जैन पर्युषण काळात जैन समाजाची लोक व्रत करत असल्याने मुंबई महानगरपालिकेने ४ दिवस आणि मीरा भायंदर महानगरपालिकेने तिथे जैन समाजाचे लोक बहुसंख्य असल्याचे लक्षात घेता ८ दिवस मांसविक्रीवर बंदी आणली आहे.
भारतासारख्या लोकशाही तत्वावर चालणार्या देशात हा निर्णय तालिबानी स्वरुपाचाच वाटतो.
एक दिवस कायद्याने पुर्ण भारतात मांसाहार बंदी झाल्यास, तसेच लोकांनी फक्त आणि फक्त शाकाहारच करावा असा फतवा निघाल्यास गैर वाटू नये अशी परिस्थिती उद्भवली आहे.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे का! असे आज पुन्हा एकदा म्हणावेसे वाटतेय.
लोकांनी काय खावे आणि काय नाही यात काहीही कारण नसताना हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही.
लोकहो, तुम्ही शाकाहारी असाल वा मांसाहारी, पण आज याविरुद्ध आवाज नाही उठवलात तर येत्या काळात अश्याच अनेकानेक निर्बंधासाठी तयार राहा ..
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावतो, हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही..
___________________________
संदर्भासाठी लिंका
1) #meatban मुळे संताप, ही मुंबई की `बॅनिस्तान' ?
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/big-ban-fest-t...
२) मांसविक्री बंदला शिवसेनेचा कडाडून विरोध
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/controversy-ov...
अर्थात मानवी कर्मे मानवी
अर्थात मानवी कर्मे मानवी हस्तक्षेपाने थांबवायची असतात आणि मानवी प्रयत्न संपले की दैवी उपाय योजायचे असतात हे सकुराताईंना कोण समजवून सांगणार!>>>.
मानवी हस्तक्षेपाने किंवा दैवी हस्तक्षेपाने निसर्गाचे काही सत्य बदलणार आहेत का? आजारपण, वृधत्व अवस्था ,मृत्यु मनाविरुद्ध होण्याचे दु:ख.
>>>>> पुर्वी वैदिक काळात
>>>>> पुर्वी वैदिक काळात यज्ञात पशु बळी (गाय) दिला जात होता की नाही? याचे उत्तर द्या. <<<<<
म्हणजे गायींच्या कत्तलीही होऊद्यात, अन नरबलीही होऊद्यात असे तर काही तुम्हाला अपेक्षित नाहीना?
पूर्वीही याबाबत लिहीले होते. हिंदू धर्म सुधारणा स्विकारत आजवरच्या स्थितीला येऊन स्थिरावला आहे.
पूर्वी पशूच काय, "नरबळीही" दिला जायचा, किंबहुना दक्षिणेकडील मंदिरातून, अशा नरबळीला बसवुन जिथे बळी द्यायचा ती दगडाची गोल शीळा आजही दिसते.
आता पूर्वी यज्ञात पशूबळी (गाय) दिला जायचा म्हणून तुम्ही आजच्या परधर्मियांकडून निव्वळ हिम्दूंना खिजविण्याकरता होणार्या गायीच्या कत्तलिंचे समर्थन करु पहाणार असाल, तर मग कृपयाच, तोच न्याय नरबळीलाही लावायला सांगालच, नाही का?
मी २१साव्या शतकातल्या हिंदूधर्मश्रद्धेबाबत बोलतो आहे, अन तुम्ही वेदांच्या निर्मितीवेळच्या ज्या काळा करता किती हजार वर्षे मागे जावे लागेल त्याचाही थांग नसलेल्या अतिप्राचिन काळाचे उदाहरण देऊ पहाताय. असो, ही सवयही नित्याची व जुनीच आहे तुम्हां लोकांची की सोईस्कर तेव्हडेच संदर्भ पुराणांतून घ्यायचे, एरवी मात्र पुरांणे बाद....
फारच विस्कटून सांगता लिंबुभाऊ
फारच विस्कटून सांगता लिंबुभाऊ
आता प्रतिपक्षाच्या उत्तराच्या अपेक्षेत 
मी २१साव्या शतकातल्या
मी २१साव्या शतकातल्या हिंदूधर्मश्रद्धेबाबत बोलतो आहे, अन तुम्ही वेदांच्या निर्मितीवेळच्या ज्या काळा करता किती हजार वर्षे मागे जावे लागेल त्याचाही थांग नसलेल्या अतिप्राचिन काळाचे उदाहरण देऊ पहाताय. >>>>
लिंबू भौ,पोस्ट आवडली.
