काहे दिया परदेस - २

Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन दिवसापुर्वी एक भाग पाहिला ज्यात निशा शुगोला बोलत होती. त्यावर गवरी तिला म्हणाली की तू मला काय ते बोल आईला नको. त्यावर निशा म्हणते की आईंचीच चूक आहे. त्यांनी तुला दोन लगावल्या असत्या तर तुझी हिंमतच नसती झाली पुढे जाण्याची. यावर त्या दोघी शरमेने खाली बघतात. Angry
त्या गवरीच्या जागी इतर कुणी असती तर म्हणाली असती की ती तूच ना जी मला शिवसोबत पळून जायला सांगत होती? वर मदत करण्याची शाश्वतीही दिली होतीस. निशाचं पितळ उघडं पडलं असतं Angry

त्या गवरीच्या जागी इतर कुणी असती तर म्हणाली असती की ती तूच ना जी मला शिवसोबत पळून जायला सांगत होती? वर मदत करण्याची शाश्वतीही दिली होतीस. निशाचं पितळ उघडं पडलं असतं >> असं भडाभडा बोलत नाहीत गं शिरेलीत कुठल्याच. Angry

तेच ना..बरं गौरी एक वाक्य तरी आत्मविश्वासाने बोलत आहे का?

की हो मी केलं प्रेम..
तुम्हाला सांगितल नाही ते चुकलं ... पण शिव चांगला मुलगा आहे..
माझी निवड बरोबर आहे अस काहीतरी..

आत्ता असं वाटत आहे की..

तिला खरच वाटत आहे की आपण काहितरी चुकलो आहोत आणि आता राहु दे..
बाकी शिव दरवेळेस कुठल्या प्रॉब्लेम मधे ठाम च वाटला आहे..गौरी मात्र दर दोन दिवसांनी रहु दे ना नको ना करते...

गवरी तर काही करणारच नाही . आजी ड्युटीवर रुजु झाली की अंजन घालेल डोळ्यात मोजो च्या तो पर्यन्त असाच टाईम पास

काल गौरी म्हणाली ना, " बाबा , मी तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेन"..याचाच अर्थ असा की काही घटनांनंतर खुद्द मोजो च तिला शिव शी लग्न करायला भाग पाडतील. कदाचित शिव त्यांना खूप मदत करेल दुखण्यात किंवा इतर काही संकटात.
निशा मात्र डोक्यात जाते...काल नक्राश्रू ढाळत म्हणे ," मनात भलते भलते विचार येत होते!!" शुगो पण मस्त काम करताहेत. केवळ एक कटाक्ष पुरेसा असतो त्यांचा मनातले भाव कळायला!

आज्जी कुठेयत सद्ध्या?

निशाच ते दुतोंडी गांडुळासारख वागणं आता कटकटीच झालय. इतकं सगळं होऊनही गौरी ढिम्मच.

शिवने आतातरी शहाणे व्हावे आणि क्षणोक्षणी धरसोड करण्यार्‍या गवरीचा नाद सोडावा व सिरेलीला सुफळ संपुर्ण करावे.

आणि मगरीचे अश्रु ढाळणारी ती पसरणी मस्त जेवत असते बेडरुमात.

अस बेडवर ताट घेऊन आमच्यात कुणी जेवल तर पुन्हा त्यावर बसायची देखिल इच्छा होणार नाही माझी बाकी Wink

काल गौरी म्हणाली ना, " बाबा , मी तुम्ही सांगाल त्या मुलाशी लग्न करेन".>>> काल गवरीने मोजो च्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतली. अस डोक्यावर हात ठेऊन शपथ मराठीपधे पण घेतात का Uhoh नॉर्मली हे हिंदीत पाहिलं आहे "खा मेरे सिर कसम" वगेरे.

