काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सम्पली परवा कादिप.
मला तरी शेवट आवडला....फार मस्त अभिनय सगळ्यांचाच..... अम्मा, बाबूजी, शिव......... अहाहा....!!
शिव दिसत पण किती गोड होता.....
पण सरला ला का गायब केले ऐन वेळेवर कोण जाणे!!

हो आणि त्यातलं एक बाळ ती सरलाला देणार हे पण गौरीने सांगितलं. सगळ्या शेवटच्या एपिसोड मध्ये सरला का नाही ? एवढी घरातली मोठी सून असूनही. हे काही बरोबर नाही Happy

सम्पली का एकदाची? "हुश्श" Uhoh
आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?
झी मराठी ला म्हणावे जरा झी युवा चे ** खा..

खरतर सरलाला दाखवायला हवे होते. एक बाळ गवरीकडे आणि एक बाळ सरलाकडे

शिव दिसत पण किती गोड होता.....>>> तो चहा पितानाचा कातिल शिव पण एकद दाखवला

एक तरी गुपित की सरलाला मुलगी दिली की मुलगा>>>> मग हि दुसर्या भागाची नान्दी असावी बहुधा.

आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?>>> नो छळवाद. सम्भाजी सुरु झालीये त्या जागेवर.

आता कोणता छळवाद सुरू होणारे म्हणे?>>> नो छळवाद. सम्भाजी सुरु झालीये त्या जागेवर. >>>> ..अमोल कोल्हे
नकोरे बाबा, तो शिवाजी महाराज म्हणुन सुद्धा आता अती झालाय.

दुसरे कोणी असते तर नक्की पाहिली असती

[काय झाला शेवट ? अम्मा सुधारल्या का ?]
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले.

मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले. >>>> ओके. मालिका बघायची सोडली ते बरं झालं.

निशा पण सुधारली असेल ना मग >> हो एकदम सुधारली . तिचा नवरा जो आतापर्यंत तिच्याशी तुसडेपणे वागत होता तो अचानक आजीला निशाची बाजू घेऊन बोलला कि मीच तिला खाली रिक्षाचे पैसे घेऊन बोलावलं होत इत्यादी. आजी आता ती सुधारलेय तुला कळत नाही का ? इत्यादी इत्यादी Happy

बर झाली संपली ते. अता झी टी व्ही वर काय मालिका चालु आहेत या बद्दल काही ही माहित नाही. आम्ही जेव्हा टी व्ही विकला तेव्हा चालु असणारी ही शेवटची सिरियल.
अत्तापासुन उपग्रह वाहिनी च्या धाग्यावर जाणे बंद Happy

शेवटच्या भागात पण चांगल्या कलाकाराना गायब करतात Uhoh

मी पाहत असलेल्या दोन्ही (आणि दोनच) मालिका संपता संपता म्हणजे गेल्या शुक्रवारी आमच्या टीव्हीनेपण राम म्हटला. त्यामुळे नव्या मालिका आपसूक टळल्या.
आता नवा टीव्ही घेतला की प्रो कबड्डी संपेतो झीकडे बघणार नाही.
मायबोलीवरचा हा ग्रूपपण सोडू काय ? Wink

मी निशाचं विचारायला आले होते. कारण ही सिरियल जेव्हा शेवटच्या घटका मोजत होती तेव्हा मी नेमकी पहायची बंद केली. बरं झालं

आणि हे शिरेल वाले किती सोयीने वागतात.
तिकडे जानीची डिलिव्हरी दिड वर्ष लांबवली होती म्हशीसारखी का तर शिरेलित पाणी घालता यावं म्हणून...
आणि हितं गवारीला लगेच जुळं देऊन बाळंत करून टाकली. शिरेल समाप्त.

तिकडे जानीची डिलिव्हरी दिड वर्ष लांबवली होती म्हशीसारखी का तर शिरेलित पाणी घालता यावं म्हणून...
आणि हितं गवारीला लगेच जुळं देऊन बाळंत करून टाकली>>>>>> Lol

सुधारण्याची साथच आली मालिकेत. आधी हम्मा सुधारली. मग तिने फोनवरून निशाला लस टोचली. तीपण सुधारली. आजीला खात्री नव्हती. म्हणून तिने आपल्या कुड्या निशाच्या कपाटात ठेवल्या. त्या मिळाल्यावर निशाने आजीला आणून दिल्या. आजीची पण खात्री पटली आणि तिने निशाला मिठी मारली एकदाची, सुधारलंस गो बाय म्हणून. तिला बर्फी की जिलेबी असं बिरुदही दिलं.

[काय झाला शेवट ? अम्मा सुधारल्या का ?]
मालिका गुंडाळायची म्हटल्यावर त्यांना सुधारणे भागच होते.गौरीने सगळ्यांसमोर कैवार घेतल्याने पश्चात्तप झाला..खूप रडारड केली. त्या अश्रूपातात जातिभेद, मांसाहार म््हणजे पाप हे विचारपण वाहून गेले.>>>> तशी हि झी मराठीची परम्पराच आहे म्हणा. मालिकेचा शेवट येईपर्यन्त खलनायक्/खलनायिका कधी सुधारत नाही. पण मालिकेच्या शेवटच्या भागात ते अचानक सुधारतात. मानबा मध्ये सुद्दा शेवटच्या भागात गुरु आणि शनायाला अचानक असाच हदय परिवर्तनाचा झटका येईल. Lol

Pages