मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्तरानु, मास्तरीणु Proud
बघा मालवणिक लिवक जमता की नाय.... Happy

१>मास्तरांनी कालचा अभ्यास तपासून शाबासकी दिल्यामूळे खूप बरं वाटलं... मालवणी भाषा शिकायचा हुरुप वाढला...
मास्तरांनी कालचो अभ्यास तपासून शाबासकी दिल्यान म्हणून खूप (मोप?) बरं वाटलान..... मालवणि भाषा शिकायचो (शिकूक?) हुरूप वाढलो.

२>रोज थोडा-थोडा असाच प्रयत्न करत राहिलो, तर मालवणि शिकणं कठीण वाटणार नाही...
रोज थोडा-थोडा आसाच प्रयत्न करूक रवलोन तर मालवणि शिकणं कठीण वाटायचो नाय....

३>या शाळेचं एक बरं आहे, कधीही येऊन अभ्यास केला तरी चालतो... त्यामुळे शिकायला बरं वाटतं...
या शाळेचं एक बरं आसा, कधीही येवान अभ्यास केलान तरी चालता....त्यामुळे शिकूक बरं वाटता....

४>हळु-हळू मालवणि बोलणं देखिल शिकलं पाहिजे, म्हणजे मालवणी भाषा लवकर शिकता येईल...
हळु हळु मालवणि बोलान देखिल शिकूक होया, म्हणजे मालवणि भाषा बेगिन (लवकर?) शिकता येईल.

५>अरे वा! म्हणता-म्हणता आम्हाला हळू-हळू जमायला देखिल लागलं...
अरे वा! म्हणता-म्हणता आम्हाला हळू-हळू जमाया देखिल लागलंन....

चुका दुरुस्त कराव्यात हो मास्तरानु! Happy

ठकू, आंबोलीक गणेश चतुर्थीक जातलय.. आणि मी लहान आसय अजून... नुसता सुन्या चलात Happy दादा म्हटल्यार उगीच मोठो झाल्यासारख्या वाटता... Happy

अकु, कमी वेळात खुप प्रगती Happy

१>मास्तरांनी कालचो अभ्यास तपासून शाबासकी दिल्यानी म्हणान खूप/मॉप बरा वाटला..... मालवणि भाषा शिकाचो/शिकूचो हुरूप वाढलो.

२>रोज थोडो-थोडो आसोच प्रयत्न करत रवलो तर मालवणी शिकणा कठीण वाटायचा नाय....

३>या शाळेचां एक बरा आसा, कधीय येवन अभ्यास केलो तरी चालता....त्यामुळे शिकूक बरा वाटता....

४>हळु हळु मालवणी बोलणा देखिल शिकूक होया, म्हणजे मालवणी भाषा बेगिन शिकूक येतला.

५>अरे वा! म्हणता-म्हणता आमकाय हळू-हळू जमूक देखिल लागला....

मास्तर पुढचो अभ्यास दिया आता.... Happy

डॅफो...
फक्त ट्च मधे र्‍हव... भाषा आपोआप छान पैकी सुधारतली... माझ्यामते मध्यंतरी ग्याप पडल्यामुळे थोडोसो गोंधळ होताहा, तरी देखिल Keep it up...

अरुंधती...
प्रयत्न खरोखरच वाखाणण्या सारखे आसत, कारण प्रगती खूप छान दिसताहा... कायम हंयसर येयत र्‍हवा...

ठकू...
अभ्यास बघून घाबरलंस की काय?... असाम केलस तर मालवणि येवची नाय... निदान डॅफो, अरुंधती कशि अभ्यास करतहत तां बघुन प्रयत्न सुरु कर, सगळां सुरळित शिकाक गावतलां....

पुढचो अभ्यास उद्या सकाळी... जादा उजळणी साठी माझ्या वि.पू. त डोकावन नमुद केलेलां लिखाण वाचुचो प्रयत्न करा...

