मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९ तारखेक माका सुटी होती. Happy

तरीपण मी अभ्यास करतंय हा.

१) आम्हाला वाटल होत, मालवणी शिकणं सोपं असेल.. पण कसल काय? पहिला धडा सोडवतानाच नाकी नौ आले.फे-फे उडली). तरीसुद्धा जमेल तेवढा प्रयत्न करुन बघितला. बर्‍याच जणांनी अभ्यास बघुनच बर्गातुन काढता पाय घेतला. आता त्यांची गैरहजेरी लागलीय वर्गात. मास्तर त्यांना काय शिक्षा देतात ते पाहायचय. असो. मालवणीतलं शुद्ध्-मराठी करणं जमत्(पण अजुन अस्खलीत पणे लिहायला जमायला हव.) कारण शब्दांच्या अंदाजाने लिहिल की बहुधा बरोब्बर 'दगड' बसतो. पण शुद्ध-मराठीतल मालवणी करताना मात्र काय हाल होतात , ते आमचे आम्हाला माहिती... पण असो. आम्ही काहीही झाल तरी मालवणी शिकणारच. आणि सिनियर लोकांच तोंड गप्प करणार.( तसही माझ तोंड गप्प करण कठीणच Lol )

२) सुटी सोपल्याबरोब्बर मास्तरानी अभ्यास फुड्यान हाडुन ठेवलो. Sad काय करतलव? मालवणी शिकुची आसा, तेवा अभ्यास सोडवुन दाखवल्याशिवाय दुसरो पर्यायच नाय. फाटलो अभ्यास सोडवताना देवाचा नाव घेवची पाळी इली होती, एकेक शब्द मालवणीत लिवताना. मास्तरांका किंवा बाकीच्या गजालीकारांका सांगून शुद्ध मराठी ते मालवणी शब्दकोष करुन घेवक जायो.
म्हंजे फुडाराक मालवणी शिकताना होणारो त्रास कमी जायत.

गजालीकारानो( नुसते 'ओ' काय म्हणताव?) आमच्या सुचनेकडे वायच लक्ष दिया...

ही शाळा बंद पडली काय? कोणाक मालवणी शिकाचा आसला तर मी शिकवक तयार आसय. फक्त एप्रिल मे महिन्यात पेटीभर आंबे ( हापूस/ पायरी)दीवचा काय ता बगा.

कमीत कमी सहा महिने भरपूर मासे , मालवणी खाजां , खटखटे लाडू आणि मालवणी गाळी खाल्याशिवाय मालवणी शिकणयाच्या फंदात पडूं नकात , हयां आपलां माझां मत !!! हो ' फाऊंडेशन कोर्स ' केल्याशिवाय जीभ मालवणीसाठी तयार होणां नाय !! Wink

Bhau,तुम्हाला धन्यवाद! शिरां पडली तोंडार ऐकले होते.
मरी,नायनाट होवो असा अर्थही महिता होता.पण त्या म्हणींचा धाग्यावर तुम्ही नेमका अर्थ सांगितलात.लगेच सर्वांना पास on kela.

*मालवणीचो सराव करुक सगळेजण राखेचा बघतत* - अस्सल मालवणी आपलां मालवणी 'राखेचा'मुळे बिघाडलां म्हणान कपाळार हात घेवन बसलेत !! Wink

आपल्या झिलाचां सगळांच वागणां त्या अण्णा नाईकाच्या वळणावर चललांहा तरी सहन केलंय .कहर म्हणजे मालवणी पण आतां तो अण्णासारख्या बोलता
!!
20190912_004623_2.jpg

मालवणीचो सराव करुक सगळेजण राखेचा बघतत* - अस्सल मालवणी आपलां मालवणी 'राखेचा'मुळे बिघाडलां म्हणान कपाळार हात घेवन बसलेत !! >>>
अगदी बरोबर बोल्लास भाऊकाकानू.

"लक्षात आहे होय तुझ्या? मला वाटले हा पोरगा मला विसरला कि काय?" हे वाक्य कोकणी भाषेत कसे म्हणायचे सांगेल का कोण?
(चेडवा म्हणजे मुलगी. मुलाला काय म्हणतात तो शब्द इथे वापरला तर योग्य राहील का?)

लक्षात आहे होय तुझ्या? मला वाटले हा पोरगा मला विसरला कि काय?">>>>>>>>> लक्षात असां काय तुझ्या? माकां वाटलां,हो झील विसरलो की काय माकां (झील माकां विसरलो की काय?)
मुलगी असेल तर ह्या चेडू माकां विसरलां की काय? चेडवा हे संबोधन/ अनेकवचन आहे.गो चेडवा हंय ये.
तेकां २ चेडवां आसत.

>> Submitted by देवकी on 2 February, 2020 - 16:48

धन्यवाद देवकीजी आपले... खूप गोड भाषा आहे कोकणी/मालवणी.

*गो चेडवा हंय ये. तेकां २ चेडवां आसत.* -
'झीला 'च्या वापराबाबत एक बारकावाही आहे. 'कुणाचा तरी मुलगा ' , असा संदर्भ असेल तर 'झील' म्हणावं. कुणी तरी मुलगा महणायचं असेल, तर झिलगा' म्हणणं अधिक योग्य. उदा., ' हल्ली कामाक झिलगेच गावणत नाय गावात '.

माका जे काय मालवणी येतां तां राखेचा बघताहा म्हणान येतां.>>>>ता दिसताच हा.
राखेचामधला मालवणी आणि अग्निहोत्रमधला कोंकणी, आयकान अगदीच धन्य झालो आमी.

Pages