Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00
२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग, आपल्या पोरानीं दिवे लावले
अग, आपल्या पोरानीं दिवे लावले म्हणून नाही;
स्टंपमधे तसे लाईट लावलेलेच असतात !!!
परत पोस्ट झालं. सॉरी.
परत पोस्ट झालं. सॉरी.
तसंच. सॉरी
तसंच. सॉरी
भाऊ,
भाऊ,
दिवे लावले >>>
दिवे लावले >>>
संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त
संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त बांगलादेशचीच होती. त्यांच्या बॅटिंगच्या १९ व्या ओवरपर्यंत ! >> actually नाही. आपल्या बॅटींगच्या वेळी एक वेळ म्हणता येईल. पण बॉलिंगच्या वेळी नाही. तमिम चा बुमराहच्या त्या ओव्हरमधल्या शेवटच्या ४ पासून शब्बीर रहमान बाद होइतो 'अल्ला मेहेरबान तो गधा पेहेलवान' सुरू होते. किती वेळा एजेस होत्या नि अश्विन चा सोडलेला कॅच होता. १२ व्या ओव्हरनंतर भारताने हळू हळू खेचायला सुरू केले होते. १२ व्या ओव्हरनंतर ५२ र्न्स ४८ बॉलमधे होते, हातात सात विकेट्स होत्या. इथून बांग्लादेश हरल्यावर संपूर्ण मॅच बांग्लादेशची होती हे भयंकर धाडसी विधान आहे. Dropped catches मूळे त्यांना जिंकायची जबरदस्त संधी होती ती त्यांना साधता आली नाही. जेंव्हा (१२ व्या ओव्हरनंतर ) गरज पडली तेंव्हा भारतीय खेळाडू बरोब्बर खडूसपणे खेळले, त्यांच्या कडे आलेली प्रत्येक संधी त्यांनी घेतली, त्यांना साजेशी परिस्थिती बनवली नि जुगाड केला.
फा, ह्या वेळचे 'मॅन ऑफ द मॅच' एकट्याला देणे बरोबर वाटले नाही.
दिवे लावले >> >>
आपण इथे लाऊया 
<< संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त
<< संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त बांगलादेशचीच होती. त्यांच्या बॅटिंगच्या १९ व्या ओवरपर्यंत ! >> १५.२ षटकं झालीं तेंव्हां भारताची धांवसंख्या होती ११५-५. तितक्याच षटकांत , त्यांची इतकी झंझावाती सुरवात होवून व झेल सुटलेले असूनही, बंगलादेशचीही धांवसंख्या होती - ११५-५ !. याचाच अर्थ, त्यांच्या डावाची पहिलीं ७-८ षट्कं झाल्यावर, भारताने खेळावर ताबा मिळवायला निश्चितपणे सुरवात केली होती. म्हणूनच, बंगलाच्या डावाचीं फक्त सुरवातीचीं ७-८ षटकं सोडलीं, तर सामना कुणाच्याही बाजूला झुकूं शकत होता.<< संपूर्ण मॅच फक्त आणि फक्त बांगलादेशचीच होती. त्यांच्या बॅटिंगच्या १९ व्या ओवरपर्यंत ! >> याच्याशी म्हणूनच नाहीं सहमत होवूं शकत.
कालची मॅच संपल्यावर एक मॅचेस
कालची मॅच संपल्यावर एक मॅचेस आठवली..
एक विंडीज विरुद्ध साऊथ आफ्रिका..
http://www.espncricinfo.com/wivsa/engine/match/209027.html
जिच्या मध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये ३, ४, आणि पाचव्या बॉलला लँगेवेल्डनी दोन बोल्ड आणि एक एलबीडब्लू करुन हॅटट्रीक घेऊन मॅच जिंकून दिली होती..
भारत पण एक मॅच अशीच हारला होता असे अंधुकसे आठवते आहे.. श्रीनाथ, प्रसाद आणि अजून कोणीतरी शेवटच्या ओव्हर मध्ये आऊट झाले होते.. ३ बॉल मध्ये ३ करायचे होते तेव्हा..
असामी, भाऊ +१
असामी, भाऊ +१
ती वरची वेस्ट ईंडीज आफ्रिका
ती वरची वेस्ट ईंडीज आफ्रिका मी सुद्धा लाईव्ह पाहिलेली. बहुधा वेस्टईंडिजमध्येच होती. रात्रीच्या वेळी पाहिलेल्या यादगार मॅच पैकी एक.. वेस्ट ईंडिजमध्ये असलेल्या मॅच बघायला मला नेहमीच मजा यायची त्याचे कारण म्हणजे रात्रीची शांत वेळ, आणि तेथील अतरंगी पब्लिक व म्युजिकल वातावरण.. वेस्टईंडिज अटीतटीचा सामना जिंकल्यावर तेथील पब्लिक जे वेड्यासारखे मैदानावर कोलांट्या उड्या मारते ते वेड मजा आणते.
