Submitted by संपदा on 12 October, 2015 - 03:41
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२
पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी ढोकळ्यासाठी तांदूळ, उडीद
मी ढोकळ्यासाठी तांदूळ, उडीद अन चना डाळ भिजत घातली आहे, मायक्रोवेव्ह मध्ये तुनळीवर पाच मिनिटांत शिजतो तसा होईल का?
किंवा जर कन्व्हेकशन मध्ये करायचा असेल तर साधारण काय टेम्परेचर अन किती वेळ लागेल?
https://www.maayboli.com/node/10641
या रेसिपी ने करणार आहे, पण कुकरमध्ये नको वाटतेय.
कुकरमध्ये ( शिटी काढून) किंवा
कुकरमध्ये ( शिटी काढून) किंवा ढोकळा पात्रात मस्त होतो.
मायक्रोवेव्ह मध्ये माझा तरी सेंटरला पातळ राहतो आणि ते शिजेपर्यंत कडेचा कडक होतो.
कन्व्हेक्शन बेकि़ंगसाठी वापरतात. वाफवण्यासाठी नव्हे.
थँक्स भरत
थँक्स भरत
माझ्या एका मैत्रिणीने सांगितले होते की जर बिन सोड्याचा करायचा असेल तर केकसारखा बेक करायचा म्हणून कन्व्हेकशन बद्दल विचारले.
मायक्रो मध्ये सगळे इन्स्टंट ढोकळे बघितले.
कुकरमध्येच बनवावा लागेल वाटते.
जर इडलीच्या भांड्यात स्टँड ठेवून त्यावर भांडे ठेवून वाफवले तर जमेल का विचार करतेय.
जर इडलीच्या भांड्यात स्टँड
जर इडलीच्या भांड्यात स्टँड ठेवून त्यावर भांडे ठेवून वाफवले तर जमेल का विचार करतेय.>> हो जमेल की
कढईत सुद्धा जमेल, कढईत पाणि घालून त्यात स्टॅन्ड ठेवा पाणी उकळले की त्यावर ढोकळ्याची ताटली ठेवा वरुन एखादी कढई बसणारी ताटली ठेवा
वांगी मध्ये एक मसाला भरुन ती
वांगी मध्ये एक मसाला भरुन ती कुकर मध्ये उकडतात आणी नंतर लसणावर फोडणी ला टाकतात . पेडणावर ची वांगी असे म्हणतात त्याला त्या मसाल्या ची रेसिपी महीती आहे का कोणाला?
https://youtu.be/2sjddrhqj14
https://youtu.be/2sjddrhqj14
पेडणावरची वांगी
धन्यवाद Blackcat . ही
धन्यवाद Blackcat . ही रेसिपी चांगली वाटत आहे.
माझी आजी आमच्या लहानपणी नेहमी बनवायची पण ती मसाला कशी करायची ते आठवत नव्हते.
गोडा मसाला
गोडा मसाला
कोथिंबीर
लसूण
कांदा
तिखट
मीठ
गुळ
चिंच कोळ
खोबर्याचा किस , दाण्याचा कूट, तीळ
धने जिरे पूड
बडीशेप कुटून
तेलकट कमी वाटले तर चमचाभर तेल
इतके घेऊन मळले की कशातही भरता येते
ओके धन्यवाद BLACKCAT .
ओके धन्यवाद BLACKCAT .
पाणी अजिबात घालायचं नाही का?
पाणी अजिबात घालायचं नाही का?
पेडणावरच्या वांग्याचा मसाला
पेडणावरच्या वांग्याचा मसाला पाणी न घालता वाटायचा असतो.
ह्या मसाल्यात पाणी घातले की
ह्या मसाल्यात पाणी घातले की चव जाते
पेडणावरची वांगी
पेडणावरची वांगी
पेडण म्हणजे काय ?
पेडण म्हणजे काय ?
असे पेडणावर अजून कोणकोण बसेल ?
ढब्बू मिरची
पेडणा वरचे वांगे मस्त आहे मी
पेडणा वरचे वांगे मस्त आहे मी पण केले होते पण फोटो नाही काढला.
खरे तर ते पेडणी वांगे नंतर
खरे तर ते पेडणी वांगे नंतर तेलात परतायचीही गरज नाही
उकडूनच मसाला व वांगी चविष्ट होतात
लाळगळू फोटो ब्लॅक कॅट...लवकरच
लाळगळू फोटो ब्लॅक कॅट...लवकरच करून बघणार आणि झब्बू देणार ..
वाह मस्त फोटो BLACKCAT .
वाह मस्त फोटो BLACKCAT .
ब्लॅककॅट फारच छान फोटो आहे.
ब्लॅककॅट फारच छान फोटो आहे.