म्हणजे उभ्या जाळा त्या पंचागपोथ्या....!!! याच्याशी तुम्ही सहमत आहात.
अभिनंदन.
>>>> म्हणजे उभ्या जाळा त्या
>>>> म्हणजे उभ्या जाळा त्या पंचागपोथ्या....!!! याच्याशी तुम्ही सहमत आहात. <<<<<<
नाही. माझ्या वरील पोस्टचा असा परत एकदा स्वतःस सोईस्कर असा अर्थ तुम्ही काढता आहात.
परधर्मीय लोक हिंदुना
परधर्मीय लोक हिंदुना खिजवायला गाय खातात.
तुम्ही जैनाना खिजवायला कोंबड्या खाता काय ?
अहो लिबूं भौ,२१साव्या शतक आणि
अहो लिबूं भौ,२१साव्या शतक आणि पंचागपोथ्या....!!! एकत्र कसे राहिल.
म्हणजे एक पाय बैलगाडित आणि एक विमानात असे का?
परधर्मीय म्हणे ! मुसलमान
परधर्मीय म्हणे !
मुसलमान स्पष्टपणे लिहायचे की ! की जिव्हा जड पडते ?
>>>>> मुसलमान स्पष्टपणे
>>>>> मुसलमान स्पष्टपणे लिहायचे की ! की जिव्हा जड पडते ? <<<<<
अस्तित्वातील कायदा जड पडतो,
झालच तर कधी एकदा शब्दातुन कायदेभंग होतो व कायद्याच्या कचाट्या कसे पकडता येईल हे पहाणारे डोमकावळे भारी पडतात.
>>>> तुम्ही जैनाना खिजवायला
>>>> तुम्ही जैनाना खिजवायला कोंबड्या खाता काय ? <<<<<
कोल्होबा, मी ब्राह्मण, पुजापाठ करणारा, सबब मांसमच्छी खात नाही.
बाकी कुणी हिंदू मुद्दामहून जैनांचे विशिष्ट सणाचे दिवशी मुद्दामहून कोंबडी कापून खात असेल, वा मंदिरापुढे जाऊन चिकनतंदुरी बनवायचे थेरचाळे करीत असेल, तर अशा हिंदूमधे व आधीच्या गोष्टीतल्या कसायामधे मी तरी फरक करीत नाही, व दोनही कृत्ये तितकीच निषेधार्ह आहेत व अशी कृत्ये करणारे हिंदू ऑलरेडी "वैचारिकदृष्ट्या बाटवले गेलेले" आहेत असे मानायला मला खुप वाव असेल.
बाकी पोथ्यापुराणे जाळून टाका, देवाला रिटायर करा, देव मानूच नका, श्रद्धा वगैरे काहीही नसते, देवधर्म म्हणजे निव्वळ बामणांचा फुकटखाऊपणा, वगैरे बाबी आक्रस्ताळेपणे मांडणे म्हणजेही "हिंदूंना वैचारिकदृष्ट्या बाटविण्याचे घृणास्पद व निंद्य " प्रकारच होत यात मला शंका नाही.
, त्या नियमाला अनुसरुनच, आधीच वैचारिकदृष्ट्या पूर्णतया बाटलेल्या हिंदुंची ही आक्रस्ताळी बाम्ग हल्ली दिवसेंदिवस अधीकच तीव्र व लाम्ब होऊ लागली आहे हे देखिल एक वास्तव.
अन म्हणतात ना की बाटग्यांची बांग नेहेमीच लईच मोठी अस्ते
सकुरा, ते पंचांग जाळायचे
सकुरा,
ते पंचांग जाळायचे म्हणताय ना? ते पंचांग म्हणजे नक्की काय असते ओ?
अस्तित्वातील कायदा जड
अस्तित्वातील कायदा जड पडतो,>>>
नाही हो लिंबू भौ असे काही नाही.सगळ्या कायद्याहुन भारी निसर्गाचा कायदा आहे.
सर्वासाठी समान
जन्म, व्याधी, वृधत्व मृत्यु कोणाची सुटका नाही.
राहुल१२३ ,लिंबू भौनां विचारा
राहुल१२३
,लिंबू भौनां विचारा ..
मला टायपाचा जाम कंटाळा आलाय.
