काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावंतांनी गवरीची लहानपणीची पुस्तक न वाचता शोकेसमधेच ठेवली होती का Uhoh कोरीच दिसत होती.

बाकी ते पत्र छान होतं Happy

तुमी हस्ला तेच खूप झाल मझ्यसथी. हि शिरेलसशी बोरे की विचर्ता सोय नही.
ति हम्मा नुस्ती कोकलतस्ते
गवारी नेहमी स्म्भ्रमात आनि तो शिव बालू छाप

ती अम्मा वचावचा काहीही बोलत असते आणि शिगौ नुसते आ करून बघत बसतात. बावळट कुठले. गौरी तर नुसती येडी मुंबईची मुलगी मुंबईची मुलगी करत अस्ते एकदाही मुंहतोड जवाब देत नाही.

दक्षिणा Lol

एकदाही मुंहतोड जवाब देत नाही.>>>एव्हढे मोठे पाप ती कशी करणार!!! तसेच अम्माचे प्रेम तिला मिळवायचे आहे, तिचा राग नाही Proud

Ratri baherun aalyavar gangajal nahi takle tya doghanvar!

गंगाजल नाही, पण लाव्हारस टाकला ना.

विठ्ठल +१

शिवचा एक पॅटर्न ठरलेला आहे. ज्या गोष्टी आपल्या घरी चालत नाहीत किंवा ज्यांमुळे हम्माचा भडका उडणार आहे, त्या गोष्टी करायला गौरीला भाग पाडायचं. (गजरा, जीन्स,..... ते हम्माने लावलेली पोस्टर्स काढणं, कालचं रात्री बाहेर जाणं). हम्मा भडकली तर मी तिला सांगेन म्हणायचं. तेव्हा तोंडावर केजीतल्या मुलासारखं क्युट स्माइल आणि डोळ्यांत ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आणायचे आणि हम्मा गौरीवर बरसू लागली की तोंड उघडं ठेवून तिच्याकडे बघत बसायचं. आणि मग नंतर गुळचट शब्दांत आणि टोनमध्ये तिची माफी मागायची.

गौरीबाईंनी नोकरी सोडली.

ते तरी वास्तववादी दाखवल की limited सुट्टी मिळते. ही बया परत सुट्टी मागुन बसलेली. ऑफिसवाल्यांनी सांगितल की तुम्ही नोकरी सोडा नाहीतर आम्ही काढुन टाकतो.

>>>तेव्हा तोंडावर केजीतल्या मुलासारखं क्युट स्माइल आणि डोळ्यांत ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार आणायचे --
हा हा. भरत अक्खी पोस्ट +१

या मालिकेत परंपरेच्या नावाखाली हुंडा पद्धतीचे अत्यन्त निर्लज्ज समर्थन व प्रमोशन चालू आहे. लग्नाच्या वेळी कर्ज काढून सावन्त फॅमिली घर गमावते - मुलीच्या सासूच्या मागण्या पुर्या करण्यासाठी - असं दाखवलं आणि अजूनही तेच चालू आहे.
शेम ऑन अजय मयेकर, झी मराठी अँड एंटायर टीम.

अ‍ॅग्री, सारखं दागिने साड्या मागत बसणं हा हुंडाच म्हणायचा शकुनच्या नावाखाली.
यांचं एवढंसं साडीचं दुकान आणि आव एकदम करोडपती असल्यासारखा

एकदाही मुंहतोड जवाब देत नाही.>>>एव्हढे मोठे पाप ती कशी करणार!!! तसेच अम्माचे प्रेम तिला मिळवायचे आहे, तिचा राग नाही >> मी प्रेम ऎवजी प्रेत वाचलं. Uhoh हे भगवान
आणि ते "आधीच दोघांना वेगळं ठेवायचं" > अरे ते कंसाला पण नाही सुचलं, ही तर अम्मा.तिला कसं सुचणार?

हम्माच्या नावावर इतक्या रिग्रेसिव्ह गोष्टी (परक्या मुलीला आपल्या घरात घेण्याआधी तिच्यावर गोमूत्र की गंगाजल शिंपडणे, राखेने हात साफ करायला लावणे, स्त्रियांनी नोकरी करणे, कमवणे म्हणजे पुरुष त्यांच्या जिवावर जगतात असे म्हणणे, परजातीतली मुलगी आणल्याने हुक्कापानी बंद हो जाएगा, दुसर्‍याच्या अन्नाला नावे ठेवणे - मग तो मांसाहार असू दे किंवा तेलात तळलेलं आहे म्हणून, बाहेरून आल्यावर गंगाजल शिंपडून शुद्ध होणे, नवर्‍याने बायकोचे ऐकणे वाईट्ट, नवरा कसाही असला तरी बायकोने त्याला सोडू नये, तो बेकार असला, तरी तो म्हणतोय म्हणून मूल हवं, पोटातला गर्भ मुलगाच आहे हे गृहित धरणे......) दाखवताहेत की हुंडा प्रकरण आहे हे लक्षातच आलं नाही. परंपरा, रीतिरिवाज यांत गुंडाळलंय.

इतके दिवस सावंत त्यांना बुरसटलेल्या विचाराचे म्हणायचे, ते आता म्हणाले नाहीत, एवढंच काय ते बदललं.

अंजली_१२, शुक्लंची साड्यांची फॅक्टरी आहे आणि तिथे अनेक कामगारही आहेत. गौरीने तिचे इन्शुरन्स पॉलिसीजचे टारगेट फॅक्टरीमध्ये जाऊन एकाच फटक्यात पूर्ण केलेले. फॉर्म्स्चा गठ्ठा दाखवला होता.

काल राम वस्कन मोड मध्ये होता हम्मावर.. मला जाम आवडलं
तरी पण आम्मा 'नाक कापलं तरी भोक आहे ' मोड मध्येच.. >>>>:हहपूवा:

Pages