कोणाला विकतचा गोडा मसाला घ्यायचा असेल तर काटदरेंचाच घ्या.( सांगलीचे ) तो अस्सल चवीचा आहे. केप्रचा ( पुणे ) अजीबात घेऊ नका. अंबारी व प्रकाशचा चांगला आहे, पण काटदरेला तोड नाही. प्रकाश वाल्याने गोडा म्हणता म्हणता त्यात तिखट पण मिक्स केलेय सवयीनुसार. केप्रचा खवट कुबट लागतो.
भरली वांगी, खिचडी, चिंच गुळाची आमटीत गोडा मसाला मस्ट.
काटदरे साताऱ्याचे हो.
काटदरे साताऱ्याचे हो.
त्यांचा मिसळ मसाला आणि ताक मसाला पण छान असतो.
काटदारे च्या चटण्या पण छान
काटदारे च्या चटण्या पण छान लागतात.
काटदरेंची बहुतेक प्रॉडक्ट
काटदरेंची बहुतेक प्रॉडक्ट चांगली असतात.
ते सांगली चे आहेत माहित नव्हतं>
आमच्याकडून दुकानात गेल्यावर अनकॉन्शसली बरीच काटदरे उत्पादनेच उचलली जातात.
अर्थात केप्र चे खवट कुबट वगैरे त्या स्पेसिफिक बॅच चे असू शकेल.
सॉरी प्राची, लक्षात नाही आले
सॉरी प्राची, लक्षात नाही आले ते. धन्यवाद !
नाही अनू, असे दोन दा झालेय. आधी मी तारीख वगैरे पाहुनच माहेरी एक पाकिट दिले. नंतर परत दुसर्या वेळी घरी घेतले तेव्हा तसाच कुबट वास व चव होती.
ओह.
ओह.
त्यांना हा फीडबॅक इमेल ने पोहचवायला हवा.
परदेशात मसाले जात असतील तर मराठी आणि भारतीय ब्रँड चे नाव खराब.
त्यांचे पॅकेजिंग चुकतेय किंवा मसाल्यात दमटपणा राहतोय.
मी एकदा छोटे पाकिट घेऊन पाहून फीडबॅक लिहेन.
मी केप्र चा गोडा मसाला वापरला
मी केप्र चा गोडा मसाला वापरला आहे 2 दा मीडियम पाकिट आणले होते. माझा तर चांगला लागला . मी पाकिट फोडल्या वर fridge मध्ये ठेवले होते.
हम्म
हम्म
मग एका बॅच चे असेल किंवा ज्या एरियात तो जातो तिथे गोडाऊन मध्ये दमटपणा असे काही असेल.
परवा आम्ही गन्नापन्ना मागवले होते(उसाचा रस साखरे ऐवजी टाकून पन्हे ड्रिंक.आमच्याच कंपनी तल्या मित्रांचे व्हेंचर आहे.)
तर एक्सपायरी डेट ला 15 दिवस असून, झाकण सील उघडलेले किंवा सैल नसून आत दारू बनली होती.
यात एकच शक्यता आहे.प्रॉडक्ट ट्रक किंवा उघड्या टेम्पो मधून खूप उन्हात इथून तिथे आणली असल्यास प्रक्रिया होत असेल.
केनबॉट चा आमचा अनुभव चांगला आहे.त्यामुळे त्या एका बाटलीला संशयाचा फायदा देऊन कंपोस्ट मध्ये उपडे केले.
परत अनुभव आल्यास फीडबॅक कळवू.
भेंडी ची बेसन चे पिठ घालुन जी
भेंडी ची बेसन चे पिठ घालुन जी भाजी करतात त्याची कृती काय?
सॉरी प्राची, लक्षात नाही आले
सॉरी प्राची, लक्षात नाही आले ते. धन्यवाद !>>
सॉरी काय त्यात.
सातारकर असले तरी सासुरवाशीण आहे त्यामुळे एवढ्या काही दुखावल्या गेल्या नाहीत.
सहज सांगितले.
सातारकर असले तरी सासुरवाशीण
सातारकर असले तरी सासुरवाशीण आहे त्यामुळे एवढ्या काही दुखावल्या गेल्या नाहीत.>> मी सांगली सासुरवाशीण त्या मुळे हे नाव तर कधी
आमच्या इथे सर्व बेस्ट मिळते असे थोरल्या नणंद बाई कडून ऐकलेले नाही. असे वाटून गेले.
थॅन्क्स प्राची, समजून घेतल्या
थॅन्क्स प्राची, समजून घेतल्या बद्दल व भावना दुखावल्या न गेल्या बद्दल.
अनू, ही पण शक्यता असेल. मागे वार्षापूर्वी मी डिसेंबर मध्ये कोथरुड ला एका घरगुती वस्तु विकणार्या दुकानात आमरसाची बाटली घेतली. तेव्हा माझ्या मुलीला व भाचीला तो रस छान वाटला. पण तेच जेव्हा मार्च मध्ये घेतली तेव्हा मात्र रसाची चव उतरल्यासारखी लागली.
Pages