माका मालवणी लिवाक वायच भेव वाटता.. माका जमत नाय शुद्ध मालवणी लिवाक.. हयसर मेलं कनेक्शन सारखा डिसकनेक्ट होता माका लिहीलेलं पोष्टायलाच मिळ्त नाय.. Sad

माका मालवणी लिवाक वायच भेव वाटता.. माका जमत नाय शुद्ध मालवणी लिवाक.. हयसर मेलं कनेक्शन सारखा डिसकनेक्ट होता माका लिहीलेलं पोष्टायलाच मिळ्त नाय.. >>
माका मालवणी लिवाक वायच भ्या वाटता.. माका जमणा नाय शुद्ध मालवणी लिवाक.. हयसर मेलो कनेक्शन सारखो डिसकनेक्ट होता माका लिहीलेलं पोष्टाक गावणा नाय..

ठकू...
भियालंस तर मालवणि कसां शिकतलंस?... आता जां काय लिवलंस, तां महेशांनी दुरुस्त करुन दाखवल्यानी ना!... तसांच अभ्यासाचां आसा, चुकल्याशिवाय बरोबर काय तां लक्षात येवचां नाय. तेव्हां प्रयत्न करुक लाग... हंयसरचे मास्तर छडी घेवन शिकवणत नाय, प्रेमानच शिकवतत... :स्मित:...

तर आजचो अभ्यास...
१> गेल्या दोन दिवसांचो अभ्यास बरो जमलो बाय... आता आज काय अभ्यास देतले मास्तर?...
२> ठकू वगीच घाबरत र्‍हवता... कनेक्शनचां निमित सांगान अभ्यास टाळताहा... असल्यांनी 'ह्यां', मालवणी कसां काय शिकतलां?
३> हंयसर बहुतेक ह्यो मास्तर फक्त अभ्यास देता. बाकिचे मास्तर येवन केलेलो अभ्यास तपासतत... बरी पद्धत आसा बाय... सगळ्यांकडसुन वेग-वेगळे पद्धतीन शिकाक मेळताहा...
४> ऊद्या 'नाग-पंचमी', आणी विकांत... मास्तरांक विचारुक व्हयां 'उद्या सुट्टी आसा काय?', म्हणान...
५> अशे सणा-वाराचे सुट्ट्ये घेतल्या शिवाय शाळेत बसान शिकल्या सारख्यां वाटणांच नाय...

१> श्रावण महिना म्हणजे आपल्या सणा-वारांना सुरुवात झाली... ऊद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातला पहिला सण... हां-हां म्हणता गोकुळाष्टमी होऊन 'श्री गजानना'चे आगमन होईल...
२> मायबोलिवर आपल्या या सण-वारां बाबत आधुनिक कल्पनेतून कुणी लिहितं की नाही?... शोधलं पाहिजे...
३> आज पर्यंत या 'अजब' पद्धतीने कोण्-कोण शिकलेलं आहे?, चौकशी केली पाहिजे...
४> हळू-हळु आपणच मराठीचं मालवणित भाषांतर करायला सुरुवात केली पाहिजे... तपासायला बरेच मास्तर उपलब्ध आहेत.
५> नाहीतरी आपण शाळेत ईंग्रजीचं मराठी मधे भाषांतर करतोच, तसंच हा प्रयत्न करुन बघायचा...

मास्तरानु पहिल्ये पाच ओळी सोप्प्ये आसय त्ये नवशिक्यांका करुक सोडतंय.

फुडल्ये तपासून बघा..:)

१> श्रावण महिना म्हणजे आपल्या सणा-वारांना सुरुवात झाली... ऊद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातला पहिला सण... हां-हां म्हणता गोकुळाष्टमी होऊन 'श्री गजानना'चे आगमन होईल...

श्रावण महिनो इलो म्हणजे आपल्या सणा-वारांक सुरुवात झाली.. उद्या 'नाग-पंचमी'- श्रावणातलो पहिलो सण.. हां-हां म्हणता गोकुळाष्टमी (होवान ? झाल्यार )'श्री गजानना'चा आगमन होतलंय...

२> मायबोलिवर आपल्या या सण-वारां बाबत आधुनिक कल्पनेतून कुणी लिहितं की नाही?... शोधलं पाहिजे...
मायबोलीवर आपल्या सणा-वारांबाबात आधुनिक कल्पनेत्सून कुणी लिवता की काय ? शोधुक होया..

३> आज पर्यंत या 'अजब' पद्धतीने कोण्-कोण शिकलेलं आहे?, चौकशी केली पाहिजे...
आज पर्यंत ह्या 'अजब' पद्धतिन कोण-कोण शिकला हा ?, चौकशी करून होई...

