काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मजनूचाचाची मुलगी खरच हिरवनी आहे .
कोल्ड शोल्डरचा ड्रेस्स , हायलाईट केलेले केस .
दाअदीला ते बरं चाललं , अगदी तोंड भरून कौतुक करत होती .
गुन्डाळतायेत वाटतं गाशा . भरत मिलाप चालू आहे .

रच्याकने , गौरीचा कितवा महिना म्हणायचा ? जानूसारखीच केस होणार आहे वाटतं !

आयला काय छळ आहे? सर्व सिरियल्स मध्ये (खास करून झी च्या) हिरॉईन प्रेग्नंट असली तर पोट दाखवत नाहीत.
Uhoh

<< गुन्डाळताये त वाटतं गाशा . भरत मिलाप चालू आहे . >> इतकं सगळं आतां गोडू गोडू चाललंय; माझ्यासारखे डायाबेटीसवाले बघत असतील तर औषधाचा डोस दुप्पट करणं उत्तम !!! Wink

हो ना.... कादिप चे दिवसही भरत आलेले दिसताहेत! अम्मा एकदम गोड गोड, निशाला उपरती, चाची चे पुनरागमन,..सारे कसे छान छान...
पण हम्मा ग्रेट अभिनय करत्ये.....मानावेच लागेल.

नवर्‍याची बायको पण संपविणार का सिंगापूर अध्यायाने सांगता करुन?
प्लीज.......!!
म्हणजे, कादिप, खुकखु, मानबा.... तिन्ही संपणार? वा वा!!!

ती रमा आलिये तिचा रोल बघता ती अजून काहीतरी नवीनच खुसपट काधेल अशी शंका आहे मला Wink
म्हणजे इतकं मोठं घर, जायदाद, घरचा स्वतःचा व्यवसाय (साड्यांचा) यातून इतकी वर्षं वगळलं तर मग आता याचा वचपा काढण्याचा प्रयत्न, त्यात ती बुआ आणि फूफा तिला मदत करणार, इतरांच्या मनातल्या अपराधी भावनेमुळे तिला त्या सगळ्यांकडून मिळणारा सोफ्ट कॉर्नर आणि अतिविश्वास वगैरे....मग पुन्हा एकदा गौराक्का यातून शुक्ल खानदानाला वाचवणर आणि मग कुठे समाप्ती! त्यात प्रेग्नन्सी ही दीडवार्षिक असल्यामुळे (संदर्भ-होसूमीयाघ) अजून वर्षभर होईल हे दळण!

:पळा: Proud

९ ने सर्वांच्या मनातील आशा आकांक्षांना सुरुंग लावला >>> होना Sad मला पण वाटत होत की मालिका संपत आली म्हणून

असं काही होऊ नये असंच मलाही वाटतंय, पण झीची दळणपरंपरा बघता काय करतील सांगता येत नाही! Proud

त्यामुळे पुढची काडी - इकडे शुक्ल आणि तिकडे निशा अजून आहेच की! तिच्यात परिवर्तन वगैरे व्हायला वेळ आहे तो बहुतेक रमा-वगैरे शुक्लांच्या पॅरलली तिच्यातही होईल!

हुश्श! आजचा आणि पुढच्या अनेक दिवसांचा स्टॉक खल्लास! आज माझे ष्टूडंट्स न आल्यामुळे माझा अभ्यास करून उरल्या वेळात इथे टीपी करत होते, आता वेळ संपल्यामुळे सभा अनिश्चित काळासाठी समाप्त होत आहे. धन्यवाद! Proud

नवर्‍याची बायको पण संपविणार का सिंगापूर अध्यायाने सांगता करुन?>>> नाही, उलट राधिकाला गुरुचे पराक्रम सिन्गापूर मध्ये कळणार आहे. ती सरप्राईज देणार आहे नवर्याला सिन्गापूर मध्ये एकटी जाऊन, तिकडे तिला त्यापेक्षाही मोठे सरप्राईज मिळणार आहे. Lol मग नन्तर सवत माझी लाडकी+ बीवी नम्बर १ ड्रामा यात निदान वर्षभर तरी सिरियल दळण दळेल.

हो.. मी पण पाहिला नवीन मालिकेचा प्रोमो.
नकटीच्या लग्नाला... संपेल असं वाटतंय
या मालिकेत अजून पाणी घालायला स्कोप आहे तसा

नकटीचा आत्येभाऊ तिच्या प्रेमात पडलाय म्हणजे तीच संपेल बहुतेक.>> मग खर तर चांगलं होईल कारण ती अजिबातच बघत नव्हते मी. कथानकाला प्रचंड मर्यादा होत्या किव्वा कथानकाचा जीव अगदीच छोटा होता Happy

गौरी अतिशय चांगली सून आहे दाखवायला, तिला जुळी होणार मग ती एक मूल जावेला देणार. एक मुलगा जावेला आणि मुलगी हिला.

त्यागी सून म्हणजे = योग्य सून. 

मुद्दामून जुळी दाखवत आहेत एक तर दोन्ही मुलगे किव्वा एक मुलगा आणि एक मुलगी असं असावं असं वाटतंय . मुलगा मुलगी झाले तर मुलगी कदाचित जावेला आणि दोन्ही मुलगे झाले तरी एक मुलगा जावेलाचं असा लेखकाचा प्लॅन असावा Wink

योक्या Rofl
अरे मेसेज वाचून फुटले. जुळं. दिड+दिड
मी म्हणलं दिड मूल + दिड मूल की काय.. Rofl

एक मुलगा जावेला आणि मुलगी हिला.>>> मग पुन्हा अम्मा गौरीचा छळ करेल मुलगी झाली म्हणून आणि शिवच्या दुसरया लग्नाच्या मागे लागेल. हयापुढच्या रामायणात सिरियल दोन-तीन वर्ष सहज खपून जातील. इतक्या लवकर काही हि सिरियल सम्पत नाहीये.

Pages