आपल्या सर्वांचे अनमोल कमेंट वाहून जाऊ नये म्हणून हा नविन धागा . असाच पूर येऊद्या कमेंटचा.
आधीचा धागा
रात्रीस खेळ चाले : झी मराठी ....... नविन
मालिका www.maayboli.com/node/57443
शिर्षक गीत :
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
(वहिनी ठुबे ही जाड...)े
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
पात्र परिचय :
माधव-मंगेश साळवी
नीलिमा-प्राची सुखथनकर
आर्चीज्-अदिश वैद्य
दत्ता-सुहास सिरसाट
सरिता-अश्विनि मुकादम
गणेश-अभिशेक गवान
पुर्वा-पूजा गोरे
अभिराम-संकेत कामत
आज्जी-शकुंतला नरे
पांडू-प्रल्हाद कुडतारकर
देविका-नुपुर चितळे
सुषमा -रूतुजा धर्माधिकारी
नाथा-विकास थोरात
गुरव-अनिल गावडे
यमुना -प्रतिभा वाळे
छाया-नम्रता पावसकर
वकिल-दिलीप बापट
मालिकेच्या टीममधील जे इथ येऊन गपचूप कमेंट वाचून जातात त्यांच्यासाठी आजवरचे अनुत्तरित प्रश्नः
१. निलिमाच्या कपाळी मळवट कसा आला?
२. घरात आग कशी लागली?
३. नाना कोणाला आत ये म्हणत होते? (ह्यांना
इमॅजिनरी फ्रेन्ड असावा का?)
४. आर्चिसला समुद्रात कोण बोलावत होतं?
५. निलिमाला कोणत्या बाईने घरी आणुन सोडलं?
६. सुशल्याकडे मोबाईल कसा आला?
७. आर्चिस आणि अभिरामला छाया कशी दिसली
आणि गायब झाली?
८. सुशल्या क्षणात गॅलरीत आणि क्षणात बाहेर
कसा गेला?
९. विहिरीतून वेळाने एको कसा आला?
१०. बॅगेत चिखल कोणी भरला?
११. गुरवाने आणि वकिलाने जमिनीत नारळ का पुरला?
१२. गणेश शिमग्याच्या दिवशी घरात का आला
होता?
१३. छाया घरात आल्यावर उलटी पावलं कोणाची
दिसली?
१४. गुरवाने सगळ्यांनी घरात रहा
म्हणूनही गणेश ऐनवेळी का बाहेर गेला
होता?
१५. दारावर कोणी थाप मारली?
१६. आर्चिसने गणेशला कसला विधी
करताना पाहिलं?
१७. गणेशला ट्रकने उडवलं तो योगायोग
का घातपात?
१८. नाथाच्या बायकोला झाडाजवळ
दिवा लावताना दागिन्यांचा आवाज
येतो त्याचं रहस्य काय?
१९. गुरव गणेशला बरं करायला आला आणि
टरकला का? तो अंगणात दिसलेला माणूस
कोण? गुरवाने घराबाहेर जाऊन वर का पाहिलं?
२०. कपड्यांवर बिब्ब्याच्या फुल्ल्या कोणी
मारल्या?
२१. सरिताला निलिमा किचनबाहेर कशी दिसली?
२२. कपाटातून दागिने गायब कसे झाले? ते
नार्वेकरांकडे कसे आले?
२३. घरावर दगडांचा पाउस कसा पडला?
२४. माधवाच्या खोलीत पलंगाखालच्या पेटीत काय
आहे?
२५. निलीमाच्या लेपटोपवर कोणी मेसेज लिहिला?
२६. सगळ्यांना दुपारी गाढ झोप कशी लागली?
२७. छायाची बाहुली कशी हसली?
२८. जेवणात अळ्या कश्या आल्या?
२९. गुरावाने काही उपाय करायला नकार का दिला?
जवळचंच कोणीतरी हे सगळं करतंय असं तो का
म्हणाला?
३०. छायाच्या बाहुलीला पंख्याला कोणी लटकावलं?
३१. 'अण्णा आहेत' असं गणेश सारखं का म्हणतो?
३२. झाड तोडायच्या आधी माईला तिथे बांगड्यांचा
आवाज कसा आला? दिवा ठेवताना नाथाला?
३३. झाड तोडा असं गुरवाने का सांगितलं? तरी ह्या
लोकांनी ते का ठेवलं?