ती प्रसाद श्रीनाथ वालीही पाहिलीय. तपशीलवार डिटेल आठवत नाही पण तेव्हा फार धक्काही बसला नव्हता. कारण त्यांच्याकडून कधी अपेक्षाच नसायच्या. तेव्हा आपल्या शेपटाला आमच्याकडे अपंग म्हणायचे. सहा विकेट गेल्या की मॅच गेली, मग आपले आंधळे लंगडे बहिरे अपंग फलंदाज आहेत म्हणत तिथेच आशा सोडायचो.
त्या श्रीनाथ कुंबळेने एक मॅच पन्नासची भागीदारी करत काढलेली. त्यांच्या आई सुद्धा बघायला होत्या. ती केवढी फेमस झालेली. कारण असले द्रुश्य दुर्मिळच.
मलिंगानेही 2007 वर्ल्डकपला चार चेंडूत चार काढलेल्या तेव्हाही आफ्रिका अश्याच धक्क्यातून कशीबशी वाचलेली. ती सुद्धा वेस्टईंडिजमध्ये असल्याने लाईव्ह बघायचा योग नशिबी होता.
https://in.yahoo.com/cricket/
https://in.yahoo.com/cricket/photos/here-are-all-the-quotable-quotes-not...
परफेक्ट उत्तर दिलय धोनीनी पत्रकाराला. It's so easy to criticize sitting outside the boundary lines.
http://youtu.be/u6plh0YC6Aw
हिम्या तुला बहुधा भारत वि.
हिम्या तुला बहुधा भारत वि. झिम्बाब्वे १९९९ वर्ल्ड कप ची गेम डोक्यात असेल. शेवटच्या काही ओव्हर्स मधे मोंगिया, रॉबिन सिंग, श्रीनाथ व प्रसाद आउट झाले होते.
श्रीनाथ ची विकेट एकदम निर्बुद्ध वाटते आता बघताना. पण या आधी त्याला साधारण तशाच प्रयत्नांमधे दोन छक्के मिळाले होते. तरीही मला आठवते तेव्हा गावसकरच यांनी आता १-२ धावा काढून खेळले पाहिजे वगैरे म्हणत होता. रॉबिन सिंग आउट झाला तेव्हा बहुधा २ ओव्हर्स मधे ६-७ रन्स हवे होते. बॅटी फिरवायची अजिबात गरज नव्हती.
क्लिप सापडली
https://www.youtube.com/watch?v=ALCGgaS7EVg
या मॅच नंतर गावसकर ला कोणीतरी विचारले होते की त्याच्यामते भारत सुपर-सिक्स मधे जाईल का? तेव्हा तो म्हंटला होता:
My heart says yes, but my mind says no
ही मॅच भारताला त्या कप मधे बरीच त्रास देउन गेली. सुपर सिक्स मधे आपण गेलो पण कमी पॉइंट्स घेउन. मग तेथे ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड कडून हरल्यावर बाहेर गेलो. नेहमीप्रमाणे पब्लिक ला फक्त पाक ला हरवल्याचे समाधान मिळाले.
<< My heart says yes, but my
<< My heart says yes, but my mind says no >> परवांच्या मॅचनंतर, या स्पर्धेपुरतं तरी गावसकरच्या 'हार्ट' व 'माईंड'चं 'येस' म्हणताना 'सूर मिले तुम्हारा हमारा' व्हायला हरकत नसावी !
आता रविवारचं प्रिपेरेसन
आता रविवारचं प्रिपेरेसन म्हणून आपण ब्राऊन वॉश दिलेली टि २० सिरिजचे हायलाईट्स बघितले. टू गूड! हीच एग्जॅक्ट टीम होती आणि असली भारी वाटली! कोहली करता तर मॅड रिस्पेक्ट. काय नजर होती बॉल वर? कुठेही डेंजरस शॉट्स नाही की काही नाही. फ्लॉलेस असा गेम होता त्याचा! शर्मा ला बरेच जीवदान मिळाले नाहीतर त्याचे शॉट्स तर ट्रिट फॉर द आईज असतात.
भुमराह, पंड्या आणि अश्विन कसली बॉलिंग करत होते? अश्विन जबरी आहे! फोर मारा, सिक्स मारा he does not deviate from his line and especially is not all afraid to give the ball flight yet again!
