सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रसंगावधानाचे महत्त्व
.
अरोरा नावाचे पुण्यातल्या कॅंपातले गृहस्थ पूर्वी मोटीव्हेशन करणारे एकपात्री कार्यक्रम करत. कंपनीतील कर्मचा-यांसाठी हे कार्यक्रम असत.
नावे लक्षात ठेवण्यात काही अडचण येत असेल तर एखादे नाव एखाद्या संदर्भाला जोडून लक्षात ठेवावे, म्हणजे ते सहसा विसरत नाही अशी युक्ती त्यांनी सांगितली होती.. मी त्यांना विचारले, परंतु तो संदर्भच विसरला तर काय करायचे? त्यावर ते निरूत्तर झाले. गंमत म्हणजे आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ही युक्ती सांगितली जाते. नाही म्हटले तरी त्यात थोडे तथ्य आहे, पण तो काही अशा सवयीवरचा पूर्ण उपाय होऊ शकत नाही.
काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, म्हणजे ताजेतवाने वाटते असे त्यांनी सांगितल्याचे आठवते.
त्यांच्या कार्यक्रमात दृष्टीभ्रमाची काही चित्रे दाखवण्याचा एक भाग असे. एका चित्रामध्ये दोन चित्रे समाविष्ट असतात. एकदा एखाद्याच्या नजरेला एक चित्र दिसले, की सहसा दुसरे चित्र डोळ्यांसमोर येत नाही. फार अवघड जाते. पण त्यांनी दाखवलेल्या एका चित्रातली दोन्ही चित्रे माझ्या मित्राला दाखवता आली तर हे महाशय थोडे चिडले. अस्वस्थ झाले. म्हणून त्यांनी तावातावाने आणखी एक चित्र दाखवले, तेव्हा त्यातली दोन्ही चित्रे मला दिसली. त्यामुळे त्यांची अस्वस्थता आणखी वाढली.
आमच्या कंपनीसाठी तो कार्यक्रम करेपर्यंत कितीतरी हजार लोकांना मोटिव्हेट (प्रेरित) केले, अशी त्यांची जाहिरात असे. तरीही आमच्यासाठीच्या सत्रामध्ये तीन-चारवेळा असे झाल्यामुळे त्यांना याआधी खरोखर असे अनुभव आलेच नव्हते का, असे वाटले. की त्यांच्या अनुभवाची त्यांची जाहिरातच बोगस होती कोणास ठाऊक. अखेर जेथे लोकांशी थेट संपर्क होत असतो, अशा कार्यक्रमांमध्ये असे आणीबाणीचे प्रसंग येणारच. पण तरीही तुम्ही किती लगेचच सावरता यातले तुमचे कौशल्य महत्त्वाचे असते. तेथे अनुभवास आलेले अडचणीचे प्रसंग तुम्ही मनाला फारच लावून घेतले तर पुढच्या कार्यक्रमावर त्याचा विपरीत परिणाम होणारच.
आजही वर्तमानपत्रात अधूनमधून त्यांची जाहिरात दिसते. असो.
या निमित्ताने आणखी एक प्रसंग आठवतो.
बी.एड.च्या लेसनसाठी उमेदवारांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन पाठ घ्यावा लागे. एका वर्गातल्या मुलांना त्याचा विषय आधीच कळला होता. चहा. प्रस्थापित दंडकांप्रमाणे थेट विषयाला हात घालायचा नसतो. त्यामुळे या शिकाऊ शिक्षकांनी विषयाची प्रस्तावना करताना मुलांना विचारले, मुलांनो, तुम्ही सकाळी उठल्यावर काय करता? मुले उत्तरली की ब्रश करतो, आंघोळ करतो, केस विंचरतो, धुतलेले कपडे घालतो, वगैरे वगैरे. खाण्यापिण्याकडे गाडी वळेचना. अखेर हे शिक्षक म्हणाले, छान, छान. बरे, आता मला सांगा, तुम्ही सकाळी आटोपून झाल्यावर काय खाता पिता? झाले, मुलांनी खाद्यपदार्थांची जी यादी सुरू झाली, ती संपेचना. शिक्षक अस्वस्थ. मुलांवर रूष्ट होऊनही फायदा नाही. शेवटच्या रांगेत बसलेले परीक्षक थेट नापास करणार. मग मुलांना मध्येच थांबवून ते म्हणाले, छान, ही झाली खाद्यपदार्थांची नावे. आता सांगा तुम्ही सकाळी सकाळी काय पिता. मुलांनी दूध, कॉफी, बोर्नव्हिटा अशी नावे सांगितली. ती यादी फार मोठी होईना. तेव्हा चक्क थांबली. पण कोणीही तोंडातून चहा हा शब्द काही काढला नाही.
