काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>खरेतर गौरी ने आता माहेर कडून काहीही मदतीची अपेक्षा ठेवायला नको त्यान्च्या मनाविरुद्ध लग्न केल्यावर .
लव्ह marraige केले आहे तर ते स्वतःच्या हिमतीवर success करून दाखवायची धमक हवी कारण होणाऱ्या सासरचे लोक आणि त्यांची मेन्टॅलिटी कशी आहे याची तिला लग्ना आधी पूर्ण जाणीव होती....मग आता रडत बसून काय उपयोग आहे ??-----

माझ्यामते हे चुक आहे. आईवडिल असा, या कारणास्तव मुलीच्या पाठी उभे राहणे नाकारु शकत नाहीत/नये. मुलगी एकटीच पडते अशाने आणि नवर्‍याचे, सासरच्यांचे चांगलेच फावते. किती मुलींनी आत्महत्या केल्या आहेत अशा प्रकरणांत. लव असो की अरेंज असो, आईवडिलांनी संकटसमयी मुलास्/मुलीस आधार द्यावा.

माताप्रसाद किती शांतपणॅ सांगत होते सावंताना , ईथली गोष्ट वेगळी आहे . मुंबई आणि बनारसची तुलना करू नका .
सावंतांचा मुद्दा बरोबर असला तरी मुलीच्या मनाचा जराही विचार न करता , आक्रस्तळेपणा करणं जरा जास्तच होतं .

शिवच्या बाबूजींना मारणार? Uhoh

मालिका एकदमच टिपिकल झालीय. हम्मा फुल कारस्थान मोडमध्ये. स्वतःच्या मुलाचाच संसार मोडताना काहीच वाटत नाही तिला.

सरिताबाई विमानाने बनारसला जाणार होत्या ना? अजून नाही पोचल्या?

हम्मा फुल कारस्थान मोडमध्ये >>> ही सुधारली होतीना, मागे प्रोमो मधे गौरीला जवळ घेते प्रेमाने, असं काहीतरी बघितल्याचं आठवतं.

सरिताबाई विमानाने बनारसला जाणार होत्या ना? अजून नाही पोचल्या? >> हो आणि सावंत ट्रेनने दुसर्‍या दिवशीच पोचले होते.

माताप्रसादच्या नावापुढे कै. लागतंय बहुधा

काहीही असो पण हम्मा जरीकाठ असलेल्या लाल साडीत अप्रतीम सुन्दर दिसते.
चेहर्याची त्वचा किती नीतळ, भान्गाताला सिंदूर, कानाताले झुबे, नाकतली चमकी, भुवया कृत्रिम रित्या रेखल्या असल्या तरीही शोभतात आणि आयशेड़ो पण छान दिसते तिला.

काहीही असो पण हम्मा जरीकाठ असलेल्या लाल साडीत अप्रतीम सुन्दर दिसते.
चेहर्याची त्वचा किती नीतळ, भान्गाताला सिंदूर, कानाताले झुबे, नाकतली चमकी, भुवया कृत्रिम रित्या रेखल्या असल्या तरीही शोभतात आणि आयशेड़ो पण छान दिसते तिला. >>>>> आणि काम पण सुरेख करतात, अगदी नॅचरल.

अगदी....मला तर अम्मांचाच अभिनय प्रथम क्रमांकाने आवडतो.. इव्हन शुगो पण फिक्की पडली. अर्थात अम्माला फूटेज ही खूपच दिलं गेलंय म्हणा!

एखादी व्यक्तिरेखा आक्रमक असणं, बोलभांड असणं म्हणजे ती व्यक्तिरेखा साकारणार्‍याचा अभिनय पैसा वसूल. तेच दबलेली,पडतं घेणारी सोशिक किंवा शांत व्यक्तिरेखा साकारणार्‍याचा अभिनय फिका पडला असं वाटून घ्यायची परंपरा जुनी आहे आणि चित्रपटांपासूनची आहे.
शुभांगी गोखले इथे मध्यमवर्गीय, तीही मुंबईतली, नोकरदार महिला, शिक्षिका रंगवताहेत. अर्थात शिक्षिका म्हटल्यावर घरीही ती छडी घेऊनच असेल अशीही लोकांची समजूत असते.