तिन्ही हाय स्कोरिंग मॅच झाल्या. ह्यावेळी ज्या चुकांकरता आपण भारताच्या नावानी बोंब मारतोय त्यातल्या काही तेव्हाही झाल्या फक्त स्कोअर जास्त असल्यामुळे त्यातून सावरता आलं.
ओवरॉल ह्या गेम मध्ये एरवीच चुका करुन सुधारत बसायला वेळच नाहीये त्यामुळे कमीत कमी चुका खासकरुन ज्यात चुका अवॉईड करता येतात जसं फिल्डिंग आणी बॉलिंग (लाईन, लेंत) ह्याक्डे फार लक्ष दिलं पाहिजे. बॅटिंग्चं असं आहे की जेवढं बॅटिंग ओरियेंटेड हा गेम झालाय तेवढच एखाद्या प्लेयर कडून कन्सिस्टंटली येऊन दर वेळी तो भरपूर रन करेल ही अपेक्षा ठेवणच चुकीचे वाटत आहे. ह्याचाच अर्थ सगळ्या लाईन अप पैकी १-२ जणं फायर झाले आणि बाकीच्यांनी हातभार लावला तरी डिसेंट स्कोअर होऊ शकतो. खुपच भारी खेळले ते १-२ जणं अन १७५ वगैरे झाला स्कोअर तर बोनसच.
सध्या कोहली आणि धोनी नीट दिसत आहेत. खरं असला डीप लाईन अप आहे आपला. पहिल्या २-३ जणांनी ६०-७० जरी केले तरी पुढ्चे येऊन प्रेश्॑र न घेता स्कोअरबोर्ड हालता ठेवू शकतील.
अवांतर (?): धोनीनी तेव्हा पण एक पाय नाचव रे ... बॅकफूट्वर जोर देऊन पुढ्चा तरंगवून असले तडाखे लावले दोन! हसायलाच येतं तो शॉट बघून.
कितीही गावठी मारलेले असले तरी फिल्डर नी मध्ये हात घालूच नये त्यामध्ये कारण मला वाटतं एखाद्याचा हात बरोबर घेऊन जाईल तो बॉल एक दिवशी.

https://www.facebook.com/dwar
https://www.facebook.com/dwarkanath.sanzgiri/photos/a.490157064448629.10...
सांझगिरींचा लेख उत्तम आहे
पहिल्या २-३ जणांनी ६०-७० जरी
पहिल्या २-३ जणांनी ६०-७० जरी केले तरी पुढ्चे येऊन प्रेश्॑र न घेता स्कोअरबोर्ड हालता ठेवू शकतील. >> हेच म्हणतोय हो मी कधी पासून पहिल्या दोघांनी ६ ओव्हर मधे हाणामारी करून ४०-५०ची तरी भागीदारी करावी पण एकदम तुफ्फान खेळून. खेळपट्टी कशी का असेना पहिल्या ६ ओव्हर मधे उचलून मारले तर कसली खेळपट्टी आणी कसले काय
आपले सर्वांचे नशिब चांगले की
आपले सर्वांचे नशिब चांगले की पाकिस्तान बरोबर अशी मॅच झाली नाही.
फारेण्ड, ती झिम्बाब्वेची
फारेण्ड, ती झिम्बाब्वेची वर्ल्डकप मॅच फेमसच आहे. त्या सामन्यात सचिन नसल्याचा फटका बसलेला. पण अजून एक अशी मॅच आठवतेय ज्यात पटपट तीन गेलेल्या. बहुधा भारतातीलच डे नाईट होती.
नेटरनरेटच्या आधारे भारत जरी
नेटरनरेटच्या आधारे भारत जरी ऑस्ट्रेलिया विरुध्द हरला तरी सेमीमधे पोहचू शकतो. वरील एक्सेलशीट्स मधे नेटरनरेटचे काही धावसंख्या दिली आहे. त्यानुसार जर झाले तर आपला नेटरनरेट वाढवून सेमीमधे पोहचू शकतो
आजच्या मॅच मधे पाकिस्तान जिंकला पण धावांची मार्जिन ५ असेल तर त्या दोघांचा नेटरनरेट मायनस मधे जाईल उदा. पाकिस्तान ने १८० धावा २० ओव्हर्स मधे केले आणि ऑसीने १७५ धावा २० ओव्हर मधे केल्या तर पाकिस्तानचा नेटरनरेट -०.३७ होईल. आणि गुण ४ होतील .
