नोव्हेंबरच्या दुसर्या - तिसर्या आठवड्यात आकाशात काळ्या-पांढर्या रंगाचे पट्टे उमटायला लागतात आणि अचानक कॅनडा गीझचा आवाज आसमंत भरून टाकायला लागतो. कॅनडाहून दक्षिणेला प्रयाण करणारे हे कॅनडा गीझ मजल दरमजल प्रवास करताना काही काळासाठी आपल्या भागात मुक्कामाला आल्याची जाणीव होते. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं या पक्षांचं चाललेलं ट्रेनिंग पाहणं हा विलक्षण अनुभव. त्यांचं एकत्र येणं, विविध गट करणं, आवाजातून आणि पंख फडफडवून संदेश देणं, फिजीकल कपॅसीटी आणि वयानुसार वेगवेगळे ग्रुप्स करून सगळ्यांना एकत्र घेऊन उड्डाण करणं हे सगळंच अचंबित करणारं. ह्या ट्रेनिंगमधे आधी त्यांचा लिडर पुढे जाऊन त्यांना ' मार्ग' दाखवतो, मग त्यानंतर गटागटानं उरलेले पक्षी उड्डाण करतात. जमिनीवरून उडून पाण्यावर उतरणं आणि पाण्यावरून उडून जमिनीवर उतरणं अशा त्यांच्या ट्रेनिंग राऊंडस पाहताना निसर्गामधे अशी किती रहस्य दडली असतील ह्याचं कमालीचं कुतुहल वाटल्याशिवाय रहावत नाही. कोणत्या आंतरीक उर्मीनं हे पक्षी असे मैलोनमैल प्रवास करत असतील हा प्रश्न मनात गडद होतो. अजून २ आठवडे हे पाहुणे या भागात असतील. मग निघून जातील त्यांच्या मार्गाने..... परत एप्रिल, मे च्या सुमारास अशीच भेट देण्यासाठी.
गेले २ वर्ष मी ह्या पक्षांचं निरीक्षण करतीये. काल फायनली मला ही घटना, हा अनुभव व्हीडीयोमधे कॅपचर करण्याची संधी मिळाली. हा सगळा अनुभवच विलक्षण होता. डोक्यावर घिरट्या घालणारे हजारो पक्षी आणि त्यांचा आवाज .. मनात अर्थातच हिचकॉकच्या 'द बर्ड्स' चित्रपटाची आठवण !
Heres the video : Birds of a feather fly together
व्हीडीयो लिंक : https://youtu.be/HIDfW6vsjos
सही व्हिडिओ टिपलायस , मस्त
सही व्हिडिओ टिपलायस , मस्त निरिक्षण.
मस्त टिपला आहे.
मस्त टिपला आहे.
प्रस्तावना अगदी उत्तम जमली
प्रस्तावना अगदी उत्तम जमली आहे !! व्हिडीओ पण सुंदर आहे.
मस्त!
मस्त!
व्हिडिओ मस्त. मला वाटतं
व्हिडिओ मस्त. मला वाटतं ऑक्टोबरच्या आसपास मी असंच कुठल्यातरी पक्षांचं मायग्रेशन पाहिलं आहे. आकाराने कावळ्यापेक्षा छोटे आणि चिमणीपेक्षा मोठे काळ्या रंगाचे पक्षी. गीझ नक्कीच नव्हते. पण झुंडीने मायग्रेट करत होते.
छान...
छान...
मस्त निरीक्षण. पुढच्या वेळी
मस्त निरीक्षण.
पुढच्या वेळी नविन कॅमेरा घेऊन जा. तसेच जमल्यास एक हाईड पण घे किंवा Camouflage कपडे घालुन जा. त्यामुळे आणखी जवळुन बघता येतील पक्षी व डिटेल्स टिपता येतील. भारतात असाच Bar Headed Geese चा थवा येतो. यावर्षी जमले तर व्हिडीओ काढायचा विचार आहे.
छान टिपलाय व्हिडिओ.
छान टिपलाय व्हिडिओ.
भारी आहे व्हिडीओ! किती तास
भारी आहे व्हिडीओ! किती तास शूटिंग केलंस?
छानच आहे विडीयो. हे खूप अजून
छानच आहे विडीयो.
हे खूप अजून खोलात जाऊन आभ्यासण्यासारख आहे अस जाणवल..
धन्यवाद सगळ्यांना. इट ऑज टोटल
धन्यवाद सगळ्यांना. इट ऑज टोटल फन टू वॉच...
हा व्हीडीयो २ मिनीटाचा असला तरी २ तासापेक्षा अधिक काळ मी तिथे निरीक्षण करत होते. रेकॉर्ड करत होते.
हे साध्या फोनवरचे रेकॉर्डींग आहे. पण त्याक्षणी तो मोमेंट कॅपचर करता आला ह्यातच समाधान.
बायलॉजीकल सीस्टीम मधे ' मोमेंट' महत्त्वाचा.