>>>>> नाही हो लिंबू भौ असे
>>>>> नाही हो लिंबू भौ असे काही नाही.सगळ्या कायद्याहुन भारी निसर्गाचा कायदा आहे. >>>>> सर्वासाठी समान
जन्म, व्याधी, वृधत्व मृत्यु कोणाची सुटका नाही. <<<<<<
पुन्हापुन्हा चूक बोलत राहिलेच पाहिजे का?
हा कायदाही सर्वांना समान नाही.
कारण मुळात निसर्ग माणसांहून वेगळा स्वतंत्र असा नाहीच्चे, तो माणसासहित आहे, व वैविध्यतेने नटलेला आहे, जीवो जीवस्य जीवनम या तत्वाभोवती गुरफटलेला आहे, शिवाय तो स्वतःच इश्वराच्या इच्छेची (नि:श्वासाची) उत्पत्ती आहे. तिथे समान असलेच तर एकच तत्व आहे ते म्हणजे, इश्वराचा वास चराचरात आहे, वा दुसर्या शब्दात मानवी पंचेंद्रिये/ज्ञानेंद्रियांना जाणवणारा निसर्ग/सृष्टी यात कणाकणात इश्वर भरलेला आहेच, कारण ती त्याच्यापासुनचीच निर्मिती आहे.
जन्म होणे हातात नाही, जन्म होण्याचे पुरता समान असला, तरी कोणत्या घरात, कोणत्या स्थितीत, कोणत्या आईबापांच्या पोटी जन्म होणार यात कुठेही समानता नाही.
तद्वतच, मृत्यू होणारच, तो टळत नाही हे समान सत्य, पण तो कोणत्या परिस्थितीत, काय कारणाने, किती हाल अपेष्टात की सुखासीन होणार हे समान नाही.
व्यक्तिव्यक्तिगणिक ही बदलती परिस्थिती प्रत्यक्ष बघता येते. अन तिथेच हिंदू धर्मातीलच चिरातन त्रिकालाबाधित सत्य असलेला कर्मफलाचा "कायदा" सर्वात महान ठरतो. जसे कर्म तशी गती. जोडीने पुनरपी जननं पुनरपी मरणं, पूर्वजन्माचे भोग म्हणुन जन्म, ते भोग नविन जन्मात भोगताना नव्याने जी कर्मे हातुन होतील, त्याची अजुनचि फले, त्याचेभोग, असे हे अव्याहत चक्र, ज्यातुन मुक्ति मिळवायची म्हणजेच मोक्ष मिळवायचा तर ज्यापासून आपण उत्पन्न झालोत, त्याचेतच परत सामावुन जाणे/मिसळून जाणे, तरच मुक्ति ही विचारधारा, हे तत्वज्ञान, व त्या अनुषंगाने मानवी देहास सोईस्कर अशी रचलेली कर्मकांडे/मार्ग/साधना म्हणजे हिंदू धर्म असे मला तरी थोडक्यात वाटते.
मांसाहार विक्री? मांसविक्री
मांसाहार विक्री?
मांसविक्री हवंय.
मांसाहारावर बंदी नाहिये विक्रिवर बंदी आहे.
काय मराठी आहाहा (दिव्य)
च्यामारि, माझा धागा चूकतो आहे
च्यामारि, माझा धागा चूकतो आहे का या चर्चेकरता?
कुणीतरी वरील पोस्ट्स योग्य जागी डकवा रे.... प्लिज.
लिंब्या , तू म्हणजे वयक्तिक
लिंब्या , तू म्हणजे वयक्तिक तू नव्हे.
हींदू स्वतःच्या पोटासाठी कोंबडी खातात तर मुसलमानही पोटासाठीच गाय खातात.
गोमांस कत्तलखान्याचे कितीतरी मालक हिंदू आहेत. ( म्हणे) . खाणारे लोक फक्त विकत घेऊन खातात... मग ते हिंदुना खिजवायला गाय खातात ही फुकाची बोंब कशाला ?
मुसलमान आम्हाला खिजवतात अशेe भावना असलेलं एक भगवं येडं आणि मी एकदा वाडीला फिरायला गेलो होतो. समोर देवासमोर बसलो होतो. नरसोबावाडीच्या समोरच पलीकडच्या तीरावर एक मोठी मशीद आहे.
ते येडं बोल्लं ... हॅ बघ ! आता याना आमच्या देवळापेक्षा उंच मशीद बांधायची गरज होती काय ? आम्हाला खिजवायला बांधतात साले !