अखेर शिक्षकांना या चक्रव्युहातून बाहेर पडण्याची युक्ती सुचली. अन्यथा प्रस्तावनेवर फार वेळ घालवला म्हणूनही गुण कमी होण्याचा धोका होता. ते म्हणाले, तुम्ही जसे दूध, कॉफी, वगैरे पिता, तसेच काहीजण चहा पितात. झाले. मुलांचा पराक्रम तेथेच संपला. त्यांना आणखी द्वाडपणा करणे शक्य नव्हते. मग देशात चहा कोठे पिकतो, चहाला कोणत्या प्रकारचे हवामान लागते, वगैरे मुद्द्यांवर ही शिकाऊ गाडी सुखरूप मार्गस्थ झाली.
वर्षभरानंतर ते उमेदवार शिक्षक म्हणून त्याच शाळेत रूजू झाले व मुलांवर त्यांचीच विद्या उलटवली गेली हे वेगळे सांगायला नको.
तुमच्या पाहण्यात असे चांगलेवाईट अनुभव आले आहेत का? अशा काही गमतीजमती तुमच्या स्मरणात आहेत का?
सार्वनजिक नाही. सार्वजनिक.
सार्वनजिक नाही. सार्वजनिक.
अहो त्या चहा प्रसंगावर
अहो त्या चहा प्रसंगावर द.मा.मिरासदारांचीच एक कथा आहे ना?
मायबोली पण सार्वजनिक
मायबोली पण सार्वजनिक प्लॅटफॉर्म आहे. इथे धागा काढणे हे देखील परफॉर्म करण्यासारखे असते. इथे अनेक व्रात्य आणि द्वाड मुले आहेत. तेव्हां प्रसंगावधानाच्या प्रसंगावधानाचं प्रसंगावधान इथेही वापरावं लागतं.
बाकी सर्दीचा अॅटॅक आल्यामुळे जास्त काही लिहीत नाही. प्रसंगावधान पाळून झंडू बाम चोळतो आणि उद्या संमोहनाच्या प्रयोगांवर लिहीतो.
टीप : ते अरोरांचं नाव टाळा द्यायचं...
>>>काही काम करताना कंटाळा आला
>>>काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, म्हणजे ताजेतवाने वाटते असे त्यांनी सांगितल्याचे आठवते.<<<
दाढीच करताना दाढी करण्याचा कंटाळा आला तर?
बेफि, अहो दाढी कसली करताय! पण
बेफि, अहो दाढी कसली करताय! पण तुम्ही खरंच करता की काय??? ऐतेन. गुलाम कुठेले.
हे असलं काहीबाही लिहिलेलं वाचलं नी बायका शेव करायला पळाल्या. बाहेर साहेब बसले खमंग, कुरकुरीत मिळेल अशा आशेने. कसचं काय! बाहेर ओबडधोबड आलं काहीतरी. तात्पर्य : शेव कुठलीही असो, मोहन कमी पडले की बिघडते.
शिकाऊ शिक्षकांना जो अनुभव आला
शिकाऊ शिक्षकांना जो अनुभव आला तो मायबोलीवर नित्यनेमाने येत असतो. त्याला धागा भरकटवणे म्हणतात.इथेही काही मुलं गँग अप करून मूळ विषयावर चर्चा होणारच नाही याची काळजी घेतात.
काही काम करताना कंटाळा आला तर
काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, /// दाढीचा हात कसा होईल ? दाढीची दाढीच होइल ना ?
>>>> दाढीची दाढीच होइल ना ?
>>>> दाढीची दाढीच होइल ना ? <<<<< नाही ते ही नाही होणार. दाढीचे "भादरणे" होईल...
बाकी धाग्याचा विषय चांगला आहे.... पण सार्वजनिक ठिकाणचे कै आठवत नै बोवा... आता आम्ही पडलो सर्वसामान्य माण्से, सार्वजनिक जागी जाउन जगाला अक्कल शिकविण्याची संधी कुठली मिळायला?
तर तुम्ही जर घरात अर्धांगिनीसमोर, चिल्यापिल्यांसमोर, हापिसात सायबासमोर दाखविलेल्या प्रसंगावधानाचे बोल्ला अस्तात तर ढीगाने उदाहरणे येतिल...... सार्वजनिक सभासंमेलनाचि नाही..... चान्सच नस्तो हो आमच्या सारख्या सर्वसामान्यांना!
चीकू, शक्य आहे. अशा
चीकू,
शक्य आहे. अशा लेसन्समध्ये मुले अगदी ठरवून उमेदवाराची धांदल उडवतात असा अनुभव असल्याने असे अनेक किस्से ऐकायला मिळतात.
काही काम करताना कंटाळा आला तर
काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा, म्हणजे ताजेतवाने वाटते>>>>
आम्हाला दिवसातुन चार पाच वेळा कंटाळा येतो ब्वॉ.. मग काय चार पाच वेळा तासायची का? शेव्हिंग किट बरोबर घेउन फिरायला लागेल...
काही काम करताना कंटाळा आला तर
काही काम करताना कंटाळा आला तर सरळ दाढीचा एक हात करावा.
<<
पण "हात" करण्याएवढे दाढीचे केस कुठुन मिळवणार..
