काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजी ला 'नर्मदा' शब्द उच्चारता येत नाही ? काल नचि खूप गोड दिसत होता...तो पण फार नॅचरली अभिनय करतो...... आजी ओव्हर अ‍ॅक्टींग करत्येय. बळंच आपलं हासवायचा नाद !
आणि गवरीने आधीच काय भयाण उपमा केलेला आजी साठी...नुसता रव्याचा चिखल ! मिरची कोथिंबीर, कांदा...कशाचाच पत्ता नाही! त्यात मग अजून पाणी ओतले सरलाने..........!!! काहीही दाखवितात.

नामर्दा का काय्तरी बोलते ना आजी हम्मा ला? Uhoh झी वर इतकी वेळ आली का की कसलेही ओढून ताणून विनोद करायचे आणि प्रेक्षकांना हसवण्याचा क्षीण प्रयत्न करायचा.

दक्षिणा....... खरेच.. क्षीण प्रयत्न! Happy
आणि आजी दादीजींना टाळी काय मागते..." दे टाळी" करुन !! ती असं गृहित धरुन मराठीत कशी काय बोलू शकते ? आणि तो एक कुणी माणूस दिसतो.. आजी झारा घेऊन जाताना दाखविलेय...तर त्याला म्हणते... " हिंदी नाय......... मराठीत बोलनेका.....हम्मा मी इलंय........"!! काहीही.....
बनारसला मराठीत कुणी बोलेल ही अपेक्षाच काय म्हणून?
कोण लिहीतं हे असले दळभद्रे डायलॉग्ज?
Angry

आणि गवरीने आधीच काय भयाण उपमा केलेला आजी साठी...नुसता रव्याचा चिखल ! >>> आ, इतकी वर्ष माहेरी राहून गौरी काहीच शिकली नाही का स्वयमपाकाच? Uhoh

मानबा मधे तर तो हसणारा डॉक्टर तर कसला डोक्यात जात होता.दक्षिणा....... खरेच.. क्षीण प्रयत्न! Happy
आणि आजी दादीजींना टाळी काय मागते..." दे टाळी" करुन !! ती असं गृहित धरुन मराठीत कशी काय बोलू शकते ? आणि तो एक कुणी माणूस दिसतो.. आजी झारा घेऊन जाताना दाखविलेय...तर त्याला म्हणते... " हिंदी नाय......... मराठीत बोलनेका.....हम्मा मी इलंय........"!! काहीही.....
बनारसला मराठीत कुणी बोलेल ही अपेक्षाच काय म्हणून?
कोण लिहीतं हे असले दळभद्रे डायलॉग्ज?>>> सहमत

उपमा खरच भयाण दिसत होता, डॉयलॉग्ज डेजर असले तरी आजी माका आवडते, गवरिने सुरळिच्या वड्या केल्या नाही पण खाल्ल्याही नाही कधी?
कन्सेप्ट वैगरे जाउ देत पण तरी त्यातल्या त्यात बरी अशी हिच सिरियल वाटते मला , हिन्दी सिरियलची कॉपी असली तरी किमान कॉपिशी इमान राखुन गोन्धळ घालतात बाकी उतरत्या भाजणीने खुकखु सगळ्यात माठ आहे.
शिव मस्त अ‍ॅक्तिन्ग करतो , काहि काही सिन्स मधे कातिल दिसतो.

प्रेगनन्सी टेस्ट ची एवढी भिती का म्हणे वाटत होती गवरीला Uhoh म्ह्णजे ती गोड हुरहुर वगेरे नव्हती तर चक्क टेन्शन आलं होतं तिला. बातमी कन्फर्म झाल्यावर पण किती तो रडका चेहरा. लाजता येत नव्हत म्हणून चेहर्यावर हात ठेवले.

मला वाटत होतं की कुठल्या तरी प्रेग्नन्सी टेस्ट किट ची अ‍ॅड होणार आता .... असं झालं तर मग
वीणा वर्ल्ड, प्रेग्नन्सी किट, होस्पिटल, बेबी प्रॉड्क्ट्स, ग्राईप वॉटर वगैरे वगैरे ... नशीब मधल्या काही सिच्येशन वापरल्या नाहीत... Wink Lol

हो ना! शिव मस्त अभिनय करत होता..... एक नंबर.
इव्हन राम पण किती छान काम करतो...! सरलाही..!!
आणि आता अम्माने नवीन काय काढलंय.. की सरला से जो बच्चा होगा वही शुक्ल खानदान का असली वारीस होगा.. काहीही...!!

ग व री काल फार मठ्ठ दिसत होती क्लोजप मधे... आहेच म्हणा ! तिची बोटं किती शॉर्ट आहेत ! तीच किती बुटकी आहे इन फॅक्ट ! जरा जास्तच!!!
शिव सारखा उमदा, हँडसम नवरा मिळालाय नशिबाने!

अत्यंत भिकार मालिका, लाँग विकेंड ला चुकून दोन भाग पाहिले.
आज्जी ला दादी चाट खायला घेऊन जाते, ते पण चोरून? Uhoh काय गरज? जौनपूर वालीला गप्प बसवते ना? मग अजून कुणाची भिती? ते पण या वयात?
निशाची नक्की भानगड काय झाली आहे? परत काही खोटं वगैरे बोलली आहे का ती? प्रेग्नन्सी चं नाटक करून तिने फसवलंय का? नचिच्या बोलण्यात तसा उल्लेख आला.

