मालवणी शिकायचंय? भाग-२

Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31

मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परभणी थय मराठ्वाड्याक.. मिया विदर्भाचो..>> गो आसा लिव: मिया विदर्भाचा. पुरुष असलो तर तो म्हणतलो "मिया विदर्भाचो"
ह्या माका म्हायत आसा गो तुया विदर्भात आसा म्हणान. तुका परभणी म्हायत हा का नाय ह्या विचारी होतंय मिया. जावंदेत. तुका म्हायत हा. Happy

अरे ह्या काय.. इतका वाहान कसा गेलो ह्यो बिबी.. !!
एकाच दिवशी इतका अ‍ॅडमिशन कसा झाला ? खय मालवणीत्सुन बोलणार्‍यांकाच जॉब बिब देतत की काय.. Proud

चला शाळा सुरु झाली. हयसर गजाली नको.. चला गृहपाठ द्या बघू नव्ये इलेल्यांना. म्हणजे आमचीपण उजळणी होतली. Happy

नमस्कार बाईनू, मास्तरानू.. आज माका वायच उशीर झाला त्यासाठी माफी मागतय.. मिया दुसर्‍या शाळेत गेले होते परिक्षक म्हणून.. (समूहगीत स्पर्धा)... आताच इलय... चुकला तर दुरुस्त करा.. कसे असा सगळे..?

आसंय, आसंय मिया आसंय. मिया मास्तर नाय पण वायच दिसला तेवडा दुरुस्त करतंय. Happy
आज माका वायच उशीर झाला त्यासाठी माफी मागतय.. मिया दुसर्‍या शाळेत गेले होते परिक्षक म्हणून.. (समूहगीत स्पर्धा)... आताच इलय... चुकला तर दुरुस्त करा.. कसे असा सगळे..?>>
आज माका वायच उशीर झालो. त्यासाठी माफी मागतय.. मिया दुसर्‍या शाळेत गेले होते परिक्षक म्हणान.. (समूहगीत स्पर्धा)... आताच इलय... चुकला तर दुरुस्त करा.. कसे असा सगळे..?
हे काय, आज अर्धीच शाळा आहे का? सगळे मास्तर मास्तरीनी गजाली करण्यात दंग आहेत की काय?>>ह्या काय, आज अर्धीच शाळा आसा काय? सगळे मास्तर मास्तरीनी गजाली करण्यात दंग आसा की काय?

ठकू,
>>नमस्कार बाईनू, मास्तरानू..<<
नमस्कार बाईनू, मास्तरानू.. आज माका वायच उशीर झालो तेच्यासाठी माफी मागतय.. मिया दुसर्‍या शाळेत गेलं होतय परिक्षक म्हणान.. (समूहगीत स्पर्धा)... आताच इलय... चुकला तर दुरुस्त करा.. कसे आसात सगळे..?

<<हे काय, आज ...<<
ह्या काय, आज अर्धीच शाळा हा काय ? सगळे मास्तर मास्तरणी गजाली करण्यात दंग हत की काय?

वर्गात काय गडबड चल्ली हा रे. मास्तर वायच घरी गेले हत. तोपर्यंत ह्या शिनिअरांनी धडे दिलेत त्येची उजळ्णी करा बघू.

ठकू, डॅफो, अरुंधती...
खाली देतंय तो अभ्यास जमता काय बघा... मालवणितसून मराठीत भाषांतर करुचो प्रयत्न करा...

१> चला बाय, मालवणि शाळा सुरु झाली एकदाची...
२> एका शाळेत ह्ये, किती मास्तर?... आणि प्रत्येकाची पद्धत बाय निराळिच!!!...
३> कायय असयना, मालवणि शिकाक मिळाल्याशी कारण...
४> ह्यो एक मास्तर, कसो शिकवित कोणाक ठावक, दक्षिणाक विचारुन बघूक व्हयां... तां सांगता, ह्याच मस्तराकडसून बरांच मालवणि शिकलंय म्हणान...
५> पण माका सांगा, ईतके दिवस ह्यो मास्तर व्हतो खंय?... आम्ही ईतके दिवस शोधतसंव, तर खंय दिसाक नाय, आणी काल पासुन हजर झालोहा... सुट्ट्येर गेल्लंलो की काय?...