४> हळू-हळु आपणच मराठीचं मालवणित भाषांतर करायला सुरुवात केली पाहिजे... तपासायला बरेच मास्तर उपलब्ध आहेत.
हळू-हळू आपणच मराठिचो मालवणित भाषांतर करूक सुरुवात करुक होई... तपासाक बरेच मास्तर उपलब्ध हेत.

५> नाहीतरी आपण शाळेत ईंग्रजीचं मराठी मधे भाषांतर करतोच, तसंच हा प्रयत्न करुन बघायचा...
नायतर आपण शाळेत ईंग्रजीचो मराठीत भाषांतर करताव, तसांच ह्या प्रयत्न करुन बघतलंय..

डॅफो...
छान पैकी जमताहा...

फक्त काही बारीकशे सुधारणा...
१> गोकुळाष्टमी होवान...
२> आगमन होतलंय...>>> आगमन होतालां...
शक्यतो होतलंय, करतलंय, आसंय... अशे शब्द हे स्वतः शी संबंधीत म्हणून वापरले जातत... उदा. मी उद्या पुरणपोळी करतलंय... (केल्यावर माझी आठवण काढा!... :फिदी:...)
३>चौकशी करूक होयी...
४> मराठिचां मालवणीत भाषांतर...
५> तपासूक बरेच मास्तर उपलब्ध आसत...
६> ईंग्रजीचां मराठीत भाषांतर करतंव...
७> तसोच ह्यो प्रयत्न करुन बघतलंय...

मास्तरानु, बघा जमताय का भाषांतर..... Happy

१> गेल्या दोन दिवसांचो अभ्यास बरो जमलो बाय... आता आज काय अभ्यास देतले मास्तर?...
गेल्या दोन दिवसांचा अभ्यास बर्‍यापैकी जमला गं बाई.... आता आज काय अभ्यास देणार मास्तर?...

२> ठकू वगीच घाबरत र्‍हवता... कनेक्शनचां निमित सांगान अभ्यास टाळताहा... असल्यांनी 'ह्यां', मालवणी कसां काय शिकतलां?
ठकू उगीच घाबरत असते.... कनेक्शनचे निमित्त सांगून अभ्यास टाळते.... अशाने ती मालवणी कशी काय शिकणार?

३> हंयसर बहुतेक ह्यो मास्तर फक्त अभ्यास देता. बाकिचे मास्तर येवन केलेलो अभ्यास तपासतत... बरी पद्धत आसा बाय... सगळ्यांकडसुन वेग-वेगळे पद्धतीन शिकाक मेळताहा...
इथे बहुतेक हे मास्तर फक्त अभ्यास देतात. बाकीचे मास्तर येऊन केलेला अभ्यास तपासतात. बरी पध्दत आहे बाई....सगळ्यांकडून वेगवेगळ्या पध्दतीने शिकायला मिळत आहे....

४> ऊद्या 'नाग-पंचमी', आणी विकांत... मास्तरांक विचारुक व्हयां 'उद्या सुट्टी आसा काय?', म्हणान...
उद्या नागपंचमी आणि विकांत.... मास्तरांना विचारायला हवं 'उद्या सुट्टी आहे का?' म्हणून...

५> अशे सणा-वाराचे सुट्ट्ये घेतल्या शिवाय शाळेत बसान शिकल्या सारख्यां वाटणांच नाय...
अशा सणावारांच्या सुट्ट्या घेतल्याशिवाय शाळेत बसून शिकल्यासारखे वाटणारच नाही....

आता मराठीचा मालवणीत भाषांतर ....

१> श्रावण महिना म्हणजे आपल्या सणा-वारांना सुरुवात झाली... ऊद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातला पहिला सण... हां-हां म्हणता गोकुळाष्टमी होऊन 'श्री गजानना'चे आगमन होईल...
श्रावण महिनो म्हणजे आपलो सणा-वारांचो सुरुवात झाली. उद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातलो पहिलो सण...हां हां म्हणता गोकुळाष्टमी होवान 'श्री गजानना'चो आगमन होतलंय.

२> मायबोलिवर आपल्या या सण-वारां बाबत आधुनिक कल्पनेतून कुणी लिहितं की नाही?... शोधलं पाहिजे...
मायबोलीवर आपलो ह्यो सण-वारांबाबत आधुनिक कल्पनेत्सून कुणी लिवतात का नाय?.... शोधूक होया....