आम्हाला दिवसातुन चार पाच वेळा
आम्हाला दिवसातुन चार पाच वेळा कंटाळा येतो ब्वॉ.. मग काय चार पाच वेळा तासायची का? >>>>>>>
त्यांनी प्रत्येक वेळेस स्वता:चीच दाढी करावी असं कुठे लिहिले आहे ? :फिदी:
त्यांनी प्रत्येक वेळेस
त्यांनी प्रत्येक वेळेस स्वता:चीच दाढी करावी असं कुठे लिहिले आहे ? >>>
हो पण त्याचवेळी असा दुसरा कंटाळलेला शोधण पण अवघडै..
आणि दुसरा प्रश्न हा उपाय unisex नाहिये, बाप्ये लोक्सांनी दाढी करावी, मग बायकांनी काय करायचं कंटाळा आल्यावर ;), की त्या एका झाहिरातीत दाखवतात तसं बाइने बाप्याची दाढी करुन द्यायची
घ्या... कुलकर्णी साहेब, आता
घ्या... कुलकर्णी साहेब, आता दाखवा तुमचे प्रसंगावधान या धाग्यावरच......

इकडची जन्ता दाढी भादरण्यातच गुंतली आहे...
>>>आणि दुसरा प्रश्न हा उपाय
>>>आणि दुसरा प्रश्न हा उपाय unisex नाहिये, बाप्ये लोक्सांनी दाढी करावी, मग बायकांनी काय करायचं कंटाळा आल्यावर<<<
http://www.maayboli.com/node/56607
ह्या धाग्यात सांगितल्याप्रमाणे वागायचं
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून ब्रश आणि रेझर घेऊन मेन्स रूममधे जाताना लोकांच्या किती विचित्र प्रकारच्या नजरा झेलाव्या लागतील त्याचा विचार करतोय.
कठीण आहात तुम्ही लोकं..
कठीण आहात तुम्ही लोकं..
आम्हाला दिवसातुन चार पाच वेळा कंटाळा येतो ब्वॉ.. मग काय चार पाच वेळा तासायची का? शेव्हिंग किट बरोबर घेउन फिरायला लागेल...>>
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून ब्रश आणि रेझर घेऊन मेन्स रूममधे जाताना लोकांच्या किती विचित्र प्रकारच्या नजरा झेलाव्या लागतील त्याचा विचार करतोय. >>
कहर
कहर
आज कळले. न्हावी हा जगातील
आज कळले. न्हावी हा जगातील सर्वात कंटाळलेला पंथ आहे.
दाढीचा एक हात करावा म्हणजे
दाढीचा एक हात करावा म्हणजे मला वाटलं की दाढीवरुन एक्दा हात फिरवावा
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून
ऑफिसमधे अचानक जागेवरुन उठून ब्रश आणि रेझर घेऊन मेन्स रूममधे जाताना लोकांच्या किती विचित्र प्रकारच्या नजरा झेलाव्या लागतील त्याचा विचार करतोय.
<<
पंत यासाठी ऐवढा द्राविडी प्राणायम कश्याला. एकाद्या नाव्ह्याचा मोबाईल नंबर जवळ बाळगायचा आणि जेंव्हा जेंव्हा कंटाळा येईल त्यावेळी त्याला बोलावून ऑफिसमध्येच भादरायची दाढी. हाकानाका.
ह्या हिशोबाने मायबोलीवर अनेक
ह्या हिशोबाने मायबोलीवर अनेक न्हावी ठेवावे लागतील.
मग मोठ्यांच्या विचित्र सवयी
मग मोठ्यांच्या विचित्र सवयी आणि त्यावरील उपाय असा धागा मुले काढतील.
असो. राजेश कुलकर्णी, वैतागू
असो. राजेश कुलकर्णी, वैतागू नयेत अशी विनंती! सगळ्याच धाग्यांवर हेच सुरू आहे सध्या. तुम्ही इतरत्र वाचन करत असलात तर तुम्हालाही जाणवेलच ते.
(No subject)
आता सर्वानी बास करा नाहीतर
आता सर्वानी बास करा नाहीतर बीनपाण्याने होईल.:फिदी:
आता सर्वानी बास करा नाहीतर
आता सर्वानी बास करा नाहीतर बीनपाण्याने होईल.
<<
खरय, मलाही आता फारच कंटाळा आलाय.
आलोच एक दाढीचा हात करुन, तोवर तुमचे चालूदे.:स्मित:
प्रसाद
प्रसाद
जपानमधे लोक ऑफिसच्या रेस्टरूम
जपानमधे लोक ऑफिसच्या रेस्टरूम मधे लंच नंतर ब्रश करतात (दंतधावन) तसेच फावल्या वेळात दाढी पण करतात.
एकदा तर कहर म्हणजे एकदा एक जण त्याच्या खुर्चीत बराच वेळ वाकलेला दिसला, सहज वळून पाहिले तर महाशय छोट्या आरशात पाहून विद्युत रेझरने दाढी करत होते.
कामाच्या ठिकाणी असे केले म्हणुन त्याच्या बॉसने बिनपाण्याने केली की नाही ते कळाले नाही.
Pages