२०-२० विश्वचषक स्पर्धा:२०१६

Submitted by परीस on 15 March, 2016 - 01:00

२०-२० विश्वचषक स्पर्धा १५ मार्चपासून भारतात सुरू होत आहे.
स्पर्धेत एकूण २ गट आहेत.
गट १) श्रीलंका, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि द. आफ्रिका
गट २) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

फटकेबाजी आणि चर्चाकरण्यासाठी ही खेळपट्टी!!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयल्या त्या धोनीच्या,
हरभजन ला घ्यायचे असेल तर घे नाहीतर बिचार्‍याला "हनिमुन"ला तरी जाऊ दे, त्याला उगाच अडकवून ठेवला आहे बायकोचा वाढदिवस सुध्दा टीम बरोबर साजरा करावा लागला. त्या अजिंक्यला सुध्दा उगीच सगळीकडे नाचवत फिरवतोय. अरे नविन लग्न झाले आहे. एक तर तुम्ही त्यांना खेळवत सुध्दा नाही. मग कशाला अडकवून ठेवायचे?
Happy

अरे कसली देर आणि अंधेर आधीच हरभजन ने उशीरा लग्न केले . वर धोनी ने अडकवला आहे.
धोनीचे काय आता त्याचे झाले सगळे सुरळीत. पण असा बदला घेणे चुकिचे Happy

आजच्या सामन्यात भारत ऑस्ट्रेलिया प्लेऑफ सिच्युएशनला भारतीय खेळपट्ट्यांवर आणि या फॉर्मेटमध्ये आपणच किंचित सरस वाटत आहोत. ऑस्ट्रेलिया या नावाला एक ग्लॅमर असल्याने आपण गाफिलही राहणार नाही हे विशेष.

एकेकाळी ऑस्ट्रेलियाबरोबर आपली पहिली फलंदाजी यावी असे वाटायचे. पण सध्याचा भारतीय संघ चेसही करू शकतो. फक्त सध्या सूर थोडासा गंडलाय. तो आजच परत मिळावा.

आज का सचिन तेंडुलकर म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली या सामन्यात परफॉर्म करायची शक्यता आणखी वाढणार.

एक हेजलवूड सोडला तर ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फारशी भेदक वाटत नाही. त्रास देणार नाही. फक्त फॉकनर जेव्हा डेथ ओवरला बॉलिंगला येईल तेव्हा त्याच्यासमोर प्रॉपर बॅटसमन असावेत, तळाचे फलंदाज नसावेत, नाहीतर तो गंडवतो.

तरीही आजच्या सामन्यात की फॅक्टर आपली ओपनिंग पार्टनरशिप राहील. सुरुवातीला दोन विकेट गेल्या तर ऑस्ट्रेलिया चढून बसणार.

स्मिथला आता पुन्हा खेळवू नका. बस्स झाले म्हणावं.
वॉर्नर जेव्हा केव्हा येईल त्याची विकेट आश्विनने मिळवून द्यावी.
मला भिती शेन वॉटसनची वाटते, त्याने सुरुवात चाचपडत केली तरी थोड्याच वेळात 150-200 च्या स्ट्राईकरेटने खेळताना दिसतो. अंडरआर्म बॉलिंगला मारावेत तसे समोर फटके मारतो.
मॅक्सवेलला आपण रोखू शकतो, पॉवरप्लेमधील फिंचचे सांगता येत नाही.
थोडक्यात ऑस्ट्रेलियाला ठराविक अंतराळाने विकेट काढूनच रोखू शकतो. त्यांची फलंदाजी कोणा एकदोघांवर अवलंबून नाही.

आयपीएल् मुळे भारतीय गोलंदाजी २०-२० सामन्यात भारतीय खेळपट्टीवर कशी खेळावी ह्याचे चांगले ज्ञान स्मिथ, वॉर्नर, वॉट्सन, फिंच, फॉकनर ह्यांच्या पाशी आहे. आपपल्या फ्रेंचाईज ना विजय मिळवून देण्यात ह्या मंडळींचा नेहमीच मोलाचा वाटा राहिलेला आहे.. त्यामुळे ह्यांना कसे गुंडाळायचे ह्या बाबतीत भारतीय गोलंदाज आणि कर्णधार (ज्याला आयपीएल मुळे सगळ्यांच्या खोडी ठाऊक आहेत ) ह्यांना आपले कसब पणाला लावावे लागेल!

भारतीय संघ आज विजयी होऊन बाद फेरीत प्रवेश करो... हीच सदिच्छा! ऑल द बेस्ट टीम इंडिया! Happy

आजचा अडथळा पार केला तर कप आपलाच ही खात्री!! Happy

सेमी वेस्ट ईंडिज भेटणार मुंबईला.
तिथे त्या बॅटींग पिचवर फक्त गेल स्टॉर्म येऊ नये याची काळजी घ्यावी लागेल ती आपण घेऊच. गेल नाही खेळत आपल्याबरोबर.
मग फायनला न्यूझीलंडचा बदला ! कलकत्त्याच्या येड्या पब्लिक समोर..

<< तिथे त्या बॅटींग पिचवर फक्त गेल स्टॉर्म येऊ नये याची काळजी घ्यावी लागेल >> सध्यां कोणत्याही पीचबद्दल अस छातीठोकपणे सांगतां येत नाहीं, हीच तर खासियत आहे या विश्वचषकाची !!

भाऊ मुंबई बॅटींगला जागते नेहमीच. या मलिकेतही जागलीय. आठवा 230 चा चेस आणि अफगाणने आफ्रिकेला दिलेले टेंशन ..
असो, अफगाण प्रत्येक सामन्यात इम्प्रेस करतच आहे. आजही 56-5 वरून 123 ला जातानाचा फलंदाजीचा एप्रोच आवडला.
आता 124 बनवायला विंडीजला किती झुंजवतेय हे बघणे रोचक.

योगराज सिंघना कामं नाहीत कसली. म्हणे I told him not to worry. Lol म्हणा भौ the world doesn't revolve around your laadla. I am sure Yuvraj must've told Dhoni that I don't believe in what he said. Lol
This is not the first time he's said something like that and Yuvraj had clarified that he's always enjoyed playing under MSD. वय झालं पण पोरकट्पणा गेला नाही त्या योगराज सिंघांचा. एकता कपूरच्या शिरेलीत काम दिलं पाहिजे त्यांना. Proud

क्रिस गेल अफगाणी जर्सी घालून अफगाण टीम सोबत सेलेब्रेट करत होता. अत्यंत दुर्मिळ क्षण

विचार करा पाकिस्तान हारल्यावर अफ्रिदी इंडीयन जर्सी घालून विराट बरोबर गंन्गम नाच करताना कसा वाटेल ?
पाकिस्तानमधे ठेवतील का ? Wink

वेल प्लेड अफगाणिस्तान !

A lovely moment just now as Gayle joins in the celebrations with Afghanistan and Shahzad. That might be my moment of the tournament. Shahzad demands a selfie, and eventually the entire team crowd round Gayle in front of the cameras. I'm sure we'll have the shot for you shortly. Cricket is a wonderful sport. (Source: cricinfo)

मानलं क्रिस गेल ला. आपल्याला हरवणार्‍या टीममधे जाऊन त्यांच्या बरोबर celebrate करत प्रोत्साहन देतोय! गट्स लागतात राव असलं काहीतरी करायला. खरंच moment of the tournament ! आज हायलाइट्स पहायलाच पाहिजेत.

Pages