हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
अधुन मधुन काढतो तिकीट,
अधुन मधुन काढतो तिकीट, सेंट्रल ट्रॅक सोडला की.
लाडकी बाहुली होती माझी
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधून दुसर्या लाख!
ही कविता म्हणताना डोळयात पाणी आणि माळरानावर गाईने तुडवलेली बाहुली हे चित्र डोळ्यासमोर हे नेहमीच असे.
बिंगो
बिंगो
तशी न, शोधुन
तशी न, शोधुन
ही कविता म्हणताना डोळयात पाणी
ही कविता म्हणताना डोळयात पाणी आणि माळरानावर गाईने तुडवलेली बाहुली हे चित्र डोळ्यासमोर हे नेहमीच असे
हो! आता बालभारत्या ऑनलाईन उपलब्ध आहेत ना, तेव्हा बघितली ही सगळी चित्रे परत.
२०९ लाडकी बाहुली होती माझी
२०९
लाडकी बाहुली होती माझी एक
मिळणार तशी ना शोधूनी दुसर्या लाख
२०४ र ह थ य स अ द ढ त प ज म अ
२०४
र ह थ य स अ द ढ
त प ज म अ झ
मराठी.
तशी न, शोधुन<<<<<<हो. घाईत राहिला तो "ना" .
क्लु द्या.
क्लु द्या.
२०४ रे हिंदबांधवा, थांब या
२०४
रे हिंदबांधवा, थांब या स्थळीं अश्रु दोन ढाळीं,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशिवाली
२०५ हे घ्या,अगदी सोप्प! ह च
२०५
हे घ्या,अगदी सोप्प!
ह च त अ क भ
ड ब ढ
ज म अ क ब न स
मराठी - (हे चित्रपटगीत नाही)
२०५. ही चाल तुरुतुरु उडती केस
२०५.
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागिण सळसळली
कर्रेक्ट कृष्णाजी!
कर्रेक्ट कृष्णाजी!
२०६ मराठी य भ ग प म ह स ज द अ
२०६
मराठी
य भ ग प
म ह स ज द
अ य द
या भवनातील गीत पुराणे मवाळ,
या भवनातील गीत पुराणे
मवाळ, हळवे, सूर जाऊ द्या
आज येथुनी दुर
वा आर्या! किती फास्ट उत्तर
वा आर्या!
किती फास्ट उत्तर ते!!
१ मिनिटात!!!
असा कधीतरी चुकुन माकुन दगड
असा कधीतरी चुकुन माकुन दगड लागतो हो.
२०७
अ थ झ प प
त न म भ फ ध त
मराठी: हे ही चित्रपटगीत नाही
अनुरागाचे थेंब झेलती
अनुरागाचे थेंब झेलती प्रीतवेलीची पाने
तुझ्या नि माझ्या भेटीमधुनी फुलते धुंद तराणे
२०८ मराठी व ख ब त ब त ख म प
२०८ मराठी
व ख ब त ब
त ख म प
चित्रपटगीत नव्हे.
भुजंगप्रयात.
भुजंगप्रयात.
अरे बापरे! कृष्णदेवांनाही
अरे बापरे! कृष्णदेवांनाही जमेना, तर आमची काय कथा????????
कविता आहे. बालभारतीच्या
कविता आहे. बालभारतीच्या पहिल्या मालिकेत होती, दुसर्या मालिकेत होती. नंतरच्या मालिकेंमध्ये असेल पण नक्की माहिती नाही.
क्लु: माझे नाव आणि कवितेचे वर
क्लु: माझे नाव आणि कवितेचे वर दिलेले वृत्त यांचा एकत्र गुगल सर्च केला तर सापडेल
फोडु का?
फोडु का?
वनी खेळती बाळ ते
वनी खेळती बाळ ते बल्लवांचे
तुरे खोविती मस्तकी पल्लवांचे
बिंगो
बिंगो
बिंगो काय त्यात, बालभारतीची
बिंगो काय त्यात, बालभारतीची कृपा
२०९ मराठी - क च भ च च व ह प,
२०९ मराठी -
क च भ च
च व ह प, म क थ
२०९. कैवल्याच्या चांदण्याला
२०९.
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर
अरे बापरे! कृष्णदेवांनाही
अरे बापरे! कृष्णदेवांनाही जमेना, तर आमची काय कथा???????? फिदीफिदी>>>>
अहो, काहीही काय???
मी अत्यंत साधारण संगीत प्रेमी.. मायबोलीवर कित्येक सवाई आणि दिग्गज आहेत ह्या बाबतीत...
२१०. अ य ज त अ भ ज म त न क ह
२१०.
अ य ज त अ भ ज
म त न क ह ए स ज
मराठी
Pages