

नथिंग टू ओफेन्ड बट
हिंदू धर्मात देवी देवता पण मद्य प्यायचे असे उल्लेख पुराणात आहेत.

रामायणात सीतेने वनवासात जाताना गंगा देवीची प्रार्थना करताना तुला हरणाचे मांसमिश्रित भात आणि उत्तम अश्या मद्याचे सहस्त्र घट अर्पण करीन असा उल्लेख अाहे.

महाभारतात वासुदेव अाणि अर्जुन यांच्या घनिष्ट मैत्रीचे वर्णन करताना दोघे मद्य पिऊन धुंद झाल्याचा उल्लेख आणि बराच काही लिहिले आहे.

देवीपुराणात देवी युद्ध करताना मद्याचे घोट घेत होती असे लिहिलेय.

शिवाय उज्जैनला काळभैरव मंदिरात. दारूचा नैवेद्य दाखवतात शिवाय दारूचा प्रसाद देखील मिळतो.

माझा उज्जैनचा मित्र नुकताच ओल्ड मंक चा नैवेद्य दाखवून आला.
Happy

ऑकेजनल अल्कोहोलिक्स, सोशल ड्रिंकर्स, रेग्युलर मॉडरेट ड्रिंकर्स, बिंज ड्रंकार्ड्स, विनोज, अ‍ॅडिक्ट्स असे अनेक प्रकार दारू पिणार्‍यांत आढळतात.
>>या मद्याच्या व्यसनाच्या स्टेजेस आहेत.<<

अभ्यास वाढवा Wink

>>
या उपरही जर त्याच्या धाग्याचा अथवा इतर कुणाच्या धाग्याचा मायबोली समुहात खरच त्रास होतच असेल तर त्यावर चर्चा करायला हरकत नक्कीच नसावी, तक्रार करायलाही हरकत नसावी.
तसेच या दारु विषयाबद्दल आहे. त्यावर चर्चा करण्यास हरकत नसावी.
<<

आपण उदार अंतःकरणाने ना-हरकत दिलीत, त्याबद्दल समस्त कांदेवाडीकडून आपणास धन्यवाद!

सदर धाग्याच्या लेखकाने पुर्वी दुस-या एका चर्चेत "एक दिवस मरायचेच तर आहे" असे म्हणुन, स्वतःच्या सिगरेट फुंकण्याचे जोरदार समर्थन केले होते.

>>>>>

सदर धागाकर्ता? मी? ऋन्मेष मायबोलीकर?? आणि सिगारेट ??

आर यू शुअर??

मी सिगारेट पितच नाही तर तिचे स्वतासाठी समर्थन कुठून करू?

जरा लिंक द्या बघू, नक्की काय आणि कश्याच्या संदर्भात बोललेलो हे बघतो..

चि. रुन्मेष

अापण दारु प्यायलात का? साॅरी चाखलीत का?
दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

चि. रुन्मेष

अापण दारु प्यायलात का? साॅरी चाखलीत का?
दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

सदर धाग्याच्या लेखकाने पुर्वी दुस-या एका चर्चेत "एक दिवस मरायचेच तर आहे" असे म्हणुन, स्वतःच्या सिगरेट फुंकण्याचे जोरदार समर्थन केले होते.

>>>>

वर मी याची लिंक मागितलेली, मिळेल का प्लीज?

जर मी सिगारेटच पित नाही तर नक्की हे कश्याचा सम्दर्भात बोललेलो ते बघायचेय., आठवत नाहीये काही

बाहुबली | 28 July, 2016 - 20:40
चि. रुन्मेष

अापण दारु प्यायलात का? साॅरी चाखलीत का?
दारु चाखली म्हणजे नेमके काय केलेत?
कोणती दारु चाखली?
नीट की मिक्स करुन? (अर्थात हे दारूच्या प्रकारावर अवलंबून आहे)

>>>>>

आपल्यासाठी ही लिंक
माझा पहिला मद्यप्रयोग ! - http://www.maayboli.com/node/59525

आता सांगा तुमचा मुद्दा नक्की काय होता?

Pages