काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>टायवाला रात्री पण टाय लावून फिरतो.... त्यातच जन्मला वाटतं
कारण त्याला बिझनेस 'टाय'कून व्हायचं आहे >>> जबरी

पण काही किंचीतशा जाणवलेल्या सुधारणा अशा... -
शिव चा भाऊ फार देखणा आहे, पण त्याच्या कडे दुर्लक्ष होतंय...काम पण छान करतो.
गवरी थोडा बरा अभिनय करत्येय
मोजो गायब आहेत
सरला पण क्लू देऊन अभिनय करत्ये.

सावंतांची सून आणि शुक्लंचे जावई यांच्यात कारस्थाने करण्यात स्पर्धा.
पण दोन दोन ट्रॅक चालवताना घोळ घालताहेत. (म्हणजे कशात घालत नाही म्हणा?)
नचिकेत निशाला डॉक्टरकडे घेऊन जाणार होता, त्या संकटातून तिने कसा मार्ग काढला हे दाखवलंच नाही. ती डायरेक्ट माहेरी पोचली.
इथे बनारसमध्ये चोरीचं प्लानिंग, प्रॅक्टिस, शोध इत्यादी व्हायला एकेक दिवस लागला, तरी निशाचं घोडं तिथेच. बहुतेक मुंबई आणि बनारसमध्ये काळाचा वेग वेगवेगळा असावा.

कालच्या भागात शिव 'आप क्यों सस्पेन्स क्रिएट कर रही है" च्या ऐवजी क्यों सिक्रेट क्रिएट कर रही है म्हणाला.

तसंच अगदी आधीच्या सीनमध्ये दाखवलेल्या प्रसंगाबद्दल , त्याच दिवशी बोलतात असं वाटत असताना, सगळी पात्र 'मगाशी' म्हणायच्या ऐवजी 'त्या दिवशी' असं म्हणतात.

दक्षिणा, हो तीच ती उर्मिला जीजी.....टायकून ची बायकून!
तिच्या डोळ्यांत व दातात फरक आहे.
आणि आधी गवरी सरळ पदर घेत होती ना...? आता पुन्हा उलटा पल्लू व डोक्यावरुन पदर...? आणि हिला रॅशेस येतात म्हणे ना सिंठेटिक बनारसी साड्या नेसून....."
'उपसंपादकांच्या डुलक्या' असायच्या तसा 'सह दिग्दर्शकाचे दुर्लक्ष' असे म्हणावे लागेल!

नाही. सासूने तिला डोक्यावर पदर घ्यायची गरज नाही असे सांगितले. त्यातला कावा तिच्या लक्षात आल्यामुळे ती मुद्दाम डोक्यावर पदर घेतेय.
बाकी टायकूनच्या बायकोला पदर नसलेला ड्रेस चालतोय. नवर्‍यासोबत बिझिनेस डील करायला गेलेलंही चालतंय.

कावा - हम्मानी गवरीला फक्त मुन्नाकी पत्नी म्हणून घरात घेतलय. शुक्ल खानदानची बहू म्हणून नाही. (बरय की Proud ) मग ती बहू नाही तर उलटा पल्लू व डोक्यावरुन पदर याची गरज नाही. पण गवरी हिरवीण असल्याने तिला बहू पण व्हायचय. म्हणून ते पल्लू वगेरे सगळं

गवरी ला कळलंय की तिचे गहने टायकून ने जैसवाल ला दिलेत.
आणि टायकून ने त्याच्या बायकोच्या नावे हॉटेल घे ण्यात काय हाशिल आहे?

मला काही समजतच नाहीये....... दागिने चोरले काय, परत काय आणून ठेवायचा प्लॅन केला......आता टायकून ढसाढसा रडतोय का ? फायनांसर कडून २५ लाख मिळाले की परत दागिने सोडवून आणून गवरीच्या कपाटात? मग बिझीनेस कशाच्या जोरावर करणार होता? काहीही.
मुळात मग आधी २५ लाख त्या जयस्वाल कडून घेतलेच कशाला? नुसती फिरवाफिरवी........
शिव एकदम भारी अ‍ॅक्टिंग करतो पण. अगदी शिव म्हणून शोभतोच. दुसरा रोल नाही शोभणार आता त्याला..............

सध्या काय सुरू आहे सिरियल मध्ये?
आणि आपला जावई चोर आहे हे हम्माला माहित नाही? आणि खुद्द टायकून ची बायको काय भांग पिउन असते? तिला नाही संशय येत की आपला नवरा काहीतरी फिरवाफिरवी करतोय म्हणून? Uhoh इतके का टोकाचे वागतात हे लोक? लेखक पण अशी पात्र का लिहितो देव जाणे, टोकाची चांगली आणि टोकाची वाईट. मधली अवस्थाच नाही Uhoh

टायकून चा टाय गायब आहे सध्या ... इकडच्या कमेंट्स वाचल्या बहुतेक Proud
काल पण त्याचं नाटकच होतं का बदलल्याचं? शिवपुढे

तिकडे निशा आणि इकडे हा टायवाला दोघे गौरीला मस्त फसवत आहेत. त्यांच्या जोडीदारांनी त्यांना पुरते ओळखले आहे, त्यांची त्याबरोबर रहायची ईच्छाही होत नाही.....पण गौराक्का सज्जणाचा पुतळा होऊन जोड्या तुटू नये म्हणून किती नाटक करते!!! Happy

ह्या माठ हिरो आणि हिरविणींना चूक आणि गुन्हा ह्यातला फरक कळात नाही का Uhoh तो टायकुन किती सहज सांगतो जजला पैसे (लाच) दिले वगेरे. आणि शिव आणि मंडळींना लाच दिल्याचा राग येत नाही तर त्या काकै वाल्याने ते पैसे मधेच ढापले ह्याचा राग येतो Angry

आंबट गोड् तो का कही म्हणणारा जाम डो़क्यात जातो >>> पण हे हिंदी कलाकारच चांन्गला अभिनय करताहेत. नाकपुड्या फुगलेले मोजो, गोंधळलेली शुगो, भोचक आजी आणि कहर म्हणजे निशा.. या सर्वांपेक्षा हिंदी कलाकार सहज अभिनय करताहेत

Happy तो डोक्यात जावा असाच त्याचा रोल आहे ना .... तो तो व्यवस्थित निभावतोय!! टायवाल्याचा नको तितका क्लोज अप दाखवितात त्यामुळे...अति चीड चिड होत्ये.
पण हिंदी कलाकारांची कामं मस्तच...विशेषतः अम्मा, बाबूजी, शिव, राम..........

तो डोक्यात जावा असाच त्याचा रोल आहे ना .... तो तो व्यवस्थित निभावतोय!! >> अगदी अगदी .
टिपिकल फुफाजी वाला रोल आहे तो .
त्याचा गेटअप पण . सफारी , गळ्यात चेन , हातात लेदर बॅग . परफेक्ट .

काल चुकून मी रिपिट पाहिला रात्री. बनारस मध्ये कुणी वडापाव खाल्ला नाहिये आत्तापर्यंत? Uhoh हे काही पचत नाही. वडापाव दूर दूर देशांत पसरलाय आणि बनारस मध्ये नाही? ये बात कुछ हजम ना हुई.
आणि उर्मिला अचानक गौरीचं कस्काय ऐकायला लागली? Uhoh सोबत बसून बिझनेस प्लॅन वगैरे?
पण काल हम्माला गौरीने छान उत्तर दिलं... मुंबई कशी सर्वांना समावून घेते ते.

Pages