म्या म्हटलं ... ज्या देशात हिंदूच नाहीत तिथलेही मुसलमान उंच मशिदी बांधतात ना ? त्या ते कुणाला खिजवायला बांधतात ? आणि मुसलमान येण्यापुर्वी हिंदुही उंच मोठी देवळं बांधत होतेच ना ? तेही कुणाला तरी खिजवायलाच बांधत होते का ?
बस्लं गप्प ते !
मी कलटी....
मी कलटी....
गाय खाणारा मुसलमान दिसला की
गाय खाणारा मुसलमान दिसला की लिंब्या त्याला नमस्कार कर.
देव गायीच्या पोटात
आणि गाय त्याच्या पोटात !
तुला पुण्य मिळून तू भवसागर तरुन जाशील.
हा कायदाही सर्वांना समान
हा कायदाही सर्वांना समान नाही.>>>
उदाहरण द्या
.गुजरात मध्ये भूकंपात सगळ्या जाती -धर्माची मानसे एकाच वेळी मेली त्यांचे कर्म सारखेच होते का?
एकाच वेळी हॉस्पिटल मध्ये वेगवेगळ्या जातिचे १० जण मरतात त्यांची कर्म सारखी असतात का?
मृत्यु तर सारखाच असतो ना?
जौ दे भौ,तुमच्या इतके मला टायपाला येत नाही मी पण कलटी.....
लिंबूटिंबू, त्या गाय आणि
लिंबूटिंबू, त्या गाय आणि कसायाच्या गोष्टीचं एक समर्पक उत्तर ऐकलं आहे. जेव्हा कसाई त्या सत्यवचनी, अहिंसक व्यक्तीला गायीबद्दल विचारतो तेव्हा ती व्यक्ती उत्तरते की मला माहिती आहे गाय कुठे गेली ते मात्र तुम्हाला ते सांगून मी गायीच्या हत्येचे कारण बनू इच्छित नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही. प्रतिकार न करणारे अहिंसक नसतात भित्रे असतात.
सकुरा, ज्या अर्थी तुम्ही
सकुरा,
ज्या अर्थी तुम्ही पंचांग जाळा असे म्हणताय त्या अर्थी तुम्हाल पंचांगत काही गैर दिस्ले असावे.
म्हणुन जरा टायपायचे कषष्ट घघेउन सांगाल का? पंचांग का जाळावे?
बंदी वाढत चालली! बेंगळूरूपण
बंदी वाढत चालली! बेंगळूरूपण सामील!
http://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/Bengaluru-decides-to-c...
मांसाहार विक्री? अ ओ, आता काय
मांसाहार विक्री? अ ओ, आता काय करायचं मांसविक्री हवंय.
मांसाहारावर बंदी नाहिये विक्रिवर बंदी आहे.
काय मराठी आहाहा (दिव्य)
>>>>>>>
मांस आहार म्हणून विकण्यास बंदी आहे.
मांसापासून बनवलेल्या शोभेच्या आणि उपयुक्त वस्तू विकण्यास बंदी नाही.
माझे मराठी दिव्य आहे हे मी मान्य करतो, पण इथे माझे लॉजिक वरकरणी बरोबर वाटतेय. आणि चूक असले तरी मी कबूल थोडीच करतो
रश्मी, मला नाही वाटत की +१
रश्मी, मला नाही वाटत की +१ ऐवजी +७८६ असे लिहिल्याने मी कोणाची टिंगल उडवतो असे होते.
तरी कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास क्षमस्व ! माझा तसा हेतू तरी नक्कीच नव्हता.
मुळात मी कुठलाही धर्म वा देव मानत नसल्याने कोणाच्या भावना कश्यावरून दुखावतील याचा मला अंदाज नसल्याने असे होते.
चला चार दिवसांत बंदी संपणार
चला चार दिवसांत बंदी संपणार आणि धागाही!
पुढचा मुद्दा घ्या!
ऋन्मेष, ७८६ हा मुस्लिमान्चा
ऋन्मेष, ७८६ हा मुस्लिमान्चा पवित्र नम्बर मानला जातो. आणी तू जर त्याला स्टाईल मानत असशील तर तो वेडेपणा होईल असे मी म्हणले होते. मुस्लिम लोक धर्मा बाबत सन्वेदनशील असतात. चुकून कोणी हे वाचले तर काय होईल? गैरसमज व्हायला वेळ लागत नाही. आजकाल घराघरात गोन्धळ असतो मग बाहेर असे व्हायला कितीसा वेळ लागणार? सो टेक केअर.
