Submitted by नीलू on 27 January, 2009 - 04:31
मालवणी शिकायचंय? थोडं थोडं येतंय पण आठवत नाहीये? इथे विचारा. किंवा तुम्हाला छान बोलता येत असेल तर इतरानाही सांगा.
या अगोदरचं मालवणी भाषेबद्दलचं हितगुज इथे पहा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शांकली... प्रतिसाद मराठीत्सुन
शांकली...
...
प्रतिसाद मराठीत्सुन कशाक?... जमात तसां तोडक्या-मोडक्या मालवणित लिवक लागा... दुरुस्ती करुन देणारे 'मेस्त्री' हंयसर बरेचजण आसत... येवक लागा, तुमचां स्वागत आसा...
थेंकू थेंकू.....हा लिवता
थेंकू थेंकू.....हा लिवता मालवणीत!
शांकलीचो अर्थ काय गो? म्हणजे
शांकलीचो अर्थ काय गो? म्हणजे आता त्येची तोडमोड कशी करुची. गो शांकल्या चलात काय?
हा लिवता नाय.. लिवतय हा मालवणीत. लिव आता.
लिवतय हा मालवणीत. शांकली
लिवतय हा मालवणीत.
शांकली शब्दाला काहीही अर्थ नाही. माझं नाव अंजली आहे. (हे मालवणीत कसे लिहायचे?)
गो शांकल्या चलात काय?>> ह्याचा अर्थ काय?
'गो' ह्या पोरीक हाक मारुचा
'गो' ह्या पोरीक हाक मारुचा संबोधन. जसा 'पारु गो पारु' म्हणतत ता
आणि 'शांकल्या' ह्यो तुझ्या नावाचो मालवणी अपभ्रंश. कोणाचाय नाव सरळसोट घेवचा नाय ह्यो मालवणी बाणोच आसा.
माझं नाव अंजली आहे... माजा नाव अंजली आसा.
शांकलीक पहलो मालवणी हिसको
शांकलीक पहलो मालवणी हिसको बसलो काय?

माझ्य्य नावाचो काय्येक मालवणी अपभ्रंश होवक नाय.
प्रदल्या. आता तुका प्रताय
प्रदल्या.
आता तुका प्रताय म्हणतवच ना.
बघा झालो. आणि तसाव ज्या
बघा झालो.
आणि तसाव ज्या नावाचो अपभ्रंश जाव शकना नाय त्येका नावच म्हणू न्हय 
इति नीलूमाता उवाच!
इति नीलूमाता उवाच!
माता!!!!!! बढती गावली काय
माता!!!!!! बढती गावली काय माका
नाही हिसको बसलो नाय! कोणाचाय
नाही हिसको बसलो नाय!
कोणाचाय नाव सरळसोट घेवचा नाय ह्यो मालवणी बाणोच आसा.>>>>>:हाहा:
आता ते वाक्य ध्यानामंदी आलाव माका
हे एक वाक्य माका ठाऊक
हे एक वाक्य माका ठाऊक असा....' सुंगटा घालून कर गो बेस बिमलांचो रोस फैदासून हाडला हांवे आज तांचो घोस!' (हे वाक्य डॉ. शरदिनी डहाणूकरांचे पुस्तक 'वृक्षगान' मधे आहे त्याचा अर्थ मला मराठीत सांगा ना)..त्यातला बिमलांचो - बिमली नावाचे फळ एवढेच माका कळाले.
ता मालवणी असा की गोंयचा
ता मालवणी असा की गोंयचा कोंकणी?
सुंगटा घालून कर गो बेस बिमलांचो रोस फैदासून हाडला हांवे आज तांचो घोस!
सुंगटं घालून कर ग मस्तपैकी बिमलांचा रस. फैदासून (म्हणजे कुठून?) आणलाय आज त्यांचा घोस (गुच्छ)
शांकली ही गोयंची कोकणी..
शांकली ही गोयंची कोकणी.. मालवणीपासून जराशी येगळी .
सुंगटा घालून बिमलाचा रस्सा कर गं मस्त. बिमलाची फळा असतत बारकी, हिरवट, कच्चीव गोड लागतत. सुंगटा म्हणजे सुकी कोलंबी, सुकट. रोस = रस्सो. फैदासूनचो अर्थ माकाय ठावक नाय. शैलू सांगात.
मयेकारानू वायच गजालेरव येवा कधीतरी.
हा आता आला ध्यानात. मयेकरांनी
हा आता आला ध्यानात. मयेकरांनी सांगितलेलो मी वाचला होता पण माका सुंगटाचा अर्थ कळला नव्हता.
हा बरोबर डहाणूकर गोयंकर ना! परंतू ते वाक्य गोयंची कोकणी असा हे माका ठाऊक नव्हते. धन्यवाद.