३४. दत्ता आणि सरिताला रात्री लहान मुलाच्या
रडण्याचा आवाज कसा येतो?
३५. सकाळी अंगणात बाहुल्याच्या पायाचे ठसे कसे
असतात?
३६. दत्ता आणि यमुनाला 'येऊ का' म्हणून कोण
विचारतं?
३७. निलीमाच्या फोनमध्ये शेवंताचा आवाज कसा
येतो?
३८. पांडू का गायब झाला?
३९. गुरवालाच पांडू बरोबर कसा सापडला?
४०. पांडू झाडावर का बसला होता?
४१. पांडू सगळ्यांच्या आधी घरी कसा पोचला?
४२. गुरव सुषल्याला घाबरतो का?
शक्य झाल्यास याची उत्तरे कधीतरी द्या .
आज विशेष
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता बत्ता
अण्णा नाईकाना मुलगा झाला
नाव ठेवले दत्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते कासव
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले माधव
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती सुपारी
अण्णा नाईकाना छाया झाली ढळढळीत दुपारी
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता मॅन्गो जाम
अण्णा नाईकाना मुलगा झाला नाव ठेवले अभिराम
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता अडकित्ता
अण्णा नाईकाना लव्हर भेटली नाव होते शेवन्ता
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता ससुल्या
शेवन्ताला मुलगी झाली नाव ठेवले सुसल्या
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती माचीस
अण्णा नाईकाना नातु झाला नाव ठेवले अर्चिस
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होत्या दुर्वा
अण्णा नाईकाना नात झाली नाव ठेवले पूर्वा
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होता धनेश,
अण्णा नाईकाना नातु झाला,
नाव ठेवलं गणेश.
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होती गाथा,
अण्णा नाईकांचा एक नोकर आहे
नाव त्याचं नाथा!!!
अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ,
खिडकीत होते दाणे,
अण्णा नाईकांना पीडतायेत एक वकिल
नाव त्यान्चे नेने!!!
रात्रीस खेळ चाले सिरीयल बघुन काही प्रश्न
१) : माधव VRS घेऊन कोकणातच रहाणार का?
२) माधवच्या बायकोच्या प्रबंधाचे काय
३) अर्चिस ला कॉलेज मधुन काढले कि त्याने गटांगळी खाल्ली
४) अर्चिसच्या मुंबईतील गर्ल फ्रेंडला त्याची आठवण येत नाही का?
५) दत्ता शेतावर काम करायला कधी जाणार
६) सुश्ल्या ला अजुन ड्रेस शिवायला झालेत, निदान पाड्व्या निमित काहीतरी द्या
७) एवढे दिवस दत्ताच्या बायकोने काय मक्ता घेतला आहे का रांधायचा ती माधवी ( माधवची बायको ) फक्त शंका घेऊन माडीवरच कॉम्पुटर उघडुन बसणार का ?
८) दत्ताची मुलगी शिकत्ये का कॉलेजमधे ,जाताना दिसत नाही ,बाकी मुलगी कामसु आहे
९) धाकटा भाऊ अभिराम ,फक्त बुलेट आणि देविका मध्ये मग्न आहे त्याला इतर कामधंदा नोकरी वगैरे कधी लागणारे?
१०) ओरीजनल कागद पत्रे नसताना कुठल्या बेस वर वकील जमिनीवर हक्क सांगत आहेत ,त्यांची वकिली डिग्री कुठल्या कॉलेजची आहे .
भाऊ, तुम्ही मालवणी लिहीत जा
भाऊ, तुम्ही मालवणी लिहीत जा हो. मला खूप आवडते ऐकायला. वेगळाच गोडवा आहे त्यात.
भाऊंचा मालवणी आणि आणि समर्पक
भाऊंचा मालवणी आणि आणि समर्पक व्यंगचित्र म्हणजे धमाल असते.
हो करेक्ट प्रज्ञा. त्यांची
हो करेक्ट प्रज्ञा.
त्यांची व्यंगचित्र बघायला कधी कधी मी कोकणचे असतात गजाली करायला, त्या बाफवर जाते.
माका मादवाचा वागणां जरा
माका मादवाचा वागणां जरा निराळाच दिसतासा. माझो संशय तेच्यावर असा.
आज काय झालं.
आज काय झालं.
दागिने आणि जमीनीच्ये
दागिने आणि जमीनीच्ये कागदपत्र असलेलां कपाट तसांच उघडां टाकून भायेर गजाली करूंक येतत सगळे ! कागदपत्र गायब !! येडपट खंयच्ये !!!