>>>> हींदू स्वतःच्या पोटासाठी
>>>> हींदू स्वतःच्या पोटासाठी कोंबडी खातात तर मुसलमानही पोटासाठीच गाय खातात. <<<<
हा अजुन एक भ्रम.
जिथे मुसलमान धर्म उदयास येऊन स्थिरावला त्या मूळ आखाती प्रदेशात दूर दूर कुठेही उंटाव्यतिरिक्त गाय वगैरे पशू नाहीत/नव्हते. ही लोक आक्रमणे करीत जेव्हा हिंदुस्थानापर्यंत पोहोचली, तेव्हा इथे त्यांना अन्य पशुंचे दर्शन झाले. पैकी ज्यांच्यावर आक्रमण करुन जिंकले आहे त्या जित लोकांचा मनोभंग तेजोभंग व्हावा म्हणून मग त्यांना पवित्र असणार्या गाईचे भक्षण इथे हिंदुस्थानात सुरू झाले, जे की मूलतः त्या धर्माचे/धर्मियांचे अन्न कधीच नव्हते.
त्याचबरोबर हल्ली हल्ली नाक्यानाक्यावर दुकाने दिसतात म्हणुन वा काही कारणांनी, मुसलमान म्हणजे अत्तरातील तज्ञ, वा मुसलमान म्हणजे कोरीवकाम वगैरे तील तज्ञ व त्यांनी ताजमहाल बनवला वगैरे असंख्य भूलथापा येथिल अज्ञ जन तशाच प्रमाण मानुन चालत आहेत. हे लक्षातही न घेता की
त्या वाळवंटी प्रदेशात दूर दूर गोटीयेवढाही दगड मिळणे शक्य नाही, अगदी डोंगर कोरलेच तर अफगाणिस्तानातील (गांधारातील गुहा, ज्या बव्हंशी बौद्धांच्या आहेत) गुहा, यांना संगमरवर हा दगडाचा प्रकार तरी माहित होता का? शिवाय यांचे धर्मात मूल आदेश की इश्वरी कृतीची प्रतिकृती बनवू नये, मग कशाला करतील कोरीव कामे?
तोच प्रकार अत्तरांचा.... जिथे फुलेच काय, गवताचे पातेही उगवत नाही ती लोक म्हणे अत्तराचे उद्गाते? अत्तरातील तज्ञ? काहीही हं बोलायचे..... आणि आमच्या येरागबाळ्यांनी पिढ्यानपिढ्या माना डोलवायच्या...
लिम्ब्या हा पु ना ओक यांचा
लिम्ब्या हा पु ना ओक यांचा पुनर्जन्म आहे::फिदी:
जिथे मुसलमान धर्म उदयास येऊन
जिथे मुसलमान धर्म उदयास येऊन स्थिरावला त्या मूळ आखाती प्रदेशात दूर दूर कुठेही उंटाव्यतिरिक्त गाय वगैरे पशू नाहीत/नव्हते. ही लोक आक्रमणे करीत जेव्हा हिंदुस्थानापर्यंत पोहोचली, तेव्हा इथे त्यांना अन्य पशुंचे दर्शन झाले. पैकी ज्यांच्यावर आक्रमण करुन जिंकले आहे त्या जित लोकांचा मनोभंग तेजोभंग व्हावा म्हणून मग त्यांना पवित्र असणार्या गाईचे भक्षण इथे हिंदुस्थानात सुरू झाले, जे की मूलतः त्या धर्माचे/धर्मियांचे अन्न कधीच नव्हते.
>>
फक्त ह्या परिच्छेदाशी सहमत! अगदी आजही, अरेबिया बीफचा आहारात समावेश असलेल्या देशांच्या लायनीत खूप मागे आहे.
बाकी, रसायनशास्त्राचा मध्ययुगात अभ्यास इस्लामी लोकांनी सुरु केला … त्यात सोने बनवण्याचा प्रयत्न करणारे किमयागार (अल्केमिस्ट) खूप होते. केमिस्ट्री हा शद्ब अल-किमिया, अल्केमी असा प्रवास करत अरेबिआतून युरोपात स्थिरावला. गनपावडरचा शोध चीन मध्ये लागला असला तरी त्याचा बंदुकांमध्ये वापर करणारे तुर्की होते. बगदादचे महाल आणि इतर गोष्टी आख्या जगात प्रसिद्ध होत्या.
धार्मिक पडग्याखाली राहिल्याने त्यांचा विकास ज्या गतीने व्हायला हवा होता, तो झाला नाही आणि युरोपिअन पुढे निघून गेले
Pages