काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो उर्‍मिलाचा नवरा गौरी शिवच्या लग्नाच्या वेळी कसा बावळा दाखवला होता. आता एकदम कॅरेक्टर चेंज ?? आणि सारखा काय टाय लावून फिरतो? त्या जिज्जीच्या नवर्याकडे एकच सफारी आहे का?.

>>>>जिज्जीच्या नवर्याकडे एकच सफारी आहे का<<
असेच वाटते. अगदी डोक्ययत जाणारे पात्र आहे ते. काकही..?

बाकी, शिवला बहिणीच्या गोष्टी कळताहेत पण स्वतः कसा वागला किंवा काय ते लक्षात येत नाही?

ईकडे गौरी भावाचा (त्याच्या मनाविरुद्ध) संसार जुळवते आणि तिकडे शिव बहीणीचा, स्वतःचा तर राहीला बाजुलाच.

आम्ही सारे खवय्ये'त उद्या हम्मा आणि गौरी. >>> आज कुठल्यातरी शोभायात्रेत शिव, गौरी आणि प्राजक्त्ता माळी होती.

सध्या शिव परत फॉर्म मध्ये आलाय Wink
दोन तीन सीन्स मस्त होते त्याचे
एक , तो सावंताची नक्कल करतो . "माझी मुलगी माझचं ऐकणार ..."
दूसरा , गौरी घरी डबे द्यायला येते आणि त्याने शर्ट घातलं नसतं म्हणून किंचाळते . तो घाबरून लपतो . नंतर म्हणतो , "एक मिनीट . हम आपके पति है , पडोसी नही . "
तिसरा , जो प्रोमो मध्ये दाखवतायेत . ती म्हणतो - प्रेमात आणि युद्धात सगळ माफ असतं . तो विचारतो - युद्ध चल रह है यहां Happy

पण गवरी कोणत्याही प्रसंगात जीव नाही ओतत. तेच ते ठोकळेपण बघुन आता कंटाळा आला.
शिव मात्र प्रत्येक प्रसंगात निराळा निराळा अभिनय करतो.
हम्मा वर भडकलेला तो सिन मस्त केला होता त्याने.

हो ना....ही अगदीच ठोकळा आहे...त्या एका प्रोमोत शिव तिला जिन्यातून बाजूला ओढतो ..तर बावळटा सारखी किंचाळून मग त्याच्या कडे (त्याच त्या!) शून्य निर्वीकार नजरेने पाहाते. काहीच भाव नाहीत...अगदी निर्लेप, थंड नजर! अजिबात जीव ओतत नाही.........इतकी काही अप्रतिम सुंदरही नाही की प्रेक्षकांनी त्या भरवशावर कानाडोळा केला असता अभिनयाकडे!

इतकी काही अप्रतिम सुंदरही नाही की प्रेक्षकांनी त्या भरवशावर कानाडोळा केला असता अभिनयाकडे! >> Lol
तिने खुद्द स्वतःला सुंदर समजून केलाय ना अभिनयाकडे काणाडोळा Proud

पण गवरी कोणत्याही प्रसंगात जीव नाही ओतत. तेच ते ठोकळेपण बघुन आता कंटाळा आला.>>> प्रेक्षकांच्या दुर्दैवाने काही ठोकळे नशीबवान असतात, त्यांना यासाठी नुसता पैसाच नाही, अवॉर्डस पण मिळतात.

दूसरा , गौरी घरी डबे द्यायला येते आणि त्याने शर्ट घातलं नसतं म्हणून किंचाळते . >>>> बावळटच आहे. शिव तिचा नवरा आहे हे मुम्बईत राहून विसरली वाटत.

गौरीच्या जावेची मान किती बारीक आणि लांब आहे. तिला पाहिलं की मला या प्रथेची आठवण येते.

गौरीची नणंद भलतेच मॉडर्न कपडे घालून इंटरव्युला गेलीय. उत्तरप्रदेशात सध्या जे काय चाललंय ते पाहून मला तर तिची काळजीच वाटतेय.