मीं जावन त्येंचा 'मालवणी' सुधारतलां, पण त्येंच्यात रवान मीं खुळावतलंय त्येचां काय !!!
माका वाटतां ,सगळ्यांक कळूक
माका वाटतां ,सगळ्यांक कळूक होया म्हणून मालवणी+मराठी बोलत असतले.
दागिने आणि जमीनीच्ये कागदपत्र
दागिने आणि जमीनीच्ये कागदपत्र असलेलां कपाट तसांच उघडां टाकून भायेर गजाली करूंक येतत सगळे ! कागदपत्र गायब !! येडपट खंयच्ये !!!>> +१. सगळे नाईक गुडघ्यावर पडले आसत. कपाटाक कुलुप लावचा मगे काय ते गप्पा झोडायचे.
सुसल्याक सांगायचा नाय म्हणतत जमीन त्याच्या आवशीच्या नावावर हाय ती. आणि नेन्याक फोन करुन सांगतत. वरचो मजलो रिकामोच काय सगळ्यांचो.
धमाल आहे सगळी. थांकू
थांकू सगळ्यांना ब्रीफबद्दल. पण कपाट उघडं टाकून बाहेर का येतात?
सुसल्याक सांगायचा नाय म्हणतत
सुसल्याक सांगायचा नाय म्हणतत जमीन त्याच्या आवशीच्या नावावर हाय ती. आणि नेन्याक फोन करुन सांगतत. वरचो मजलो रिकामोच काय सगळ्यांचो. राग>>+१
बाहेरून कोणी बोलावत नाही
बाहेरून कोणी बोलावत नाही किंवा येत नाही तरी फक्त गप्पा मारायला कपाट लॉक न करता जातात, ग्रेट सर्वच.
बाहेरून कोणी बोलावत नाही
बाहेरून कोणी बोलावत नाही किंवा येत नाही तरी फक्त गप्पा मारायला कपाट लॉक न करता जातात, ग्रेट सर्वच.>> अगं, त्या कपाटात शेवंताचे दागिने असतात, आणि रस्त्याकडेच्या जमिनीचे कागदपत्र कपाटावर असतात. सगळे ठरवतात ती जागा शेवंताच्या नावावर आहे ते कोणाला कळू द्यायचे नाही अगदी ठोकळीलाही. कारण ती सुषमाला जागा द्यायला लावेल म्हणून. आता अशा परिस्थितीत आपण इथे खोलीत फार वेळ थांबूया नको, बाहेर जाऊन ठरवूया काय ते. असे ठरवून सगळे इतके महत्वाचे कागदपत्र आणि दागिने असलेले कपाट लाॅक न लावता फक्त असंच बंद करुन बाहेर येतात.
ओके, असं झालं का
ओके, असं झालं का एकंदरीत.
म्हणजे ठोकळी गैरहजर. मला वाटलं सुसल्या सोडून सर्वजण असतील हजर.
माई, दत्ता, दत्ती, माधव,
माई, दत्ता, दत्ती, माधव, अभिराम एवढेच हजर असतात तिथे.
यमी या सगळ्यांना हातात कागद घेतलेले चोरुन बघते आणि मेकअप करत असलेल्या सुसल्याला जाऊन सांगते. आता ते कागद सुसल्यानेच गायब केले असणार असं वाटतय.
ओहह्ह. थांकू निधी.
ओहह्ह. थांकू निधी.
कालची आमची संगीत मैफील खुपच
कालची आमची संगीत मैफील खुपच रंगली. पंडीत भीमसेन जोशींचे पट्टशीष्य आनंद गंधर्व गात होते.