३> आज पर्यंत या 'अजब' पद्धतीने कोण्-कोण शिकलेलं आहे?, चौकशी केली पाहिजे...
आज पर्यंत ह्यो 'अजब' पध्दतीन कोण-कोण शिकूक रवलंन? चौकशी करूक होयी

४> हळू-हळु आपणच मराठीचं मालवणित भाषांतर करायला सुरुवात केली पाहिजे... तपासायला बरेच मास्तर उपलब्ध आहेत.
हळू-हळू आपणच मराठीचा मालवणित भाषांतर करूक सुरुवात करूक होयी.... तपासूक बरेच मास्तर उपलब्ध होया.

५> नाहीतरी आपण शाळेत ईंग्रजीचं मराठी मधे भाषांतर करतोच, तसंच हा प्रयत्न करुन बघायचा...
नायतर आपण शाळेत इंग्रजीचा मराठीत भाषांतर करतंव, तसोच ह्यो प्रयत्न करूक बघतलंय....

सुदुपार मास्तरानु..... सोमवाराचो अभ्यास देतला ना? काल माका बहिणीशी मालवणीत बोलून पायलेन.... ती फार फास्ट बोलताहां.... माका काय बी समजूच नाय!

१> श्रावण महिना म्हणजे आपल्या सणा-वारांना सुरुवात झाली... ऊद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातला पहिला सण... हां-हां म्हणता गोकुळाष्टमी होऊन 'श्री गजानना'चे आगमन होईल...
श्रावण महिनो म्हणजे आपलो सणा-वारांची सुरुवात झाली. उद्या 'नाग-पंचमी' - श्रावणातलो पहिलो सण...हां हां म्हणता गोकुळाष्टमी होवन 'श्री गजानना'चा आगमन होतला

२> मायबोलिवर आपल्या या सण-वारां बाबत आधुनिक कल्पनेतून कुणी लिहितं की नाही?... शोधलं पाहिजे...
मायबोलीवर आपल्या ह्या सण-वारांबाबत आधुनिक कल्पनेत्सून कुणी लिवतत की नाय?.... शोधूक होया....

३> आज पर्यंत या 'अजब' पद्धतीने कोण्-कोण शिकलेलं आहे?, चौकशी केली पाहिजे...
आज पर्यंत ह्या 'अजब' पध्दतीन कोण-कोण शिकलेला आसा? चौकशी करूक होयी

४> हळू-हळु आपणच मराठीचं मालवणित भाषांतर करायला सुरुवात केली पाहिजे... तपासायला बरेच मास्तर उपलब्ध आहेत.
हळू-हळू आपणच मराठीचा मालवणित भाषांतर करूक सुरुवात करूक होयी.... तपासूक बरेच मास्तर उपलब्ध आसत.

५> नाहीतरी आपण शाळेत ईंग्रजीचं मराठी मधे भाषांतर करतोच, तसंच हा प्रयत्न करुन बघायचा...
नायतरी आपण शाळेत इंग्रजीचा मराठीत भाषांतर करतंव, तसोच ह्यो प्रयत्न करूक बघूचो...

अरु जास्त नाय थोडेशेच फेर्फार

अरुंधती...
सोमवाराचो अभ्यास देतला ना? काल माका बहिणीशी मालवणीत बोलून पायलेन.... ती फार फास्ट बोलताहां.... माका काय बी समजूच नाय!...>>>

सोमवारचो अभ्यास देतलात नां? काल मी बहिणीशी मालवणित बोलून बघितलंय... ती खूप फास्ट बोलता हां... माका काय्यक समजाक नाय!...

हळू हळू प्रगती होवन म्हणायचो !!!...>>> हळू-हळू प्रगती होयत म्हणायचां...

प्रयत्न खूप छान आसत, अशेच प्रयत्न चालू ठेवा... आजचो अभ्यास दुपार-नंतर देतय...

मास्तरानु, गजालीकरांनु..... गायब झालो की काय सगळा लोक??? माझो मालवणि नायतर कसा सुधारंल?:)

गायब झाले की काय सगळे लोक??? माझी मालवणि नायतर कशी सुधारात?

वाचीत रवा आणि शिकलेले नियम लक्षात ठेवा.. आपोआप सुधारतली.. Happy

हे. मा.

Pages