काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घरात आईमुळे ह्या शिरेली बघाव्या लागतात, पण काल खरेच मज्जा आली, दादी कसे लाडू खात होती.!

एकत्र कुटुंबाचं गुणगान करतात या सिरियल्स उठ्सूट पण या मालिका बघुन एखादी भाबडी ( / निर्बुद्ध ?) लग्नाळू मुल्गी कट्टर शत्रू होईल `एकत्र कुटंब' ची.

गौरीच काम काय सतत अम्माना खुश ठेवण हे आहे का? प्रेग्नसी मधे स्त्री जास्तित जास्त कशी चिन्ताग्रस्त राहिल याकडे लक्ष देणार का?

शिवचा एक पॅटर्न ठरलेला आहे. ज्या गोष्टी आपल्या घरी चालत नाहीत किंवा ज्यांमुळे हम्माचा भडका उडणार आहे, त्या गोष्टी करायला गौरीला भाग पाडायचं>>>> तिच्या नोकरी करण्याच्या निर्णयाला नकार दिला होता त्याने

हम्मा गौरीवर बरसू लागली की तोंड उघडं ठेवून तिच्याकडे बघत बसायचं. आणि मग नंतर गुळचट शब्दांत आणि टोनमध्ये तिची माफी मागायची.>>> हिच का ती गौरी जेव्हा लग्नाआधी सावन्त पहिल्यान्दा एका दिवसासाठी बनारसमध्ये जातात, तेव्हा त्यान्चा दादी कडून अपमान झाला होता. तेव्हा ही गौरी शिव काहीच बोलला नाही म्हणून लग्न मोडून मुम्बईला यायला निघाली होती?

हम्माच्या नावावर इतक्या रिग्रेसिव्ह गोष्टी (परक्या मुलीला आपल्या घरात घेण्याआधी तिच्यावर गोमूत्र की गंगाजल शिंपडणे, राखेने हात साफ करायला लावणे, स्त्रियांनी नोकरी करणे, कमवणे म्हणजे पुरुष त्यांच्या जिवावर जगतात असे म्हणणे, परजातीतली मुलगी आणल्याने हुक्कापानी बंद हो जाएगा, दुसर्‍याच्या अन्नाला नावे ठेवणे - मग तो मांसाहार असू दे किंवा तेलात तळलेलं आहे म्हणून, बाहेरून आल्यावर गंगाजल शिंपडून शुद्ध होणे, नवर्‍याने बायकोचे ऐकणे वाईट्ट>>>> शिवचे बाबूजी कसे काय ऐकतात अम्माचे? Uhoh

इतके दिवस सावंत त्यांना बुरसटलेल्या विचाराचे म्हणायचे, ते आता म्हणाले नाहीत, एवढंच काय ते बदललं.>>>> सावन्त तरी कुठे नवीन विचारान्चे आहेत? तरी बर त्यान्नी आपल्या बायकोला, सासूला, मुलीला आणि सुनेला नोकरी करु दिली.

तरी पण आम्मा 'नाक कापलं तरी भोक आहे ' मोड मध्येच..
>>
Rofl
क्षणभर माझ्या डोळ्यासमोर voldemort चा चेहरा झळकला.

तरी पण आम्मा 'नाक कापलं तरी भोक आहे ' मोड मध्येच..
>>
Rofl
क्षणभर माझ्या डोळ्यासमोर voldemort चा चेहरा झळकला.>>>> Rofl

तरी पण आम्मा 'नाक कापलं तरी भोक आहे ' मोड मध्येच.>> Lol
शिवचे बाबूजी कसे काय ऐकतात अम्माचे? >>होना, या घरातल्या बायकांनी पुरुषांच्या डोक्याला ताप आणला आहे. रोज एक नवीन नाटक असते.

{तिच्या नोकरी करण्याच्या निर्णयाला नकार दिला होता त्याने}
यावरही आधी बोलून झालंय. फालतू गोष्टींत प्रागतिकतेचा आव आणि नेमक हवं तिथे शेपूट घातलं. खरं तर त स्वतःच तिने नोकरी करण्याच्या विरोधात होता. तेव्हाच तर आपल्याल आ कळलं की सरला मास्टर्स आणि ती नणंद एमबीए आहे.

गौरीच्या आवाजात पसायदान का ऐकवतात?? ज्ञानेश्वरानी रेड्याच्या तोंडुन वेद वदवले होते (म्हणे), इथे म्हैस पसायदान म्हणते.