सगळ्यात धमाल म्हणजे ह्या गीझच्या कलकलाटाने आणि त्यांनी आकाश भरुन टाकल्याने २ मोट्ठे 'ग्रेट ब्लू हेरॉन' बिथरले. आणि एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्या अनुभव होता.
केप्या, अजून जवळ म्हणजे मला पाण्यातच उतरावे लागले असते
आणि त्यातले पक्षी मला पाहून उडून गेलेले नाहीत. हा सुद्धा त्यांच्या ट्रेनिंग ड्रीलचाच एक भाग. त्याचाही एक पार्ट माझ्याकडे आहे. आधी फक्त 'पेरीफेरीचे ' पक्षी जागच्या जागी उडून सिग्नल देतात.
शिवाय दरवेळी कंडीशन्स फेवरेबल असतीलच असं नाही (मोस्टली त्या नसतातच असा माझा अनुभव ). पल्बीक पार्क आहे हे. मुळात ही जागा कॅमोफ्लाज साठी नाहीच. कुत्री ह्या गीझच्या पाठी धावतात. अश्या वेळी कॅमोप्लाजचा काय उपयोग !!
पण कॅमेरा मात्र आता घ्यायलाच हवाय !
ऑस्सम, रार! तुझी मेहनत जाणवते
ऑस्सम, रार! तुझी मेहनत जाणवते आणि पोहोचते आहे.
वॉव, सिंपली वॉव!!!!!!!
वॉव, सिंपली वॉव!!!!!!!
खूपच सुंदर विडिओ आणि मस्त
खूपच सुंदर विडिओ आणि मस्त लिहिलंय ....
आरती कळले. तरी कॅमो घेऊन बघ.
आरती कळले. तरी कॅमो घेऊन बघ. मज्जा येते. मोबाईलने काढले असतील तर भारीच. घ्याच आता कॅमेरा.
एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्या अनुभव होता>> आयला हे भारीच. डोळ्यासमोरच आले एकदम.
रार हा तुझा व्हिडिओ पाहून मला
रार हा तुझा व्हिडिओ पाहून मला वाटतंय की माझेही एक दोन व्हिडिओ(कॅनडा गीजचे) इथे डकवावेत की काय!
अर्थातच हे अगदी सर्व सामान्य माणसाच्या उत्सुकतेने घेतलेले आहेत.
एका चिंचोळ्या टनेल मधे मी आणि समोरून २ हेरॉन्स उडत येताहेत . मी खाली वाकले नसते तर धडकच व्हायची... हा मोमेंट कुठेही कॅपचर झाला नाहीये. पण जबर्या अनुभव होता>>>>>>> भारीच!
Manushi, pl go ahead. I would
Manushi, pl go ahead. I would love to watch. Any observation is good observation and one step towards better understanding nature
मस्त व्हिडिओ.. लिहल्यस पण छान
मस्त व्हिडिओ.. लिहल्यस पण छान
रार, सहीये! मानुषी,
रार, सहीये!
मानुषी, व्हिडीयोच्या प्रतिक्षेत!
मानुषी आवडतील असे व्हिडीयो
मानुषी आवडतील असे व्हिडीयो बघायला.
मस्त वीडियो, आणि तुमचं
मस्त वीडियो, आणि तुमचं निरीक्षण तर खासच !
कृपया इथे पहाल का? आत्ताच
कृपया इथे पहाल का? आत्ताच डकवले आहेत काही व्हिडीओज.
http://www.maayboli.com/node/56539
मस्तच. ह्यावेळी आमच्याकडे
मस्तच. ह्यावेळी आमच्याकडे कॅनडा गीज आलेच नाही. अगदी दोन आठवड्यापुर्वी 80°F होते आणि दोन-तीन दिवसात 25°F पर्यन्त खाली आले त्यामुळे ते ब्रेक न घेता साउथ ला गेले असतिल आता एप्रिल पर्यन्त वाट बघावी लागेल.
कॅनडा गीज बद्दल काही माहिती
१> कॅनडा गीज ताशी ७० माईल (१०० किमी) पर्यन्त वेगात उडु शकातत आणी एका दिवसात १००० किमी चे अंतर पार्क करु शकातात.
२> ३०-४० वर्षापुर्वी याची संख्या खुप कमी झाली होती म्हणुन आमच्या राज्यात सरकार ने त्याच्या घरट्यातिल अंडी चोरुन अनैसर्गिक पणे ब्रीड केली होती. त्यामुळे ह्या गीस मधे knowledge transfer नाही झाले आणि ते कायाहोगा रिव्हर च्या परिसरात स्थायिक झाले. ही ब्रिड जमात 10°F ला पण राहु शकते आणि हे गीज स्थलांतर करत नाहीत.
३> आमच्या भागात एकटा गीस कधीच गाडीखाली येऊ शकत नाही अशी म्हण आहे. कारण ते नेहमी ग्रुप मधेच असतात.