निशाची नक्की भानगड काय झाली आहे? परत काही खोटं वगैरे बोलली आहे का ती? प्रेग्नन्सी चं नाटक करून तिने फसवलंय का? नचिच्या बोलण्यात तसा उल्लेख आला.>>> हो तिने प्रेग्नन्सी चं नाटक केले ते गौराक्काल कळते. मग तिने शिव आणि गौराक्काला आपल्या बाजुने करुन नंतर या प्रेग्नन्सीच्या नाटकातून बाहेर येण्यासाठी एका दवाखान्यातल्या परिचारिकेला देण्यासाठी रु. १०,००० घेते. नची जेव्हा गौराक्काच्या घरी जातो तेव्हा निशा माहेरी पाय घसरुन पडल्याने मिसकॅरेज झाल्याचे सांगते.
पुढे नची जेव्हा तिचे नाटक माहित असल्याचे बोलतो तेव्हा मी फक्त तुझ्यावरच्या प्रेमाखातर, तुला मिळवण्यासाठी असे केले आणि हे मला गौरीने सुचवून त्यात मला तिने मदत पण केली असे सांगते.

सरला-राम ला बाळ होणार नाही म्हणे...... आता गौराक्काला महानतेचा झटका येणार आणि ती आपले बाळ सरला-रामला देणार Happy

सोनाली.... अगं बाई असं होय? Uhoh काहीही करते ही निशा... अर्धवट बाई.
आता गौराक्काला महानतेचा झटका येणार आणि ती आपले बाळ सरला-रामला देणार Happy --> तिच ती घिसिपिटी त्यागमुर्ती ची कथा.. Uhoh

हो शिवची अ‍ॅक्टींग मस्त होती जेव्हा न्यूज साठी उतावीळ होऊन गौरीला विचारत असतो तेव्हा हलकं हसू असतं त्याच्या चेहेर्यावर...मस्तच

ओ के.....म्हणजे आता सरलाही नाटक करणार ...दोघीही प्रेग्नंट! ...आणि मग गवरी तिचं बाळ सरलाला देईल...(पण मग गवरीला कोणतं बाळ? की जुळी दाखवतात देव जाणे!)
मग जो घराण्याचा असली वारीस तो खरे तर शिव गवरीचा मुलगा.................................... कथानक २५ वर्षांची लीप घेईल व तो मुलगा मोठा होऊन नाव काढेल किंवा यांना खूप मदत करेल.
गवरी कदाचित घर सोडून गेलेली... ती त्यावेळी पुन्हा येईल.....व मग सगळे मिळतील . हम्मा ला चूक रिअलाईज होईल.
:रागः

गवरी खरी प्रेग्नन्ट सरला ने नाटक केलं तर ती खोटी प्रेग्नन्ट मग गवरी सरला ला गपचूप बाळ देईल
अम्मा गवरी च बाळ काय झालं विचारत गवरी ला हाकलून देईल
मग गवरी जीव देईल गंगा किनारे
मग ते कोणाला माहीत नसेल
मग ती बाळाला भेटायला येईल
आणि इतक्यात दार वाजेल
पण सगळे दरवाजा उघडायला जातील
मग मो जो असतील ते वाईट बातमी देतील
शिव बोलेल गोरिजि तो यही है
पण गवरी नसेल
मो जो बोलतील ती शेवटचं बाळाला बघायला अली होती वगैरे
अश्या प्रकारे बाळा गाऊ कशी अंगाई चा रिमेक होईल

आणि आपण सुटू

गवरी कदाचित घर सोडून गेलेली...>>> मग शिवचा मजनू चाचा होईल. Proud

मग गवरी जीव देईल गंगा किनारे>>> कशाला? तिची आमची मुम्बई आणि मोजो आहेत कि तिला साम्भाळायला. मुम्बईची मुलगी आहे ना ही!

गोद भराईच्या पूजेत गवरी ने जायचं नाही असं हम्मा ने स्पष्ट सांगितलं. इतकं फटकळ असतं का कोणी कधी खरंच? आणि सुना पण अशा गवरीसारख्या मूग गिळू असतात? घडाघडा बोलून रिकाम्या का नाही होत? आणि सरला च्या पोटी येईल तोच शुक्ल खानदान का सच्चा वारिस असेल असं हम्मा म्हणते, मग गवरीच्या पोटी काय खोटा वारिस येणार आहे का? Uhoh आणि गवरी अपसेट होऊन शिव ला "मै अभी तय्यार नही हूं" म्हणते म्हणजे आता पोटातल्या पोटात प्रेग्नंसी थांबवणार की काय? Uhoh आणि बिलाच्या लायनीत मागच्याला आपला नंबर देऊन पुढे ढकलतो, तसं गवरी सरला ला पुढे घालणार की काय?
वाट्टेल ते... फाल्तू शिरेल
आज चुकून पाहिला एपिसोड् (ऐकला रादर)

दक्षिणा..... माझी पण अशीच चिड्चिड झाली Happy

गरोदरपणाचे नाटक, मग बाळ देणे-घेणे अश्या भानगडी सोप्या असतात काय? नुसती फालतुगिरी!!!

(पण मग गवरीला कोणतं बाळ? की जुळी दाखवतात देव जाणे!) >>> तिळं दाखवायला पाहिजे , निशाचं नको का बघायला Happy .

इथली आजीजी आणि दादीजी मधली साप-शिडी ची भांडणे ऐकुन गीता काकीने तिथे इशाला लहानपणीच साप-शिडी शिकवायला सुरवात केली. उगाच म्हातारी झाल्यावर भांडणाला अजुन एक कारण नको Proud

गौरीची व्यक्तिरेखा गंडलेली आहे. कधी ती अम्माचा हात धरुन सुनावू शकते आणि कधी अम्मासमोर हतबल दाखवली जाते. शिव तर बिनकण्याचा नवरा आहे. त्याला फक्त रोमान्स दिसतो, बाकी 'हम है ना' हा ड्यलॉग मारतो आणि मग अम्मासमोर शेपूट घालतो

Pages