ती गवरी दहा वेळा म्हणते की माझे माझ्या बाबांवर जीवापाड प्रेम आहे. पण तिच्या देहबोलीत, नफरेत, इतर कोणत्याही प्रसंगी असे वाटत नाही. जानू आणि तिच्या बाबांचे खास नातं आहे असे अनेक वेळा जाणवायचे.

>>त्या गवरीच्या जागी इतर कुणी असती तर म्हणाली असती की ती तूच ना जी मला शिवसोबत पळून जायला सांगत होती? वर मदत करण्याची शाश्वतीही दिली होतीस. निशाचं पितळ उघडं पडलं असतं<<<

+१११११

ती गौरी त्या निशाचं भांड का फोडत नाही? की निशाने पैसे खाल्ले, रोज चुगल्या करते हम्माला...
मला चिथवत सुद्धा होती.

आणि ज्या सूनेला घरची कधीच चिंता नाही वाटली वा केली ती अगदी इतकी चांगली कधी असेल का?

मुलीने प्रेम केले म्हनजे डोंगर कोसळला असे का वागताहेत सर्व?

आणि जरी बायकोने नाही सांगितले तरी अगदी इतकी टोकाची प्रतिक्रिया त्या मधूसुदनाची की, मी घराचा मुख्य, कर्ता तरी कळवले नाही... सगळे निर्णय मी घेतो, मला मान होता तो गेला... ह्यांव-त्यांव. कुठल्या काळात रहातो?

इतक्या थंड डोळ्याने, थंड भाव ठेवून ती शप्पथ घेते गौरी, की मजेशीर वाटते.
आणि डोक्यावर हात ठेवून शप्पथ म्हणजे कमाल होती. मराठीत मला वाटते गळ्याची शप्पथ घेतात. Proud

>>>शिवने आतातरी शहाणे व्हावे आणि क्षणोक्षणी धरसोड करण्यार्‍या गवरीचा नाद सोडावा व सिरेलीला सुफळ संपुर्ण करावे.<<<

अहो पण त्या शिवच्या तरी कुठे दम आहे की हम्माला समजावायचे. नुसते प्रेम है , प्रेम है म्हणून काय करणार जर हम्मा बसलीय डोक्यावर...

>>नादाला लावल म्हणजे हिंडली फिरली त्याच्याबरोबर..<<<
काहीही काय... प्रेम असतं दोघांचं. कोणी कोणाला नादाला लावत नाही.( अ. आ. मा. म.)

>नादाला लावल म्हणजे हिंडली फिरली त्याच्याबरोबर..<<<
काहीही काय... प्रेम असतं दोघांचं. कोणी कोणाला नादाला लावत नाही.( अ. आ. मा. म.)
तिच त्याच्यावर खरच प्रेम आहे हे तिच्या आत्ताच्या वागणुकीवरून तरी कुठे दिसत नाही. तेव्हा अगदी मारे त्याला म्हणलेली असते की कायम तुझी साथ देईन..यांव न् त्यांव..आणि आता खरच गरज आहे साथीची तर अशी कच खातीये.

तिच त्याच्यावर खरच प्रेम आहे हे तिच्या आत्ताच्या वागणुकीवरून तरी कुठे दिसत नाही>>> आत्ताच्या Uhoh मला ते कधीच दिसलं नाही Proud

मला ते कधीच दिसलं नाही .मलाही.

आत्ता तर अजून गरज आहे त्याला साथ द्यायची..तर नाही देत .मग हे कसलं प्रेम?
वेळोवेळी बदलणारं?

मला ज्यांनी जन्म दिला त्यांच्यावर माझं जीवापाड प्रेम आहे...असं ती काल (निर्जीव डोळ्यांनी) म्हणाली ना! म्हणजे तिने जेव्हा दोघांमधे चॉईस करायची वेळ आली तेव्हा बाबांना निवडलं आहे!

बिचारा शिव.!
त्याची निवड चुकली..

खरच चुकली...
जन्म दिला त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे म्हणे! मग शिव वरती कसल प्रेम होत म्हणे हिच? टाईमपास वाल?