आता कथानकाकडे. सावंतांना घरच्या सगळ्यांनी फायर केलंय. आजीनी सुरुवात करून सरितानी अल्टिमेटमच दिलाय. तर सावंत, शुक्ल कुटुंबाची माफी मागतील का? माताप्रसादना टपकवलेलं नाहीए, म्हणजे तुटेल इतकं ताणणार नाहीत.

फोनवर शिवचं गौरीवर ओरडणं, मग गौरीचं सगळं छान असल्याचं खोटं खोटं सांगणं यामुळे सावंतांची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण त्यांनी बायकोचंही मत विचारात घेतलं नाही; त्यांना जावयाशी काय, मुलीशीही नीट बोलावंसं वाटलं नाही.

माताप्रसादना टपकवलेलं नाहीए, म्हणजे तुटेल इतकं ताणणार नाहीत. >>
गुढीपाडव्यापर्यंत सगळं गोड करायचय ना परत त्याना...मागे एकदा गौरी म्हणत होती ना शिव ला की मी ईथे बनारस मद्धे गुढी उभी करेन म्हणुन....सो मला पण असं वाटतय की आता हे फार ताणणार नाहीत.

सावंतांच्या बायकोने त्यांना फायर केलाय ते योग्यच आहे. त्यावरून सावंतची घरात हुकमत होती आणि ते स्वतःच्या घरच्या लोकांना विचारात नव्हते हे नक्की . पण तरीही ते मुलींच्या बाजूने उभे राहतात मग ती स्वतःची मुलगी असू दे नाहीतर सून एवढं नक्की . निशानी एवढा तमाशा केल्यानंतर सुद्धा ते निशाची बाजू घेऊन तिला एक चान्स देऊया असं म्हणत होतेच आणि त्याप्रमाणे त्यांनी तिला घरात राहू पण दिलाय. आता त्यांच्या मुलाने जो काही निर्णय घेतलाय त्यात पण ते निशाच्या बाजूने त्याला समजावत आहेत. थोडक्यात स्त्रियांवर झालेला अन्याय त्यांना पटत नाहीये आणि त्यात ते मुलगी आणि सून यात भेदभाव करत नाहीयेत हि एक त्यांच्या स्वभावाची जमेची बाजू

फोनवर शिवचं गौरीवर ओरडणं, मग गौरीचं सगळं छान असल्याचं खोटं खोटं सांगणं यामुळे सावंतांची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण त्यांनी बायकोचंही मत विचारात घेतलं नाही; त्यांना जावयाशी काय, मुलीशीही नीट बोलावंसं वाटलं नाही>> बनारस ला जाताना ते बायकोला सांगून निघाले होतेच फक्त बायकोचं मत ऐकून "गौरीला आता आपल्या मदतीची जरुरी आहे तरी आपल्याला बनारस ला जायलाच पाहिजे " असा विचार करून ते घरी थांबले नाहीत किव्वा घरीच थांबावं असं त्यांना वाटलं नाही . त्यामुळे ते तडकाफडकी बनारसला निघून आले. त्याच्या मनात फक्त एवढच होत कि सासरच्या लोकांनी गौरीला नोकरी करू दयावी . तिने टिपिकल घरकाम करत घरात गंजून जाऊ नये . हे पण त्यांना वाटण स्वाभाविक होतच कारण बनारस ला गौरीने राहण्याचा निर्णय हा शुक्ल कंपनीकडून ( शिव कडून ) तडकाफडकी घेण्यात आला. आता त्यांचं बनारस ला राहणं आम्ही एक्सेप्ट केलं ना मग तिला निदान नोकरी तरी करू द्या असं त्यांना वाटतंय . शिवला पण त्यांचा सांगणं हेच होत एकतर तू घरच्या लोकांना तिच्या नोकरी संबंधात समजावून सांग किव्वा मुंबईला ये.
शुक्लाच्या घरातून ते तडकाफडकी गौरीला घेऊन बाहेर पडले असतील रागाच्या भरात वगैरे. पण नंतर गौरीने सांगितलं मला शिव शी बोलायचं आहे . तेव्हा त्यांनी स्वतःहून स्वतःचा मोबाईल तिच्या हातात दिला होताच . पण शिव नेमका मोबाईल घरीच असल्याने तिच्याशी बोलू शकला नाही आणि मग अम्माने सगळी सूत्र हातात घेऊन पूर्ण पणे गौरीशी संबंध तोंडूनच टाकले ज्याची शिवला अजिबात कल्पना नाहीये