आजच्या भागात सरिता दागीन्यांचे डबे बघुन हरखून जाते. जवळजवळ ती डब्यांवर झडपच घालते व आशाळभुत नजरेने दागीने न्याहाळते. परंतू जेव्हा ती दुसर्या छोट्या डब्याला हात लावते तेव्हा माई थांबवतात. म्हणतात की त्याला हात लावू नकोस ते दागीने शेवंताचे आहेत. ती जेव्हा गेली तेव्हा तीच्या अंगावरील उतरवलेले हे दागीनेआहेत. सरिता घाबरते व पटकन डबा लावून ठेऊन देते. अभिराम बघतो काही दिसते का अजुन कपाटात. मग माधव गुढपणे बघुन म्हणे शोधायला हवे, मग डिटेलमधे कपाट बघायला घेतात. कपाटात तर काही नसते पण फाईल कपाटावर असते. मग मागे नाही का? कसे सगळे फाईल वाचून मुकपणे एकमेकांकडे पास करतात तशी करतात. निलीमा विचारताते की काय आहे, माधव म्हणतात की प्राॅब्लेमचे सोल्युशन मीळाले, आई मी म्हटले नव्हते की आपले वाईट दिवस संपून चांगले दिवस येतील? तेवढ्यात यमुना चोरून डोकावते. माई परत विचारतात काय आहे? मग माधव म्हणतात की जमीनीचे कागदपत्र आहेत. अभिराम म्हणतो नदीकाठच्या जमीनीचे पेपर्स आहेत, माई विचारतात, कोणाच्या नावाने आहे जमीन? तर म्हणे शेवंताच्या. माई डोक्याला हात लावतात. अरे देवा ही जमीनपण ती गीळू बघत होती. अभिराम सांगतो की ती तर गेली पण सरिता म्हणे तिची लेक आहे ना! दत्ता म्हणे आपण तिला कळूच दिले नाही तर? सरिता खुदकन हसते. माई देवच पावला म्हणून हात जोडतात. यमूना सुसल्याच्या खोलीत येते तर ती नट्टापट्टा करत असते व माळलेल्या गजर्याचा वास घेत असतांना तिला यमुना आरशात दिसते. ती काय काम आहे विचारते तर मी कामाशिवाय येऊ शकत नाही का? विचारते. सुसल्या गडीमाणसांनी आरामाकरिता यायचे नसते आणि मला सुशमा म्हण मग ती सुशमा म्हणते. ती पुढे सांगते की तू काही कुबेराची लेक नाही ह्या घरात. तर फणकार्याने सुसल्या म्हणतो मी या घरात तर आले! ती सांगते की तुला नाईक कसे आहेत माहित नाही, तुझ्या समोर काही म्हणणार नाही पण तुझ्या पाठी खुप काही करतील. आत्ता येतांना मोठ्या कपाटाच्या खोलीत माई, माधवदादा, दत्ता, अभिराम होते. काय करत आहे विचारल्यावर काही माहीत नाही पण हातात कागद होते. ती विचार करत असतांना खाली दत्ता म्हणतो की कोणाला कळले नाही पाहीजे. तो नेनेवकिल तर सुसल्याच्या बाजूने आहे. माधव पण हो म्हणतात, माई सांगतात की नीट ठेव सगळे. आपण ह्या खोलीत पण राहायला नको म्हणुन दार उघडे ठेऊनच निघतात.
सरिता आशाळभुतपणे म्हणते की दागीने असे इथे ठेवलेले बरे नाहीत तुम्ही जर म्हणत असाल तर माझ्याकडे ठेऊ का? त्यावर दत्ता त्याची गरज नाही चला सांगतो सगळ्यांना. मग माधव कडीकुलपात असलेल्या कपाटाला फक्त खुटी लावतात. इकडे सुसल्या विचारात पडते की कसले कागद असावेत? तसेच महत्वाचे असतील, यमुना सांगते, तर ती चिडते, मला बघायला हवेत, तिला मधेच अडवून यमुना सांगते की काहीही असो पण तुला आम्ही पोसलय जे तुझे तेच आमचेपण आहे. सुसल्या वसकन अंगावर येऊन तिला घालवून देते. ही पण वैतागते त्यावर मला जरा विचार करू दे म्हणुन सुशमा तिची बोळवण करते. यमुना सवयीप्रमाणे भांड लपवून नेत असताना सुसल्या तिला पकडतो व इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही म्हणुन बजावतो. खाली सगळी भावंडं, माई व सरिता बसलेले असतात. दत्ता म्हणतो की बघ मला सुरवातीपासूनच नेनेवकिलावर संशय होता माधव तुला तर त्याच्यावर खुप विश्वास ना? माधव जाऊदे म्हणुन पेपर तर आपल्या हातात आहे ना सांगतात. आता ते काही करू शकणार नाही, पण माई ते तसे शांत बसणार नाहीत म्हणून शंका उपस्थीत