ते आल्याबरोबर मी फास्ट फॉर्वर्ड केलं. हम्माने आता सरलाला वांझ डिक्लेअर करायचं शिल्लक ठेवलंय. सगळ्या रिग्रेसिव्ह गोष्टींचा मक्ता तिच्याकडे दिलाय. आणि बाकीचे लोक कडेलोट होईपर्यंत गप्प बसतात. बोलले तर एकेकटे बोलतात.
काल तिने मी माहेरी जाते अशी धमकी दिल्यावर आमच्याकडे "जा जा" असा कोरस उठला.

भयाण आहे ही मालिका! झी वाल्याची अक्कल काय शेण खायला गेलिये की काय? त्या हम्मा तिला ताबिज काय बान्धतात्,पुड्या काय चाटवतात, वरतुन काय तर म्हणे भात खायच सोड, उद्या हे बघुन निर्बुद्द जनता ताबिज शोधत फिरली तर कोण जबाबदार?

एकत्र कुटुंबाचं गुणगान करतात या सिरियल्स उठ्सूट पण या मालिका बघुन एखादी भाबडी ( / निर्बुद्ध ?) लग्नाळू मुल्गी कट्टर शत्रू होईल `एकत्र कुटंब' ची.>>>>>>

हल्ली मुलीचं काय त्यांचे पालकच एकत्र कुटुंबाला नकार देतात. भावासाठी एका मुलीच्या स्थळाला माहिती देण्यासाठी फोन केला तर मुलाचे नाव काय शिक्षण काय हे विचारण्याऐवजी त्या मुलीच्या तीर्थरुपांनी मुलगा काय करतो किती पगार आहे स्वतःचे घर आहे का आणि सगळ्यात हाईट प्रश्न विचारला मुलगा कुणासोबत राहतो (म्हणजे कुटुंबासोबत कि सेप्रेट घर आहे का वैगरे) मी सांगितले कि बहीण भाऊ वाहिनी त्यांची मुले तर ते चक्क म्हणाले कि मुलगी मोठ्या कुटुंबासोबत राहणार नाही. आता हे त्या मुलीचे मत होते कि तिच्या फॅमिलीचे देव जाणे.

अत्यंत घाण एपिसोड
भात काय सोड Uhoh
च्यायला इथे गरोदर बाईचे लाड करकरून तिला हैराण करतात आया आणि सासवा.
इथे कायतरी नविनच.

ही मालिका काय, ती खुकखु काय, मानबा काय, चांगले संवाद एकाही मालिकेत नाहीत... मुंबै चा सेट आला की तेच ते म्युझिक, सरकणारं दार बघुन हसू येतं.. फक्त एडिटिंग करतात असं वाटतं...तेच ते डायलॉग... ती आजी पण आता अतिच करत आहे....तिनेही का मागे राहावं म्हणा...

त्या खुकखु मध्ये तर संवाद फक्त मो ला आहेत, बाकी सगळे मुके च जणू.. विक्र्या काय बोलायचे पैसे घेतो की काय असं वाटतं, नको तितका घुमा... त्या लॉकर प्रकरणाने तर कहर केला...लेखकाला जास्त लोड नको म्हणून असेल... १ वाक्य कोणी बोललं, की बघा एकमेकांकडे,

ती चुभुद्याघ्या मध्ये तर तेच तेच background music पिपाणी सारखं वाजत राहातं...ते ही saturate केलय....

१ वाक्य कोणी बोललं, की बघा एकमेकांकडे,... Biggrin

बाकी आता गवरी चा अभिनय ज ss रा सुधारल्या सारखा वाटतोय. ( आठवा! तिचा मागच्या वर्षीच्या गोकुळाष्टमीला शिव ने हंडी फोडली तेव्हाचा भयाण डान्स! व भावशून्य, निर्वीकार डोळ्यांनी म्हटलेले कितीतरी महत्वपूर्ण ड्वायलॉक्स!)) त्या मानाने आता बरं काम करत्येय.
आता तर काही उद्देशच नसल्या सारखी सिरीयल भरकटत चाललीये....वारा नेईल तिकडे...!

भरत Lol

अरे हो, ती निशा सुधारलेलीच नाहीये ना अजून, काल चुकून शेवटचा सीन थोडा वेळ बघायला लागला. साडेनऊची सिरीयल बघायची म्हणून दोन मिनिटं आधी टीव्ही लावला.

तिने हम्मा ला फोन करून आग लावली ना? कि आज लावणार आहे..
काय वाट्टेल ते दाखवतात. आणि हा असा घरचा भेदी यांना ओळखू कसा येत नाही? Uhoh

गौरी ने हम्माला सुनावलं तो आणि नंतर दादी बरोबर संवाद साधला तो आवडला. कामात गढलेले असूनही लक्ष वेधलं गेलं. न जाने किस चक्की का आटा खाके आयी थी गवारी Proud

Pages