गजाली म्हणजे काय?
गजाली म्हणजे काय?
गजाली = गप्पा
गजाली = गप्पा
आता ते वाक्य ध्यानामंदी आलाव
आता ते वाक्य ध्यानामंदी आलाव माका....
शांकल्या, आता तां वाक्क्य समाजलां माका... आसां होया तां! 'ध्यानामंदी' घाटावरलो शब्द आसां.
चला... आज परत एकदा अभ्यास
चला... आज परत एकदा अभ्यास घ्येवा...
मालवणीचां शुद्ध-मराठी करा: -
आमकां वाटलेलां, मालवणी शिकणां सोप्यां असात असां... पण कसलां काय?... पयलो धडो सोडवतानाच फे-फे उडाली. तरी देखिल जमात तितको प्रयत्न करुन बघितलंव. बर्याच जणांनी तो अभ्यास बघून वर्गातसूनच काढतो पाय घेतल्यांनी. आता त्येंची वरचे-वर गैर-हजेरी लागतासा वर्गात. आता मास्तर त्येंका काय-कसली शिक्षा देतत, ती बघूची आसा. आसो. मालवणितलां शुद्ध-मराठी करणां जमता (पण आजून अस्खलीत पणे लिवक जमाक होयां...), कारण शब्दांच्या अंदाजान लिवलां की बरेचदा बरोब्बर 'दगड' लागता... पण शुद्ध-मराठीतलां 'मालवणी' करताना मात्र काय हाल होतंत, ते आमचे आम्का म्हायत... पण आसो, आम्ही कायय झालां तरी 'मालवणी' शिकतलवंच, आणी 'शिनीयरां'चा ताँड गप्प करतलंव...
शुद्ध-मराठीचां मालवणी करा: -
सुट्टी संपल्या बरोबर मास्तरांनी अभ्यास समोर आणून ठेवला. काय करणार?, मालवणी तर शिकायचं आहे, तेव्हां अभ्यास सोडवून दाखवण्या शिवाय दुसरा पर्याय नाही. मागचा अभ्यास सोडवताना देवाचं नाव घ्यावं लागत होतं, एक-एक शब्द मालवणीत लिहिताना. मास्तरांना किंवा बाकी गजालिकरांना सांगून शुद्ध-मराठी ते मालवणी, असा शब्द-कोष बनवून घेतला पाहीजे. म्हणजे पुढे 'मालवणी' शिकताना होणारा त्रास थोडासा कमी होईल. गजालिकर आमच्या या सुचनेकडे लक्ष द्या...
सुट्टी संपल्यार लगेच
सुट्टी संपल्यार लगेच मास्तरांनी अभ्यास दिलो. काय करुचा? मालवणी तर शिकुचा असा, तेव्हां अभ्यास करुन दाखवण्या शिवाय दुसरो पर्याय नाय. मागचो अभ्यास सोडवताना देवाचा नाव घ्यावा लागत होता, एक-एक शब्द मालवणीत लिवताना. मास्तरांका किंवा बाकी गजालिकरांका सांगून शुद्ध-मराठी ते मालवणी, असो शब्द-कोष बनवून घेतलो पाहीजे. म्हणजे पुढचो 'मालवणी' शिकताना होणारो त्रास थोडो कमी होईल. गजालिकरांनु आमच्या या सुचनेकडे लक्ष द्या...
अ) मला वाटलेले की मालवणी
अ) मला वाटलेले की मालवणी शिकणे सोपे असते...पण कसले काय? पहिला धडा सोडवतानाच फ़ेफ़े उडाली. तरी देखील जमले तितका प्रयत्न करून पाहिला. बर्याच जणांनी तो अभ्यास बघूनच वर्गातून काढता पाय घेतला. आता वर्गात त्यांची वारंवार गैरहजेरी लागते. आता मास्तर त्यांना कशी काय शिक्षा देतात ते पाहायचे आहे. मालवणीतले शुद्ध मराठीत लिहिणे जमते (पण आणखी अस्खलितपणे लिहिता आले पाहिजे) कारण शब्दांचा अदमास घेऊन लिहिले की र दगड अचूक बसतो, पण शुद्ध मराठीतले मालवणीत करताना काय होतात ते माझे मलाच माहीत. तरी असो, काही ज़ाले तरी मी मालवणी शिकेनच आणि ज्येष्ठ/वरिष्ठांची तोंडे बंद करीन.