करतात. दत्ता अभिरामला नाईकांना फोन करायला लावतो, त्यांनी नाईकांशी वाकडेपणा घेतलाय सांगतो. अभिराम फोन लावतो तर ते दुकान बंदच करतच असतात. अभिराम वकिलकाकांना मी अभिराम बोलतोय हे जेव्हा सांगतो तर ते म्हणे मला माहित आहे, आपल्या लोकांचे नंबर असतात माझ्याकडे. अभिराम सांगतो की प्राॅब्लेम आहे, त्यावर ते सांगतात म्हणून मी सांगतोय वाटण्या करून टाकू. अण्णांची इच्छा होती ना की रस्त्याजवळची जमीन तुमच्या नावावर होती पण आम्हाला माहित आहे ती कोणाच्या नावे आहे. प्राॅब्लेम आम्हाला नाही तुम्हाला. तुम्ही त्या रस्त्याकडच्या जमिनीची चिंता करा.आम्हाला माहित आहे ती कोणाच्या नावावर आहे. तुम्ही खुप मोठे आहात पण मी पण UPSC ची परिक्षा देतोय, मला थोडे का होईना कळते. आमच्याकडे पुरावा आहे. ती जमिन शेवंताच्या नावावर आहे, त्यावर ते तो पुरावा कोर्टात घेऊन जा, लक्षात ठेवा गाठ माझ्याशी आहे असे सांगतात. अभिराम तसे घरच्यांना सांगतो. माधव म्हणतो की पेपर्स आपल्याकडे आहेत, आपल्याला शांतपणे घ्यायला लागेल. दत्ता माधवला हे सगळे निलीमाला सांगायला मनाई करतो कारण त्याला वाटते की ती ही जमिन सुसल्याला देईन. सरिता पण म्हणते की हो त्यांना खुप पुळका आहे तिचा. माधव दिर्घ हो लावतात. इकडे निलीमा आॅफीसमधल्या लोकांशी बोलत असते व काही तरी पाठवलेले काम चेक करायला लावते. त्यांना सांगते की मी लवकरच इथले काम संपवून येते. माधव म्हणतात की निलीमाला आज ना उद्या हे कळेलच. दत्ता माधवांना विनंती करतात की जेव्हा कळायचे तेव्हा कळेलच पण तू स्वता:हून काही सांगू नको. निलीमा माधव माधव करत येते खाली येते. तर सगळे गप्प बघून काय झाले विचारते. तो म्हणे की काहीच नाही सहज गप्पा मारत होतो. ती म्हणते की मला जरा बोलायचे होते. तर ते बोल म्हणतात पण ती वरती बोलूया सांगते व वरती जाते.
दत्ता परत उजळणी करतो की वहिनींना नको सांगू. माधव वरती जातात. निलीमा म्हणते की मला आॅफीसचा काॅल आला होता लवकरच निघावे लागेल. तू पण प्राॅपर्टी संदर्भात कागतपत्रांची पुर्तता कर आणि ये. माधवला गप्प बघुन ती विचारते की काय झाले? मला असे का वाटते की तू माझ्यापासून काहितरी लपवीत आहे? त्यावर ते काहीनाही असे सांगतात. निलीमा म्हणते की मला पण हे प्रकरण लवकरात लवकर मिटवायचे आहे. तु बरोबर म्हणतो की मलापण त्यांच्यासारखा विचार करावा लागेल वगैरे.खाली सरिता शंका उपस्थीत करते की भाऊजी नाही सांगणार ना? तर दत्ता दिलासा देतात की त्यांनी आपल्याला एकदा नाही सांगीतल्यावर नाही सांगणार. माई म्हणतात की आता शंका घेऊ नका. माधव वरती जातात आणि यमुना खाली येते. दत्ता विचारतात की तू वर कशाला गेली होतीस? माधवच्या खोलीत तर नसेल गेली. ती सांगते की सुसल्याचे काही सामान राहिले होते ते द्यायला आले होते. सरिता बजावते की तिच्यापासून दुर रहा. सरिता चहा केलाय तो घेऊन ये सांगते. ती आत जाते तर दत्ता म्हणतात पेपर्स जपून ठेवायला पाहिजे. अभिराम काॅपी करायला पाहिजे असे सुचवीतो व जातो. यमुना चहा देते व तिथेच घुटमळते. सरिता तिला घालवायला बघते तर ती म्हणते की मी चहाचे रिकामे कप घऊन गेले असते तर ते मी आणते असे सरिता सांगुन तिला घालवते. इकडे अभिराम कपाटाचे दार उघडतो तर त्याला पेपर्सच्या ऐवजी गजरा दिसतो. तो ओरडतो तर सगळे त्या खोलीत जातात व घाबरे होतात. माई घाबरून म्हणतात हा तिचाच गजरा आहे शेवंताचा. तेवढ्यात कौलांवर आवाज येतो. सगळेच घाबरतात. पांडू हसत हसत म्हणतो की हा दगडांचा पाऊस आहे.
