हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
नविन नियम ८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कृष्णा...बरोबर.
कृष्णा...बरोबर.
कृष्णा, गायब झाला का?
कृष्णा, गायब झाला का?
१८४
मराठी
म भ अ स
त न ल ल क, क ल क
ब ग क म स त स क
भ क त ल म
स ब म स, त ल घ क
ब ग क म स त स क
अरे वा! मस्ताय हा धागा १८४
अरे वा! मस्ताय हा धागा
१८४ ची हिंट देता का गजानन
बाई गं केळेवाली मी सांगा
बाई गं केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभल का?
मी तर भोळी अडाणी सखु तुमच्या
मी तर भोळी अडाणी सखु
तुमच्या नावाच लाल लाल कुकु कपाळी लावाल का
बाई ग केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभन का
१८५ मराठी म च ग ध त द स प अ अ
१८५ मराठी
म च ग ध त द
स प अ अ अ ग
बरोबर, मानव. तर चे अक्षर
बरोबर, मानव.
तर चे अक्षर द्यायचे राहिले. सॉरी.
शोभन ऐवजी सोबन (ग्रामीण) आहे ना?
गजानन, सोबन असावे.
गजानन, सोबन असावे.
सोबल का? अस आहे हो. शोभेल
सोबल का? अस आहे हो. शोभेल च्या ऐवजी खेड्यामंदी सोबलं म्हणतेत.
अनघा, काही ठिकाणी सोबल तर
अनघा, काही ठिकाणी सोबल तर काही ठिकाणी सोबन म्हणतात.
काही ठिकाणी जाशील का तर काही ठिकाणी जाशीन / जासल का / जासन का म्हणतात.
पण गाण्यात बहुतेक तुम्ही म्हणताय तसे सोबल का असेच असावे.
(हापिसांमंदी विडियो आयकु नाय सकत आता.)
होय. विदर्भात / खानदेशात
होय. विदर्भात / खानदेशात सोबन म्हणत असावेत.
सोबल - मराठवाड्यात म्हणतात.
१८५ , क्लु: नाट्यगीत, भूप.
१८५ , क्लु:
नाट्यगीत, भूप.
गाण वळका की कुणीतरी.
गाण वळका की कुणीतरी.
क्लु २. पं. कु. गं
क्लु २. पं. कु. गं
१८५ मलयगिरीच्या चंद्न गंधीत ?
१८५
मलयगिरीच्या चंद्न गंधीत ?
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला
मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आता, उठि उठि गोपाला
बिंगो स्निधा!
बिंगो स्निधा!
बिंगो नाय ओ, खुप वेळ लागला
बिंगो नाय ओ, खुप वेळ लागला ओळखायला
१८६. मराठी
क च भ च
च व ह प म क थ
१८६: कैवल्याच्या चांदण्याला
१८६:
कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर
चंद्र व्हा हो पांडुरंगा मन करा थोर
बरोबर आहे हे गृहित धरून पुढील
बरोबर आहे हे गृहित धरून पुढील कोडे :
१८७:
अ प फ त ह
श घ म त अ
हिंदी/ मराठी?
हिंदी/ मराठी?
मराठी आहे असे समजून
मराठी आहे असे समजून
१८७.
एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात
बरोबर आहे हे गृहित धरून पुढील
बरोबर आहे हे गृहित धरून पुढील कोडे :
१८८:
द त म स
त न व
मराठी
१८८. देवा तुझा मी सोनार तुझे
१८८.
देवा तुझा मी सोनार
तुझे नामाचा व्यवहार
परफेक्ट!!
परफेक्ट!!
१८९. मराठी क ज क स क स क क र
१८९. मराठी
क ज क स क स क क
र त ग न ख न अ ग
१८९.. कुणि जाल का, सांगाल का
१८९..
कुणि जाल का, सांगाल का सुचवाल का ह्या कोकिळा
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा
येस
येस
१९०. ज ह ख व प म स ग य भ स ध
१९०.
ज ह ख व प म स
ग य भ स ध व ह त
मराठी
जगी हा खास वेड्यांचा पसारा
जगी हा खास वेड्यांचा पसारा माजला सरा
गमे या भ्रांत संसारी ध्रुवाचा वेड हा तारा
Pages