चला बाई, मालवणी शाळा सुरू झाली एकदाची...
एका शाळेत किती हे मास्तर ? आणि प्रत्येकाची पद्धत बाई निराळीच !!!...
काहीही असो, मालवणी शिकायला मिळाल्याशी कारण...
हे एक मास्तर, कसे शिकवतात कुणास ठाउक ? दक्षिणाला विचारयला हवे... ती सांगते की ह्याच मास्तरांकडून बरंच मालवणी शिकलेय म्हणून...
पण मला सांगा, इतके दिवस हे मास्तर होते कुठे ? ... आम्ही इतके शोधले तरी दिसले नाहित, आणि कालपासून हजर झाले आहेत.. सुट्टीवर गेले होते की काय ? ...

मास्तरानु, मिया इलय हयसर.
मालवणितसून मराठीत भाषांतर करुचो माझो प्रयत्न

१> चला बाय, मालवणि शाळा सुरु झाली एकदाची...
चला बाई, मालवणी शाळा सुरु झाली एकदाची...

२> एका शाळेत ह्ये, किती मास्तर?... आणि प्रत्येकाची पद्धत बाय निराळिच!!!...
एका शाळेत हे किती मास्तर?.... आणि प्रत्येकाची पध्दत बाई निराळीच!!!!....

३> कायय असयना, मालवणि शिकाक मिळाल्याशी कारण...
काहीपण असेना, मालवणी शिकायला मिळाल्याशी कारण...

४> ह्यो एक मास्तर, कसो शिकवित कोणाक ठावक, दक्षिणाक विचारुन बघूक व्हयां... तां सांगता, ह्याच मस्तराकडसून बरांच मालवणि शिकलंय म्हणान...
हा एक मास्तर, कसा शिकवतोय कोणास ठाऊक, दक्षिणाला विचारून बघायला हवे....ती सांगते , ह्याच मास्तराकडून बरेच मालवणी शिकली म्हणे!

५> पण माका सांगा, ईतके दिवस ह्यो मास्तर व्हतो खंय?... आम्ही ईतके दिवस शोधतसंव, तर खंय दिसाक नाय, आणी काल पासुन हजर झालोहा... सुट्ट्येर गेल्लंलो की काय?
पण मला सांगा, इतके दिवस हा मास्तर कोठे होता?... आम्ही इतके दिवस शोधला, तर कोठेच दिसला नाही. आणि कालपासून हजर झाला.... सुट्टीवर गेलेला की काय?

Happy

डॅफो, अरुंधती...
प्रगती खूपच चांगली आसा... अभिनंदन!...
आज मराठी वाक्य मालवणित लिवक जमता काय बघुया...

१>मास्तरांनी कालचा अभ्यास तपासून शाबासकी दिल्यामूळे खूप बरं वाटलं... मालवणी भाषा शिकायचा हुरुप वाढला...
२>रोज थोडा-थोडा असाच प्रयत्न करत राहिलो, तर मालवणि शिकणं कठीण वाटणार नाही...
३>या शाळेचं एक बरं आहे, कधीही येऊन अभ्यास केला तरी चालतो... त्यामुळे शिकायला बरं वाटतं...
४>हळु-हळू मालवणि बोलणं देखिल शिकलं पाहिजे, म्हणजे मालवणी भाषा लवकर शिकता येईल...
५>अरे वा! म्हणता-म्हणता आम्हाला हळू-हळू जमायला देखिल लागलं...

भ्रमा...
अभ्यासात मास्तराक "एकवचनी" संबोधलाहा...>>> मी स्वतः कच आदरार्थी कसो संबोधून घेतलंय सांग बघुया!!!... :फिदी:...

१>मास्तरांनी कालचो अभ्यास तपासून शाबासकी दिल्यान.. त्यामूळे खूप बरां वाटलां... मालवणी भाषा शिकायचो हुरुप वाढलो...
२>रोज थोडो-थोडो असोच प्रयत्न करीत रवलो, तर मालवणि शिकणां कठीण वाटायचो नाय...
३>या शाळेचा एक बरा हा, कधीही येवान अभ्यास केलाव तरी चालता... त्यामुळे शिकाक बरां वाटतां...
४>हळु-हळू मालवणि बोलूक देखिल शिकूक होया, म्हणजे मालवणी भाषा लवकर शिकता येतली...
५>अरे वा! म्हणता-म्हणता आम्हाला हळू-हळू जमाक देखिल लागलो...

कसे आसात सगळे..?
माझा घो गावात नाय हा तर त्याची आफिसाची कामं माकाच करावी लागतात.. म्हणान माका शाळेत याय्ला उशीर होतो..

खरा बोललात गुरुकाका... मिया रोज हजर रवायचा प्रयत्न करता.. पण तुमिच रोज माका दिसत नाय.. हेडमास्तर आसात काय तुमी..?

Pages