भगवती,अग तुझे पदकमल कुठे
भगवती,अग तुझे पदकमल कुठे आहेत? भागाचा गोषवारा नलिहिता अ पासून ज्ञ पर्यंत सर्व वाक्यांसहित भाग उभा केलास की.
भगवती, इतका सगळा
भगवती, इतका सगळा टाइपलस.....
___/\___. स्वीकारावा.
<< कालची आमची संगीत मैफील
<< कालची आमची संगीत मैफील खुपच रंगली. >> ह्येच्यानंतर ताबडतोब 'रात्रीस खेळ ...' बघणां म्हणजे खूपच उंचारून खालीं उडी मारूंची लागली असतली तुमकां !!! खूप लागलां नाय मां ?
भाऊ, तुम्ही मालवणी लिहीत जा
भाऊ, तुम्ही मालवणी लिहीत जा हो. मला खूप आवडते ऐकायला. वेगळाच गोडवा आहे त्यात.>>>>>+१०००
भगवती ___/\___
भगवती ग्रेट, थांकु. माधव
भगवती ग्रेट, थांकु.
माधव कुलुप न लावता खुटी लावतो आणि जातो, डाऊट्ट. माधव आणि ठोकळी मिळून तर नाही करत ना
.
भाऊकाका, कमेंट भारी हा.
भाऊकाका, कमेंट भारी हा.
भगवती खरच तुम्ही ग्रेट आहात
भगवती खरच तुम्ही ग्रेट आहात अगदी! मी रा. खे. चा हां भाग बघुक नाय जमलो, पण ह्या वाचून पुरो सिन उभो रव्हलो डोळ्यासमोर !
ह्या सिरियलच्या निमित्ताने माका पैन मोडक्यातोडक्या का होईना पण मालवाणित बोलुचि संधि मिळता
कालचा एपीसोड बघीतल्या
कालचा एपीसोड बघीतल्या बघीतल्या लिवायला घेतला म्हणून फ्रेम टू फ्रेेम लिहीला गेला. उद्यापासून थोडक्यात शाॅर्टमधे लिवायचा प्रयत्न करेन
थोडक्यात शाॅर्टमधे लिवायचा
थोडक्यात शाॅर्टमधे लिवायचा प्रयत्न करेन >> नको नको. मग आमका काय कळूचा नाय.
अस्साच डिटेलमधी लिव.
भगवती, डिटेलिंगच हवं प्लीज.
भगवती, डिटेलिंगच हवं प्लीज.
बॅगवती तुसी ग्रेट हो . असच
बॅगवती तुसी ग्रेट हो . असच डिटेलिंग द्या.
<< डिटेलिंगच हवं प्लीज. >>
<< डिटेलिंगच हवं प्लीज. >> म्हणजे, ओरिजिनल एपिसोड बघूंचेच बंद करतले हंयले सगळे; ह्यां तर 'पायरेटींग'च्याय पुढचां काम झालां !!
ह्यां तर 'पायरेटींग'च्याय
ह्यां तर 'पायरेटींग'च्याय पुढचां काम झालां !! >>
पांडुचे काम करणार्या
पांडुचे काम करणार्या कलाकाराचे नाव प्रल्हाद कुडतरकर आणि या मालिकेचा लेखकही तोच आहे.
Madhav - Mangesh Salvi
Neelima - Prachi Sukhathankar
Archi - Adish Vaidya
Dattaram - Suhash Sirsat
Sarita - Ashwini Mukadam
Ganesh - Abhishek Gavan
Purva - Pooja Gore
Abhiram - Sainkeet Kamat
Aajji - Shakuntala Nare
Pandu - Pralhad Kudtarkar
Devika - Nupur Chitale
Sushma - Rutuja Dharmadhikari
Natha - Vikas Thorat
Gurav - Anil Gawade
Naths's Wife - Pratibha Vale
Chhaya - Namrata Pavasakar
Vakil - Dilip Bapat
Crew
Directed by = Shivaji Badadare
Concept by = Nilesh Mayekar
written by = Pralhad Kudtarkar
(फेसबुकहुन साभार)
https://www.facebook.com/RatrisKhelChale/?fref=ts
Pages