ब) सुट्टी संपना नाय तोच मास्तरान अभ्यास फ़ुड्यात हाडून ठेवलो. काय करतलंय? मालवणी तर शिकूचा असा, तेव्हा अभ्यास सोडून दाखवण्यापरास दुसरो मार्ग नाय. मागलो अभ्यास करताना देवाचा नाव घेऊक लागा, एक एक शब्द मालवणीत लिवताना. मास्तरांक आणि बाकी गजालीकरांक सांगान शुद्ध मराठी ता मालवणी असो एक शब्दकोष बनवून घेयाक होवो. म्हणजे पुढे मालवणी शिकताना होणाअरो त्रास तरी वाईच कमी होतलो. गजालिकर, माझ्यो ह्यो सूचनेकडे लक्ष देवा.
उत्तर १) आम्हांला वाटलेलं,
उत्तर १) आम्हांला वाटलेलं, मालवणी शिकणं सोपं असेल.. पण कसलं कांय?.. पहिला धडा सोडवतांनाच फे- फे उडाली. तरी देखील जमेल तेवढा प्रयत्न करुन पाहिला. बर्याच जणांनी तो अभ्यास पाहूनच वर्गातून काढता पाय घेतला. आता त्यांची वरचेवर गैरहजेरी लागते वर्गांत. आता मास्तर त्यांना कांय आणि कसली शिक्षा देतात, ते पहायचंय. असो. मालवणीतले शुद्ध मराठी करणे जमते ( पण अजून अस्खलितपणे लिहिणे जमले पाहिजे...), कारण शब्दांच्या अंदाजाने लिहिलं की बरेचदा बरोब्बर 'दगड' लागतो... पण शुध्द- मराठीतले 'मालवणी' करतांना मात्र कांय हाल होतात, ते आमचे आम्हांला माहित... पण असो, काहीही झालं तरी आम्ही 'मालवणी' शिकूच, आणि 'सिनियरां'ची तोंडे गप्प करू..
उत्तर २) सुटी संपना नाय तोच मास्तरांनी अभ्यास फ़ुड्यात हाडांन ठेवला. काय करतलंय? मालवणी तर शिकूची हां, तेव्हा अभ्यास सोडऊन दाखवण्यापरास दुसरो पर्याय नाय आसां. मागलो अभ्यास सोडवतांना देवाचा नाव घेऊक लागा होतां, एक एक शब्द मालवणीतसून लिवताना. मास्तरांका आणि बाकी गजालीकरांका सांगान शुद्ध मराठी ता मालवणी असो येक शब्दकोष बनवून घेऊक होयो. म्हणजे पुढे मालवणी शिकताना होणारो त्रास वायंच कमी होतलो. गजालिकर, आमचे ह्यो सूचनेकडे लक्ष द्यावा...
मराठीत भाषांतर : आम्हाला
मराठीत भाषांतर : आम्हाला वाटलेलं मालवणी शिकणं सोपं असेल, पण कसलं काय? पहिला धडा सोडवतानाच फेफे उडाली. तरीसुद्धा जमलां तेवढा प्रयत्न करून पाहिला.बर्याच जणांनी तो अभ्यास पाहून वर्गातून काढता पाय घेतला. आता त्यांची वर्गात वरचे-वर गैर्-हजेरी लागणार. आता मास्तर त्यांना कसली शिक्षा देतात, ते बघायचं. असो. मालवणीतलं शुद्ध मराठी करणं जमतं ( पण अजून अस्खलित पणे लिहायला जमलं पाहिजे....), कारण शब्दांच्या अंदाजाने लिहिलं की बरेचदा बरोब्बर 'दगड' लागतो...
पण शुद्ध मराठीतला 'मालवणीत' करताना मात्र काय हाल होतात, ते आमचे आम्हाला माहित.... पण असो, आम्ही काहीही झालं तरी 'मालवणी' शिकणारच, आणि सिनिअरांचं तोंड गप्प करणारच.....
शुद्ध-मराठीचां मालवणी करा: -
सुट्टी संपल्याबरोबर मास्तरांनी अभ्यास समोर ठेवल्यांनी. काय करणार? मालवणी तर शिकूचा हा, तव्हा अभ्यास सोडवून दाखवूकच होयो, दुसरो पर्याय नाय. मागचो अभ्यास सोडवताना देवाचो नाव घेवक लागलेला, एक्-एक शब्द मालवणीत लिहिताना. मास्तरांना किंवा बाकी गजालीकरांना सांगून शुद्ध मराठी ते मालवणी, असो शब्द-कोष बनवून घेवक होयो. म्हणजे पुढे 'मालवणी' शकताना होणारो त्रास तरी कमी होयत. गजालीकरांनु, आमच्या या सुचनेकडे लक्ष देवा..........
प्रताय अभ्यास दिला हेच माका
प्रताय अभ्यास दिला हेच माका ठाऊक नव्हते!