आता भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया मॅच मधे जरी ऑस्ट्रेलिया जिंकला तरी आपण १० पेक्षा कमी धावांनी हरायला पाहिजे ते ही ती धावसंख्या ओव्हर राखुन करायला हवी. उदा. १९० ऑस्ट्रेलियाने २० ओव्हर्स मधे केले तर भारताला १८० ही धावसंख्या १७ ओव्हर मधे गाठावी लागेल. त्यानंतर हरले तरी चालेल कारण तेव्हा ऑस्ट्रेलियाचा नेटरनरेट होईल -०.२३ आणि भारताचा होईल -०.२०
अशा पध्दतीने तिन्ही संघाचे ४ समान गुण होतील आणि सरस धावगतीवर भारत सेमी मधे पोहचू शकेल
पण
यासाठी आधी पाकिस्तान कमीत कमी धावा राखून जिंकावा लागेल आणि भारताला ३ ओवर शिल्लक राखुन ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येजवळ १०पेक्षा कमी अंतरात पोहचावे लागेल.
आज न्युझिलंड आणि पाकिस्तान या
आज न्युझिलंड आणि पाकिस्तान या दोन देशांत मॅच आहे ना?
मला क्रिकेटच्या फारश्या टर्मस कळत नाहीत, पण खेळ कळतो.
भारत पाकिस्तान पेक्षा भारत बांगला देश मध्ये जी चुरस होती ती खरंच उत्कंठावर्धक होती. मी तर श्वास रोखून पाहिली.
आज जिंकेल त्याच्यासोबत आपली मॅच रविवारी आहे असं ऐकलं मी. खरं का?
आज जिंकेल त्याच्यासोबत आपली
आज जिंकेल त्याच्यासोबत आपली मॅच रविवारी आहे असं ऐकलं मी. खरं का?>>>
आपली मॅच ऑस्ट्रेलिया सोबात आहे रविवारी!
आज पाक ऑस्ट्रेलिया मॅच आहे... त्यांच्या विजेत्याशी काही संबंध नाही! आपल्याला रविवारी ऑसीज बरोबर जिंकणे आवश्यक.. उपान्त्य फेरी गाठण्यासाठी जी शक्यतो दुसर्या गटातील पहिल्या क्रमांच्या टीमशी होईल मॅच आणि तो संघ वेस्ट इंडीज असण्याची दाट संभावना सध्यातरी!
दक्षिणा, बाय द वे क्रिकेट च्या धाग्यावर अचानक पायधूळ हा बदल???
अरे किशोर मी मॅच पाहते पण
अरे किशोर मी मॅच पाहते पण तुम्हा दिग्गजांसारखी चर्चा नाही करता येत. बॉलिंगचे प्रकार, फिल्डिंगचे प्रकार, बॅटिंश शॉट्स इ. काही कळत नाहीत. त्यामुळे टेक्निकल चर्चा नाही कळत. फक्त खेळ (गरजेपुरता) कळतो, आणि आवडतो पण.:) म्हणून जस्ट हजेरी लावली.
चांगली सुरवात केली
चांगली सुरवात केली पाकिस्ताननी पण होल्ड सोडला नंतर. वॉटसन, स्मिथ सुटले आता तर १९० होऊ शकतील.
१९व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू
१९व्या ओव्हरचा शेवटचा चेंडू कहर होता...
आयला ऑसी ने १९२ मारले आता
आयला ऑसी ने १९२ मारले
आता पाकिस्तान भले जिंकले तरी आपल्याला ऑसिंना ची टोटल किमान १५ ओव्हरच्या आत ०१० धावांचे अंतर राखून मग हरावी लागेल. त्या आधी हारले तर आपण गेलो.
च्या मायला अवघड झाले रे. बांग्लादेश बरोबर चांगल्या मर्जिन ने जिकलो असतो तर..
आता तर ऑसी विरुध्द जिंकावेच लागेल
झकास !!
झकास !!
साडेपाच षटकात दोन आऊट चाळीस
साडेपाच षटकात दोन आऊट चाळीस पाकीस्तान!
ऑस्ट्रेलियाला आता रविवारी हरवा अन्यथा न्युझिलंड ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्याची मजा लुटा!! मस्त इडनगार्डनवर....
शेवटच्या ६-७ ओवर्स पाहिल्या.
शेवटच्या ६-७ ओवर्स पाहिल्या. धडाधड विकेट्स जाताना दिसल्या फक्त. आफ्रिदीसकट कुणी कॉन्फिडन्ट वाटले नाहीत.
आता विसरा नेटरनरेट आता जिंका
आता विसरा नेटरनरेट आता जिंका या बाहेर व्हा.
अरे काय चाललय काय? अवघड
अरे काय चाललय काय? अवघड परिस्थिती साउथ आफ्रिकेची.
Pages