बा प रे ! सुजा, तुम्ही लेखिका आहात का या सिरीयलच्या? किंवा को ऑर्डिनेटर तरी? किती ते निरीक्षणा आणि तर्क!

गवरी तोंड मिटुन बसलेय आता. भारी बेरकीपण. आता बाबा खाणार सगळ्यांच्या शिव्या आणि ह्या मॅडम सहानुभुती मिळवणार.

आता चुकून झी मराठी लावले, तर गवारी आणि आज्जी झोपल्या होत्या, आणि ही दचकून उठली. मला वाटलं हिला उलट्या होतात की काय, पण उचकी होती..
वाचलेच Proud
म्हटलं माहेरी आल्यावर हिला प्रेग्नंट करतात का काय झी वाले.

>>>>म्हटलं माहेरी आल्यावर हिला प्रेग्नंट करतात का काय झी वाले.
स्विस ट्रीप चा साईड इफेक्ट Wink

बापरे! दक्षिणा, आपल्या इतका सखोल विचार 'झी' चे लेखक दिग्दर्शक सुद्धा करीत नसतील! त्याचा काही विचार दिसत नाही इतक्यात. अजून तर सरलाचाच नं नाहि लागला! याबाबतीत मात्र शुक्ल लोक भारी लिबरल दिसताहेत!

राया.. Happy गवरी तोंड मिटुन बसलेय आता. भारी बेरकीपण...............................................

गवरीला शिव्या द्यायचं आपण काही सोडणार नाही!.......... rofl.gif:

>>>>म्हटलं माहेरी आल्यावर हिला प्रेग्नंट करतात का काय झी वाले. Lol
नको रे देवा ..अशाने मग सिरीयल होसूमीयाघ च्या ट्रॅक वर जायची ...आणि मग या पाडव्याला नाही २-३ वर्ष नंतरच्या पाडव्याला संपायची .... Lol Lol

>>>>>>>>>माझ्यामते हे चुक आहे. आईवडिल असा, या कारणास्तव मुलीच्या पाठी उभे राहणे नाकारु शकत नाहीत/नये. मुलगी एकटीच पडते अशाने आणि नवर्‍याचे, सासरच्यांचे चांगलेच फावते. किती मुलींनी आत्महत्या केल्या आहेत अशा प्रकरणांत. लव असो की अरेंज असो, आईवडिलांनी संकटसमयी मुलास्/मुलीस आधार द्यावा.

बरोबर आहे राया ...माहेरची साथ हवीच ...पण मुलीनेही विचार पूर्वक निर्णय घ्यावा(लग्नाचा) ...प्रेम आंधळ्यासारखे न करता डोळस पणे करावे असं वाटतं ....जाऊद्या पण ती सिरीयल आहे शेवटी.......ते एवढा विचार नाही करत.... माबोकर करतात फक्त Happy

गौरीने अजूनही ती दुसरी बॅग उघडलेली नाही.

थोडं मागे जाऊन सावंतांबद्दल : तुला नोकरी करायला देत नाहीत, या कारणासाठी तू हे घर सोडायला तयार आहेस का? मुंबईला परत जायचंय का ? असं त्यांनी गौरीला विचारलं होतं का? अर्थात गौरीनेही तोंड उस्कटून त्यांना थांबवायचा प्रयत्न केलेला नाही. दोघांचंही असं करणं हे त्यांच्या आतापर्यंतच्या वागण्याशी सुसंगतच आहे म्हणा.
-----
डोळसपणे प्रेम करायचं म्हणजे सासरकडच्यांचा विरोध असला, तर प्रेम विसरून दुसरीकडे लग्न करायचं का?

Pages