आता मालवणी-मराठी शब्दकोष
आता मालवणी-मराठी शब्दकोष वाचणं चालू आहे.... थोड्यावेळाने नक्की अभ्यास करीन.
माका अभ्यास करूक झाला..... हे
माका अभ्यास करूक झाला.....
हे मराठीतला भाषांतर आसा...
आम्हाला वाटलं मालवणी शिकणं सोपं असेल. पण कसलं काय! पहिला धडा शिकतानाच फे फे उडाली! तरीदेखील जमेल तितका प्रयत्न करून बघितला.बर्याचजणांनी तो अभ्यास बघून वर्गातून काढता पाय घेतला. (ओ तुम्ही मला डोळ्यांसमोर ठेऊन नाही ना अभ्यास दिलाय? :अओ:)
आता त्यांची वर्गात वरचेवर गैरहजेरी लागणार! आता त्यांना मास्तर कुठली शिक्षा देतात ते बघायचं.असो, मालवणी ते शुद्ध मराठी असं लिहिणं जमतं; (पण अजून अस्खलीत लिहिणं जमायला पाहिजे.) कारण शब्दांच्या अंदाजाने लिहिलं की बरोबर दगड लागतो. पण शुद्ध मराठीतून मालवणीत लिहिताना काय हाल होतात ते आमचे आम्हाला माहीत! (आता मात्र मला खात्रीच पटलीये की मलाच डोळ्यांसमोर ठेऊन अभ्यास दिलाय :अरेरे:)
असो, पण काहीही झालं तरी आम्ही मालवणी शिकणारच आणि सिनियरांचं तोंड गप्प करणार.
(बाप्रे आता मराठीतून मालवणीत भाषांतर!!! देवा सांभाळ रे बाबा!)
सुट्टी संपल्याक मास्तरान अभ्यास म्होरं ठेवलान्.काय करूचा? मालवणी त शिकाय होवा. तेव्हा अभ्यास सोडवूक दाखवाय होवा! दुसरा पर्याय नसा. मागचो अभ्यास सोडवताना देवाक नाव घेवा होवा.एक एक मालवणी शब्द लिहिताना.(मला नाई येते नीट लिहिता)
अंजलीताय, वरचे लोकांनी ज्यां
अंजलीताय, वरचे लोकांनी ज्यां कांय लिवला हां तेच्यांर एक नजर मारान घी.. मगे परत प्रयत्न कर.. जमतलां तुका! नाय येत म्हणांन दरवाजो बंद केलंस तर मास्तर करवादतले..
अरे वा वा वर्ग चालू आसत.
अरे वा वा वर्ग चालू आसत. मास्तर खय गेले?
पयलो भाग सगळ्यांनी डोळे झाकून सोडवलो. फे फे दुसर्याक झालेली दिसता.
मी जरा वायच दुसरो भाग सोडवूचो प्रयत्न करतय हा.
सुट्टी संपल्यार लगेच मास्तरांनी अभ्यास समोर हाडून ठेवलो. काय करतलव? मालवणी तर शिकूची आसा तेवा अभ्यास सोडवून दाखवल्याशिवाय दुसरो पर्यायच नाय. मागचो अभ्यास सोडवताना देवाचा नाव घेवचा लागला होता, एकेक शब्द मालवणीत लिवताना. मास्तरांका नायतर दुसर्या गजालीकरांका सांगून शुद्ध-मराठी ते मालवणी, असो शब्दकोषच बनवून घेवक होयो म्हणजे पुढे मालवणी शिकताना होतलो तो त्रास वायच कमी जायत... ओ गजालीकरानू आमच्या ह्या सुचनेकडे लक्ष देवा बगू.. तर मंडळीनू शब्दकोष आधीच हय बनलेलो आसो. ईच्छुकांनी दर्शन घेवन येवा
परत एकदा प्रयत्न... मराठी चं
परत एकदा प्रयत्न... मराठी चं मालवणीत रुपांतर..
सुट्टी संपल्या मास्तरांनी अभ्यास पुढ्यात हाडान ठेवला. काय करतय? मालवणी शिकूची आसा तर अभ्यास सोडवल्याशिवाय दुसरो पर्याय नाही. मागचो अभ्यास सोडवताना देवाचे नाव घेवाक लागात होता एकेक शब्द मालवणीत लिहिताना. मास्तराक नायतर दुसरे गजालीकराक सांगोन शुद्ध मराठी ते मालवणी असा शब्दकोष बनवूक घेयाला होवा म्हणजे पुढे मालवणी शिकताना त्रास होतलो नाय. गजालीकरानू आमच्या सूचनेकडे लक्ष देवाक.
नवो अभ्यास खय आसा मास्तर?
नवो अभ्यास खय आसा मास्तर?
Pages