आपल्या प्रेयसीला राखेने हात धुवायला लावणार्‍या, गंगाजल शिंपडून तिची शुद्धी करू देणार्‍या, आणि जिच्याशी आपलं लग्न ठरलंय अशा कुटुंबासाठी तिला(प्रेयसीला) येत नाही अशा पद्धतीचा स्वैपाक करायला लावणार्‍या शिवशी संबंध तोडायला गौरीने जरा उशीरच केला. Wink

कारण चुकलं असलं तरी. उद्या बनारसला गेल्यावर तिला आणखी काय काय करायला लावतील तेव्हा मुन्नाराजे काय ह्म्मा ह्म्मा करत बसणार का?

रच्याकने, मालिकांमध्ये आर्ची टाइप नायिका चालत नाहीत. कौटुंबिक मूल्यांची काळजी घ्यावी लागते Wink

सावंत एक टिप्पीकल बाबा. सरीता एक टिपीकल गृहिणी, शिव एक जगावेगळा प्रेमवेडा, हम्मा एक टिप्पीकल छाछु ( सासु ), शिवचे पप्पा एक टिपीकल पण अगतीक पिताजी. बट......बट वॉट अबॉउट आज्जी आणी गवरी?

आज्जी कुट्ट गेल्यासा? मी आते जाते हंसते गाते ही सिरीयल बघत असते. पसरणी डोक्यात गेल्याने पूर्ण बघत नाही. मुलीची लवकर शाळा असल्याने बेडरुम मधला टिव्ही बंद आणी हॉल मध्ये साबु चॅनेल शी आट्यापाट्या खेळत असल्याने तुझ्यावाचुच करमेना, काहे दिया आणी बातम्या सगळ्यांची खिचडी असते.

जशी निशा तसा नचिकेत, मी किती चान्गला मुलगा आहे हे काल तो सावन्तान्ना दाखवत होता. गौरी आपल म न बाबान्पुढे मारते हे पाहून त्याला आन्नद होत होता हे त्याच्या चेहर्यावरच दिसत होत. "मला Australia ला जायला मिळाल नाही ना, मग गौरीच लग्न सुद्दा शिवशी होणार नाही." असा आर्विभाव होता त्याचा.

बाकी शिव दरवेळेस कुठल्या प्रॉब्लेम मधे ठाम च वाटला आहे..गौरी मात्र दर दोन दिवसांनी रहु दे ना नको ना करते...>>> नैतर काय, जरा काही झाल हिच सुरु, "मला हे जमणार नाही, आपण इथेच थान्बुया." वै वै. त्यादिवशी शिवने तिला राधिकाला स्वयमपाकात मदत कर म्हणून request केली फोनवर, तर हिने "मला हे जमणार नाही, आपण इथेच थाम्बलेलच बर" अस बोलून फोनच कट केला. ही शिवला डरपोक म्हणते, पण स्वतः काय करते?

काल सावंत शेजार्‍यांकडे काय पिऊन गेले होते? फुल्टु राडा करायची तयारी होती.

शपथेवर शपथेचा उतारा.
पण ती घ्यायला शिवकुमार शुक्ल गौरीच्या हापिसात कशापायी गेले?
सावंतांच्या समोरच हम्माच्या डोक्यावर हात ठेवून घ्यायची ना शपथ? म्हणजे दोन्ही पारडी सारखी राहिली असती.

शिवने आता मितूशी सुत जुळवावं. हम्माबाबूजींना भेटायला ती डोक्यावर ओढणी घेऊन आलेली. शिवाय ती उपासतापास पण करते. सासूचा वारसा चालवेल.

शिवने आता मितूशी सुत जुळवावं. हम्माबाबूजींना भेटायला ती डोक्यावर ओढणी घेऊन आलेली. शिवाय ती उपासतापास पण करते. सासूचा वारसा चालवेल.

Pages