गौरीच्या जावेची मान किती बारीक आणि लांब आहे. तिला पाहिलं की मला या प्रथेची आठवण येते... >> मला तिला बघीतले की फक्त ET सिनेमा आठवतो. किंवा MAD Magazine Proud

२ दिवसांपुर्वीच्या एपिसोडात हम्मा मुंबईला पोहोचली आणि शिव आणि राम ला न घेता सावंतांच्या घरी जाऊन दंगा घातला, परत येऊन शिव जवळ उलट्या बोंबा मारल्या. इतक्या जवळ्चं माणूस राजकारण करतंय आणि कुणाला शंका पण येत नाही Uhoh

मग प्रोमोत पाहिलं की शिव गौरी ला सांगतोय आपल्या दोघात प्रॉब्लेम नाही मग आपण आपल्या घरच्यांना का इतकं महत्व देतोय.
लवकर कळलं Proud

आधी हेच तर मारे म्हणत होते ना...की घरच्यांना सोबत घेऊनच चालायचंय...इव्हन गवरी सुद्धा बाबांच्या विरोधात काहीच करायचं नाही म्हणायची!
आता?
पण हम्माची कारस्थानं आणि अगदी आव आणून रडणं पडणं...कांगावा....सगळं एकदम जेन्युईन वाटतं..असतात अशा बायका.... स्वतःच्या मुलावरच्या प्रेमाला शस्त्र म्हणून परजणार्‍या...........

पण मला हम्माचे क्रोकोडाईल टीयर्स बघुन त्यांना मगरमच्छ के आंसू का म्हणत असावेत हे कळत.
नाही नाही ते कुणालाही दुखावणार नाहियेत फक्त दोघे मिळुन स्वत:च्या प्रेमाची बली चढू देणार नाहीत शिवच्या अम्मा आणि गौरीच्या बाबांपुढे.

मुंबई मध्ये आल्यापासून गौरीचे ड्रेस आवडले ,साधे पण छान आहेत.सीरिअल संपायला आली तशी गौराक्काना ऍक्टींग जमायला लागलीय . जाऊ बाई पण जोरात !
हम्माची डायलॉग बाजी सुरु असताना मला तीच आवाज थोडा श्वेता तिवारी सारखा वाटतो .

दक्षिणा........ Happy
निशा इतक्यात दाखवतच नाही आहेत.
यांचंच नीट को ऑर्डिनेशनने लिहीणं होईना...त्यात अजून ते निशाचं कुठे घोडं दामटवायचं...असं लेखकाला वाटलं असावं बहुतेक.

आहे की निशा. तिला मुद्राभिनय जास्त आहे. उगाच एखादं वाक्य.
आणि तिच्या प्रेग्नंसीचं राज प्रेक्षकांना सांगून टाकलंय.

मुंबई मध्ये आल्यापासून गौरीचे ड्रेस आवडले ,साधे पण छान आहेत.>>> कुठले नवीन आहेत ड्रेस? लग्नाआधी आणि सिरियल झाल्यापासून हेच ड्रेस तर घालत होती ती.

सीरिअल संपायला आली तशी गौराक्काना ऍक्टींग जमायला लागलीय . >>> हिसुद्दा सम्पणार आहे का? कधी? नवीन सिरियलचे प्रोमो नाही दिसलेत अजून.
आहे की निशा. तिला मुद्राभिनय जास्त आहे. उगाच एखादं वाक्य.
आणि तिच्या प्रेग्नंसीचं राज प्रेक्षकांना सांगून टाकलंय.>>> काय आहे ते राज?

सावंतांचं मन वळवण्याच्या नावाखाली शिव-गौरीचा पोरकटपणा, रादर पोरखेळ चालू आहे.
मागे हम्मा कोठडीत जाऊन बसलेली तेव्हाही त्यांनी असलाच आचरटपणा केला होता.

बाकी त्या सोसायटीत ते एका खोलीचं घर कुठून आलं? सिक्युरिटीवाल्याला रहायला केलेल्या किंवा सर्व्हंट्स क्वार्टर टाइप खोलीत राहताहेत का दोघे? पाणी बाहेरून म्हणजे नक्की कुठून आणतात? दाराबाहेर बसून भांडी घासताहेत. फ्लॅटची चाळ करून टाकलीय.

गौरी प्रेमात पडून किमान वर्ष, लग्न होऊन किमान सहा महिने झाल्यावर इश्श म्हणायला शिकलीय. पण लाजण्याचा अभिनय कुठून आणणार?
लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्‍याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात. शिवगौरी श्रीजान्हवीचा कित्ता गिरवताहेत.

या मालिकेचे संवादलेखक खुलता कळीच्या तुलनेत जरा अ‍ॅलर्ट असतात. म्हणजे जे पात्र मिसिंग आहे, त्याच्या नसण्याचं काही ना काही कारण संवादातून देऊन टाकतात. उगाच प्रेक्षकांना जास्तीचे प्रश्न पडायला नकोत Wink

Pages